दहावी किंवा बारावीनंतर लवकरात लवकर एखादं कौशल्य शिकून नोकरी करायची असेल, तर Certificate in Diesel Mechanics हा एक उपयुक्त पर्याय ठरू शकतो. हा कोर्स विशेषतः त्या विद्यार्थ्यांसाठी आहे ज्यांना इंजिन, मशीन आणि प्रत्यक्ष कामाची आवड आहे.
Certificate In Diesel Mechanics हा कोर्स किती उपयुक्त आहे ?
नमस्कार मित्रांनो Certificate In Diesel Mechanics details हा एक बेसिक म्हणजेच एकदमच दहावीनंतरचा किंवा १ २ वि नंतर लगेच संपणारा एक वर्षांचा अभ्यासक्रम आहे त्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे अलाइनमेंट किंवा ॲडजस्टमेंट करणे डिझेलवर जे उपकरण चालतं त्याचं ॲडजस्टमेंट करणे डिझेलच्या ज्या मशनरी आहेत त्यांचा मेंटेनन्स ठेवणं आणि ते ऑपरेट करणे आणि इतर अजून याच प्रकारची सर्व कामे असतात.
त्यानंतर काही कामे अशी असतात की म्हणजे उदाहरणार्थ
- पंप ऑपरेटर,
- टूल ऑपरेटर,
- ऑटोमोबाईल मेकॅनिक,
- इंजिन मेकॅनिक आणि हि कामे असतात.
हा कोर्स त्यांच्यासाठी खूप महत्त्वाचा आहे ज्यांना पुढे जाऊन Diesel Mechanics मध्येच आपले करिअर किंवा फ्युचर घडवायचे आहे.
आता या कोर्समध्ये विद्यार्थी तो सगळ्या प्रकारचे स्किल्स असतील जे डिझेल मेकॅनिक्स बनण्यासाठी लागतात जे महत्त्वाचे असतात जे शिकल्यानंतर तो एकदम परफेक्टली ट्रेन होईल अशा प्रकारचे सर्व स्कीन तो शिकतो जसे की वेल्डिंग असेल किंवा हिट ट्रीटमेंट असेल किंवा बेसिक इलेक्ट्रिसिटी ड्रिलिंग ऑपरेशन मेंटेनन्स किंवा लेथ मशीन वर वर्किंग करणे किंवा डिझेल इंजिन संदर्भाची काही कामे असतील ते तो सर्व काही शिकून घेतो.
जेव्हा हा कोर्स कम्प्लीट होईल त्यानंतर विद्यार्थी वेगवेगळ्या क्षेत्रात करिअर करू शकतो उदाहरणार्थ इंजिन मेकॅनिक असेल किंवा मशीन ऑपरेटर असेल पंप ऑपरेटर असेल टूल ऑपरेटर असेल किंवा डिझेलचे कृषी कुठल्या मशीनरीज असतील कृषी मशीनरीचा असेल त्या सर्व प्रकारचे मशीन आणि तो हँडल करू शकतो वर्क करू शकतो रिपेअर करू शकतो.
यांनतर मिळणारे फायदे
तर आपण पुढचा मुद्दा बघूया की हा कोर्स आपल्याला काय करायचा आहे आपल्याला ह्या कोर्स केल्यानंतर मिळणारे फायदे त्यामधून लागणारे जॉब आणि पुढचं भविष्य जे काय असेल ते इथे मी सांगण्याचा प्रयत्न करतो Certificate In Diesel Mechanics details
हा कोर्स केल्यानंतर आपल्या भविष्यातल्या जॉबच्या खूप मोठा संधी जसे इंजिन मेकॅनिक मशीन ऑपरेटर पंप ऑपरेटर ऑटोमोबाईल मेकॅनिक किंवा गाड्यांचे मेकॅनिक असेल ज्या डिझेलच्या गाड्या असतील डिझेल वाहतूक मालगाड्या असतील त्याचा मेकॅनिक होण्याचे संधी मिळते.
या डिझेल संदर्भातल्या खूप मोठ्या कंपन्या आहेत त्यांना सतत रिक्रुटमेंट किंवा आपले भरती करण्यासाठी या जॉब साठी सततच आपल्याला विद्यार्थी लागतात तर असे ट्रेंड विद्यार्थी ही कंपनी सतत रिक्वायरमेंट मध्ये असते त्यामुळे आपल्याला तिथेही खूप मोठी चांगली संधी मिळू शकते.
हा कोर्स केल्यानंतर आपल्याला डिझेल मेकॅनिक्सची सर्टिफिकेट मिळून जाईल हेच सर्टिफिकेट आपल्याला सगळीकडे काम मिळते आपल्याला आपल्याला थर्टिकल आणि प्रॅक्टिकल अशा दोन्ही प्रकारचे नॉलेज यामध्ये मिळून जाईल.
आपण आता सगळ्यात महत्त्वाच्या महत्त्वाच्या मुद्द्याकडे येऊया ते म्हणजे डिझेल मेकॅनिक्सचा पगार तर या डिझेल मेकॅनिक्स ना खूप चांगल्या प्रकारचा इन्कम मिळू शकतात ते म्हणजे महिना 50 ते 60 हजार स्कल मेकॅनिकला मिळू शकता.
यामध्ये पूर्ण कोर्स करतात आणि त्यानंतर अप्रेंटिसशिप म्हणून रुजू होतात त्यावेळेस त्यांना पंधरा ते वीस हजार पगार मिळू शकतो आणि जसे जसे ते ट्रेन आणि अनुभवी होत जातील तसं तसं पगार वाढत जातो तो एक लाख रुपये पर्यंत सुद्धा जाऊ शकतो.
डिझेल मेकॅनिक हा कोर्स हा खूप महाड नाहीये त्याची फी सर्वसाधारणपणे पंधरा ते वीस हजार पर्यंत असू शकते किंवा थोडी कमी जास्त ही होऊ शकते परंतु बाकी इतर सर्व कोर्सेस पेक्षाही खूप कमी आहे.
Certificate In Diesel Mechanics कोर्सचा हेतू
विद्यार्थ्यांना डिझेल इंजिनचे भाग, त्यांची दुरुस्ती (Repairing) आणि देखभाल (Maintenance) करण्याचे तांत्रिक कौशल्य शिकवणे. इंजिन थिअरी, फ्युएल सिस्टीम, इलेक्ट्रिकल सिस्टीम आणि वर्कशॉप कॅल्क्युलेशन. यात पुस्तकी ज्ञानापेक्षा ‘हँड्स-ऑन ट्रेनिंग’ म्हणजेच प्रत्यक्ष इंजिनवर काम करण्यावर जास्त भर दिला जातो.
याची सविस्तर माहिती पहा
Diesel Mechanics हा कोर्स किती कठीण आहे ?
हा कोर्स फारसा कठीण नाही. जर तुम्हाला हाताने काम करायला (Practical Work) आवडत असेल आणि मशिनरीचे भाग कसे जोडायचे यात रस असेल, तर तुम्ही हा कोर्स सहज पूर्ण करू शकता. थोडी मेहनत आणि तांत्रिक समज असेल तर हा विषय अतिशय रंजक आहे.
या कोर्सचे ऍडमिशन असतील ते पूर्णपणे मेरिट म्हणजेच आपल्या गुणांवर आधारित असतात म्हणजेच 50 टक्के हे दहावी अथवा टेन प्लस टू म्हणजेच बारावी किंवा त्यासारखीच परीक्षा मध्ये पास झाल्यानंतर असतात.
काही संस्था या दहावीनंतर दहावी पास झालेल्या विद्यार्थ्यांना पण घेतात. आणि त्यांनाही हा कोर्स शिकण्याची परवानगी मिळते.
आपल्याला कोर्सला प्रवेश घेण्यासाठी आपण संबंधित शैक्षणिक संस्थेच्या ऑफिशियल वेबसाईट वर जाऊन ऍडमिशन प्रोसेस करावी किंवा ऍडमिशन फॉर्म्स भरावीत किंवा त्या इन्स्टिट्यूशनच्या ऑफिसला जाऊनच आपण ऍडमिशन घ्यावेत. त्यानंतर एप्लीकेशन फॉर्म भरावेत त्यानंतर कॉलेज जे काय असेल ते चेक करावे आणि त्यासाठी गरज असणारे डॉक्युमेंट जे असतील ते सगळे सबमिट करावे.
वेबसाईटला भेट देऊन किंवा पर्सनली किंवा ऑफिसला कॉन्टॅक्ट करून याबद्दल संपूर्ण माहिती विचारून घ्यावी सर्व माहितीही गुगलवर अवेलेबल आहे तर वेबसाईट कॉलेजच्या WEBSITE वर सर्व चेक करावे.
त्यानंतर जेव्हा हे सगळे ॲप्लिकेशनची प्रोसेस होईल त्यावेळेस एंट्रन्सचा टेस्ट कोर वगैरे बघून ते आपली मेरिट लिस्ट आणि क्वालिफाईड विद्यार्थी ची लिस्ट लावली जाईल त्यानुसार आपण जे सिलेक्टेड असतील त्यांनी अकाउंटला फीज जमा करून प्रवेश प्रक्रिया पूर्ण करावी.
- आता या संपूर्ण एंट्रन्स आणि ऍडमिशन प्रोसिजर मध्ये काही गोष्टी महत्वाच्या आहेत एकदा त्याबद्दल चर्चा करू या.
- काही विद्यार्थी ज्यांना प्रवेश घ्यायचा आहे त्या विद्यार्थी ना सायन्स STREAM मधून असावेत त्यानंतर त्यांचे कुठलेही बॅक लॉग किंवा काही विषय राहिलेले असू नयेत.
- दहावीनंतरचे काही विद्यार्थी असतील किंवा बारावी नंतरचे ते परीक्षा पास होऊन 50% कमीत कमी मार्कांसह उत्तीर्ण झालेले असावेत तरच त्यांना प्रवेश दिला जाईल.
- तसेच प्रत्येक संस्थेच्या स्वतःच्याही काही नियम अति व शर्ती असतात त्या ही आपण खातरजमा करून एप्लीकेशनच्या अगोदर हे सगळं माहीत करून घेण खूप गरजेच आहे.
- आता काही Scheduled Castes (SC), Scheduled Tribes (ST), Other Backward Classes (OBC), and Economically Weaker Sections (EWS) किंवा आर्थिक किंवा शैक्षणिकदृष्ट्या मागास विद्यार्थी असतील.
- त्यांना आपले जे प्रमाणपत्र असतील उदाहरणार्थ कास्ट सर्टिफिकेट असेल किंवा एलिजिबिलिटी सर्टिफिकेट असेल किंवा नानक्रीमियर सर्टिफिकेट असेल किंवा इतर काही जे आपले सर्टिफिकेट असतील, त्यांच्याकडे जे प्रमाणपत्र असतील त्यांनी ते ऍडमिशनच्या प्रोसिजरच्या वेळेस आपल्याला लाभ घेण्यासाठी तिथं द्यायचे आहेत. Certificate In Diesel Mechanics details
पात्रता निकष आणि ॲडमिशन प्रोसेस (Eligibility & Admission)
महाराष्ट्रात प्रामुख्याने ITI (Industrial Training Institute) मार्फत हा कोर्स चालवला जातो.
पात्रता:
-
विद्यार्थी किमान १० वी उत्तीर्ण असावा.
-
वयोमर्यादा साधारणपणे १४ ते ४० वर्षांच्या दरम्यान असावी.
ॲडमिशन प्रोसेस (प्रवेश प्रक्रिया): महाराष्ट्रात ‘DVET’ द्वारे ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया राबवली जाते. १० वीच्या गुणांच्या आधारावर गुणवत्ता यादी (Merit List) तयार केली जाते.
तुमच्याकडे १० वीची मार्कशीट आणि शाळा सोडल्याचा दाखला असणे आवश्यक आहे. तुमच्या जिल्ह्यातील सरकारी किंवा खाजगी ITI कॉलेजची यादी तपासा. MahaITI च्या पोर्टलवर ऑनलाइन अर्ज भरावा लागतो. साधारणपणे सर्टिफिकेट कोर्ससाठी मोठी प्रवेश परीक्षा नसते, पण काही खाजगी संस्था स्वतःची छोटी टेस्ट घेऊ शकतात. तुमचे १० वीचे गुण जितके चांगले, तितकी सरकारी कॉलेज मिळण्याची शक्यता जास्त. निवड झाल्यावर तुम्हाला मूळ कागदपत्रे घेऊन कॉलेजमध्ये पडताळणीसाठी जावे लागते.
Mechanical Engineering Diploma Course बद्दल माहिती
Certificate In Diesel Mechanics details कोर्सचा कालावधी:
डिझेल मेकॅनिक सर्टिफिकेट कोर्स चा कालावधी हा एक वर्षाचा असतो त्यामध्ये दोन सेमिस्टर मध्ये त्याची विभागणी केलेली असते प्रत्येक सेमिस्टर हे सहा सहा महिन्यांच्या असते.
डिझेल मेकॅनिक्स या कोर्सचा सिलॅबस तर या कोर्समध्ये विषय आहेत ते पुढील प्रमाणे:
- हायड्रोलिक सिस्टिम्स
- ऑपरेशनल सेफ्टी
- बेसिक कॉम्प्युटर्स स्किल्स
- हॅन्ड अँड पावर टूल्स
- कटिंग टूल्स
- प्रॅक्टिकल स्किल
पात्रता निकष आणि ॲडमिशन प्रोसेस (Eligibility & Admission)
हा कोर्स कोणासाठी योग्य आहे व कोणासाठी नाही ?
कोणासाठी योग्य: ज्यांना बसून काम करण्यापेक्षा फिरून किंवा वर्कशॉपमध्ये काम करायला आवडते. ज्यांना यंत्रांची आवड आहे.
कोणासाठी नाही: ज्यांना तांत्रिक कामात रस नाही किंवा ज्यांना धुळ, तेल आणि कष्टाच्या कामाची आवड नाही.
कोर्सची रचना
हा कोर्स साधारणपणे १ वर्षाचा असतो, जो दोन सेमिस्टरमध्ये विभागलेला असतो.
यात तुम्ही काय शिकता ?
तुम्ही इंजिन डिस्मेंटल करणे (उघडणे), दोष शोधणे (Fault Finding) आणि ते पुन्हा जोडणे शिकता.
Diesel Mechanics टॉपचे कॉलेजेस
| मुंबई | पुणे | अहिल्यानगर | रायगड |
|
आग्नेल इंडस्ट्रियल ट्रेनिंग इन्स्टिट्यूट
|
संकल्प आयटीआय इन्स्टिट्यूट | न्यू महाराष्ट्र व्होकेशनल ट्रेनिंग सेंटर | लोकमाता अहिल्यादेवी होळकर एज्युकेशनल अँड इन्स्टिट्यूट |
| ए आय टी आय ( Fr. Agnel Private Industrial Training Institute) | विश्वनाथ आयटीआय | – | – |
| NCVT अप्रुड इन्स्टिट्यूट | – | – | – |
Diesel Mechanics details करियर आणि संधी:
तर यामधील काही टॉपचे करिअर ऑप्शन्स जे आपण निवडू शकतो:
| मटेरियल हॅण्डलर | मटेरियल हॅण्डलर असतात ते मुख्य म्हणजे प्रोडक्शन निर्मिती आणि डिस्ट्रीब्यूशन या डिपार्टमेंट सांभाळतात. त्यांच्यावर मोठी रिस्पॉन्सिबिलिटी किंवा जबाबदारी असते की MATERIAL IDENTIFY करणे,
लेबल करणे आणि मटेरियल सप्लायर च्या स्टॉक मध्ये ठेवणे. |
त्यांच्या मंथली सॅलरीज किंवा पॅकेज बद्दल आपण बोलूया तर त्यांना इयरली पॅकेज सर्वसाधारणपणे दीड ते दोन लाख या प्रमाणात असते.
|
| पंप ऑपरेटर | कुठलेही द्रव पदार्थ किंवा गॅस वाहून नेण्यासाठी पाईप सिस्टीम आणि पंप यांची गरज असते आणि प्रत्येक ठिकाणीच याची गरज असते तर पंप ऑपरेटर हे स्टेशनरी किंवा पोर्टेबल जे पंप असतात त्यावर काम करतात.
त्यांचा मुख्य काम म्हणजेच लिक्विड म्हणजे द्रव पदार्थ असतील किंवा जे पावडर मटेरियल असेल किंवा गॅस जे असतील ते वाहून नेणे. त्या साठी पंप चालू ठेवणे किंवा त्या पंपाचा इन्स्पेक्शन, इक्विपमेंटचे इन्स्पेक्शन असेल स्ट्रक्चर बनवणे किंवा मटेरियल फंक्शन चालू असणे हे खूप इम्पॉर्टंट काम आहे. |
त्यांचा पगार साधारणपणे दीड लाख ते पावणेदोन लाख इथपर्यंत असतो. |
| ऑटोमोबाईल मेकॅनिक: | आता जो सगळ्यात मागणी असणारे आणि प्रॉमिसिंग करिअर हे ऑटो मोबाईल मेकॅनिक हे आहे तर ऑटोमोबाईल मेकॅनिक मुख्य काम म्हणजे जे वाहन असतील त्यांचे देखभाल करणे त्यामध्ये काही अडचणी असतील तर ते सोडवणे, सर्विसिंग करणे, मेंटेनन्स ठेवणे, सगळ्या मशीन स्मूदली चालू ठेवणे ही त्यांची मुख्य जबाबदारी असते.
अनुभवी ऑटोमोबाईल मेकॅनिकची सध्याच्या काळात गॅरेजमध्ये किंवा इतर सर्व ठिकाणी खूपच गरज आहे अनुभवी जे त्या कामांमध्ये खूप तयार झालेले आहेत त्यांच्याकडे प्रॉब्लेम सॉल्विन क्षमता असतात त्यामुळे ते खूप लवकर मशीन मधील किंवा इंजिन मधील प्रॉब्लेम समजून घेऊ शकतात नुसते आवाजाने किंवा इंजिन मध्ये होणारे knocking मुले त्यांना तो प्रॉब्लेम समजतो आणि ते लवकरात लवकर तो सोडवतात त्यामुळे त्यांना नक्कीच सर्व ठिकाणी जास्त मागणी आहे . |
मोठमोठे गॅरेज असतील किंवा शोरूम असतील यामध्ये या ऑटोमोबाईल मेकॅनिकला सदैव मागणी असते त्यामुळेच त्यांचा पगार सर्वसधारण सर्वसाधारणपणे चार लाख ते पाच लाख पर्यंत जाते. |
| मशीन ऑपरेटर | यांचा मुख्य काम हे अवजड मशीन चे सर्व काम म्हणजे त्यांचे कॅलिब्रेशन करणे. अवजड मशीन मेंटेनन्स ठेवणे, त्यांच्या रेगुलर टेस्टिंग करणे असते . मशीनमध्ये काय अडचणी असतील त्या संपूर्ण व्यवस्थित करणे आणि डाटाबेस अपडेट करत राहणे मशीनचे कॅलिब्रेशन करणे. |
यांना सर्वसाधारणपणे पगार हा दोन ते तीन लाखापर्यंत येऊ शकतो अनुभवी मशीन ऑपरेटरना यापेक्षा जास्त पगार असू शकतो. |
| इंजिन मेकॅनिक | इंजिन मेकॅनिकचे सर्वात महत्त्वाचं काम म्हणजे जे डिझेल पावर इंजिन अवजड वाहनामध्ये असेल ज्यामध्ये डिझेल एंजिने आहेत त्यांचा सर्व मेंटेनन्स ठेवणे,
त्यांचे टेस्ट ड्राइविंग करणे, इंजिन चेक करणे, परफॉर्मन्स आणि मेंटेनन्स ठेवणे, वेहिकल एंजिन मध्ये काय प्रॉब्लेम असेल तर ते दुरुस्त करणे आणि रिप्लेस आणि रिपेअर करणे. |
यांचेही सर्वसाधारण मागणी जास्त असते त्यामुळे यांनाही चार ते पाच लाखापर्यंतचा पगार मिळू शकतो हे सर्व अनुभवावर आधारित आहे अनुभवी मेकॅनिकल चांगला पगार मिळू शकतो. |
Certificate Diesel Mechanics हा कोर्स केल्यानंतर संधी
तर तर सर्टिफिकेट डिझेल मेकॅनिक कोर्समध्ये आपण टेक्निकल केले शकतो पण टेक्निकल स्किल शिकल्यामुळे आपल्याला प्रॅक्टिकल Knowledge खूप येऊन जातो त्यामुळे प्रॅक्टिकल गोष्टी करताना आपण कुठेही अडचण येत नाही त्यामुळे स्टुडंट ना स्कील आणि नॉलेज हे मेकॅनिक बद्दल मेकॅनिक्स मधील सर्व नॉलेज आहे मिळून जातात त्यानंतर जिथे कुठे इंजिन बेस्ट आहेत किंवा ऑपरेशन बेस्ट जे आहेत त्यामध्ये विद्यार्थ्यांना नॉलेज येऊन जातं त्याचा उपयोग पुढे भविष्यामध्ये होऊ शकतो.
यासोबतच विद्यार्थी बाकीचे इतर स्किल शिकतात जे आपल्याला इतर ठिकाणी उपयोगी येतात जसे की वेल्डिंग असेल किंवा हिट ट्रीटमेंट असेल किंवा बेसिक इलेक्ट्रिसिटी असेल ड्रिलिंग असेल ऑपरेशन आणि मेंटेनन्स जे असेल ते आणि मेकॅनिकल नॉलेज येऊन जाते. Certificate In Diesel Mechanics details
त्यानंतर काही ज्या टॉपच्या कंपनी असतील त्यामध्ये जॉब रोल असतात त्यामध्ये तर ऑटोमोबाईल मॅन्युफॅक्चरिंग कंपनीज असतील किंवा इंजिन रिपेअर कंपनीज, पंप ऑपरेशन, किंवा मशीन ऑपरेशन, असेम्ब्ली लाईन त्यामध्ये आपल्याला काम करण्याची संधी मिळते.
डिझेल मेकॅनिकचा पगार हा अनुभव, शहर आणि कौशल्यावर अवलंबून असतो.
सुरुवातीला अप्रेंटिसशिप दरम्यान
₹12,000 – ₹20,000 पर्यंत पगार मिळू शकतो.
अनुभव वाढल्यानंतर
₹25,000 – ₹40,000 किंवा त्याहून अधिक पगार मिळण्याची शक्यता असते.
कमी मार्क्स असल्यास हा कोर्स करावा का ?
नक्कीच! हा कोर्स गुणांपेक्षा तुमच्या ‘कौशल्यावर’ (Skill) आधारित आहे. जर तुम्हाला १० वीत कमी मार्क्स असतील तरीही तुम्ही तांत्रिक क्षेत्रात आपली प्रगती करू शकता.
सरकारी व खाजगी नोकऱ्या (Career Options)
या क्षेत्रात नोकरीच्या अनेक संधी उपलब्ध आहेत:
सरकारी क्षेत्र: भारतीय रेल्वे, MSRTC (एसटी), संरक्षण दल (Army/Navy), महानगरपालिका वाहतूक सेवा.
खाजगी क्षेत्र: टाटा मोटर्स, महिंद्रा, अशोक लेलँड, खासगी गॅरेज आणि सर्व्हिस सेंटर्स.
मुख्य नोकरी कंपन्या
महिंद्रा अँड महिंद्रा, आयशर, कमिन्स इंडिया, आणि विविध ट्रॅक्टर कंपन्या.
सरासरी पगार
सुरुवातीला पगार १०,००० ते १५,००० रुपये असू शकतो, जो अनुभवानुसार वाढतो.
Certificate In Diesel Mechanics न या कोर्सनंतर पुढील पाऊल काय असावे ?
सर्टिफिकेट पूर्ण झाल्यावर लगेच नोकरी करण्यापेक्षा १ वर्ष ‘Apprenticeship’ पूर्ण करा. त्यानंतर तुम्ही ‘CITS’ कोर्स करून ITI मध्ये शिक्षक (Instructor) देखील होऊ शकता. जर तुम्हाला लवकर नोकरी, प्रत्यक्ष कौशल्य आणि भविष्यात स्वतःचं काम उभं करायचं असेल, तर डिझेल मेकॅनिक सर्टिफिकेट हा एक व्यवहार्य पर्याय ठरू शकतो. पण निर्णय घेण्याआधी तुमची आवड, कष्ट करण्याची तयारी आणि दीर्घकालीन उद्दिष्ट यांचा नक्की विचार करा.
One response to “Certificate In Diesel Mechanics कोर्स । दहावीनंतर करियर पर्याय”
[…] Certificate In Diesel Mechanics कोर्स काय आहे ? […]