BSc Economics Honours हा कोर्स काय आहे ?
बीएससी इकॉनॉमिक्स ओनर्स हा तीन वर्षांचा पदवी पूर्व असणारा पदवी अभ्यासक्रम आहे यामध्ये अर्थशास्त्र आणि त्या संबंधित बाबींमध्ये स्पेशलिझेशन आहे.
बारावीनंतर आपण सहसा इंजिनिअरिंग अथवा मेडिकलचा विचार करतो पण जर तुम्हाला इकॉनॉमिक्स अर्थशास्त्र त्यानंतर अर्थव्यवस्था व शेअर मार्केट या विषयांमध्ये रस असेल तर बीएससी इकॉनॉमिक्स ऑनर्स हा तुमच्यासाठी एक उत्कृष्ट पर्याय आहे.
बीएससी इकॉनॉमिक्स हा फक्त अर्थशास्त्राचा अभ्यास नाही तर तो गणित स्टॅटिस्टिक्स आणि सामाजिक प्रश्नांचा एक कॉम्बिनेशन आहे यामध्ये तुम्हाला जागतिक अर्थव्यवस्था कशी चालते कशी काम करते आणि तुमचा त्यातील सहभाग या सर्व गोष्टी शिकवल्या जातात.
BSc Economics Honours याचा कालावधी
हा कोर्स साधारणपणे तीन वर्षांचा असतो ज्यामध्ये सहा सेमिस्टर असतात.
याचा हेतू
त्याकरता मुख्य हेतू हा विद्यार्थ्यांना आर्थिक सिद्धांत आणि त्याच्या व्यावहारिक उपयोगांची सखोल माहिती देणे हा असतो.
याचे मुख्य विषय
याचे मुख्य विषय हे मायक्रो इकॉनॉमिक्स मॅक्रो इकॉनॉमिक्स आणि मॅथेमॅटिकल अर्थशास्त्र हे आहेत.
याची अध्ययन पद्धत
यामध्ये सोबत डाटा ॲनालिसिस आणि केस स्टडीज वर भर दिला जातो.
BSc Economics Honours यासाठी शैक्षणिक पात्रता कोणती ?
महाराष्ट्र मधील टॉपच्या कॉलेजेस मध्ये ऍडमिशन घेण्यासाठी खालील अटी विद्यार्थ्यांनी पूर्ण करणे आवश्यक असते.
याची पात्रता
विद्यार्थी कोणत्याही शाखेमधून आर्ट सायन्स कॉमर्स यामधून बारावी पास असावा मात्र आणि कॉलेजेस मध्ये बारावीला मॅथेमॅटिक्स असणे अनिवार्य असू शकते.
यासाठी कमीत कमी लागणारे गुण
यामध्ये किमान 50 ते 60 टक्के गुण आवश्यक असतात कास्ट कॅटेगिरी अनुसया मध्ये बदल होऊ शकतो.
याची वयोमर्यादा
या कोर्सला वयोमर्यादाची अट नाही.
याचा प्रवाह
यामध्ये कॉमर्स आणि सायन्सच्या विद्यार्थ्यांना हा कोर्स अधिक सोपा जाऊ शकतो.
BSc Economics Honours याची ऍडमिशन प्रोसेस
महाराष्ट्र मध्ये प्रवेश प्रक्रिया मुख्यत्वे गुणवत्तेवर किंवा प्रवेश परीक्षा वर आधारित असते.
याची पात्रता चेक करा
यामध्ये सर्वात आधी तुम्ही कॉलेजच्या वेबसाईटवर जाऊन तुमची पात्रता तपासणी गरजेचे आहे.
याचे कॉलेज निवडा
आपले आवडते टॉपचे कॉलेजेसची एक लिस्ट बनवा यामध्ये मुंबई पुणे नाशिक यांसारख्या शहरातील स्वायत्त ऑटोनॉमस कॉलेजेस हे उत्तम आहेत त्यानुसार त्यांची एक लिस्ट बनवून ठेवा त्यांचे गेल्या वर्षीचे कट ऑफ मार्च यादी बनवून ठेवा त्यानुसार आपली तयारी ठेवा.
यासाठी अर्ज करा
कॉलेजच्या अधिकृत वेबसाईटवर जाऊन आपला फॉर्म भरा
याची प्रवेश परीक्षा
काही संस्था स्वतःची एंट्रन्स एक्झाम घेतात त्यामध्ये एन एम आय एम एस सी बी ऑफिस सारखी कॉलेज स्वतःची एंट्रन्स एक्झाम घेतात त्याची माहिती आधीच घेऊन ठेवा वर्षभर आधी त्याची तयारी ठेवा कॉलेजच्या वेबसाईटवर जाऊन त्याचा अभ्यास क्रम त्याच्या सर्व महत्त्वाच्या तारखा लक्षात घ्या.
यात गुण मिळवा
बारावीचे गेम गुण किंवा प्रवेश परीक्षेतील रेंटनुसार निवड होत असते त्यामुळे जास्तीत जास्त चांगले मार्क्स घेण्याचा प्रयत्न करा.
याचे डॉक्युमेंट वेरिफिकेशन
आपले सिलेक्शन झाल्यानंतर तुमचे कागदपत्रे तपासून फी भरावी लागते तर कागदपत्रांमध्ये दहावी बारावीचे मार्कशीट एलसी तसेच आपल्या ओळखीचा पुरावा व लागू असल्यास जातीचे प्रमाणपत्र हे सर्व डॉक्युमेंट्स गरजेचे आहेत.
BSc Economics Honours याचा कालावधी
हा कोर्स तीन वर्षांचा असतो.
याची रचना
या कोर्समध्ये सहा सेमिस्टर असतात म्हणजेच प्रत्येक वर्षी दोन सेमिस्टर असतात प्रत्येक सेमिस्टर चांगले मार्काने उत्तीर्ण होणे आवश्यक आहे.
यात तुम्ही काय शिकता
पहिल्या वर्षी पायाभूत विषय असतात तर शेवटच्या वर्षी अधिक कठीण आणि संशोधनावर आधारित विषय असतात.
BSc Economics Honours याचे विषय आणि अभ्यासक्रम
आपण या याचा आता सेमिस्टर वाईज सिलॅबस पाहूया:
| सेमिस्टर वन | सेमिस्टर टू |
|
थेअरी ऑफ कन्स्युमर बिहेवियर टू थेअरी ऑफ फर्म फास्टर प्राइजिंग वेल्फेरे इकॉनॉमिक्स फंक्शन्स डिफरन्शियल कॅल्क्युलस इंडियन पब्लिक फायनान्स |
| सेमिस्टर थ्री | सेमिस्टर फोर |
|
|
| सेमिस्टर फाईव्ह | सेमिस्टर सिक्स |
|
|
यामधील प्रॅक्टिकल्स
यामध्ये एक्सेल आर प्रोग्रामिंग किंवा स्टेटा यांसारखे सॉफ्टवेअरचा वापर करून डेट अँडिसिस शिकवले जाते.
प्रथम वर्षात काय शिकण्यास मिळते ?
अर्थशास्त्राच्या मूलभूत संकल्पनांची ओळख करून देणे.
शेवट वर्षात काय शिकण्यास मिळते ?
अर्थशास्त्राचा जागतिक स्तरावर वापर आणि स्वतःचा रिसर्च प्रोजेक्ट करण्याची संधी मिळते.
BSc Economics Honours याचे कॉलेजेस
बीएससी इकोनामिक्स ओनर्स याचे टॉपचे कॉलेजेस आपण पाहूया.
|
सर्व कॉलेजेस चे सरासरी शुल्क
सरकारी अनुदानित कॉलेजेस मध्ये फी कमी असते तर खाजगी विद्यापीठात ते जास्त असू शकते तरी आज मी कॉलेजमध्ये सरासरी एक ते दीड लाख दरवर्षीप्रमाणे फीस असू शकते.
मध्ये प्लेसमेंट साठी काय करावे ?
चांगल्या कॉलेज एस मध्ये शेवटच्या वर्षाला मोठ्या कंपन्या कॅम्पस इंटरव्यू साठी येतात त्यामुळे आपण कॅम्पस सेलेक्शन साठी आपल्या प्लेसमेंट सेलमध्ये कॉलेजच्या नाव नोंदणी करणे आवश्यक आहे तसेच इंटरव्यू ची तयारी करणे व बेसिक गोष्टींचे संपूर्ण नॉलेज ठेवणे गरजेचे आहे.
BSc Economics Honours यामध्ये करिअर आणि संधी
बीएससी इकॉनॉमिक्स ऑनर्स हा कोर्स केल्यानंतर करिअरच्या संधी बद्दल माहिती घेण्यासाठी आपण खालील माहिती पाहूया.
| मॅक्रो इकॉनॉमिक ऍनालिस्ट: यामध्ये मॅक्रो इकॉनॉमिक पॅरामिटर एनालिसिस समाविष्ट आहे जेणेकरून कंपनीला त्यांचे धोरण आणि प्रमोशनल धोरणांबद्दल योग्य सल्ला देता येतो. |
पगार चार ते पाच लाख रुपये |
| इकॉनोमिक ॲडव्हायझर: आर्थिक सल्लागार या कामांमध्ये कंपन्यांसाठी क्रीफायतशीर धोरणे आखण्यासाठी मार्केट एनालिसिस आणि रिसर्च या गोष्टी समाविष्ट असतात. |
पगार आठ ते दहा लाख रुपये |
| रिसर्चर: संशोधक हा त्या विषयाची सखोल विश्लेषण आणि अभ्यास करतो जेणेकरून या क्षेत्रातील समस्यांवर उपाय शोधता येतात. |
पगार आठ ते दहा लाख रुपये |
| ट्यूटर अथवा शिक्षक: शिक्षकाच्या कामात शालेय स्तरावरील विद्यार्थ्यांना हा विषय शिकवणे. | पगार दहा ते बारा लाख रुपये. |
| कन्टेन्ट डेव्हलपर: त्या कामात वेबसाईट साठी आणि विद्यार्थ्यांसाठी अभ्यास साहित्य म्हणून विषयाशी संबंधित सामग्री विकसित करणे लिहिणे व संपादन करणे यांचा समावेश आहे. |
पगार पाच ते सात लाख रुपये |
यामधील सरकारी नोकऱ्या
इंडियन इकॉनॉमिक सर्विसेस आयएएस आरबीआय ग्रेड बी ऑफिसर आणि निती आयोग यामध्ये नोकरीची संधी.
यामधील खाजगी नोकऱ्या
आता आपण वर पाहिल्याप्रमाणे बँकिंग क्षेत्र इन्वेस्टमेंट बँकिंग आणि डेटा ऍनॅलिसिस फॉर्म यामध्ये आपण खाजगी नोकरी मिळू शकतो.
यामधून पुढे उच्च शिक्षण
बीएससी इकॉनॉमिक्स ओनर्स केल्यानंतर पुढे तुम्ही एम ए इकॉनॉमिक्स एमबीए किंवा पीएचडी करू शकता.
यामधून पुढे स्वतःचा व्यवसाय
बीएससी इकॉनॉमिक्स ओनर्स हा कोर्स केल्यानंतर आपण स्वतः आर्थिक सल्लागार फायनान्शिअल कन्सल्टंट म्हणून काम करू शकतात.
BSc Economics Honours हा कोर्स केल्यानंतर पुढील संधी
बीएससी इकॉनॉमिक्स ओनर्स हा कोर्स केल्यानंतर आपल्याला पुढील भरपूर संधी उपलब्ध आहेत यामध्ये काही क्षेत्रे आपण पाहूया.
वित्त, सरकारी क्षेत्र, संशोधन तंत्रज्ञान, व आंतरराष्ट्रीय संघटना यासारख्या काही मोठ्या क्षेत्रांमध्ये आपण काम करू शकतो.
यामध्ये आपण आपल्या स्ट्रॉंग ऍनालिटीकल कौशल्यांचे किंवा स्किलचे मिक्सिंग करून पारंपारिक अर्थशास्त्राला आधुनिक डेटा रिलेटेड व्यवसायांसोबत जोडू शकतो.
यामध्ये मुख्य नोकरी कंपन्या
त्यामध्ये काही मुख्य कंपन्या टीसीएस, एचएसबीसी, Deloitte, केपीएमजी, आणि सरकारी बँका आहेत.
यामध्ये मिळणारा सरासरी पगार
सुरुवातीला वार्षिक पगार हा चार ते आठ लाख रुपये मिळू शकतो जो अनुभवानुसार प्रचंड प्रमाणात वाढत जातो.
BSc Economics Honours हा कोर्स का आणि कोणी निवडावा.
ज्या विद्यार्थ्यांना गणितामध्ये आवड आहे आणि ज्यांना देशाच्या बजेटमध्ये अर्थ व्यवस्थेमध्ये शेअर मार्केटमध्ये किंवा गरीबी निवारण यासारख्या विषयांमध्ये रस आहे त्यांनी हा कोर्स नक्की करावा.
याची मागणी
सध्या डेटा हा नवीन पैसा आहे आणि अर्थशास्त्रज्ञ या डेटाचे एनालिसिस उत्तम प्रकारे करू शकतात. त्यामुळे या क्षेत्रामध्ये भरपूर मागणी आहे.
यामध्ये होणारे संशोधन
जर तुम्हाला नवीन गोष्टी शोधण्यात रस असेल तर हा कोर्स तुम्हाला संशोधनासाठी एक बेसिक पाया अवेलेबल करून देतो
हे निवडणे उत्तम कारण
हा कोर्स केवळ तुम्हाला नोकरी देत नाही तर एक अनालीटीकल माइंड सेट देतो, जीवन जगण्याची कला शिकवतो तसेच आर्थिक पाया मजबूत करतो.
BSc Microbiology Honours कोर्सची संपूर्ण माहिती वाचा .
BSc Economics Honours याबद्दल विचारली गेलेली प्रश्न
आर्ट्स विद्यार्थ्यांना हा कोर्स कठीण जातो का ?
नाही जर तुमच्याकडे चांगले असेल तर तुम्ही यामध्ये उत्तम यश मिळवू शकतात.
बीए इकॉनॉमिक्स आणि बीएससी इकॉनॉमिक्स यामध्ये काय फरक आहे ?
बीएससी इकॉनॉमिक्स मध्ये गणित आणि सांख्यिकी म्हणजेच मॅथ्स आणि स्टॅटिस्टिक्स यावर जास्त भर दिला जातो जो नोकरीसाठी अधिक फायदेशीर ठरतो.
या कोर्स नंतर परदेशामध्ये संधी उपलब्ध आहेत का ?
हो जागतिक बँक वर्ल्ड बँक आणि आयएमएफ यासारख्या संस्थांमध्ये अर्थशास्त्रज्ञांची खूप गरज असते त्यामुळे हा कोर्स केल्यानंतर परदेशामध्ये आपल्याला भरपूर संधी उपलब्ध आहेत आणि त्यानुसार आपले पॅकेजिंग भरपूर प्रमाणात वाढू शकते.
गणित विषयाशिवाय हा कोर्स करता येतो का ?
काही कॉलेजेस प्रवेश देऊ शकतात परंतु गणित हा शिवाय हा अभ्यासक्रम पूर्ण करणे खूप आव्हानात्मक आहे.
यूपीएससी एमपीएससी साठी हा विषय कसा आहे ?
अत्यंत उत्तम विषय आहे स्पर्धा परीक्षांमध्ये अर्थशास्त्राचा खूप मोठा भाग असतो त्यामुळे विद्यार्थ्यांना तिथे त्याचा फायदा होतो.