BSc Geology कोर्सची संपूर्ण माहिती 2026 | अभ्यासक्रम, करिअर आणि संधी

BSc Geology कोर्सची संपूर्ण माहिती 2026 | अभ्यासक्रम, करिअर आणि संधी
Key Points hide

BSc Geology कोर्स काय आहे ?

बीएससी जिऑलॉजी किंवा बीएससी भूगर्भशास्त्र किंवा भूगर्भशास्त्रातील सायन्स डिग्री हा एक पृथ्वी विज्ञानावर केंद्रित असलेला तीन वर्षांचा पदवीपूर्व स्तरावरील पदवी अभ्यासक्रम आहे या अभ्यासक्रमामध्ये खडक, खनिजे इतर घनपदार्थ त्यांची रचना, त्यांचा इतिहास आणि त्यांच्याशी संबंधित इतर प्रक्रियांचा अभ्यास केला जातो.

जर तुम्हाला भूगर्भ, पृथ्वीचे रचना, डोंगरदर्‍या, खनिजे, आणि नैसर्गिक संसाधने यांबद्दल कुतूहल असेल आणि आवड असेल तर तुम्ही बीएससी जिओलॉजी हा एक उत्तम कार्य करिअर पर्याय बनवू शकता.

या अभ्यासक्रमामध्ये सहा सत्र असतात म्हणजेच सहा सेमिस्टर असतात त्यामध्ये पर्यावरण विज्ञान, पृथ्वी विज्ञान, खनिज विज्ञान, इतर नैसर्गिक संसाधने जसे की पाणी, पेट्रोलियम, नैसर्गिक वायू, नैसर्गिक खनिजे. त्यांची स्थिती उपस्थिती तसेच त्यांचे शोधणे आणि एक्सट्रॅक्शन या सर्वांचा समावेश होतो.

BSc Geology याचा कालावधी

सामनता हा तीन वर्षांचा पदवी अभ्यासक्रम आहे

याचा हेतू

त्या कोर्स आहे तो हा विद्यार्थ्यांना पृथ्वीच्या संरचनेची आणि नैसर्गिक संसाधनाच्या शोधाची टेक्निकल इन्फॉर्मेशन देतो.

याचे मुख्य विषय

याचे मुख्य विषय हे मिनरलॉजी पेट्रोल लॉजी स्ट्रक्चरल जिओलॉजी आणि पॅलेंटोलोजी हे आहेत.

याची अध्ययन पद्धत

यामध्ये थेअरी सोबतच फिल्ड वर्क म्हणजे प्रत्यक्ष जमिनीवर जाऊन अभ्यास करण्याला खूप महत्त्व आहे.

BSc Geology यासाठी शैक्षणिक पात्रता कोणती ?

हा कोर्स करण्यासाठी तुम्हाला विज्ञानाचे बॅकग्राऊंड असणे गरजेचे आहे म्हणजेच बारावी मध्ये सायन्स बॅकग्राऊंड असणे गरजेचे.

BSc Geology  याची पात्रता

बारावी विद्यार्थी बारावी सायन्स उत्तीर्ण असावा

 यासाठी कमीत कमी लागणारे गुण

खुल्या प्रवर्गासाठी किमान 50% आणि राखीव प्रवर्गासाठी 45% गुण असणे आवश्यक आहे.

याची वयोमर्यादा

या कोर्स साठी कुठलीही वयोमर्यादा नाही.

याचा प्रवाह

यामध्ये साधारणपणे बारावी मध्ये फिजिक्स केमिस्ट्री आणि मॅथेमॅटिक्स किंवा बायोलॉजी हे विषय असणे फायद्याचे ठरते.

BSc Geology याची ऍडमिशन प्रोसेस

महाराष्ट्रातील बहुतांश सरकारी आणि खाजगी कॉलेजेस मध्ये प्रवेश प्रक्रिया ही गुणवत्तेवर मेरिट लिस्ट किंवा प्रवेश परीक्षा आधारित होते.

BSc Geology याची पात्रता चेक करा

तुम्ही तुमचे बारावीचे मार्क्स तपासात असेच तुमच्या आवडत्या कॉलेजची लिस्ट बनवा व त्याचे गेल्या वर्षीचे कट ऑफ चे मार्क चेक करा आणि तुम्ही कुठे आहेत याचा तपास करा.

 याचे कॉलेज निवडा

तुम्ही शहरांमध्ये पुन्हा मुंबई सारख्या शैक्षणिक हाफ मध्ये चांगली कॉलेजेस शोधा त्यांची लिस्ट बनवा.

यासाठी अर्ज करा

कॉलेजच्या अधिकृत वेबसाईटवर जाऊन ऍडमिशन फॉर्म भरा.

याची प्रवेश परीक्षा

काही नामांकित विद्यापीठे स्वतःची एन्ट्रान्स एक्झाम घेतात तर काही ठिकाणी थेट बारावीच्या गुणांवर आधारित प्रवेश मिळतो.

यात गुण मिळवा

यामध्ये चांगले मार्क्स मिळवा गेल्या वर्षीच्या कट ऑफला क्रॉस करण्याचा प्रयत्न करा.

 याचे डॉक्युमेंट वेरिफिकेशन

आपण मेरिट लिस्ट मध्ये आल्यानंतर फी भरून प्रवेश निश्चित करा तसेच त्यासाठी दहावी बारावीचे मार्कशीट टीसी आणि कार्ड सर्टिफिकेट गरज असल्यास तयार ठेवा.

BSc Geology याचा कालावधी

हा कोर्स सेमिस्टर मध्ये विभागलेला असतो.

BSc Geology याची रचना

या कोर्समध्ये प्रत्येक वर्षात दोन सेमिस्टर असतात पहिल्या वर्षी मूलभूत गोष्टी आणि शेवटच्या वर्षी पुरोवरसेवक विषयांकडे लक्ष दिले जाते तसेच फील्ड वर्क देखील महत्त्वाचे असते.

यात तुम्ही काय शिकता

यामध्ये तुम्ही खडकांचे प्रकार ओळखायला शकता मॅप रीडिंग शकता आणि सॅटेलाईट इमेजरीचा अभ्यास करायला शकता तसेच नैसर्गिक संसाधने व त्यांचा शोध घेणे या गोष्टी शिकता.तसेच हा कोर्स तुम्हाला निसर्गाचे आणि भूकंप ज्वालामुखी सुनामी तसेच इतर अनेक नैसर्गिक घटनांबद्दल ते कसे करतात त्यांचे परिणाम इत्यादी बद्दल उत्तम ज्ञान प्रदान करतात.

BSc Geology  याचे विषय आणि अभ्यासक्रम

आपण याचा सिलॅबस पाहूया:

सेमिस्टर वन सेमिस्टर टू
  • अर्थ सिस्टीम सायन्स
  • मिनरल सायन्स
  • कम्युनिकेटिव्ह इंग्लिश
  • GE १
  • एलिमेंट्स ऑफ जिओ केमिस्ट्री
  • स्ट्रक्चरल जिओलॉजी
  • एन्व्हायरमेंटल सायन्सएन्व्हायरमेंटल सायन्स
  • GE 2
सेमिस्टर थ्री सेमिस्टर फोर
  • इंजिनीयर पेट्रोलॉजी
  • सेडीमेंट्री पेट्रोल लॉजी
  • पेलेंटोलोजी
  • फील्ड वर्क वन
  • GE 3
  • मेटामोर्फिक पेट्रोलॉजी
  • स्ट्रॅटिग्रफिक प्रिन्सिपल्स अँड इंडियन स्ट्रॅटिग्राफी
  • हायड्रोजिओलॉजी
  • फिल्ड वर्क टू
  • GE 4
सेमिस्टर फाईव्ह सेमिस्टर six
  • इकॉनोमिक जिऑलॉजी
  • Geomorphology
  • इलेक्टिव्ह1
  • इलेक्टिव्ह टू
  • इंजिनिअरिंग जिओलॉजी
  • रिमोट सेन्सिंग अँड जीआयएस
  • इलेक्टिव्ह थ्री
  • इलेक्टिव्ह फोर

BSc Geology यामधील प्रॅक्टिकल्स

त्यामध्ये खडकेच्या नमुनाचे प्रयोगशाळेमध्ये निरीक्षण करणे आणि फील्ड विजिट समाविष्ट असते.

 प्रथम वर्षात काय शिकण्यास मिळते ?

पृथ्वीच्या बाह्य स्वरूपाचा आणि खनिजांचा प्राथमिक अभ्यास.

शेवट वर्षात काय शिकण्यास मिळते ?

खनिज शोध मायनिंग आणि भूगर्भातील पाणी व्यवस्थापन तसेच नैसर्गिक वायू नैसर्गिक पेट्रोल डिझेल आणि खनिज तेल यांचा शोध घेणे यावर फोकस असतो.

BSc Geology याचे कॉलेजेस

याचे कॉलेजेस आपण पाहूया:

  • गव्हर्नमेंट इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स जीआयएस छत्रपती संभाजीनगर
  • गोपाळ कृष्ण गोखले कॉलेज कोल्हापूर
  • कवयित्री बहिणाबाई चौधरी नॉर्थ महाराष्ट्र युनिव्हर्सिटी
  • कोहिनूर आर्ट्स कॉमर्स अँड सायन्स कॉलेज खुलताबाद छत्रपती संभाजीनगर
  • नवरोसजी वाडिया कॉलेज पुणे
  • भारतीय महाविद्यालय अमरावती
  • फर्ग्युसन कॉलेज पुणे महाराष्ट्र
  • के एस टी एम कॉलेज नाशिक
  • देवगिरी कॉलेज छत्रपती संभाजीनगर

BSc Geology सर्व कॉलेजेस चे सरासरी शुल्क

सरकारी कॉलेजमध्ये कमी फी असते तर खाजगी कॉलेजेस मध्ये पन्नास हजार ते एक लाख पर्यंत दरवर्षीसाठी शुल्क जाऊ शकते.

मध्ये प्लेसमेंट साठी काय करावे ?

शेवटच्या वर्षात नामांकित कंपन्यांच्या कॅम्पस इंटरव्यू साठी तयारी करणे गरजेचे आहे.

BSc Geology यामध्ये करिअर आणि संधी

भूगर्भशास्त्रामध्ये करिअरच्या खूप मोठ्या आणि चांगल्या प्रकारच्या संधी उपलब्ध आहे.
त्यामधील काही नोकऱ्या प्रोफाइल त्यांचे वर्णन आणि सरासरी पगार दिलेले आहेत ते आपण पाहूया.:

पेलेंटोलॉजिस्ट पेलेंटोलॉजिस्ट म्हणजे असे शास्त्रज्ञ जे नामशेष झालेल्या वनस्पती आणि प्राण्यांच्या प्रजातींच्या जीवाश्मनचा अभ्यास करतो. ते प्रयोगशाळा मध्ये काम करतात संस्थांमध्ये शिकवू शकतात. पगार पाच ते सात लाख रुपये
जिओलॉजिस्ट भूगर्भ शास्त्रज्ञ म्हणजे शास्त्रज्ञ जे पृथ्वी आणि इतर स्थानीय ग्रहांच्या रचनेतील विविध घटकांचा अभ्यास करतात स्थळांवर प्रवास करतात नमुने गोळा करतात संशोधन करतात आणि डेटाचे अनालिसिस करतात. पगार सहा ते आठ लाख रुपये
पेट्रोलियम जिऑलॉजिस्ट पेट्रोलियम भूगर्भ शास्त्रज्ञ हे पेट्रोलियम क्षेत्रामध्ये काम करतात ते पृथ्वी गाडले गेलेल्या तेल पेट्रोलियम नैसर्गिक वायू आणि इतर जनशील संशोधनाचे उत्खनन अंदाज आणि प्रक्रिया या सर्व पैलू वर काम करतात. पगार दहा ते बारा लाख रुपये
माईन सुपरवायझर्स खाण पर्यवेक्षक हे खाणकाम व त्या वरील सर्व  आयोजन आणि व्यवस्थापन यासाठी जबाबदार असतात पगार चार ते सहा लाख रुपये
हायड्रो जिओलॉजिस्ट जल भूगर्भ शास्त्रज्ञ हे शास्त्रज्ञ असतात जे भूगर्भातील पाण्याच्या क्षेत्रामध्ये काम करतात भूगर्भातील पाण्याचा प्रवाह त्याचे वितरण गुणवत्ता प्रमाण यांचे निरीक्षण आणि विश्लेषण करतात तसेच भूगर्भातील पाण्याचा शोध घेतात पाण्याचे जतन आणि उपाययोजना यासाठी काम करतात. पगार पाच ते दहा लाख रुपये
मरीन जिओलॉजिस्ट सागरी भूगर्भ शास्त्रज्ञ हे लोक सागरी क्षेत्र किनारी क्षेत्र समुद्रातील भूभाग खाडी यांचा अभ्यास करतात . 
पगार आठ ते बारा लाख रुपये

BSc Geology  यामधील सरकारी नोकऱ्या

जीएसआय जिऑलॉजिकल सर्वे ऑफ इंडिया ओएनजीसी आणि इनरो यांसारख्या संस्थांमध्ये जिऑलॉजिस्ट म्हणून काम करता येते.

यामधील खाजगी नोकऱ्या

आताच आपण वर पाहिल्याप्रमाणे वेगवेगळ्या क्षेत्रांमधील नोकऱ्या आपल्याला मिळू शकतात मुख्यत्वे करून मायनिंग कंपन्या, ऑइल अँड गॅस कंपनी आणि कन्स्ट्रक्शन कंपन्यांमध्ये मोठी मागणी असते.

यामधून पुढे उच्च शिक्षण

यामध्ये तुम्ही एम एस सी जिऑलॉजी किंवा पीएचडी करून संशोधना मध्ये जाऊ शकता.

यामधून पुढे स्वतःचा व्यवसाय

ग्राउंड वॉटर कन्सल्टंट म्हणून तुम्ही स्वतःची स्वतंत्र प्रॅक्टिस सुरू करू शकता हा व्यवसाय सध्याच्या घडीला खूप तेजी मध्ये आहे.

BSc Geology हा कोर्स केल्यानंतर पुढील संधी

हा कोर्स केल्यानंतर तुम्ही एकदा उच्च शिक्षण घेऊ शकता आवडीचे क्षेत्रात एमएससी करू शकता बीएससी जिऑलॉजी नंतर एमएससी कोर्स अनेक सोशलायझेशन मध्ये उपलब्ध आहे उदाहरणार्थ मिनरलॉजी पेलेंटोलॉजी किंवा पेट्रोलियम जिओलॉजी.
यामध्ये तुम्ही सार्वजनिक आणि खाजगी क्षेत्रात नोकरी निवडू शकता प्रवेश तरी नोकऱ्यांसाठी वेतन पॅकेज खूप चांगले आहे तथापि उच्च अनुभवसंग तुम्ही अधिक जास्त कामही करू शकता.

BSc Geology  यामध्ये मुख्य नोकरी कंपन्या

कोल इंडिया, ओएनजीसी, वेदांता, रिलायन्स इंडस्ट्रीज, Schlumberger इत्यादी काही कंपन्या ज्या आपल्याला नोकरी देऊ शकतात.

यामध्ये मिळणारा सरासरी पगार

सुरुवातीला चार ते सहा लाखा रुपयांपर्यंत पॅकेज मिळू शकते अनुभवानंतर हे 15 ते 20 लाखांच्या पुढे जाते.

याचे विडिओ स्वरूप पहा 

BSc Geology हा कोर्स का आणि कोणी निवडावा.

आता आपण पाहूया की हा कोर्स आपण का करावा त्यासाठी काही कारणे दिलेली आहेत.:

नोकरीच्या संधी

विद्यार्थ्यांसाठी अनेक नोकरीच्या संधी उपलब्ध आहेत विविध सरकारी आणि खाजगी क्षेत्रात नोकरीच्या संधी भूगर्भ शास्त्रज्ञ जल भूगर्भ शास्त्रज्ञ सागरी भूगर्भ शास्त्रज्ञ पेलेंटोलॉजिस्ट इत्यादी संधी उपलब्ध आहे.

योग्य पगार

बीएससी भूगर्भशास्त्र पदवीधरांचा प्रवेशस्तरीय पगार हा चार ते सहा लाख रुपये असतो अजून जास्त अनुभवासह विद्यार्थी या क्षेत्रामध्ये दरवर्षी वीस लाख रुपयांपेक्षा जास्त कमाई करू शकता.

विविध करिअर पर्याय

बीएससी जिऑलॉजी चा अभ्यासक्रम पूर्ण करणाऱ्या विद्यार्थ्यांकडे करियर म्हणून पर्याय निवडण्याचे अनेक पर्याय उपलब्ध आहेत तसेच त्यानंतर ते एम एस सी किंवा पीएचडी यासारखे उच्च शिक्षण घेऊ शकतात.

टॉप रिक्रुटर्स

बीएससी जिऑलॉजी पूर्ण केलेल्या विद्यार्थ्यांना अनेक टॉप कंपन्या भरती करतात जसे की जिओलॉजी कल सर्वे ऑफ इंडिया जीएसआय,  Schlumberger, ऑइल अँड नॅचरल गॅस कॉर्पोरेशन ओएनजीसी, फिजिकल रिसर्च लॅबोरेटरी पीआरएल, नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ ओशनोग्राफी एनआयओ (National Institute of Oceanography), ऑल इंडिया लिमिटेड (ओआयएल), GAIL.

BSc Geology याची मागणी

जगभरात ऊर्जेची आणि खनिजांची गरज वाढत आहे त्यामुळे ऑइल गॅस या खनिजांचे गरज प्रचंड प्रमाणात वाढत आहे म्हणून जिओलॉजी ची मागणी कधीच कमी होणार नाही.

यामध्ये होणारे संशोधन

पृथ्वीच्या हवामान बदलाचा अभ्यास करण्यासाठी हे क्षेत्र महत्त्वाचे आहे.

हे निवडणे उत्तम कारण

क्षेत्र चांगले आहे 600 आहे यात तुम्हाला नवीन नवीन गोष्टी शिकण्याची संधी मिळते.

BSc Non Medical कोर्सची संपूर्ण माहिती वाचा.

BSc Geology याबद्दल विचारली गेलेली प्रश्न

जिओलॉजी साठी गणित आवश्यक आहे का ?

हो काही विषयांच्या आकलनासाठी गणिताची प्राथमिक माहिती आवश्यक असते पण ते खूप कठीण नसते.

या क्षेत्रामध्ये मुलींना संधी आहे का ?

हो नक्कीच आज अनेक महिला जिओलॉजिस्ट प्रयोगशाळा आणि फिल्डवर अशा दोन्ही ठिकाणी उत्कृष्ट कामगिरी करत आहेत.

बीएससी नंतर लगेच नोकरी मिळू शकते का ?

हो मिळू शकते परंतु चांगल्या बाजारासाठी आणि मोठ्या पोस्टसाठी एमएससी करणे फायदेशीर ठरते.

महाराष्ट्रामध्ये जिऑलॉजी साठी सर्वोत्तम ठिकाण कुठले आहे ?

पुणे हे जिओलॉजीच्या शिक्षणासाठी महाराष्ट्रातील सर्वात मोठे हब मानले जाते.

फिल्ड वर्क म्हणजे काय ?

फिल्डवर्क म्हणजे डोंगर खाणी किंवा नद्यांच्या ठिकाणी जाऊन प्रत्यक्ष खडका खडकांच्या आणि मातीचे नमुने गोळा करून त्यांचा अभ्यास करणे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *