Warning: Constant PRODUCTION_FACTORY_BUY_BUNDLE already defined in /home2/studyflo/public_html/wp-content/themes/production-factory/get-started/notice.php on line 5
BTech Artificial Intelligence And Machine Learning माहिती

BTech Artificial Intelligence And Machine Learning बद्दल माहिती 2026 । पात्रता, अभ्यासक्रम , कालावधी

BTech Artificial Intelligence And Machine Learning बद्दल माहिती 2026 । पात्रता, अभ्यासक्रम , कालावधी
Key Points hide

BTech Artificial Intelligence And Machine Learning हा कोर्स काय आहे ?

बी टेक आर्टिफिशियल इंटेलिजन्स अँड मशीन लर्निंग हा इंजीनियरिंग अंतर्गत येणारा डिग्री स्तरावरील कोर्स आहे जिथे आपण मशीनला माणसाप्रमाणे विचार करणे तसेच निर्णय घ्यायला शिकवतो. आजच्या दैनंदिन जीवनात तंत्रज्ञानाचा खूप मोठा वाटा आहे आणि त्यामध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्स हा महत्त्वाची भूमिका निभावतो जर तुम्हाला गणितात रस असेल तसेच संगणकाची आवड असेल तर हा कोर्स तुमच्या आयुष्यातला एक नवीन उंची देणारा महत्त्वाचा पाया ठरू शकतो .

याचा कालावधी

हा चार वर्षाचा पदवी स्तरावरील अभ्यासक्रम आहे ज्यामध्ये आठ सेमिस्टर पाहायला मिळतात.

याचा हेतू

विद्यार्थ्यांना अशा प्रणाली विकसित करण्यास सक्षम करणे जे डेटाचे विश्लेषण करू शकतात आणि स्वतःहून शिकून वेगवेगळ्या समस्या सोडू शकतात.

याचे मुख्य विषय

यात मुख्यताने कोडिंग लँग्वेजेस शिकवल्या जातात वेगवेगळ्या अल्गोरिदम्स तसेच देटा सायन्स येणाऱ्या काळातील रोबोटिक्स आणि न्यूरल नेटवर्क कसे काम करतात ह्या सर्व विषयांचा समावेश यामध्ये होतो.

याची अध्ययन पद्धत

यात केवळ पुस्तकी ज्ञान नाही तर लॅब प्रॅक्टिकल्स तसेच प्रोजेक्ट्स आणि इंटर्नशिप वर जास्त भर दिला जातो.

मित्रांनो माझ्या माहितीप्रमाणे या कोर्समध्ये मुख्यतः फ्लोप एक्टिवेशन एआय न्यूरल नेटवर्क याची विशेषता माहिती शिकवली जाते त्यामुळे हे समजून घेणे तुम्ही महत्त्वाचे आहे – पृथ्वीराज चंदनशिव

BTech Artificial Intelligence And Machine Learning यासाठी शैक्षणिक पात्रता कोणती ?

या अभ्यासक्रमाला प्रवेश मिळवण्यासाठी विशेषतः महाराष्ट्रात गणित विषयाला जास्त महत्त्व दिले जाते आणि विद्यार्थ्याचे बारावी उत्तीर्ण असणे गरजेचे आहे कारण हा डिग्री स्तरावरील कोर्स आहे जो बारावी पास आऊट विद्यार्थी करू शकतो.

याची पात्रता

  • याची पात्रता बारावी उत्तीर्ण सायन्स या विषयांमधून तसेच भारतीय नागरिकत्व असणे गरजेचे आहे.

यासाठी कमीत कमी लागणारे गुण

  • ओपन कॅटेगरीसाठी साधारणतः 50% आणि राखीव प्रवर्गासाठी साधारणतः 45% गुण आवश्यक असतात.

याची वयोमर्यादा

  • साधारणपणे 16 ते 23 वर्ष आहे पण काही कॉलेजमध्ये वयाची अट ही शिटील आहे.

याचा प्रवाह

बारावी सायन्स मध्ये उत्तीर्ण झाल्यानंतर विशेषतः गणित हे विषय तर महत्त्वाचा आहेच तसेच काही ठिकाणी प्रवेश परीक्षा सध्या घेतली जाते.

BTech Artificial Intelligence And Machine Learning याची ऍडमिशन प्रोसेस

महाराष्ट्रात या अभ्यासक्रमासाठी प्रवेश मिळवायला डीटीई आणि सीईटी सेल मार्फत प्रक्रिया चालवली जाते.

याची पात्रता चेक करा

  • तुमची बारावीचे गुण आणि विषयांची सर्वप्रथम खात्री करा

याचे कॉलेज निवडा

  • तुमच्या गुणांनुसार उत्तम कॉलेजची यादी तयार करा.

यासाठी अर्ज करा

  • सीईटी सेलच्या वेबसाईटवर नोंदणी करा. आणि परीक्षा द्या.

याची प्रवेश परीक्षा

  • सीईटी आणि जेई परीक्षा देऊन चांगला स्कोर मिळवा.

यात गुण मिळवा

  • चांगल्या कॉलेजेस साठी चांगला परसेंटाइन मिळवणे हे गरजेचे असते त्यामुळे जास्तीत जास्त मार्क घेण्याचा प्रयत्न करा.

याचे डॉक्युमेंट वेरिफिकेशन

  • कॉलेज सेंटर वरती जाऊन कागदपत्राची पडताळणी करा.

याचे व्हिडिओ स्वरूप पहा

BTech Artificial Intelligence And Machine Learning याचा कालावधी

या कोर्सचा कालावधी तुम्हाला चार वर्षाचा पाहायला मिळतो यामध्ये आठ सेमिस्टर मध्ये हा पूर्ण अभ्यासक्रम विभागला गेलेला आहे.

याची रचना

प्रत्येक वर्षात दोन सेमिस्टर पाहायला मिळतात. पहिल्या वर्षी सर्व इंजिनिअरिंग शाखांची सारखेच विषय असतात पण दुसऱ्या वर्षापासून आर्टिफिशल इंटेलिजन्स तसेच मशीन लर्निंग चे मुख्य विषय शिकवण्यास सुरुवात होते.

यात तुम्ही काय शिकता

तुम्ही मशीनला ट्रेन कसे करायचे तसेच डेटा क्लिनिंग कशी करायची आणि गुंतागुंतीची प्रॉब्लेम्स कोडींग ने कसे सोडवायचे तुम्ही शिकता.

BTech Artificial Intelligence And Machine Learning याचे विषय आणि अभ्यासक्रम

सेमेस्टर 1   सेमेस्टर 2

गणित I
फिजिक्स
फिजिक्स लॅब
C प्रोग्रामिंग भाषा
C प्रोग्रामिंग भाषा लॅब
बिग डेटा सह खेळणे
ओपन सोर्स आणि ओपन स्टँडर्ड्स
कम्युनिकेशन वर्कशॉप 1.1

कम्युनिकेशन वर्कशॉप 1.1 लॅब
जागतिक इतिहासातील महत्वाची घटना
गणित II
मुलभूत इलेक्ट्रॉनिक्स अभियांत्रिकी
मुलभूत इलेक्ट्रॉनिक्स अभियांत्रिकी लॅब
C सह डेटा स्ट्रक्चर्स
डेटा स्ट्रक्चर्स-लॅब
डिस्क्रीट गणितीय संरचना
IT आणि क्लाऊड इन्फ्रास्ट्रक्चरचे परिचय
कम्युनिकेशन वर्कशॉप 1.2
कम्युनिकेशन वर्कशॉप 1.2 लॅब
पर्यावरण अभ्यास
कलेच्या मुलभूत गोष्टींचा आदर
सेमेस्टर 3   सेमेस्टर 4
कंप्युटर सिस्टिम आर्किटेक्चर
अल्गोरिदम डिझाईन आणि विश्लेषण
अल्गोरिदम डिझाईन आणि विश्लेषण लॅब
वेब तंत्रज्ञान
वेब तंत्रज्ञान लॅब
पायथॉनमध्ये फंक्शनल प्रोग्रामिंग

इंटरनेट ऑफ थिंग्जचे परिचय
कम्युनिकेशन वर्कशॉप 2.0
कम्युनिकेशन वर्कशॉप 2.0 लॅब
डिजिटल साधनांचे संरक्षण
अ‍ॅप्लाइड सायकोलॉजीचे परिचय
ऑपरेटिंग सिस्टीम्स
सेमेस्टर 5 सेमेस्टर 6
डेटा कम्युनिकेशन आणि कंप्युटर नेटवर्क्स
डेटा कम्युनिकेशन आणि कंप्युटर नेटवर्क्स लॅब
फॉर्मल भाषा आणि ऑटोमाटा सिद्धांत
मोबाईल अ‍ॅप्लिकेशन विकास
मोबाईल अ‍ॅप्लिकेशन विकास प्रयोगशाळा
बुद्धिमान प्रणालींसाठी अल्गोरिदम
AI आणि ML मधील वर्तमान विषय

सॉफ्टवेअर अभियांत्रिकी आणि उत्पादन व्यवस्थापन
मायनर विषय: – 1. आधुनिक इंग्रजी साहित्यातील पैलू किंवा भाषाशास्त्राचा परिचय
मायनर प्रकल्प I
तार्किकता, समस्या सोडवणे आणि रोबोटिक्स
मशीन लर्निंगची ओळख
मशीन लर्निंगची ओळख
नॅचरल लँग्वेज प्रोसेसिंग
मायनर विषय 2 – सामान्य व्यवस्थापन
मायनर विषय 3 – आधुनिक व्यावसायिकांसाठी वित्त
डिझाईन थिंकिंग
कम्युनिकेशन कार्यशाळा 3.0
मायनर प्रकल्प II
सत्र 7  सत्र 8
प्रोग्रॅम निवडक विषय
वेब तंत्रज्ञान
मुख्य प्रकल्प- 1
सर्वसमावेशक परीक्षा
व्यावसायिक नैतिकता आणि मूल्ये
औद्योगिक इंटर्नशिप
उघडा निवडक विषय – 3

CTS-5 कॅम्पस ते कॉर्पोरेट
डीप लर्निंगची ओळख
मुख्य प्रकल्प 2
प्रोग्रॅम निवडक विषय-5
प्रोग्रॅम निवडक विषय-6
उघडा निवडक विषय – 4
सार्वत्रिक मानव मूल्ये आणि नैतिकता
रोबोटिक्स आणि बुद्धिमान प्रणाली


यामधील प्रॅक्टिकल्स

  • विद्यार्थ्यांना कोडींग लॅब तसेच क्लाऊड कॉम्प्युटिंग आणि डेटाविज्युलायझेशनचे प्रॅक्टिकल्स करावे लागतात.

प्रथम वर्षात काय शिकण्यास मिळते ?

  • प्रथम वर्षामध्ये इंजीनियरिंग चे बेसिक ज्ञान आणि पायाभूत गणितांबद्दल अभ्यास शिकवला जातो.

शेवट वर्षात काय शिकण्यास मिळते ?

  • स्पेशलिस्ट कोर्सेस आणि कॅप स्टोन प्रोजेक्ट जो तुमच्या नोकरीसाठी महत्त्वाचा असतो त्याचे शिक्षण शेवटच्या वर्षात दिले जाते.

BE Civil Engineering बद्दल माहिती

BTech Artificial Intelligence And Machine Learning याचे कॉलेजेस

टॉप कॉलेजेस व फी अंदाज (B.Tech AI/ML साठी):

कॉलेजेस फी
पिंपरी चिंचवड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग (PCCOE), पुणे: . सुमारे ₹18-21 लाख एकंदर (खासगी), MHT-CET आधारित
G.H. राइसोनी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग (GHRCE), नागपूर: सुमारे 5.78 लाख एकंदर (खासगी), JEE मेन/MHT-CET आधारित.
D.Y. पाटील युनिव्हर्सिटी, पुणे:  सुमारे ₹15 लाख एकंदर (खासगी)
महाराष्ट्र इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (MIT), पुणे (MIT-WPU): संबंधित CSE/IT साठी  सुमारे ₹14-17 लाख एकंदर (खासगी).
मॉडर्न कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पुणे:  सुमारे ₹2.5 लाख एकंदर (खासगी), खासगीसाठी खूप परवडणारे.
सरकारी कॉलेजेस (CoEP, VJTI, SPCE, वालचंद):  सहसा कमी फी, बहुधा प्रति वर्ष ₹1.5 लाख खाली.


सर्व कॉलेजेस चे सरासरी शुल्क

सरासरी चार वर्षाचा खर्च हा चार ते दहा लाख पर्यंत जाऊ शकतो हे सर्व त्या कॉलेजवर अवलंबून आहे.

मध्ये प्लेसमेंट साठी काय करावे ?

चांगल्या प्लेसमेंट साठी स्कोरिंग च्या स्किल सोबत तुमचे कम्युनिकेशन स्किल्स म्हणजेच बोलण्याच्या पद्धतीवर लक्ष द्या आणि किमान दोन वर्षाची इंटर्नशिप तुम्ही पूर्ण करा.

BTech Artificial Intelligence And Machine Learning यामध्ये करिअर आणि संधी

नौकरी  कामे  पगार 
सॉफ्टवेअर इंजिनिअर  मूळतः हा व्यक्ती संगणक प्रोग्रामिंग आणि अनुप्रयोग विकासात गुंतलेला असतो, तो वेब ब्राउझर्स इत्यादीसारख्या वापरकर्त्याभिमुख प्रोग्रामच्या विकासास मदत करतो. INR 5.3 लाख
डेटा अनालिस्ट  डेटा अनालिस्ट सुरुवातीला विशिष्ट विषयासंबंधी माहिती मिळवतो, नंतर ती डेटा व्यवस्थित करतो, अर्थ लावतो आणि विश्लेषण करतो. शेवटी संपूर्ण अहवालांच्या रूपात निष्कर्ष सादर करतो.  INR 5.4 लाख
मशीन लर्निंग इंजिनिअर  आपल्याला संबंधित प्रोग्राम चालवण्यासाठी अल्गोरिदम चालवणे आवश्यक आहे. याशिवाय त्यांच्या सुरळीत कार्याची खात्री करणे आवश्यक आहे.  INR 6.7 लाख
  • सरकारी क्षेत्रात थेट “AI/ML Engineer” अशी पदे कमी असली तरी, तंत्रज्ञान आणि संशोधन संस्थांमध्ये संधी उपलब्ध आहेत.
    संशोधन आणि विकास संस्था (R&D Organizations):
  • Bhabha Atomic Research Centre (BARC) आणि इतर संरक्षण संशोधन आणि विकास संस्था (DRDO) मध्ये वैज्ञानिक/अभियंता पदांसाठी भरती होते, जिथे AI/ML कौशल्ये उपयुक्त ठरतात.
  • Ministry of Electronics and Information Technology (MeitY) अंतर्गत डिजिटल इंडिया कॉर्पोरेशनसारख्या संस्थांमध्ये AI-संबंधित प्रकल्पांसाठी तात्पुरती किंवा कंत्राटी भरती केली जाते. 

यामधील सरकारी नोकऱ्या

डीआरडीओ तसेच इसरो आणि काही सहकारी बँकेमध्ये डेटा सायंटिस्ट म्हणून तुम्हाला संधी उपलब्ध होतात.

यामधील खाजगी नोकऱ्या

Google तसेच मोठ्या मोठ्या कंपन्या जसे की मायक्रोसॉफ्ट किंवा इन्फोसिस यांसारख्या कंपन्यांमध्ये भरघोस पगाराच्या नोकऱ्या तुम्हाला मिळतात.

यामधून पुढे उच्च शिक्षण

तुम्ही परदेशात एम एस करू शकतात तसेच भारतामध्ये एमटेक सुद्धा करू शकता.

यामधून पुढे स्वतःचा व्यवसाय

तुम्ही स्वतःची आर्टिफिशियल इंटेलिजन्स कंपनी सुद्धा स्टार्टअप सुरू करू शकता.

BTech Artificial Intelligence And Machine Learning हा कोर्स केल्यानंतर पुढील संधी

यामध्ये विद्यार्थ्यांना हा अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर प्रायव्हेट तसेच गव्हर्मेंट जॉब तसेच स्वतःचा व्यवसाय सुरू करण्याची संधी उपलब्ध होते पण हे सर्व जॉब आणि भरघोस पगार मिळवणे हे स्किल्सवर डिपेंड आहे.

यामध्ये मुख्य नोकरी कंपन्या

  • ॲमेझॉन
  • अडोबी
  • मेटा
  • विप्रो
  • असेंटर

यामध्ये मिळणारा सरासरी पगार

यामध्ये सरासरी पगार हा फ्रेशर साठी पाच ते दहा लाख रुपया असू शकतो पुढे जाऊन अनुभवी हॉल तेव्हा 15 ते 50 लाख अधिक मिळू शकतो.

BTech Artificial Intelligence And Machine Learning हा कोर्स का आणि कोणी निवडावा.

ज्यांना भविष्यातील तंत्रज्ञानात रस आहे आणि ज्यांना गणितांची भीती वाटत नाही त्यासाठी हा कोर्स सर्वोत्तम आहे.

याची मागणी

  • पुढील दहा वर्षात जगभरात लाखो आर्टिफिशियल इंजिनियर ची गरज लागणार आहे.

यामध्ये मिळणारा पगार

  • कॅन्सर डिटेक्ट करणे असो की हवामानाचा अंदाज लावणे असो सर्वत्र आर्टिफिशल इंटेलिजन्स संशोधनाला मोठी वाव आहे.

यामध्ये होणारे संशोधन

  • दिवसेंदिवस तंत्रज्ञान विकसित होत आहे त्यामुळे यामधील संशोधन रोज पाहिला मिळते.

हे निवडणे उत्तम कारण

  • उच्च पगारारी कामाचे समाधान या कोर्समध्ये मिळते.

मित्रांनो माझ्या माहितीप्रमाणे जर मी तुम्हाला एक सजेशन देऊ इच्छितो ते म्हणजे तुम्ही हा कोर्स करताना तुमचे बॅकग्राऊंड जसे की तुम्हाला आर्टिफिशल इंटेलिजन्स आणि मशीन लर्निंग बद्दल थोडीशीही माहिती असेल तरी याचा फायदा या अभ्यासक्रमात खूप मोठा भेटू शकतो – पृथ्वीराज चंदनशिव

BTech Artificial Intelligence And Machine Learning याबद्दल विचारली गेलेली प्रश्न

BTech Artificial Intelligence And Machine Learning यासाठी मॅथ्स किती महत्त्वाचे आहे ?

मॅथ्स खूप महत्त्वाचे आहे विशेषतः स्टॅटिस्टिक्स आणि प्रोबाबिलिटी वर तुमची पकड असावी लागते.

कोडींग माहित नसले तरी प्रवेश घेता येतो का ?

हो कारण कॉलेजमध्ये कोडींग शून्यापासून शिकवली जाते फक्त शिकण्याची जिद्द हवी.

आर्टिफिशियल इंटेलिजन्स मुळे नोकऱ्या कमी होतील का ?

नाही याउलट यामुळे अधिक तांत्रिक आणि उच्च कौशल्याच्या वेगवेगळ्या नोकऱ्या निर्माण होणार आहेत.

कोडींग साठी काय गरजेचे आहे ?

कोडींग साठी स्वतः कोडिंग करणे ती शिकणे आणि समजून घेणे महत्त्वाचे आहे ?

बी टेक आणि बी इ यात काय फरक आहे ?

महाराष्ट्रात दोन्ही पदव्या समतुल्य मानल्या जातात फक्त बी टेक मध्ये प्रॅक्टिकल वर अधिक भर असतो.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *