BA Political Science Hons राजकारणाशी संबंधित आहे का ?
किंवा देशाची शासन व्यवस्था, संविधान आणि आंतरराष्ट्रीय संबंध (International Relations) समजून घ्यायला तुम्हाला आवडते का? जर तुमचे उत्तर ‘हो’ असेल, आणि तुम्ही १२ वी नंतर एका अशा कोर्सच्या शोधात असाल जो तुम्हाला भविष्यात प्रशासकीय अधिकारी (UPSC/MPSC) किंवा राजकीय विश्लेषक बनवण्यास मदत करेल, तर B.A. (Hons.) Political Science हा कोर्स तुमच्यासाठी एक उत्तम पर्याय आहे.
आजच्या या आर्टिकल मध्ये आपण या कोर्सची संपूर्ण माहिती अगदी सोप्या मराठीत पाहणार आहोत. प्रवेश प्रक्रियेपासून ते नोकरीच्या संधींपर्यंत सर्व काही सविस्तर चर्चा आपण करूया.
१२ वी नंतर विद्यार्थी हा कोर्स का निवडतात ? ( Why Choose B.A. Pol. Sci.? )
बारावी झाल्यानंतर बरेच विद्यार्थी विशेषताच्या विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेची (Competitive Exams) तयारी करायची आहे ते विद्यार्थी या कोर्सला पहिली पसंती देतात,
याचे मुख्य कारण म्हणजे राज्यशास्त्र हा विषय प्रशासकीय सेवांच्या परीक्षेचा कणा आहे.
हा विषय निवडण्यामागे विद्यार्थ्यांचा मुख्य उद्देश म्हणजे की त्यांना देशाच्या जगाच्या राजकारणाबद्दल सखोल ज्ञान प्राप्त करायचे असते.
शैक्षणिक पात्रता (Eligibility Criteria)
- हा कोर्स करण्यासाठी तुम्हा विद्यार्थ्यांना कोणत्याही विशेष ‘प्रवाहाची’ (Stream) अट लागत नाही.
- विद्यार्थ्यांनी १२ वी पास असणे आवश्यक आहे (Arts, Commerce किंवा Science कोणत्याही शाखेतून).
- बहुतेक चांगल्या कॉलेजेसमध्ये प्रवेशासाठी १२ वी मध्ये किमान ४५% ते ५०% गुण असणे आवश्यक असते.
- काही प्रतिष्ठित विद्यापीठांमध्ये तसेच कॉलेजेस मध्ये SC/ST प्रवर्गासाठी गुणांमध्ये ५% ची सवलत दिली जाते.
( “माझ्या अनुभवानुसार, जर तुमचे ध्येय कलेक्टर किंवा पोलीस अधिकारी बनण्याचे असेल, तर हा कोर्स तुम्हाला मुलाखतीसाठी खूप मदत करतो…”)
BA Political Science Hons या मध्ये प्रत्यक्षात काय शिकवले जाते ?
बरेचदा विद्यार्थ्यांना वाटते की राज्यशास्त्र म्हणजे फक्त निवडणुका आणि पक्ष! पण मित्रांनो, यामध्ये त्यापेक्षा खूप काही जास्त आहे. B.A. (Hons.) Political Science मध्ये तुम्हाला केवळ भारतीय राजकारणच नाही, तर जागतिक विचारप्रवाह शिकवले जातात.
या कोर्सचे मुख्य विषय खालीलप्रमाणे आहेत:
- राजकीय सिद्धांत (Political Theory):
स्वातंत्र्य, समता, न्याय यांसारख्या संकल्पना शिकवल्या जातात. - भारतीय शासन आणि राजकारण (Indian Government and Politics):
संविधान, संसद, राष्ट्रपती आणि न्यायव्यवस्था याबद्दलची सखोल माहिती विद्यार्थ्यांना शिकवले जाते. - आंतरराष्ट्रीय संबंध (International Relations): भारत आणि जगाचे संबंध कसे आहेत, युनेस्को, संयुक्त राष्ट्र (UN) असे सेन्सिटिव्ह विषय कसे हाताळायचे असतात याबद्दलची देखील माहिती यामध्ये शिकवली जाते.
- तुलनात्मक राजकारण (Comparative Politics):
भारताचे संविधान हे वेगवेगळ्या देशांच्या संविधानाचा अभ्यास करून एक मोठे संविधान बनवण्यात आलेले आहे.
जसे की तुम्हाला माहितीच आहे आपले भारताचे संविधान जे बनवले आहे ते वेगवेगळ्या देशाच्या संविधानाची तुलना करूनच बनवले आहे याबद्दलची माहिती तुम्हाला यामध्ये शिकवण्यात येते. - सार्वजनिक प्रशासन (Public Administration):
जर तुम्ही विद्यार्थी प्रशासनामध्ये रुजू झालात तर त्यानंतर सरकारी कामकाज कसे चालवले जाते याबद्दलची विस्तृत माहिती तुम्हाला या विषयांमध्ये शिकवली जाते.
माझा अनुभव : मित्रांनो जर तुम्ही एमपीएससी किंवा यूपीएससी या स्पर्धा परीक्षांची तयारी करत असाल तर भारतीय शासन आणि राजकारण (Indian Government and Politics) हा विषय सर्वात महत्त्वाचा असतो. या विषयाचा अभ्यास करताना रोजच्या वर्तमानपत्रातील बातम्या,(उदा. संसदेत पास झालेली विधेयके, सर्वोच्च न्यायालयाचे निर्णय) वाचण्याची सवय ठेवावी लागेल. त्याचबरोबर पुस्तके ज्ञानाला चालू घडामोडींशी जोडले तर हा विषय अगदी सोपा होऊन जातो. )
प्रवेश सोप्या शब्दात (Admission Process)
आता सर्वात महत्त्वाचा प्रश्न – ॲडमिशन नक्की मिळते कसे? हा कोर्स कोणासाठी उपयुक्त आहे? ज्या विद्यार्थ्यांना वाचनाची, विश्लेषणाची आणि वादविवादाची (Debate) आवड आहे, त्यांच्यासाठी हा कोर्स बनला आहे. महाराष्ट्रातील आणि देशातील अनेक टॉप कॉलेजेसमध्ये प्रवेशाची प्रक्रिया खालील पायऱ्यांनुसार चालते:
याची पात्रता चेक करा
सर्वात आधी तुम्ही ज्या कॉलेजमध्ये प्रवेश घेऊ इच्छिता, त्यांच्या वेबसाइटवर जाऊन पात्रता (Eligibility) तपासावी. साधारणपणे १२ वी पास असणे पुरेसे असते.
याचे कॉलेज निवडा
तुमच्या घराजवळचे किंवा शिक्षणासाठी प्रसिद्ध असलेले शहर (उदा. पुणे, मुंबई, दिल्ली) निवडून तिथे कोणती चांगली कॉलेजेस आहेत याची यादी करा.
यासाठी अर्ज करा ( Application )
बहुतेक कॉलेजेसचे फॉर्म्स मे किंवा जून महिन्यात (१२ वी च्या निकालानंतर) सुटतात. कॉलेजच्या अधिकृत वेबसाइटवर जाऊन ऑनलाइन फॉर्म भरा.
याची प्रवेश परीक्षा ( Entrance Exam )
पूर्वी फक्त १२ वी च्या गुणांवर प्रवेश मिळायचा, पण आता अनेक केंद्रीय विद्यापीठांमध्ये (उदा. दिल्ली युनिव्हर्सिटी, BHU) प्रवेशासाठी CUET (Common University Entrance Test) देणे अनिवार्य झाले आहे. महाराष्ट्रातील काही स्वायत्त (Autonomous) कॉलेजेस स्वतःची प्रवेश परीक्षा घेऊ शकतात.
यात गुण मिळवा (Merit List)
प्रवेश परीक्षेचे किंवा १२ वी चे गुण यावरून ‘मेरिट लिस्ट’ लावली जाते. जर तुमचे नाव या यादीत आले, तर तुम्हाला प्रवेश मिळतो.
याचे डॉक्युमेंट वेरिफिकेशन
तुमचे नाव लिस्टमध्ये आल्यावर तुम्हाला कॉलेजमध्ये जाऊन कागदपत्रे तपासावी लागतात. (उदा. १२ वी मार्कशीट, जातीचा दाखला, डोमिसाईल इ.).
( टीप : “महाराष्ट्रातील मुलांनी जातीचा दाखला आणि नॉन-क्रिमीलेअर वेळेवर काढून ठेवावे…”)
“एक मार्गदर्शक म्हणून मी अनेक विद्यार्थ्यांना पाहिले आहे ज्यांचे ऍडमिशन फक्त ‘कागदपत्रे’ वेळेवर नसल्यामुळे रद्द झाले.
विशेषतः ‘नॉन-क्रिमीलेअर’ (Non-Creamy Layer) आणि ‘जातीचा दाखला’ (Caste Validity) मिळायला वेळ लागतो. त्यामुळे निकाल लागण्याची वाट पाहू नका, १२ वी ची परीक्षा संपताच या कागदपत्रांसाठी अर्ज करा.”
प्रवेश घेताना विद्यार्थी कुठे चूक करतात? (Common Mistakes)
मार्गदर्शनाअभावी अनेक हुशार विद्यार्थी सुद्धा चुका करतात. एक समुपदेशक (Counselor) म्हणून मला तुम्हाला हे सांगायचे आहे :
1. फक्त ब्रँडच्या मागे धावणे : कॉलेजचे नाव मोठे आहे म्हणून प्रवेश घेऊ नका, तिथले शिक्षक (Faculty) कसे आहेत ते पाहणे अत्यंत गरजेचे असते.
2. प्रवेश परीक्षेच्या तारखा विसरणे : CUET किंवा कॉलेजच्या फॉर्मची शेवटची तारीख (Deadline) चुकवू नका.
3. विषयांची निवड : Honors कोर्समध्ये तुम्हाला ‘Elective’ विषय निवडावे लागतात. चुकीचे विषय निवडल्यास अभ्यासाचा ताण वाढू शकतो.
4. स्कॉलरशिप कडे दुर्लक्ष : अनेक कॉलेजेसमध्ये आर्थिकदृष्ट्या मागास विद्यार्थ्यांसाठी सवलती असतात, त्याबद्दल चौकशी न करणे.
वयक्तिक अनुभव:
“कॉलेज निवडताना फक्त इमारतीकडे बघू नका, तर त्या कॉलेजच्या आजूबाजूचे वातावरण बघा. जर तुम्हाला UPSC/MPSC करायची असेल, तर कॉलेजच्या जवळ चांगली लायब्ररी किंवा स्टडी रूम्स आहेत का, हे तपासणे खूप फायद्याचे ठरते. अभ्यासासाठी पूरक वातावरण अर्धे यश मिळवून देते.”
अभ्यासक्रम (Syllabus) खालीलप्रमाणे मराठीमध्ये आहे:
सेमिस्टर I (Semester I) सेमिस्टर II (Semester II)
१. भारतातील वसाहतवाद (Colonialism in India) १. भारतातील राष्ट्रवाद (Nationalism in India)
२. राजकीय सिद्धांत समजून घेणे (Understanding Political Theory) २. राजकीय सिद्धांत: संकल्पना आणि चर्चा (Political Theory: Concepts and Debates)
३. भारतातील घटनात्मक लोकशाही आणि शासन ३. भारतातील राजकीय प्रक्रिया (Political Processes in India)
४. भाषा (पात्रता) ४. भाषा (क्रेडिट)
द्वितीय वर्ष (Second Year)
सेमिस्टर III (Semester III) सेमिस्टर IV (Semester IV)
१. तुलनात्मक शासन आणि राजकारणाचा परिचय १. तुलनात्मक दृष्टीकोनातून राजकीय संस्था
२. प्रशासनाचे सिद्धांत (Theories of Administration) २. भारतातील सार्वजनिक धोरण आणि प्रशासन
३. आंतरराष्ट्रीय संबंधांचे सिद्धांत ३. जागतिक राजकारण (Global Politics)
तृतीय वर्ष (Third Year)
सेमिस्टर V (Semester V) सेमिस्टर VI (Semester VI)
१. भारतीय राजकीय विचार-I (प्राचीन विचारवंत) १. भारतीय राजकीय विचार-II (आधुनिक विचारवंत)
२. शास्त्रीय राजकीय तत्त्वज्ञान (Classical Philosophy) २. आधुनिक राजकीय तत्त्वज्ञान (Modern Philosophy)
३. समकालीन भारतातील विकास प्रक्रिया ३. भारताचे परराष्ट्र धोरण (Foreign Policy)
याचे कॉलेजेस आणि फीस (Top Colleges & Fees)
योग्य कॉलेज निवडणे ही यशाची पहिली पायरी आहे. महाराष्ट्रात आणि भारतात अनेक उत्तम कॉलेजेस आहेत. कॉलेजचे नाव (College Name) शहर (City) अंदाजे वार्षिक फी (Fees) प्रवेश प्रक्रिया (Admission)
- फर्ग्युसन कॉलेज (Fergusson College) पुणे ₹५,००० – ₹१०,००० १२ वी चे गुण (Merit)
- सेंट झेविअर्स कॉलेज (St. Xavier’s College) मुंबई ₹७,००० – ₹१५,००० १२ वी चे गुण + मुलाखत
- रुईया कॉलेज (Ramnarain Ruia College) मुंबई ₹५,००० – ₹८,००० १२ वी चे गुण (Merit)
- सिम्बायोसिस कॉलेज (Arts & Commerce) पुणे ₹२०,००० – ₹३०,००० १२ वी चे गुण (Merit)
- एम.आय.टी. डब्लू.पी.यू. (MIT-WPU) पुणे ₹७५,००० – ₹१,५०,००० प्रवेश परीक्षा (Entrance)
- के. जे. सोमैया कॉलेज (K. J. Somaiya) मुंबई ₹१०,००० – ₹४०,००० १२ वी चे गुण (Merit)
- सर परशुरामभाऊ कॉलेज (S.P. College) पुणे ₹४,००० – ₹६,००० १२ वी चे गुण (Merit)
मध्ये प्लेसमेंट साठी काय करावे ?
राज्यशास्त्रात थेट ‘कॅम्पस प्लेसमेंट’ कमी असते. पण जर तुम्ही कॉलेजमध्ये असतानाच ‘इंटर्नशिप’ (Internship) केली – उदा. एखाद्या NGO मध्ये, न्यूज चॅनेलमध्ये किंवा राजकीय नेत्याच्या पीआर टीममध्ये – तर तुम्हाला नोकरी मिळणे सोपे जाते. तुमचे लेखन कौशल्य (Writing Skills) आणि संवाद कौशल्य (Communication) उत्तम ठेवा.
कोर्सनंतर पुढे काय करता येते ? (Career & Scope)
हा प्रश्न पालकांचा आणि विद्यार्थ्यांचा सर्वात आवडता असतो – “पुढे काय?”.
मित्रांनो, B.A. Political Science नंतर करिअरचे अनेक दरवाजे उघडतात.
यामधील सरकारी नोकऱ्या
हे क्षेत्र सर्वात लोकप्रिय आहे:
- UPSC (IAS/IPS/IFS): राज्यशास्त्र हा विषय मुख्य परीक्षेसाठी (Mains) खूप गुण मिळवून देणारा आहे.
त्यामुळे जर विद्यार्थ्यांना हा विषय खूप सोपा जात असेल तर त्यांनी नक्कीच या विषयाकडे लक्ष दिले पाहिजे. - MPSC (राज्यसेवा): महाराष्ट्रात उपजिल्हाधिकारी, तहसीलदार यांसारख्या पदांसाठी जर तुम्ही विद्यार्थी इच्छुक असाल तर हा कोर्स नक्कीच तुमच्यासाठी डिझाईन करण्यात आलेला आहे.
- SSC/Railways: सामान्य ज्ञान (General Knowledge) पक्के असल्यामुळे या परीक्षा पास होणे सोपे जाते. SSC/Railways यांच्या परीक्षा खूप सोप्या असतात त्यामध्ये बारावीपर्यंतचा अभ्यासक्रम असतो.
यामधील खाजगी नोकऱ्या
- पत्रकारिता (Journalism): राजकीय पत्रकार म्हणून टीव्ही किंवा न्यूजपेपरमध्ये नक्कीच तुम्ही तुमचं फ्युचर सिक्युअर करू शकता.
- Political Consultant: राजकीय पक्षांसाठी रणनीती (Strategy) बनवणे. (उदा. प्रशांत किशोर यांची टीम).
अशा बऱ्याच पक्षांसाठी तुम्ही प्रायव्हेट तत्त्वावरती काम करू शकता. - Content Writer: राजकीय विषयांवर ब्लॉग किंवा लेख लिहिणे, त्याची SEO करणे अशी बरेच कामे असतात. जर तुम्ही इच्छुक असा किंवा तुम्हाला यामध्ये इंटरेस्ट आहे तर तुम्ही इथेही जॉब करू शकतात.
- NGO: सामाजिक संस्थांमध्ये प्रोजेक्ट मॅनेजर म्हणून देखील तुम्ही काम करू शकतात.
महाराष्ट्र मध्ये बरेच एनजीओ आहेत तिथे तुम्ही प्रायव्हेट तत्वावरती देखील काम करू शकतात.
यामधून पुढे उच्च शिक्षण
M.A. Political Science: ज्यांना प्रोफेसर व्हायचे आहे त्यांच्यासाठी हा कोर्स म्हणजे सुवर्णसंधी आहे. LL.B (Law): राज्यशास्त्र आणि कायदा यांचे कॉम्बिनेशन वकिलीसाठी उत्तम आहे.
जर तुम्हाला वकील बनायचे आहे तर त्याचा पाया म्हणजे राज्यशास्त्र. जर हा विषय तुमचा पक्का असेल तर पुढे चालून तुम्हाला कोणतीही अडचण येणार नाही.
MBA: एचआर किंवा मॅनेजमेंटमध्ये जाण्यासाठी. B.Ed: शालेय शिक्षक होण्यासाठी यासारखे बरेच पर्याय तुमच्यासमोर उपलब्ध होतात जर तुम्ही हा कोर्स योग्य पद्धतीने म्हणजे काळजीपूर्वक कम्प्लीट केलेला असेल तर.
यामधून पुढे स्वतःचा व्यवसाय
तुम्ही स्वतःचे ‘कोचिंग क्लासेस’ सुरू करू शकता, किंवा राजकीय विश्लेषण करणारी ‘कन्सल्टन्सी फर्म’ उभी करू शकता.
BA Psychology करिअरची माहिती, संधी आणि पूर्ण अभ्यासक्रम
Career बदलण्याची शक्यता (Career Flexibility)
कधीकधी विद्यार्थ्यांना वाटते की आपण चुकीच्या ट्रॅकवर तर नाही ना?
पण काळजी करू नका. B.A. Political Science केल्यानंतर तुम्ही तुमचे क्षेत्र सहज बदलू शकता.
तुम्ही कॉर्पोरेट सेक्टर मध्ये HR म्हणून जाऊ शकता.
तुम्ही डिजिटल मार्केटिंग मध्ये करिअर करू शकता कारण तुम्हाला लोकांची मानसिकता (Public Psychology) समजलेली असते.
तुम्ही सोशल वर्क (MSW) करून समाजकार्यात वळू शकता.
थोडक्यात, हा कोर्स तुम्हाला एकाच जागी अडकवून ठेवत नाही.
ह्या कोर्स चे फायदे व तोटे ? (Pros & Cons)
कोणत्याही नाण्याला दोन बाजू असतात. निर्णय घेण्यापूर्वी हे वाचा:
याची मागणी
सध्याच्या काळात ‘डेटा’ आणि ‘माहिती’ खूप महत्त्वाची आहे. राजकीय विश्लेषकांची आणि धोरण बनवणाऱ्यांची (Policy Makers) मागणी वाढत आहे.
यामध्ये मिळणारा पगार
सुरुवातीला पगार थोडा कमी असू शकतो (₹१५,००० – ₹२५,०००).
पण अनुभवानंतर, विशेषतः जर तुम्ही कन्सल्टंट किंवा सरकारी अधिकारी झालात, तर पगार लाखांमध्ये असतो.
यामध्ये होणारे संशोधन
ज्यांना वाचनाची वेड आहे, त्यांच्यासाठी हे नंदनवन आहे. तुम्ही विविध देशांच्या धोरणांवर ‘रिसर्च’ करून आंतरराष्ट्रीय स्तरावर नाव कमावू शकता.
हे निवडणे उत्तम कारण
हा कोर्स तुम्हाला केवळ नोकरीसाठी तयार करत नाही, तर एक जागरूक नागरिक बनवतो. तुम्हाला तुमचे हक्क आणि कर्तव्ये समजतात, ज्यामुळे तुम्ही समाजात ताठ मानेने जगू शकता.
तोटा (Cons): या कोर्समध्ये टेक्निकल स्किल्स (उदा. कोडिंग, मशिन्स) नाहीत, त्यामुळे जर तुम्ही वाचनात कच्चे असाल, तर हा कोर्स तुम्हाला कंटाळवाणा वाटू शकतो.
भविष्यासाठी तयारी ? (Long-term Growth Planning)
- जर तुम्हाला या क्षेत्रात ‘लांबचा पल्ला’ गाठायचा असेल, तर फक्त कॉलेजच्या अभ्यासावर अवलंबून राहू नका.
- नेटवर्किंग करा: कॉलेजमध्ये असतानाच सेमिनार्स आणि कॉन्फरन्सला जा.
- भाषा शिका: इंग्रजी सोबतच एखादी परदेशी भाषा (उदा. फ्रेंच, जर्मन) शिकल्यास तुम्हाला आंतरराष्ट्रीय संस्थांमध्ये (UN, दूतावास) नोकरी मिळू शकते.
- स्वतःचे ब्लॉग किंवा आर्टिकल लिहायची सवय ठेवा.
- राज्यशास्त्र हे एक असे क्षेत्र आहे जे कधीही संपणार नाही, जोपर्यंत समाज आहे, तोपर्यंत राजकारण आणि प्रशासन असणारच !
असे अनेक प्रश्न विचारले जातात. त्याबद्दल माझे मनोगत खाली व्यक्त केले आहे
तर मित्रांनो “सायन्स, कॉमर्स किंवा आर्ट्स कोणत्याही शाखेचा विद्यार्थी हा कोर्स करू शकतो; किंबहुना अनेक सायन्सचे विद्यार्थी स्पर्धा परीक्षेच्या तयारीसाठी जाणीवपूर्वक हाच पर्याय निवडतात. B.A. Program मध्ये ३-४ विषयांचा एकत्रित अभ्यास असतो, त्याउलट B.A. (Hons) मध्ये केवळ राज्यशास्त्राचा सखोल अभ्यास असल्याने याचे महत्त्व आणि ‘व्हॅल्यू’ अधिक मानली जाते. विशेष म्हणजे या कोर्सचा गणिताशी काहीही संबंध नसल्याने, ज्यांना गणिताची भीती वाटते त्यांच्यासाठी हा कोर्स सुरक्षित आणि उत्तम आहे, कारण यात फक्त लॉजिक आणि थेअरी असते.
महाराष्ट्रातील पुणे, मुंबई किंवा कोल्हापूर यांसारख्या विद्यापीठांमध्ये हा कोर्स मराठी माध्यमातून उपलब्ध असला, तरी भविष्यातील जागतिक संधींसाठी तुम्ही इंग्रजी सुधारण्यावर भर दिला पाहिजे. सरतेशेवटी, जर तुमचे ध्येय UPSC असेल, तर हा कोर्स तुमच्यासाठी एक ‘सुवर्णसंधी’ आहे, कारण यात मुख्य परीक्षेच्या GS Paper 2 चा जवळपास ६०-७०% अभ्यासक्रम सहज कव्हर होतो.”