मेकॅनिकल इंजिनिअरिंग मधील डिप्लोमा बद्दल माहिती । Mechanical Engineering Diploma Course Information In Marathi 2026 |

मेकॅनिकल इंजिनिअरिंग मधील डिप्लोमा बद्दल माहिती । Mechanical Engineering Diploma Course Information In Marathi 2026 |
Key Points hide
1 Mechanical Engineering Diploma Course Information In Marathi हा कोर्स काय आहे ?

Mechanical Engineering Diploma Course Information In Marathi हा कोर्स काय आहे ?

मेकॅनिकल इंजिनिअरिंगमधील डिप्लोमा हा ३ वर्षांचा पॉलिटेक्निक कोर्स आहे. विद्यार्थी दहावी नंतर याला प्रवेश घेऊ शकतात. या कोर्स मध्ये मेकॅनिकल उपकरणांची रचना, उत्पादन आणि देखभाल या विषयी सविस्तर माहिती शिकवली जाते.

 Mechanical Engineering Diploma Course Information In Marathi यासाठी शैक्षणिक पात्रता कोणती ?

मेकॅनिकल डिप्लोमा यात प्रवेश घेण्यासाठी विद्यार्थ्याला दहावीत किमान ५५% गुण घ्यावे लागतात. आणि इतर प्रवर्गातील जसे की Sc,St या साठी ५% ची सूट दिली जाते.

 Mechanical Engineering Diploma Course Information In Marathi याची ऍडमिशन प्रोसेस ?

  • मेकॅनिकल इंजिनिअरिंग मधील डिप्लोमामध्ये प्रवेश घेण्यासाठी गुणवत्ता यादी किंवा प्रवेश परीक्षा अनिवार्य असतो.
  • मेकॅनिकल इंजिनिअरिंगमधील डिप्लोमासाठी प्रवेश घेण्यासाठी कॉलेज मार्फत प्रवेश परीक्षा घेतली जाते. ती प्रत्येक कॉलेजची वेगळी वेगळी असू शकते.
  • सरकारी किंवा खाजगी महाविद्यालयात विद्यार्थी प्रवेश घेऊ शकतात.
  • तुम्हाला ज्या कॉलेजमध्ये अर्ज करायचा आहे त्या कॉलेजच्या अधिकृत वेबसाइटला भेट द्या आणि ऑनलाइन अर्ज भरा.
  • कॉलेजचा प्रवेश विभाग अर्जाची तपासणी करेल आणि उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांची यादी तयार करेल.
  • यादीत तुमचे नाव आल्यानंतर तुम्ही कॉलेजने निश्चित केलेल्या तारखेला पुढील प्रक्रियेसाठी उपस्थित राहावे.

 Mechanical Engineering Diploma Course Information In Marathi याचा कालावधी

  1. मेकॅनिकल इंजिनिअरिंगमधील पूर्ण वेळ डिप्लोमाचा कालावधी हा ३ वर्षांचा असतो.
  2. तसेच अर्ध वेळ डिप्लोमाचा कालावधी 4 वर्षांचा असतो.

 Mechanical Engineering Diploma Course Information In Marathi याचे विषय

 पहिले सत्र          दुसरे सत्र 
Engineering Mathematics-1 Engineering Mathematics-2
Engineering Physics-1 Engineering Physics-2
English Basic Electrical & Electronics Engineering
Engineering Chemistry and Environmental Studies-1 Engineering Chemistry and Environmental Studies-2
Engineering Mechanics

Engineering Drawing-1

Strength of Material
      – Physics Lab
– Chemistry Lab
 Engineering Drawing-2 Workshop Technology
   
तिसरे सत्र  चौथे सत्र 
Advanced Strength of Material Development of Life Skill-II
Thermal Engineering-I Manufacturing Processes II
Fundamentals of Electronics Theory of Machines & Mechanism
Manufacturing Processes I Thermal Engineering-II
Engineering Materials  Principles of Electrical Engineering
Mechanical Engineering Drawing

Professional Practice-I

Drawing Professional Practice-II
   
पाचवे सत्र  सहावे सत्र 
Fluid Mechanics & Machinery Design of M/C Elements
Advanced Manufacturing Processes Industrial Management
Measurement & Control Elective II (any one): Refrigeration & Air-Conditioning, CAD-CAM & Automation, Material Handling Systems, Alternate Energy Sources & Management
Industrial Project & Entrepreneurship  
Professional Practice-III Fluid Power
Power Engineering Professional Practice-IV
Elective I (any one): Automobile Engineering, Power Plant Engineering, Tool Engineering, Mechatronics Production Management
Computer Programming प्रोजेक्ट General Viva

Mechanical Engineering Diploma Course Information In Marathi याचे कॉलेजेस

मुंबईतील मेकॅनिकल अभियांत्रिकी महाविद्यालयातील शीर्ष डिप्लोमा खालीलप्रमाणे आहेत: कॉलेजची नावे आणि फी खालील प्रमाणे

1. वीरमाता जिजाबाई तंत्रज्ञान संस्था – मुंबई INR 12,800
2. नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट, मुंबई  38,800
3. सरकारी पॉलिटेक्निक, मुंबई 7850
4. श्री भागुभाई मफतलाल पॉलिटेक्निक -मुंबई 130,000
5. नवजीवन एज्युकेशन सोसायटीचे पॉलिटेक्निक, मुंबई  47,100
6. ठाकूर पॉलिटेक्निक, मुंबई 85,100
7.  विवेकानंद एज्युकेशन सोसायटीचे पॉलिटेक्निक –  मुंबई 82,100
8.  अंजुमन-ए-इस्लामचे एआर काळसेकर पॉलिटेक्निक- मुंबई 57,100
9. के.जे. सोमय्या पॉलिटेक्निक मुंबई 24,200
10. इंडियन इन्स्टिट्यूशन ऑफ इंडस्ट्रियल इंजिनिअरिंग, नवी मुंबई 6,300

 Mechanical Engineering Diploma Course Information In Marathi यामध्ये करिअर आणि संधी

  1. मेकॅनिकल इंजिनिअरिंगमधील डिप्लोमा हा या क्षेत्रातील सुरुवात आहे आणि विद्यार्थी या अभ्यासक्रमानंतर उच्च महाविद्यालयात प्रवेश घेऊ शकतात.
  2. या शिक्षणानंतर  दरमहा सुमारे २०,००० रुपयांच्या नोकऱ्या मिळू शकतात.

        Mechanical Engineering Diploma Course Information In Marathi सरकारी नोकऱ्या :

  • यामध्ये नेहमी सरकारी नोकरीसाठी पदभरती निघते ज्या विद्यार्थ्यांनी हा कोर्स पूर्ण केलेला आहे ते विद्यार्थी सरकारी नोकरीसाठी सुद्धा प्रयत्न करू शकता यामध्ये खूप सारे पद उपलब्ध आहेत.

       Mechanical Engineering Diploma Course Information In Marathi खासगी नोकऱ्या

  • सरकारी नोकरी प्रमाणेच खाजगी क्षेत्रातही नोकऱ्यांची संधी उपलब्ध असते. खाजगी कंपन्या वेळोवेळी त्यांच्या गरजेनुसार नोकरीच्या संधी उपलब्ध करून देतात. याची मासिक वेतनही तुमच्या पदक कामाच्या पदानुसार वितरित करतात.

 Mechanical Engineering Diploma Course Information In Marathi हा कोर्स केल्यानंतर पुढील संधी

मेकॅनिकल इंजिनिअरिंग हे नोकरीच्या क्षेत्रातील सर्वात मागणी असलेल्या कौशल्यांपैकी एक आहे आणि मेकॅनिकल इंजिनिअरिंगमधील डिप्लोमा हा या क्षेत्रात प्रवेश    करण्याचा एक सर्वोत्तम मार्ग आहे.
या डिप्लोमा कोर्स नंतर विद्यार्थी बी टेक च्या दुसऱ्या वर्षात किंवा बीइ ला थेट प्रवेश घेऊ शकतो.. बी.टेकनंतर तुम्ही एम टेक ही करू शकत.

 Mechanical Engineering Diploma Course Information In Marathi हा कोर्स का आणि कोणी निवडावा.

  1. अभियांत्रिकी आणि त्याच्याशी संबंध क्षेत्रात आवड असलेल्या उमेदवारांनी हा अभ्यासक्रम घ्यावा.
  2. हार्डवेअर अभियंता म्हणून करिअर करू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांनी या मध्ये प्रवेश घ्यवा .उच्च माध्यमिक स्तरावर गणित आणि भौतिकशास्त्राच्या विविध विषयांचे जसे की मटेरियल,  थर्मोडायनामिक्स,सॉलिड मेकॅनिक्स, उत्पादन डिझाइन इत्यादी विषयांचे ज्ञान असणाऱ्याने विद्यार्थ्यांनी ह्या  अभ्यासक्रमासाठी प्रवेश घ्यावा.
  3. ज्या विद्यार्थ्यांना रोबोटिक्स, ऑटोमोबाईल मॅन्युफॅक्चरिंग किंवा एरोस्पेस अभियांत्रिकीमध्ये करिअर करण्याची इच्छा आहे त्यांनी ह्या कोर्स मध्ये प्रवेश घ्यावा.
  4. ज्या विद्यार्थ्यांना स्वतःचा व्यवसाय सुरू करण्याची इच्छा आहे त्यांनी हा कोर्स करावा. हा कोर्स अशा विद्यार्थ्यासाठी देखील प्रभावी आहे.

ज्यांना तुलनेने कमी काळात मेकॅनिकल अभियांत्रिकीमध्ये प्रमाणपत्र मिळवायचे आहे आणि नोकरी मिळवायची आहे.

 Mechanical Engineering Diploma Course Information In Marathi याबद्दल विचारली गेलेली प्रश्न

मेकॅनिकल इंजिनिअर बनण्यासाठी काय करावे लागते ?

तुमचा कोर्सवर्क थर्मोडायनामिक्स, मेकॅनिक्स, मटेरियल सायन्स आणि यासारख्या बऱ्याच विषयांचा समावेश यामध्ये करण्यात आलेला आहे.
 वरील विषयांचा अभ्यास तुमचे कौशल्य वाढवण्यास मदत करतील आणि तुम्हाला यांत्रिकी शिक्षणामध्ये सर्वोत्तम बनवतील मेकॅनिकल इंजिनीअरिंगमधील शिक्षण पूर्ण करण्यासाठी रेगुलर साठी तीन वर्ष आणि पार्ट टाइम साठी चार वर्षे लागता..

मेकॅनिकल इंजिनिअरिंग डिप्लोमा चांगला आहे का ?

एकविसाव्या शतकातील आधुनिकीकरण पाहता मेकॅनिकल इंजिनिअरिंग केल्यानंतर तंत्रज्ञान आणि उत्पादन क्षेत्रात कामगार वर्गास अनेक नोकऱ्या आहेत. आणि कामगार वर्गांची मागणी ही जास्त आहे
मेकॅनिकल इंजीनियरग मध्ये डिप्लोमा केल्यानंतर भविष्यामध्ये पुढे अनेक नोकरीच्या संधी प्राप्त होतात किंवा मिळू शकतात

मेकॅनिकल इंजीनियरिंग डिप्लोमा म्हणजे काय ?

मेकॅनिकल इंजिनीरिंग मधील डिप्लोमा हा तीन वर्षाचा कोर्स आहे.
ज्यामध्ये मेकॅनिकल सिस्टीम थर्मो डायनामिक्स मटेरियल सायन्स आणि इंजीनियरिंग डिझाइन अशा विषयाचे शिक्षण दिले जाते ज्याने पुढे चालून इंजिनिअरिंग क्षेत्रामध्ये तुम्ही अत्यंत परिपूर्ण बनवू शकता.

मेकॅनिकल इंजिनीरिंग डिप्लोमामध्ये किती विषय असतात ?

वेगवेगळ्या पदांसाठी वेगवेगळे विषय असतात असे एकूण जवळपास 30 ते 35 विषय असतात.

बारावीनंतर डिप्लोमा २ वर्षांनी होतो का ?

दहावीनंतर ऍडमिशन घेणाऱ्यांसाठी हा कोर्स तीन वर्षांचा आहे आणि बारावीनंतर ऍडमिशन घेणाऱ्यांसाठी काही ठिकाणी दोन वर्षांचा आहे .

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Post