Warning: Constant PRODUCTION_FACTORY_BUY_BUNDLE already defined in /home2/studyflo/public_html/wp-content/themes/production-factory/get-started/notice.php on line 5
Diploma In Chemical Engineering 2026 एक संपूर्ण मार्गदर्शक

Diploma In Chemical Engineering 2026 एक संपूर्ण मार्गदर्शक

Diploma In Chemical Engineering 2026 एक संपूर्ण मार्गदर्शक
Key Points hide

Diploma In Chemical Engineering 2026 रसायनांच्या जगात करिअर घडवण्यापूर्वी हे वास्तव नक्की जाणून घ्या

इंजीनियरिंग क्षेत्रामध्ये केमिकल इंजिनिअरिंग हा डिप्लोमा आयटीआय स्तरावरील एक डिप्लोमा कोर्स आहे. याचा कालावधी तीन वर्षांचा आहे. यामध्ये मुख्यतः केमिकल रिएक्शन बद्दल शिक्षण दिले जाते जसे केमिकल बॉंड्स नव्या गोष्टीपासून जुन्या गोष्टी वेगळ्या करणे किंवा जुन्या पासून नव्या बनवणे तर जे विद्यार्थ्यांना केमिकल इंजिनिअरिंग बद्दल माहिती पाहिजे आहे तर हा ब्लॉग पूर्ण वाचा.

हा कोर्स उद्योगासाठी किती उपयुक्त आहे? Diploma In Chemical Engineering 2026

आज आपण औषधांपासून ते प्लास्टिकच्या बाटलीपर्यंत जे काही वापरतो, त्यामागे केमिकल इंजिनिअरिंग आहे. २०२६ च्या काळात जेव्हा जग ‘ग्रीन एनर्जी’ आणि ‘सस्टेनेबिलिटी’ कडे वळतंय, तेव्हा केमिकल इंजिनिअर्सची गरज पूर्वीपेक्षा जास्त वाढली आहे. महाराष्ट्रात विशेषतः रायगड, ठाणे आणि पुण्यातील औद्योगिक पट्ट्यात या तंत्रज्ञांना नेहमीच मागणी असते. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, हा कोर्स म्हणजे फक्त ‘केमिस्ट्री’ नाही; हा त्या केमिस्ट्रीला मोठ्या कारखान्यात कसं उतरवायचं, याचं तंत्र आहे.

या कोर्सचे महाराष्ट्रातील महत्व Diploma In Chemical Engineering 2026

अनेक विद्यार्थ्यांना वाटतं की पांढरा कोट घालून लॅबमध्ये टेस्ट ट्यूबसोबत खेळणं म्हणजे केमिकल इंजिनिअरिंग. वास्तव खूप वेगळं आहे. तुम्हाला मोठ्या प्लांटमध्ये, रिफायनरीजमध्ये किंवा औषधांच्या कारखान्यात (Pharma) काम करावं लागतं. महाराष्ट्रातील अनेक ग्रामीण मुलं “पगार खूप मिळेल” म्हणून याकडे येतात, पण सुरुवातीला तुम्हाला शिफ्टमध्ये आणि रसायनांच्या वासात काम करण्याची मानसिक तयारी ठेवावी लागते. हे क्षेत्र आव्हानात्मक आहे, पण ज्यांना कष्टाची तयारी आहे त्यांच्यासाठी हे सोन्याची खाण आहे.

यासाठी शैक्षणिक पात्रता दहावी पास असणे गरजेचे आहे विद्यार्थ्याचे तसेच विद्यार्थ्याला दहावी मध्ये किमान 45% गुण असणे आवश्यक आहे जे आरक्षित प्रवर्गातून येणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी पाच टक्के यामध्ये सूट दिली जाते तसेच यामध्ये बरेच कॉलेज असे आहेत जे स्वतःची एंट्रन्स एक्झाम ठेवतात ती पास होणे सुद्धा गरजेचे असते पण जर पात्रता पाहिली तर ती फक्त 45% गुणांची आहे.

१०वी नंतर विद्यार्थी हा कोर्स का निवडतात? (आणि कोणासाठी हा योग्य नाही?)

बऱ्याचदा ज्यांना केमिस्ट्री विषयाची आवड असते, ते याकडे वळतात. पण हा कोर्स सर्वांसाठी योग्य नाही कारण… यात फक्त केमिस्ट्री नाही तर ७०% गणित आणि फिजिक्सचा भाग असतो. जर तुम्हाला गणिताची प्रचंड भीती वाटत असेल, तर प्लांट डिझाईन किंवा प्रोसेस कॅल्क्युलेशन करताना तुमची दमछाक होईल. तसेच, ज्यांना तीव्र वासाची ॲलर्जी आहे किंवा ज्यांना मोकळ्या वातावरणात प्लांटवर उभं राहून काम करणं जमत नाही, त्यांनी या वाटेला न गेलेलं बरं.

कोर्स निवडतानाचे काही महत्त्वाचे प्रश्न Diploma In Chemical Engineering 2026

प्रवेश घेण्यापूर्वी स्वतःला हे प्रश्न विचारा:

  • मला विज्ञानातील प्रक्रियांमागील ‘का’ आणि ‘कसे’ शोधायला आवडते का?

  • मी यंत्रांच्या आणि रसायनांच्या सानिध्यात १२-१२ तास काम करायला तयार आहे का?

  • माझं गणित आणि तर्कशक्ती (Logic) मध्यम स्तराची तरी आहे का?

ऍडमिशन प्रोसेस

  • याची ऍडमिशन प्रोसेस ऑनलाइन तसेच ऑफलाइन पद्धतीने तुम्ही करू शकता.
  • दोन्ही पद्धतींमध्ये तुम्हाला तुमचे डॉक्युमेंट्स सबमिट करावे लागतील तसेच तुम्हाला व्हेरिफाय करावे लागेल
  • आणि तुम्हाला फी भरावी लागेल पण काही ठिकाणी जी एंट्रन्स एक्झाम आहे ती एंट्रन्स एक्झाम तुम्हाला पास करावी लागेल
  • एंट्रन्स एक्झाम पास झाल्यानंतर कॉलेजमध्ये किंवा त्यांच्या संकेतस्थळावर मेरिट लिस्ट लागू होते
  • त्या मेरिट लिस्ट मध्ये जर तुमचे नाव येत असेल तर तुम्हाला यामध्ये ऍडमिशन मिळून जाते
  • आणि ही परीक्षा जी आहे ती दहावीच्या बेसिस वर होते.

महाराष्ट्रातील प्रवेश प्रक्रिया आणि मार्कांचे गणित

महाराष्ट्रात १०वी नंतर या डिप्लोमाला प्रवेश मिळवण्यासाठी Admission Process ही पूर्णपणे ऑनलाइन (CAP Rounds) असते. १२वी नंतर येणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी थेट दुसऱ्या वर्षात (Lateral Entry) प्रवेशाची सोय असते, त्यासाठी १०वी च्या गुणांवर आधारित गुणवत्ता यादी लागते. अनेक विद्यार्थी इथे चूक करतात… ते फक्त कॉलेजचं नाव बघतात, पण केमिकलसाठी असं कॉलेज निवडा जिथे लॅबमध्ये प्रत्यक्ष ‘पायलट प्लांट’ किंवा रिॲक्टर्स पाहायला मिळतील.

 कालावधी Diploma In Chemical Engineering 2026

याचा कालावधी तुम्हाला तीन वर्षांचा पहिला भेटतो आणि यामध्ये त्यावेळेस तुम्ही ऍडमिशन घेतात तुमच्या ज्या कॉलेजमधील परीक्षा असतात त्यामध्ये तुम्हाला सेमिस्टर व पद्धतीने परीक्षा पाहायला भेटतात. म्हणून या अभ्यासक्रमामध्ये तुम्हाला सहा सेमिस्टर पाहिला भेटतात हे सहा सेमिस्टर तुम्हाला पास आऊट होणे गरजेचे आहे यामध्ये जेव्हा तुम्ही हे सहा सेमिस्टर पूर्णतः पास होतात तर पूर्णतः उत्तीर्ण झाल्यानंतर तुम्हाला तीन वर्षानंतर याचे प्रमाणपत्र मिळून जाते जे तुम्ही पुढे पुढील शिक्षणासाठी वापरू शकता.

या कोर्समध्ये प्रत्यक्षात काय शिकवले जाते?

सोप्या भाषेत सांगायचं तर, प्रयोगशाळेत झालेली छोटी अभिक्रिया (Reaction) हजारो लिटरच्या टाकीत यशस्वीपणे कशी घडवून आणायची, हे इथे शिकवलं जातं. यात थर्माोडायनामिक्स, मास ट्रान्सफर आणि केमिकल रिॲक्शन इंजिनिअरिंग यांसारखे विषय असतात. हा कोर्स तुम्हाला फक्त ‘केमिकल्स’ बद्दल सांगत नाही, तर ते हाताळणारी मशिनरी आणि त्यातील सुरक्षा (Safety) कशी राखायची, हे देखील शिकवतो.

संपूर्ण अभ्यासक्रम आणि प्रॅक्टिकल नॉलेज

अभ्यासक्रम हा ६ सत्रात (Semesters) विभागलेला असतो. सुरुवातीला बेसिक सायन्स असतं, पण दुसऱ्या वर्षापासून मुख्य विषय सुरू होतात. इथे ‘प्रॅक्टिकल नॉलेज’ ला प्रचंड महत्त्व आहे. तुम्ही लॅबमध्ये किती अचूक रीडिंग घेता आणि प्लांटवर व्हॉल्व्ह (Valve) कसा फिरवता, यावर तुमची हुशारी मोजली जाते. सरकारी नोकरीसाठी (उदा. ONGC, HPCL) तयारी करायची असेल, तर तुम्हाला थिअरी आणि प्रॅक्टिकल दोन्हीची सांगड घालावी लागेल.

सत्र १ -२   सत्र २-३  सत्र ४  सत्र ५ -६ 

मूलभूत गणित

संगणक प्रणालीची मूलभूत माहिती

रसायनशास्त्र I

रसायनशास्त्र II

अभियांत्रिकी रेखाचित्र, I

अभियांत्रिकी रेखाचित्र II

भौतिकशास्त्र I

भौतिकशास्त्र II

उपयोजित गणित संप्रेषण कौशल्य

जीवन कौशल्याचा विकास अभियांत्रिकी गणित

कार्यशाळा सेंद्रिय आणि भौतिक रसायनशास्त्र

रासायनिक अभियांत्रिकी

द्रव प्रवाह आणि उष्णता हस्तांतरण
 
अकार्बनिक रसायनांचे तंत्रज्ञान
 
बांधकाम साहित्य
 
सेंद्रिय रसायने आणि उत्पादनांचे यांत्रिक ऑपरेशन्स  तंत्रज्ञान
 
प्लास्टिकचे तंत्रज्ञान
वस्तुमान हस्तांतरण
 
वनस्पती उपयुक्तता प्रकल्प
 
औद्योगिक व्यवस्थापन 
रासायनिक अभियांत्रिकी
 
थर्मोडायनामिक्स
 
ऊर्जा प्रणाली अभियांत्रिकीचा परिचय
 
रासायनिक अभियांत्रिकी
 
प्रक्रिया उपकरणे आणि नियंत्रण
 
निवडक I निवडक II
 
ताण व्यवस्थापन
 
CADD आणि अंदाज
 
रासायनिक अभियांत्रिकी
 
रेखाचित्र

Diploma In Chemical Engineering Information In Marathi याचे कॉलेजेस

वीर माता जिजाबाई टेकनॉलॉजिकल इन्स्टिट्यूट मुंबई   38k
डी वाय पाटील इंजिनिअरिंग कॉलेज मुंबई   2L
डी वाय पाटील पुणे   3-4L
बाबासाहेब आंबेडकर टेक्नॉलॉजिकल युनिव्हर्सिटी.  2-3L
भारती विद्यापीठ यूनिवर्सिटी  1-2L
स्वामी विवेकानंद इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी  2-3L

 मोठ्या पॅकेजचे आणि नोकरीचे वास्तव 

डिप्लोमा पूर्ण केल्यावर तुम्हाला खालील क्षेत्रांत नोकरी मिळू शकते:

  • पेट्रोकेमिकल रिफायनरीज (Reliance, BPCL)

  • फार्मास्युटिकल्स (औषध निर्मिती कंपन्या)

  • खत कारखाने (Fertilizers)

  • पेंट आणि डाय (Paint & Dye) इंडस्ट्री बाहेरील देशांत, विशेषतः दुबई, सौदी अरेबियामध्ये ऑईल आणि गॅस सेक्टरमध्ये मोठी मागणी आहे. सुरुवातीला पॅकेज मध्यम असलं तरी ५ वर्षांच्या अनुभवानंतर तुम्ही खूप चांगली कमाई करू शकता.

Freshers साठी सुरुवातीचा पगार किती?

सत्य असं आहे की, सुरुवातीला पगार ₹१५,००० ते ₹२२,००० च्या दरम्यान असू शकतो. काही मोठ्या एम.एन.सी. (MNC) कंपन्या ₹३०,००० पर्यंत देऊ शकतात. पण ग्रामीण भागातील पालकांनी हे लक्षात घ्यावं की, सुरुवातीचा पगार कमी असला तरी हे क्षेत्र ‘स्थिर’ आहे. स्वतःचा व्यवसाय करायचा असेल, तर तुम्ही सोप, हँडवॉश किंवा छोट्या प्रमाणावर केमिकल ट्रेडिंगचा व्यवसाय सुरू करू शकता.

सुपरवायझर

सुपरवायझर चे काम असते जे इंजिनियर आहेत त्यांवर नजर रखने त्याचबरोबर

तेथील मेंटेनन्स आणि देखरेख करणे.

पगार दोन ते तीन लाख वार्षिक
टेक्निकल सर्विस रिप्रेझेंटेटिव्ह

यांच्या काम असते ज्या लोकांना टेक्निकल प्रॉब्लेम येत आहेत ते पाहणे त्यांना सॉल करणे

तसेच लोकांशी संवाद साधून त्यांचे प्रॉब्लेम नाहीशी करणे.

पगार चार ते पाच लाख वार्षिक
फिल्ड ऑपरेटर

यांचे काम असते फिल्ड वरील जेवढ्या गोष्टी आहेत त्या पाहणे त्याला ऑपरेट करणे

तसेच त्यातील जर काही प्रॉब्लेम असतील तर त्या बघणे त्यांना नीट करणे

पगार तीन ते चार लाख वार्षिक
असोसिएट सायंटिस्ट

यांचे काम असते लॅब मध्ये काम करणे जे सीनियर सायंटिस्ट आहेत त्यांच्यासोबत काम करत राहणे

त्यांना मदत करणे आणि केमिकल गोष्टी हँडल करणे

पगार चार ते पाच लाख वार्षिक
प्रोसेस इंजिनियर

यांचे काम असते जिथे हे काम करत आहेत तेथे गोष्टींना प्रोसेस करणे

जे नवीन प्रॉडक्ट्स आहेत ते तयार करणे त्यांवर नजर रखने त्यामधील त्रुटी दूर करणे

पगार चार ते पाच लाख वार्षिक

पुढील २० वर्षांचा विचार आणि प्रगती

येणारी २० वर्षे ‘ग्रीन हायड्रोजन’ आणि ‘बायो-फ्युएल’ची आहेत. यामध्ये केमिकल इंजिनिअर हा मुख्य खेळाडू असणार आहे. नोकरी शोधताना विद्यार्थी मोठी चूक ही करतात की ते फक्त मोठ्या कंपन्यांच्या मागे धावतात, पण सुरुवातीला छोट्या युनिटमध्ये काम केलं तर प्लांटच्या ए-झेड गोष्टी शिकायला मिळतात. पदवी (B.E./B.Tech) घेतल्यावर तुमची प्रगती अधिक वेगाने होते.

हा कोर्स केल्यानंतर पुढील खूप साऱ्या संधी विद्यार्थ्यांसाठी खुल्या होतात जसे की तुम्ही पुढे डायरेक्ट डिग्री करू शकता आणि डिग्रीच्या दुसऱ्या वर्षात प्रवेश मिळतो तसेच तुम्ही हा डिप्लोमा पूर्ण झाल्यानंतर वेगवेगळ्या प्रायव्हेट कंपन्यांमध्ये जॉब करू शकता त्या जॉब्स मी वर सांगितलेल्या आहेत त्या वाचू शकता तसेच तुम्ही पुढे डिग्री पोस्ट ग्रॅज्युएशन करून अजूनही चांगल्या वेगवेगळ्या नोकऱ्या मिळवू शकतात तसेच तुम्ही डिग्री वरील ज्या गव्हर्मेंट जॉब्स आहेत त्याच्या परीक्षा देऊनही एक गव्हर्मेंट परीक्षा देऊन सरकारी नोकरी मिळू शकता.

याची सविस्तर माहिती पहा 

या क्षेत्रातील दिग्गज काय म्हणतात 

माझा ५-७ वर्षांचा अनुभव सांगतो की, केमिकल इंजिनिअरिंगमध्ये ‘सेफ्टी’ (Safety) कडे दुर्लक्ष करणं ही सर्वात मोठी चूक असते. हे क्षेत्र तुम्हाला शिस्त शिकवतं. क्षेत्रातील दिग्गज नेहमी सांगतात की, “केमिकल इंजिनिअर हा फक्त इंजिनिअर नसतो, तो निसर्गाच्या शक्तींशी खेळणारा एक कलाकार असतो.” त्यामुळे या विषयाचा आदर करूनच यात उतरा.

ज्या विद्यार्थ्यांना केमिकलच्या क्षेत्रामध्ये आवड निर्माण होत आहे किंवा पहिल्यापासून आवड आहे त्या विद्यार्थ्यांनी हा कोर्स करावा पुढे ज्यांना हायर एज्युकेशन घ्यायचे आहे त्यांनी सुद्धा हा कोर्स केला पाहिजे तसेच तुम्हाला जर मोठे पॅकेज मिळवायचे आहे आणि वेगवेगळ्या पदांवर काम करायचे आहे सायंटिस्ट बनायचे आहे त्या विद्यार्थ्यांसाठी हा कोर्स डिझाईन केला गेलेला आहे

Diploma In Mining Engineering कोर्स काय आहे ?

 

One response to “Diploma In Chemical Engineering 2026 एक संपूर्ण मार्गदर्शक”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *