BSc B.Ed. Integrated Course काय आहे ?
बीएससी बीएड हा एकात्मिक अभ्यास करून वैज्ञानिक अभ्यासांना व्यावसायिक अध्यापन अभ्यासक्रमांची जोडतो ज्यामुळे प्राथमिक आणि माध्यमिक शाळांमध्ये शिकू शकणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी व्यक्तींसाठी तो आदर्श बनतो.
जर तुम्हाला विज्ञानाची आवड असेल आणि तुम्हाला भविष्यात एक आदर्श शिक्षक बनायचे असेल तर हा कोर्स तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे आपण बीएससी प्लस बीएड या इंटिग्रेटेड कोर्स बद्दल सविस्तर माहिती घेऊया.
हा एक दुहेरी पदवी अभ्यासक्रमा आहे जो विज्ञान म्हणजेच बीएससी आणि शिक्षण शास्त्र म्हणजेच बीएड या दोन पदांची एकत्रीकरण करतो पूर्वी विद्यार्थ्यांना आधी तीन वर्षे बीएससी आणि नंतर दोन वर्ष बीएड करायला लागायचे तर आता या इंटिग्रेटेड कोर्समध्ये तुमचा वेळ वाचतो आणि आपण चार वर्षातच बीएससी प्लस बीएड इंटिग्रेटेड कोर्स पूर्ण करू शकतो.
BSc B.Ed. Integrated Course याचा कालावधी
हा एकूण चार वर्षांचा कोर्स असतो
याचा हेतू
कमी वेळात विद्यार्थ्यांना विषय विषय ज्ञान आणि अध्यापन कौशल्य दोन्ही गोष्टींमध्ये पारंगत करणे व उत्कृष्ट शिक्षक बनवणे
याचे मुख्य विषय
यामध्ये फिजिक्स केमिस्ट्री बायोलॉजी आणि मॅथ्स यासारख्या सायन्स सब्जेक्ट सोबतच चाईल्ड सायकॉलॉजी आणि अध्यापन शास्त्र हे विषय ही असतात.
याची अध्ययन पद्धत
हा कोर्स स्थिर लेक्चर आणि प्रॅक्टिकल टीचिंग यांचा कॉम्बिनेशन आहे.
BSc B.Ed. Integrated Course यासाठी शैक्षणिक पात्रता कोणती ?
यासाठी सायन्स बारावी सायन्स शाखेमध्ये प्लॅन प्लस टू पास होणे गरजेचे आहे. तसेच यामध्ये फिजिक्स केमिस्ट्री आणि मॅथेमॅटिक्स अथवा बायलॉजी हे विषय अनिवार्य असतात
कॉमर्स किंवा आर्ट्स बॅकग्राऊंड असलेले इच्छुक विद्यार्थ्यांना या अभ्यासक्रमासाठी पात्र मानले जात नाही.
BSc B.Ed. Integrated Course याची पात्रता
विद्यार्थी बारावी सायन्स उत्तीर्ण असावा यामध्ये पीसीएम पीसीबी अथवा पीसीएमबी ग्रुप असला तरी चालेल.
यासाठी कमीत कमी लागणारे गुण
यासाठी खुल्या प्रवर्गासाठी किमान 50% आणि राखीव प्रवर्गासाठी 45% गुण आवश्यक आहेत.
याची वयोमर्यादा
या कोर्स साठी साधारणपणे कुठलीही उच्च वयोमर्यादा नसते.
याचा प्रवाह
तुमच्याकडे बारावीला पीसीएमबी म्हणजेच फिजिक्स केमिस्ट्री मॅथेमॅटिक्स बायोलॉजी यापैकी मुख्य विषय असणे गरजेचे आहे.
BSc B.Ed. Integrated Course याची ऍडमिशन प्रोसेस
महाराष्ट्र मध्ये या कोर्स साठीची ऍडमिशन प्रोसेस ही प्रामुख्याने CET सेल मार्फत चालते.
BSc B.Ed. Integrated Course याची पात्रता चेक करा
तुमचे बारावीचे गुण तपासा यामध्ये गेल्यावर्षी बीएससी बीएड कॉलेजेस ना कट ऑफ कितीचा होता हे चेक करून ठेवा त्याची एक लिस्ट बनवा.
याचे कॉलेज निवडा
महाराष्ट्र बीए/ बीएससी बीएड सीईटी ही महाराष्ट्र शासनाची सामायिक प्रवेश परीक्षा देणे अनिवार्य आहे.
यासाठी अर्ज करा
सीईटीचा निकाल लागल्यावर कॅप सेंट्रलाइज ऍडमिशन प्रोसेस साठी ऑनलाईन फॉर्म भरा यामध्ये कॅप राऊंडस होतात जनरली तीन राऊंड होतात किंवा चौथाही राऊंड होऊ शकतो.
कॉलेज निवडा
आपल्या पसंतीच्या कॉलेजेसची एक लिस्ट करा त्यामध्ये गेल्या वर्षीच्या कट ऑफ अनुसार कॉलेजेसची एक उतरत्या क्रमानुसार लिस्ट बनवा त्यानंतर आपल्याला किती गुण मिळालेत हे नक्की करा आणि त्यानुसार तुमचा कॉलेजचा पसंती क्रम म्हणजेच ऑप्शन फॉर्म भरा. त्यामुळे तुम्हाला तुमच्या गुणांनुसार योग्य कॉलेज मिळून जाईल आणि कॅप राऊंड मधून आपल्या सिलेक्शन होईल. हा कॉलेजेसचा पसंती क्रम म्हणजेच ऑप्शन फॉर्म काळजीपूर्वक भरणे गरजेचे आहे.
माझे मत : चांगले मार्क असणारे विद्यार्थी सुद्धा कधी कधी चांगल्या कॉलेज मध्ये Admission मिळण्या पासून वंचित राहू शकतात. त्यामुळे हा ऑप्शन फॉर्म काळजीपूर्वक भरा यासाठी कॉलेजच्या कट ऑफ चा व्यवस्थित अभ्यास करा. याबद्दल अजून माहिती आपल्या वेबसाईटवर दिली जाईल. – केशव सुर्यवंशी
याचे डॉक्युमेंट वेरिफिकेशन
निवड झालेल्या कॉलेजमध्ये जाऊन कागदपत्रांची पडताळणी करा यामध्ये मुख्यत्वे करून दहावी बारावीचे मार्कलिस्ट, त्यानंतर एलसी व आपल्या जातीचे प्रमाणपत्र आवश्यक असल्यास या कागदपत्रांची रिक्वायरमेंट असते.
BSc B.Ed. Integrated Course याचा कालावधी
हा कोर्स चार वर्षांचा असून तो 8 सेमिस्टर मध्ये विभागलेला असतो.
याची रचना
प्रत्येक वर्षी दोन सेमिस्टर असतात सुरुवातीच्या वर्षात सायन्स वर जास्त भर दिला जातो तर शेवटच्या वर्षात शिक्षकी कौशल्य शिकवले जातात.
यात तुम्ही काय शिकता
तुम्ही केवळ सायन्स मधील प्रयोगाची शिकत नाही तर विद्यार्थ्यांना कसे हाताळावे कसे शिकवावे व विशेष सोपा करून कसा सांगावा हे देखील शिकतात.
BSc B.Ed. Integrated Course याचे विषय आणि अभ्यासक्रम
आपण याचे विषय हे सेमिस्टर वाईज पाहूया.
| सेमिस्टर वन | सेमिस्टर टू |
|
|
| सेमिस्टर तीन | सेमिस्टर फोर |
|
|
| सेमिस्टर फाईव्ह | सेमिस्टर सिक्स |
|
|
| सेमिस्टर सेवन | सेमिस्टर एट |
|
|
BSc B.Ed. Integrated Course यामधील प्रॅक्टिकल्स
यामध्ये लॅबमधील प्रयोग आणि शाळेत जाऊन प्रत्यक्ष शिकणे म्हणजेच प्रॅक्टिस तीचींग याचा समावेश होतो.
प्रथम वर्षात काय शिकण्यास मिळते ?
आपण प्रथम वर्षामध्ये सायन्सचा बेस आणि शिक्षणाची ओळख या गोष्टी शकतो.
शेवट वर्षात काय शिकण्यास मिळते ?
शेवटच्या वर्षामध्ये आपण पूर्ण वेळ शाळेत इंटरनॅशनल आणि विद्यार्थ्यांचे मानसशास्त्र शिकतो.
BSc B.Ed. Integrated Course याचे कॉलेजेस
आपण बीएससी बीएड इंटिग्रेटेड कोर्स याचे टॉपचे महाराष्ट्रातील कॉलेजेस पाहूया.:
|
BSc B.Ed. Integrated Course सर्व कॉलेजेस चे सरासरी शुल्क
यामध्ये सरकारी कॉलेजेस जे अनुदानित असतात त्यामध्ये फी कमी असते तर खाजगी कॉलेजेस मध्ये 40 ते 50 हजार दरवर्षी याप्रमाणे फीस जाऊ शकते.
मध्ये प्लेसमेंट साठी काय करावे ?
अनेक नामवंत खाजगी शाळा कॅम्पस इंटरव्यू द्वारे शिक्षकांची निवड करतात.
BSc B.Ed. Integrated Course यामध्ये करिअर आणि संधी
जर तुम्हाला शिक्षणाची आवड असेल आणि तुम्ही त्यामध्येच करिअर करण्याची इच्छा असेल तर बीएससी बीएड पदवी ही तुमच्यासाठी विविध करिअर मार्ग उघडते बीएससी बीएड नंतर भारतातील नोकरीच्या संधी खालील तक्ता थोडक्यात दिलेल्या आहे.
| शिक्षक | शाळेतील शिक्षक पदवीधर प्राथमिक माध्यमिक किंवा उच्च माध्यमिक शाळेतील शिक्षक म्हणून काम करतात. | पगार पाच ते सात लाख रुपये |
| महाविद्यालयीन प्राध्यापक | बीएड पदवीधर महाविद्यालय आणि विद्यापीठांमध्ये सहाय्यक प्राध्यापक म्हणून शिकू शकतात | दहा ते बारा लाख रुपये |
| खाजगी शिक्षक | बीएड पदवीधर विद्यार्थ्यांना वैयक्तिकृत शिकवणी सेवा देतात | |
| होमट्युटर्स | विद्यार्थ्यांना घरीच शिकवतात | पगार हे बदलू शकते. |
| शिक्षण संशोधक | बीएड पदवीधर शैक्षणिक संशोधन मध्ये अभ्यासक्रम विकासात योगदान देतात | पगार बदलतो |
| खाजगी क्लासेस | हे स्वतःचे खाजगी क्लास घेऊ शकतात आणि त्यामध्ये प्रचंड पैसा कमवू शकतात. | पगार बदलणारा |
BSc B.Ed. Integrated Course यामधील सरकारी नोकऱ्या
तुम्ही TET किंवा सीईटी अथवा टी सी इ टी या परीक्षा देऊन जिल्हा परिषद किंवा सरकारी शाळांमध्ये शिक्षण सेवक म्हणून रुजू होऊ शकतात.
यामधील खाजगी नोकऱ्या
यामध्ये नामांकित इंटरनॅशनल स्कूलमध्ये विज्ञानाचे शिक्षक म्हणून मोठी मागणी आहे.
यामधून पुढे उच्च शिक्षण
तुम्ही पुढे एम एस सी किंवा एम एड करू शकता आणि त्यानंतर नेट अथवा सेट देऊन कॉलेजमध्ये प्रोफेसर बनवू शकता.
यामधून पुढे स्वतःचा व्यवसाय
तुम्ही स्वतःचे कोचिंग क्लासेस किंवा शैक्षणिक कन्सल्टन्सी सुरू करू शकता.
BSc B.Ed. Integrated Course हा कोर्स केल्यानंतर पुढील संधी
यामध्ये तुम्ही दोन वर्षाची मास्टर ऑफ आर्ट्स एम ए पदवी मिळू शकता किंवा एम एड प्रोग्रॅम मध्ये प्रवेश घेऊ शकता त्यानंतर विद्यार्थी एम ए मिळवल्यानंतर एमफील मास्टर ऑफ फिलॉसॉफी किंवा पीएचडी डॉक्टर अफेलो शॉपी करून अधिरिक्त शिक्षण घेण्याचा पर्याय निवडू शकतात यासाठी तीन वर्षांचा अभ्यास आवश्यक आहे
याशिवाय विद्यार्थी नागरी सेवा परीक्षांसाठी अभ्यास करण्याचा किंवा अध्यापन हा त्यांच्या पसंतीचा करिअर मार्ग नसल्यास इतर अभ्यासक्रम घेण्याचा पर्याय देखील आहे चार वर्षात हा अभ्यासक्रम पूर्ण करून बीएससी बीएड फिजिक्स मॅथेमॅटिक्स केमिस्ट्री किंवा वनस्पतीशास्त्र आणि प्राणीशास्त्र यासह विविध वैज्ञानिक विषयांमध्ये सखोल शिक्षण घेऊ शकतात.
BSc B.Ed. Integrated Course यामध्ये मुख्य नोकरी कंपन्या
त्यामध्ये माध्यमिक शाळा नववी दहावी अथवा उच्च माध्यमिक शाळा दहावी ते बारावी आणि कोचिंग क्लासेस कोचिंग संस्था.
यामध्ये मिळणारा सरासरी पगार
सुरुवातीला वार्षिक तीन ते पाच लाख रुपयांपर्यंत पॅकेज मिळू शकते त्यानंतर हे वाढत जाते.
BSc B.Ed. Integrated Course हा कोर्स का आणि कोणी निवडावा.
ज्या विद्यार्थ्यांना सायन्स आवड आहे आणि ज्यांना समाजाला काहीतरी देण्याची इच्छा आहे त्यांच्यासाठी हा कोर्स चांगला मार्ग आहे.
BSc B.Ed. Integrated Course याची मागणी
सध्या तज्ञ विज्ञान शिक्षकांचे मोठे कमतरता आहे त्यामुळे नोकरीची शाश्वती चांगली आहे.
यामध्ये होणारे संशोधन
जर तुम्हाला शिक्षणात काही नवीन प्रयोग किंवा संशोधन करायचे असेल तर हा बेस उत्तम आहे.
हे निवडणे उत्तम कारण
महत्त्वाचे आहे कारण यामध्ये तुमचा एक वर्ष वाचते आणि तुम्ही पदवी मिळताच नोकरीसाठी पात्र ठरतात.
BSc Geology कोर्सची संपूर्ण माहिती वाचा .
BSc B.Ed. Integrated Course याबद्दल विचारली गेलेली प्रश्न
हो तुम्ही यूपीएससी एमपीएससी सारख्या सर्व स्पर्धा परीक्षांसाठी पात्र असतात.
नाही हा कोर्स करण्यासाठी बारावी सायन्स असणे अनिवार्य आहे.
शासकीय नोकरीसाठी तुम्हाला टीईटी अथवा सिटीईटी आणि अभियोग्यता परीक्षा (टी ए आय टी) द्यावी लागते खाजगी शाळांमध्ये तुम्ही थेट इंटरव्यू देऊन रुजू होऊ शकता.
हा प्रोफेशनल कोर्स असल्यामुळे रेगुलर मोड मध्ये करणे जास्त फायद्याचे आणि कायदेशीर रित्या योग्य ठरते.
हो महाराष्ट्र शासनाचे स्कॉलरशिप चे सर्व नियम एबीसीडी किंवा एसटी सवलती या कोर्सला लागू आहे. हा कोर्स केल्यावर मी स्पर्धा परीक्षा देऊ शकतो का ?
बारावी कॉमर्स विद्यार्थी हा कोर्स करू शकतात का ?
चार वर्षानंतर थेट नोकरी मिळते का ?
हा कोर्स रेगुलर करावा कि डिस्टन्स पद्धतीने करावा ?
फी माफीची सवलत मिळू शकते का ?