Btech Information Technology हा कोर्स काय आहे ?
बी टेक इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी हा कोर्स चार वर्षाचा एक डिग्री स्तरावरील इंजिनिअरिंगच्या अंतर्गत येणारा कोर्स आहे ज्यामध्ये नेटवर्क तसेच डेटाबेस तसेच सिस्टीम मॅनेजमेंट तसेच सॉफ्टवेअर कॉम्प्युटर कोडींग आणि सायबर सिक्युरिटी या सर्व गोष्टींचा अभ्यास शिकवला जातो. हा एक इंजिनिअरिंगच्या क्षेत्रातील उच्चतम दर्जाचा कोर्स मानला जातो.
या कोर्समध्ये मुख्यतः सॉफ्टवेअर इंजीनियरिंग त्याचा डेटाबेस मॅनेज करणे तसेच नेटवर्कची इन्फॉर्मेशन सिक्युरिटी आणि डेटा अनालिटिक सारख्या गोष्टींचा अभ्यासक्रम यामध्ये शिकवला जातो तसेच भविष्यातील आणि सध्या ट्रेनमध्ये असलेल्या आर्टिफिशियल इंटेलिजन्स तसेच मशीन लर्निंग ब्लॉकचेन टेक्नॉलॉजी यांबद्दलचा सखोल अभ्यास या चार वर्षाच्या कोर्समध्ये तुम्हाला पाहायला मिळतो.
याचा कालावधी
या कोर्सचा कालावधी चार वर्षाचा असून या कोर्समध्ये तुम्हाला आठ सेमिस्टर पाहायला मिळतात.
याचा हेतू
विद्यार्थ्यांना सॉफ्टवेअर इंजिनिअरिंग तसेच डेटाबेस मॅनेजमेंट आणि सायबर सिक्युरिटी यांसारख्या विविध क्षेत्रांमध्ये मुख्यतः परिपूर्ण बनवणे हाच या कोर्सचा मुख्य उद्देश्य आहे.
याचे मुख्य विषय
यात प्रामुख्याने कोडींग चा तसेच ऑपरेटिंग सिस्टीम तसेच अलगोरी दम क्लाऊड कम्प्युटिंग आणि आर्टिफिशल इंटेलिजन्स या विषयांचा समावेश पाहिला मिळतो.
याची अध्ययन पद्धती
यामध्ये केवळ थेरी नाही तर प्रॅक्टिकल नॉलेजवर जास्त भर दिला जातो यामध्ये तुम्हाला लॅब वर्क तसेच प्रोजेक्ट आणि इंटरशिप पाहायला मिळते.
Btech Information Technology यासाठी शैक्षणिक पात्रता कोणती ?
यासाठी शैक्षणिक पात्रता आहे बारावी पास विद्यार्थ्यांना बारावी पास असणे गरजेचे आहे कमीत कमी 50 ते 60 टक्के गुण फिजिक्स केमिस्ट्री आणि मॅथ मध्ये उत्तीर्ण असायला पाहिजेत. हा एक डिग्रीस्तरावरील कोर्स आहे त्यामुळे फक्त बारावी पास विद्यार्थीच यासाठी ऍडमिशन घेऊ शकतात.
याची पात्रता
- या अभ्यासक्रमाला प्रवेश घेण्यासाठी विद्यार्थ्यांना बारावी पास असणे गरजेचे आहे.
किमान गुण
- तुम्हाला बारावी मध्ये फिजिक्स केमिस्ट्री आणि मॅथेमॅटिक्स या विषयांमध्ये कमीत कमी 50% गुण असणे आवश्यक आहे तसेच प्रवर्गानुसार यामध्ये तुम्हाला सवलतही मिळू शकते.
- विद्यार्थ्या मित्रांनो माझ्या माहितीनुसार हे सर्व शैक्षणिक पात्रता बारावी नंतरच लागू होते कारण हा डिग्रीस्तरावरील कोर्स आहे – पृथ्वीराज चंदनशिव
Btech Information Technology याची ऍडमिशन प्रोसेस
याची ऍडमिशन प्रोसेस खूप सोपी आहे विद्यार्थ्यांना वरील शैक्षणिक पात्रता पूर्ण करावी लागते मॅथ हा विषय कंपल्सरी आहे. जर विद्यार्थी बारावी पास असेल आणि वरची शैक्षणिक पात्रता पूर्ण करत असेल तर यासाठी जे ही कॉलेज आणि विद्यापीठ जो हा कोर्स ऑफर करीत आहेत त्यांच्या ऑफिशियल वेबसाईट वरती जाऊन विद्यार्थी रजिस्ट्रेशन करू शकतो तसेच ऑफलाइन सुद्धा कॉलेजला भेट देऊन विद्यार्थी ऍडमिशन पूर्ण करू शकतो.
पण काही कॉलेजमध्ये याची एंट्रन्स एक्झाम घेतली जाते जसं एमएचटी-सीईटी , जे ई इ मेन्स / ऍडव्हान्स अशा परीक्षांच्या गुणांच्या आधारे सुद्धा काही कॉलेज प्रवेश देतात.
पात्रता तपासा
आणि तुमची बारावीचे टक्केवारी आणि प्रवेश परीक्षेचे गुण तपासा
प्रवेश परीक्षा
महाराष्ट्रात प्रवेशासाठी सीईटी किंवा जे इ मेन परीक्षा देणे बंधनकारक आहे.
कॉलेज निवडा
आपले आर्टिकल्स वाचून तसेच आपले व्हिडिओ पाहून तुम्ही वेगवेगळ्या कॉलेजेस ची यादी तयार करू शकता जे ते हा कोर्स उत्तम पद्धतीने शिकवला जातो.
अर्ज करा
वेगवेगळ्या कॉलेजेस च्या संकेतस्थळावरती जाऊन तुम्ही ज्या वेळेस याचे ऍडमिशन सुरू होतात त्यावेळी तिथे नोंदणी करू शकता.
गुण मिळवा व पसंती क्रम भरा
कॉलेजमध्ये एक पसंतीक्रम म्हणजेच ऑप्शन फॉर्म असतो तो भरा.
डॉक्युमेंट वेरिफिकेशन
कॉलेज मिळाल्यानंतर कागदपत्रांची पडताळणी करावी लागते ती करून नंतर फी भरली जाते आणि प्रवेश निश्चित करू शकतात.
Btech Information Technology याचा कालावधी
या कोर्सचा कालावधी तुम्हाला हा चार वर्षाचा पहिला मिळतो हा एक डिग्री स्तरावरील कोर्स आहे जो पूर्णतः पूर्ण वेळ कोर्स आहे. विद्यार्थ्यांना स्वतः कॉलेजमध्ये जाऊन हा कोर्स पूर्ण करावा लागतो. तसेच यामध्ये तुम्हाला एका वर्षामध्ये दोन सेमिस्टर असे चार वर्षांमध्ये आठ सेमिस्टर पाहायला मिळतात. शेवटच्या वर्षामध्ये विद्यार्थी कॅम्पस मार्फत पण नोकरी मिळवू शकतो पण त्यासाठी चांगले कॉलेज निवडणे आणि हा कोर्स मन लावून करणे गरजेचे आहे.
याची रचना
पहिल्या वर्षी सर्व विषय सारखेच असतात उदाहरणात यामध्ये बेसिक इंजीनियरिंग पाहायला मिळते दुसऱ्या वर्षापासून खऱ्या अर्थाने इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीच्या संबंधित विषयांची ओळख सुरू होते.
यात तुम्ही काय शिकता
तुम्ही सॉफ्टवेअर कसे बनवायचे त्याचा डेटा कसा सुरक्षित ठेवायचा मोबाईल ॲप्स कसे बनवायचे आणि इंटरनेट ऑफ थिंग्स कसे काम करतात हे शिकतात.
Btech Information Technology याचे विषय आणि अभ्यासक्रम
| सेमिस्टर १ | सेमिस्टर २ |
|
माहिती तंत्रज्ञानाचे परिमाण सामान्य अभियांत्रिकीचे (कार्यशाळा आणि अभियांत्रिकी ग्राफिक्स) अभियांत्रिकी |
गणित I अभियांत्रिकी गणित II इलेक्ट्रॉनिक्स संगणक भाषांचे मूलभूत ज्ञान अभियांत्रिकी भौतिकशास्त्र संगणक संघटना संवाद कौशल्ये एमएस-विंडोजचा वापर |
| सेमिस्टर ३ | सेमिस्टर ४ |
| व्हिज्युअल बेसिक संगणक संप्रेषण नेटवर्क विद्युत मापन आणि मापन उपकरणे संगणक – |
ओरिएंटेड संख्यात्मक पद्धती सी द्वारे डेटा स्ट्रक्चर्स वेब तंत्रज्ञानाचा परिचय डिजिटल इलेक्ट्रॉनिक्स ऑब्जेक्ट-ओरिएंटेड प्रोग्रामिंग (C++) ऑपरेटिंग सिस्टम्स आयटीचे व्यवसाय अनुप्रयोग |
| सेमिस्टर ५ | सेमिस्टर ६ |
| डेटाबेस सॉफ्टवेअरच्या संकल्पना प्रकल्प व्यवस्थापन माहिती प्रणालींचे व्यवस्थापन मायक्रोप्रोसेसरचे अनुप्रयोग | व्यवस्थापनाची तत्त्वे ई-कॉमर्स जावा प्रोग्रामिंग आरडीबीएमएस मायक्रोप्रोसेसर प्रकल्प I चा परिचय |
| सेमिस्टर ७ | सेमिस्टर ८ |
| संगणक ग्राफिक्स आणि सिम्युलेशन डेटा मायनिंग आणि डेटा वेअरहाऊसिंग प्रोग्रामिंग साधने आणि तंत्रे | वितरित डेटाबेस कंपाइलर डिझाइन नेटवर्क सुरक्षा आणि क्रिप्टोग्राफी व्हिज्युअल C++ प्रकल्प II कृत्रिम बुद्धिमत्ता – |
प्रॅक्टिकल्स
कोडी तसेच लॅप्स आणि मिनी प्रोजेक्ट स्वर यामध्ये विशेष भर दिला जातो.
प्रथम वर्ष
हा इंजिनिअरिंगचा कोर्स आहे त्यामुळे प्रथम वर्षात इंजीनियरिंग चा पाया रचला जातो.
शेवटचे वर्ष
बाहेर कंपन्यांमध्ये नोकरीसाठी लागणारे कौशल्य आणि मेजर प्रोजेक्ट पूर्ण करणे यावर शेवटच्या वर्षात भर दिला जातो.
Btech Information Technology याचे कॉलेजेस
- पुणे इन्स्टिट्यूट ऑफ कम्प्युटर टेक्नॉलॉजी वार्षिक फी दीड ते दोन लाख
- सिम्बॉयसिस इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी वार्षिक फी एक ते दीड लाख
- विश्वकर्मा इन्स्टिट्यूट ऑफ इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी वार्षिक फी एक ते दीड लाख
- वीरमाता जिजाबाई टेकनॉलॉजिकल इन्स्टिट्यूट मुंबई वार्षिक फी 60 ते 70 हजार
- अथर्व युनिव्हर्सिटी मुंबई वार्षिक फी 40 ते 50 हजार
- संदीप युनिव्हर्सिटी नाशिक वार्षिक फी दोन ते तीन लाख
सरासरी शुल्क
सरकारी कॉलेजेस मध्ये फी कमी असते 50 हजार ते एक लाख रुपयांपर्यंत पाहायला मिळते, तर खाजगी कॉलेजेस मध्ये ती फीस दोन ते चार लाखांपर्यंत असू शकते.
प्लेसमेंट तयारी
कॉलेजेसच्या तिसऱ्या वर्षापासून एट्टीट्यूड टेस्ट आणि कोडींग ची प्रॅक्टिस सुरू केली जाते.
Btech Electrical And Electronics Engineering बद्दल माहिती
Btech Information Technology यामध्ये करिअर आणि संधी
यामध्ये डिग्री पूर्ण केल्यानंतर विद्यार्थी खालील नोकरी मिळू शकतो.
- सॉफ्टवेअर डेव्हलपर
यांचे काम असते विविध कॉम्प्युटर साठी लागणारे सॉफ्टवेअर तयार करणे त्यामधील त्रुटी दूर करणे नवीन सॉफ्टवेअर बनवणे त्याची टेस्टिंग करणे तसेच वेगवेगळे तंत्रज्ञानाचा वापर करून त्याला अधिक सक्षम बनवणे पगार 8 लाख वार्षिक
- सायबर सिक्युरिटी
यांचे काम असते सायबर जाळ्यांना सुरक्षित ठेवणे. चे सॉफ्टवेअर असतात तसेच वेबसाईट असतात यांवर हॅकर्सचा अटॅक होऊ शकतो तर त्यांपासून अशा वेबसाईट्सला सॉफ्टवेअर्स ला वाचवणे आणि त्यांना अजून जास्त सुरक्षित ठेवणे त्यांच्यावर नजर ठेवणे. पगार 10 लाख वार्षिक.
- क्लाऊड कम्प्युटिंग
यांचे काम असते वेगवेगळे जसे ॲमेझॉन चे ए डब्ल्यू एस आहे अशा सॉफ्टवेअर्सला डिझाईन करणे त्याला मॅनेज करणे आणि जे क्लाऊड इन्फ्रास्ट्रक्चर आहे जसे जीसीपी, एजर , तयार करणे. पगार 9 लाख वार्षिक.
- डेटा सायंटिस्ट
यांचे काम असते सॉफ्टवेअर कॉलिटी चांगली ठेवणे तसेच हार्डवेअर आणि सॉफ्टवेअर मध्ये जे प्रॉब्लेम्स येतात त्याला ट्रबल शूट करणे तसेच एआय सोल्युशन्स आणि अलगोरिदम्स पाहणे जे ऑटोमॅटिक सॉफ्टवेअर असतात त्यांचा डिप्लॉयमेंट करणे. पगार 8 लाख वार्षिक
- सरकारी नोकऱ्या
इसरो, डीआरडीओ, बार्क आणि बँकिंग क्षेत्रात इन्फॉर्मशन टेक्नॉलॉजी ऑफिसर म्हणून तुम्हाला काम करता येते तसेच यूपीएससी आणि एमपीएससी सारख्या आयोगाच्या परीक्षाही देता येतात.
- खाजगी नोकऱ्या
टीसीएस, इन्फोसिस, मायक्रोसॉफ्ट, ॲमेझॉन, यांसारख्या मोठ्या खाजगी कंपन्यांमध्ये सॉफ्टवेअर इंजिनिअर म्हणून नोकरी मिळू शकते.
- उच्च शिक्षण
तुम्ही पुढे एमटेक किंवा एमबीए पण करू शकता परदेशात एमएस करण्यासाठी देखील पदवीला मोठी मागणी आहे.
- स्वतःचा व्यवसाय
स्वतःची आयटी स्टार्टअप कंपनी सुद्धा तुम्ही चालू करू शकता किंवा फ्रीलान्सिंग सुद्धा सुरू करू शकता.
Btech Information Technology हा कोर्स केल्यानंतर पुढील संधी
हा कोर्स केल्यानंतर विद्यार्थ्यांना पुढे खूप संधी आहेत जसे हा कोर्स कम्प्लीट केल्यानंतर विद्यार्थ्यांना सायबर सिक्युरिटी क्लाऊड कम्प्युटिंग तसेच डेटा सायन्स सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट अशा वेगवेगळ्या ठिकाणी खूप सोप्या पद्धतीने जॉब मिळू शकतो. तसेच विद्यार्थी सायबर सिक्युरिटी अनालिस्ट फुलस्टेक डेव्हलपर डेव्हलपर इंजिनियर अशा वेगवेगळ्या पदांवर काम करू शकतात आयटी सेक्टर मध्ये.
तसेच हा कोर्स कम्प्लीट केल्यानंतर विद्यार्थी या डिग्रीच्या मदतीने वेगवेगळ्या गव्हर्मेंट एक्झाम सुद्धा देऊ शकतो आणि एक चांगली सरकारी नोकरी मिळू शकतो. इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी मंत्रालयामध्ये सुद्धा यासाठी वेगवेगळ्या जॉब्स अवेलेबल आहेत.
तसेच विद्यार्थी हा कोर्स पूर्ण केल्यानंतर उच्च शिक्षणासाठी सुद्धा जाऊ शकतो पुढे पोस्ट ग्रॅज्युएशन मास्टर्स किंवा पीएचडी सुद्धा करू शकतो.
मुख्य कंपन्या
- गुगल,
- मेटा,
- विप्रो,
- जेमिनी,
- असेंजर,
सरासरी पगार
सुरुवातीला वार्षिक पगार तीन ते आठ लाख रुपयांपर्यंत मिळू शकतो अनुभवानुसार हा आकडा 20 ते 30 लाखांच्याही पुढे जाऊ शकतो.
Btech Information Technology हा कोर्स का आणि कोणी निवडावा.
हा कोर्स त्या विद्यार्थ्यांनी निवडावा ज्यांना आयटी सेक्टर मध्ये जॉब करण्याचे स्वप्न आहे तसेच सायबर सिक्युरिटी डेटा सायंटिस्ट बनण्याचा त्यांचा हेतू असेल किंवा या डिग्रीच्या मदतीने उच्च शिक्षण जर करायचे असेल तरीसुद्धा चांगले आहे किंवा या डिग्रीच्या मदतीने विद्यार्थी एक चांगली सरकारी नोकरी सुद्धा मिळू शकतो. विद्यार्थी मित्रांनो यांपैकी तुमचे जेही स्वप्न असेल तुम्ही या डिग्रीच्या मदतीने ते पूर्ण करू शकता.
मागणी
भविष्यात डिजिटल जग आहे आणि सध्याही डिजिटल जग झपाट्याने वाढत आहे त्यामुळे इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी तज्ञांची मागणी ही कायमस्वरूपी चालूच राहील.
पगार
इतर क्षेत्राच्या तुलनेत यामध्ये पगार वाढ वेगाने होतो.
संशोधन
आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि मशीन लर्निंग मध्ये संशोधनाची खूप वाव पाहायला मिळते.
निवडण्याचे कारण
जर तुम्हाला घरबसल्या काम आणि जागतिक दर्जाचे करिअर हवे असेल तर हा कोर्स नक्की निवडा.
Btech Information Technology याबद्दल विचारली गेलेली प्रश्न
Btech Information Technology या डिग्री मध्ये कोणत्या गोष्टीवर लक्ष केंद्रित असते ?
यामध्ये प्रॅक्टिकल एप्लीकेशन त्याला मॅनेज करणे त्यांची माहिती पाहणे तसेच सॉफ्टवेअरचा डेटा कलेक्ट करणे या गोष्टींवर लक्ष केंद्रित केले जाते.
Btech Information Technology यामध्ये वेगवेगळ्या लँग्वेज शिकवल्या जातात का ?
हो यामध्ये प्रोग्रामिंग लँग्वेजेस शिकवल्या जातात जसे पायथन जावा प्रोग्रामिंग सी तसेच सीएसएस , एचटीएमएल अशा भाषांचा सुद्धा अभ्यास यामध्ये शिकवला जातो.
Btech Information Technology या कोर्सला ऍडमिशन घेण्यासाठी कमीत कमी किती मार्क असावे लागतील ?
या अभ्यासक्रमाला ऍडमिशन मिळवण्यासाठी विद्यार्थ्यांना बारावी मध्ये कमीत कमी 50 ते 60% मार्क असणे आवश्यक आहे.
Btech Information Technology यामध्ये पुढील संधी कोठे पाहायला मिळतात ?
यामध्ये पुढील संधी आयटी सेक्टर मध्ये पाहायला मिळतात जे ते विद्यार्थी सॉफ्टवेअर डेव्हलपर आयटी कन्सल्टंट सायबर सिक्युरिटी अनालिस्ट अशा वेगवेगळ्या पदांवर कार्य करू शकतो.
Btech Information Technology या डिग्रीवर जी नोकरी मिळेल त्यामध्ये ऍव्हरेज पगार किती आहे ?
यामध्ये वेगवेगळ्या नोकऱ्या पाहायला मिळतात ज्यामध्ये कमीत कमी विद्यार्थ्यांना साडेचार लाख ते आठ लाखाचे पॅकेज जे की वार्षिक असते ते पाहायला मिळते.