BSc Non Medical काय आहे
बारावी सायन्स कम्प्लीट केल्यानंतर आणि विद्यार्थ्यांसमोर पुढील करिअर काय करायचे असा हा मोठा प्रश्न असतो. जर तुम्हाला इंजीनियरिंग करायचे नसेल पण सायन्स आवड असेल तर बीएससी नॉन मेडिकल हा तुमच्यासाठी एक अतिशय उत्तम पर्याय आहे तर आपण त्याबद्दल पूर्ण माहिती जाणून घेऊया.
तर नॉन मेडिकल मध्ये बॅचलर ऑफ सायन्स हा अभ्यासक्रम हा पदवी पूर्व पदवी अभ्यासक्रम आहे. अभ्यासक्रम प्रामुख्याने बारावीनंतर सायन्स शाखेतील विद्यार्थ्यांसाठी आहे या अभ्यासक्रमामध्ये उच्च माध्यमिक शिक्षणानंतर सायन्स क्षेत्रामध्ये करिअर करू शकणाऱ्या किंवा इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांचा पाया मजबूत करण्यासाठी अभ्यासक्रम आयोजित केला जातो. बीएससी नॉन मेडिकल अभ्यासक्रमामध्ये मुख्य विषय किंवा आधार हा संगणक कॉम्प्युटर सिस्टीमची टेक्निकल अंमलबजावणी आहे.
या अभ्यासक्रमाचे उद्दिष्ट असे व्यावसायिक आणि संशोधक तयार करणे आहे ज्यांची आजकाल जगभरात प्रत्यक्ष क्षेत्रामध्ये गरज आहे. अभ्यासक्रम मुख्यत्वे नैसर्गिक विज्ञानाच्या सिद्धांतारांवर आधारित आहे ज्यामध्ये बायोलॉजीचा समावेश नसतो म्हणून याला नॉन मेडिकल असे म्हटले जाते.
BSc Non Medical याचा कालावधी
साधारणपणे हा कोर्स तीन वर्षांचा असतो. काही कॉलेजेस किंवा स्वायत्त संस्थांमध्ये जिथे नवीन शैक्षणिक धोरण लागू झाले आहे तिथे तो चार वर्षांचा देखील असू शकतो.
याचा हेतू
विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन तयार करणे आणि त्यांना संशोधन तंत्रज्ञान आणि शिक्षण क्षेत्रात तयार करणे.
याचे मुख्य विषय
त्याचे मुख्य विषय हे फिजिक्स केमिस्ट्री आणि मॅथेमॅटिक्स हे याचे मुख्य विषय आणि आधारस्तंभ आहेत.
याची अध्ययन पद्धत
या कोर्स या विषयांमध्ये वर्गातील लेक्चर सोबत प्रयोगशाळेंमधील प्रॅक्टिकलस्वर जास्त भर दिला जातो.
BSc Non Medical यासाठी शैक्षणिक पात्रता कोणती ?
महाराष्ट्र मधील कुठल्याही कॉलेजमध्ये ऍडमिशन घेण्यासाठी आपल्याला खालील शैक्षणिक पात्रता अटी पूर्ण कराव्या लागतात.
याची पात्रता
विद्यार्थी बारावी सायन्स पीसीएम ग्रुप मधून उत्तीर्ण असावा.
यासाठी कमीत कमी लागणारे गुण
किमान 45 ते 50 टक्के गुण असणे आवश्यक आहे जाती प्रवर्गानुसार यामध्ये सवलत असू शकते.
याची वयोमर्यादा
साधारणपणे 18 ते 23 वर्षे वयोमर्यादा आहे परंतु विद्यापीठांमध्ये वयाची अट शिथिल असते.
याचा प्रवाह
तुमच्या बारावीचा प्रवाह हा विज्ञान (सायन्स) असणे अनिवार्य आहे.
BSc Non Medical याची ऍडमिशन प्रोसेस
महाराष्ट्रात बीएससी नोन मेडिकल प्रवेश प्रक्रिया बहुतांश ठिकाणीही गुणवत्तेवर आधारित म्हणजेच मेरिट बेस्ट म्हणजेच बारावीच्या मार्कांवर आधारित किंवा सीईटी नीट या परीक्षांवर आधारित होते.
याची पात्रता चेक करा
आपण आपल्या आवडत्या कॉलेजेस ची लिस्ट बनवा गेल्या वर्षी त्यामध्ये कट ऑफ किती होता याची माहिती घ्या व त्यानुसार आपले बारावीचे मार्क्स आणि विषयांचे पडताळणी करा.
याचे कॉलेज निवडा
तुमच्या शहरात किंवा पुणे मुंबई सारख्या विषयक केंद्रातील चांगले कॉलेज निवडा.
यासाठी अर्ज करा
कॉलेजच्या अधिकृत वेबसाईटवर जाऊन ऑनलाईन फॉर्म भरा.
याची प्रवेश परीक्षा
काही मोजकी स्वायत्तोटोनॉमस कॉलेजेस स्वतःची परीक्षा प्रवेश परीक्षाही घेऊ शकतात. त्याची संपूर्ण माहिती तुम्हाला त्या कॉलेजेसच्या अधिकृत वेबसाईटवर मिळून जाईल त्याची तयारी एक वर्ष आधीपासूनच करा.
यात गुण मिळवा
मेरिट लिस्ट मध्ये नाव येण्यासाठी बारावी चांगले गुण असणे आवश्यक असते.
याचे डॉक्युमेंट वेरिफिकेशन
मेरिट लिस्ट मध्ये नाव आल्यावर आपल्याला खालील डॉक्युमेंट्स लागतील जे दहावी-बारावीचे निकाल पत्रक त्यानंतर एलसी आणि जातीचा दाखला आवश्यक असल्यास पडताळणीसाठी घेऊन जा.
BSc Non Medical याचा कालावधी
हा कोर्स सहा सेमिस्टरांमध्ये विभागलेला असतो.
याची रचना
प्रत्येक वर्षामध्ये दोन सेमिस्टर असतात प्रत्येक सेमिस्टर च्या शेवटी परीक्षा घेतली जाते. प्रत्येक सेमिस्टर चांगल्या मार्कांनी पास होणे गरजेचे असते.
यात तुम्ही काय शिकता
पहिल्या वर्षात तुम्ही मूलभूत संकल्पना शकता तर शेवटच्या वर्गात विषयाच्या सखोल ज्ञान आणि प्रोजेक्टवर काम करतात.
BSc Non Medical याचे विषय आणि अभ्यासक्रम
आपण बीएससी नोन मेडिकलचा सिल्याबस पाहूया. इथे सिलॅबस वर्ष आधारित दिलेला आहे.
| प्रथम वर्ष | कंपल्सरी सब्जेक्ट जनरल language (within India) and culture of that region एन्व्हायरमेंटल स्टडीज अँड रोड सेफ्टी एज्युकेशन ऑप्शनल आणि इलेक्टिव्ह सब्जेक्ट मेडिकल ग्रुप: केमिस्ट्री (सी एच एम) कॉम्प्युटर सायन्स (सीएससी) बॉटनी (बीओटी) झूलॉजी (झेड ओ ओ) |
| वर्ष दुसरे | जनरल इंग्लिश मेडिकल ग्रुप: केमिस्ट्री (सी एच एम) कॉम्प्युटर सायन्स (सीएससी) बॉटनी (बीओटी) झूलॉजी (झेड ओ ओ) नॉन मेडिकल ग्रुप: फिजिक्स (पी एच वाय) मॅथेमॅटिक्स (एम ए टी) केमिस्ट्री (सी एच एम) कॉम्प्युटर सायन्स (सीएससी) |
| तिसरे वर्ष | फिजिक्स (पी एच वाय) मॅथेमॅटिक्स (एम ए टी) केमिस्ट्री (सी एच एम)/ कॉम्प्युटर सायन्स (सीएससी) |
यामधील प्रॅक्टिकल्स
प्रत्येक मुख्य विषयासाठी आठवड्यातून किमान दोन ते तीन वेळा मधील प्रॅक्टिकल्स असतात.
प्रथम वर्षात काय शिकण्यास मिळते ?
सायन्सच्या मूलभूत पायावर लक्ष दिले जाते
शेवट वर्षात काय शिकण्यास मिळते ?
प्रोग्रेसिव्ह प्रिन्सिपल्स आणि रिसर्च रिलेटेड विषयांची ओळख करून दिले जाते.
BSc Non Medical याचे कॉलेजेस
|
सर्व कॉलेजेस चे सरासरी शुल्क
सरकारी कॉलेजमध्ये फि कमी असते तर खाजगी कॉलेजेस मध्ये ती 80 हजार ते एक लाख पर्यंत दरवर्षी साठी जाऊ शकते.
मध्ये प्लेसमेंट साठी काय करावे ?
शेवटच्या वर्षात कॉलेजच्या प्लेसमेंट सेलमध्ये नोंदणी करा आणि सॉफ्टवेअर काम करा तसेच इंटरव्यू देणे आणि पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट या गोष्टींवर वर्क करणे खूप गरजेचे आहे.
BSc Non Medical यामध्ये करिअर आणि संधी
बीएससी नॉर्म मेडिकल केल्यानंतर तुमच्यासमोर अनेक वाटा खुल्या होतात. यामधील काही नोकऱ्या व त्यांचे पगार आपण पाहूया.
| एप्लीकेशन डेव्हलपर: एप्लीकेशन डेव्हलपर कॉम्प्युटर साठी विविध एप्लीकेशन आणि प्रोग्राम तयार करतो त्यांची चाचणी करतो आणि प्रोजेक्ट करतो. | पगार सहा ते आठ लाख रुपये |
|
रिसर्च सायंटिस्ट: संशोधन शास्त्रज्ञांची काम हे प्रयोगशाळेत केलेल्या प्रयोगांमधून आणि त्या आता प्रसाद मधून मिळालेल्या माहितीचे विश्लेषण करणे व योग्य निष्कर्ष काढणे हे लोक संशोधन संस्था सरकारी प्रयोगशाळा इत्यादी उद्योगातील विविध क्षेत्रांसाठी काम करू शकतात. |
पगार आठ ते दहा लाख रुपये |
| सायंटिफिक असिस्टंट: वैज्ञानिक सहाय्यक हा प्रशासकीय प्रशासकीय कामे पार पाडतो त्यांच्या व्यवस्थापन करतो आणि शास्त्रज्ञांना संशोधनात व्यावसायिक सहाय्य प्रदान करतो. |
पगार सहा ते आठ लाख रुपये |
| कॉम्प्युटर ऑपरेटर कॉम्प्युटर ऑपरेटर चे काम संस्थेतील कॉम्प्युटर टेक्नॉलॉजीचे चौकटीचे निरीक्षण करणे आणि नियंत्रण करणे. |
पगार चार ते सहा लाख रुपये |
| टेक्निकल रायटर टेक्निकल रायटर यांचे टेक्निकल माहिती सहजपणे पोहोचवण्यासाठी लेख लिहिणे तसेच सूचना पुस्तिका आणि सहाय्यक कागदपत्रे तयार करणे हे काम असते. |
पगार सहा ते आठ लाख रुपये |
| लॅब केमिस्ट मानवी जीवनासाठी वेगवेगळी उपयुक्त कंपाउंड तयार करणे आणि केमिकल चे एनालिसिस करणे तसेच त्यांचे रिसर्च आणि टेस्टिंग करणे. |
पगार चार ते सहा लाख रुपये |
यामधील सरकारी नोकऱ्या
यूपीएससी, एमपीएससी, बँकिंग, सरळसेवा आणि रेल्वे भरती मध्ये फॉर्म भरण्यासाठी तुम्ही पात्र असतात. तसेच संरक्षण दलामध्ये आपल्याला एप्लीकेशन करण्यासाठी सुद्धा संधी मिळते.
यामधील खाजगी नोकऱ्या
आपण वर पाहिल्याप्रमाणे वेगवेगळ्या खाजगी नोकरी आहे मिळवू शकतो. केमिकल कंपन्या. लॅबोरेटरीज. आयटी कंपन्यांमध्ये डेटा ऍनालिस्ट म्हणून हे काम करू शकतो.
यामधून पुढे उच्च शिक्षण
तुम्ही एम एस सी, एम बी ए किंवा एमसीए देखील करू शकता.
यामधून पुढे स्वतःचा व्यवसाय
व्यवसाय करण्यासाठी तुम्ही स्वतःची टेस्टिंग लॅब किंवा कोचिंग क्लासेस देखील सुरू करू शकता.
BSc Non Medical हा कोर्स केल्यानंतर पुढील संधी
आपल्याला माहिती असल्याप्रमाणे टेक्निकल विभागांमध्ये आजकाल भरपूर नोकरीच्या संधी वाढत आहेत बीएससी नोन मेडिकल पदवीधरांसाठी अनेक पर्याय आणि उपलब्ध आहेत त्यामध्ये फिजिक्स मॅच केमिस्ट्री आणि कॉम्प्युटर सायन्स असे विविध विषय समाविष्ट आहेत हा अभ्यासक्रम त्यांचे कौशल्य आणि क्षमता वाढवतो त्यामुळे त्यांच्याकडे प्रकल्प किंवा संशोधन सहाय्यक क्लिनिकल संशोधन सहाय्यक सल्लागार किंवा एनालिस्ट म्हणून संशोधन आधारित नोकर यांसारखे विविध पर्याय उपलब्ध आहेत तसेच त्यांना गुगल याहून डेल एचसीएल इत्यादी संस्थांकडून विविध नोकरीच्या ऑफर देखील मिळू शकतात.
यामध्ये मुख्य नोकरी कंपन्या
रिलायन्स टाटा केमिकल्स ओएनजीसी इसरो आणि डी आर डी ओ या काही मुख्य कंपन्या आहेत ज्या कोर्स केल्यानंतर आपल्याला नोकरीसाठी संधी देऊ शकतात.
यामध्ये मिळणारा सरासरी पगार
यामध्ये सुरुवातीला चार ते सहा लाख रुपये पर्यंतगार मिळू शकतो अनुभवानंतर यामध्ये मोठी वाढ होते.
BSc Non Medical हा कोर्स का आणि कोणी निवडावा.
त्या विद्यार्थ्यांना गणित हा विषय आवडतो आणि त्यांना विश्वात घडणारा भौतिक्रियांबद्दल कुतवळ आहे ज्यांना कमी शिक्षणामध्ये चांगले प्रकारचे नौकरी मिळवायचे आहे त्यांच्यासाठी हा कोर्स उत्तम आहे.
याची मागणी
रिसर्च अँड डेव्हलपमेंट या क्षेत्रामध्ये या पदवीधरांची भरपूर मोठी मागणी आहे.
यामध्ये होणारे संशोधन
जर तुम्हाला शास्त्रज्ञ व्हायचे असेल तर हा तुमचा पहिला टप्पा आहे ज्यामुळे तुम्ही तुमचा पाया पक्का करता.
हे निवडणे उत्तम कारण
हा कोर्स इंजिनिअरिंग तुलनेने स्वस्त आहे आणि संधी मात्र तितक्याच आहे.
BSc Economics Honours कोर्सची संपूर्ण माहिती वाचा.
BSc Non Medical याबद्दल विचारली गेलेली प्रश्न
बीएससी नॉन मेडिकल नंतर मी शिक्षक होऊ शकतो का ?
तुम्ही शिक्षक नक्कीच होऊ शकता हा कोर्स झाल्यानंतर तुम्ही बी एड करून माध्यमिक शाळेमध्ये शिक्षक होऊ शकता.
BSc Non Medical हा कोर्स इंजिनिअरिंग पेक्षा सोपा आहे का ?
हो नक्कीच नॉन मेडिकल बीएससी इंजिनिअरिंग पेक्षा सोपा कोर्स आहे यामध्ये थेरॉटिकल नॉलेज जास्त आहे त्यामुळे तुम्हाला वाचनाची आणि मॅचचे आवड असेल तर तो नक्की सोपे जाईल.
यामध्ये गणित विषय अनिवार्य आहे का ?
नॉन मेडिकल बीएससी मध्ये मॅच हा एक मुख्य विषय असतो.
BSc Non Medical या कोर्स नंतर एमबीए करता येते का ?
नक्कीच कोणत्याही शाखेचा पदवीधर एमबीए करू शकतो आणि सायन्स बॅकग्राऊंडच्या विद्यार्थ्यांना त्याचा फायदा होतो.
महाराष्ट्र मध्ये या कोर्ससाठी सीईटी द्यावी लागते का ?
बहुतेक साध्या बीएससी कोर्स साठी सीईटी लागत नाही बारावीच्या गुणांवर प्रवेश मिळू शकतो मात्र काही प्रोफेशनल कोर्ससाठी ती आवश्यक असू शकते.