BA Psychology हा कोर्स काय आहे ?
या विद्यार्थ्यांना मानवी स्वभाव मानवी मन याबद्दल माहिती जाणून व समजून घेण्याची आवड असते. त्या विद्यार्थ्यांसाठी BA Psychology हा एक सर्वोत्तम पर्याय आहे.
महाराष्ट्रातील अनेक विद्यार्थी हा कोर्स अभ्यासक्रमासाठी निवडत आहेत. तर मित्रांनो BA Psychology याबद्दलची संपूर्ण माहिती एकदम सोप्या भाषेत आपण यामध्ये पाहणार आहोत.
बी.ए. सायकॉलॉजी ( Bachelor of Arts in Psychology ) यामध्ये मानवी वर्तन, मानवी मन, मानवी भावना, आणि मानवाची विचार करण्याची प्रक्रिया अशा गोष्टींचा अभ्यास या मध्ये शिकवला जातो.
हा बारावी नंतर केला जाणारा पदवी स्तरावरील अभ्यासक्रम आहे.
हा तीन वर्षांचा कोर्स आहे. या तीन वर्षांमध्ये विद्यार्थ्यांना माणूस असा का वागतो? माणसाच्या मनात काय काय गोष्टी चालू असतात? तसेच मानसिक समस्या कशा प्रकारे सोडवायच्या असतात. हे शिकवले जाते
BA Psychology याचा कालावधी
याचा कालावधी हा 3 वर्षांचा आहे. त्याच बरोबर नवीन शैक्षणिक धोरणानुसार हा काही ठिकाणी 4 वर्ष इतका आहे. याचा हेतू
- याचा मुख्य हेतू पहायचा झाला तर विद्यार्थ्यांना मानवी वर्तनाचे वैज्ञानिक ज्ञान देणे. त्याच बरोबर कौन्सिलिंगसाठी विद्यार्थ्यांना तयार करणे हा आहे.
- याचे मुख्य विषय यामध्ये बरेच विषय शिकवले जातात त्यापैकी महत्त्वाचे विषय म्हणजे सामाजिक मानसशास्त्र, बाल मानसशास्त्र, संज्ञानात्मक मानसशास्त्र हे आहेत.
- याची अध्ययन पद्धत याचे अध्ययन पद्धती पहायची झाली तर यामध्ये थिअरी बरोबरच प्रॅक्टिकल प्रयोग व केस स्टडीजवर मोठ्या प्रमाणात भर देण्यात येतो.
BA Psychology यासाठी शैक्षणिक पात्रता कोणती ?
याची शैक्षणिक पात्रता पायाची झाली तर हा बारावी नंतर करण्यात येणारा कोर्स आहे. बारावी मध्ये तुम्ही कोणत्याही शाखेतून म्हणजे (Arts, Science, Commerce) यापैकी कोणत्याही शाखेतून उत्तीर्ण असणे गरजेचे आहे. ह्याच बरोबर कमीत कमी 50% गुण घेऊन उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
याची पात्रता
विद्यार्थ्यांनी कोणत्याही शाखेमधून जसे की (Arts, Science, Commerce) यामधून बारावी पास असणे आवश्यक आहे . BA Psychology यासाठी कमीत कमी लागणारे गुण Open Catagory तील विद्यार्थ्यांसाठी 45% ते 50% गुण घेऊन उत्तीर्ण असणे आवश्यक आहे . ( काही मोठ्या कॉलेजमध्ये याचा कट ऑफ ला जास्त लागू शकतो )
याची वयोमर्यादा
या कोर्ससाठी ऍडमिशन घेण्यासाठी ठराविक वयोमर्यादा नाही पण कमीत कमी बारावी पास असणे आवश्यक आहे म्हणजे तसे पाहायला गेले तर वयोमर्यादा ही 18 वर्ष पूर्ण असणे आवश्यक आहे.
याचा प्रवाह तुम्ही बारावीनंतर थेट BA First Year ला Psychology साठी ऍडमिशन घेऊ शकता.
याची ऍडमिशन प्रोसेस (Admission Process)
ऍडमिशन प्रोसेस पाहायला गेलं तर बऱ्याच कॉलेजेस मध्ये ऑनलाईन तसेच ऑफलाइन पद्धतीने देखील ऍडमिशन दिले जाते.
मग काय कॉलेजेस मध्ये तुमच्या बारावीच्या मार्क्स च्या बेसिस वरती ऍडमिशन दिले जाते.
याची पात्रता
ऍडमिशन घेण्यासाठी तुमची पात्रता ही कमीत कमी बारावी पास असणे आवश्यक आहे. याचे कॉलेज निवडा तिच्या शहरांमध्ये राहतात त्या शहरांमध्ये किंवा तालुक्याच्या ठिकाणी तसेच जिल्ह्याच्या ठिकाणी बरेचसे कॉलेज उपलब्ध असतात. त्याचबरोबर पुणे किंवा मुंबईसारख्या शैक्षणिक शहरांमध्ये देखील हा कोर्स शिकवणारे खूप सारे कॉलेजेस उपलब्ध आहेत.
यासाठी अर्ज करा
तुम्हाला ऍडमिशन घेण्यासाठी त्या त्या कॉलेजच्या ऑफिशियल वेबसाईट वरती जाऊन फॉर्म भरणे गरजेचे असते.
याची प्रवेश परीक्षा
बऱ्याच कॉलेजेस मध्ये ऍडमिशन घेण्यासाठी एंट्रन्स एक्झाम देखे ठेवलेले असते. ती प्रत्येक कॉलेजची वेगवेगळी असू शकते. यात गुण तुमच्या बारावीच्या मार्क्सच्या बेसिस वरती याची मेरिट लिस्ट लागते.
याचे डॉक्युमेंट वेरिफिकेशन
जर तुमचे नाव पात्रता यादीच्या लिस्टमध्ये आले तर तुम्हाला मूळ डॉक्युमेंट्स सादर करून संपूर्ण फीस भरावी लागते व तुमच्या ऍडमिशन हे फिक्स होते.
याचा कालावधी
याचा कालावधी हा तीन वर्षाचा असून तो सहा सेमिस्टर मध्ये विभागला गेलेला आहे. प्रत्येक वर्षी दोन सेमिस्टर याप्रमाणे तीन वर्षाचे सहा सेमिस्टर अशी विभागणी करण्यात आलेली आहे.
याची रचना
हा कोर्स सर्वसाधारणपणे तीन वर्षाचा असतो म्हणजेच यामध्ये सहा सेमिस्टर शिकवले जातात. प्रत्येक सहा महिन्यानंतर याची एक सत्र परीक्षा घेतली जाते म्हणजे अशा टोटल 6 परीक्षा होतात.
यात तुम्ही काय शिकता
यामध्ये पहिल्या वर्षी विषयाची ओळख, यदुसऱ्या वर्षी त्या विषयाबद्दल सखोल सिद्धांत, आणि तिसऱ्या वर्षी Applied म्हणजेच उपयोजित सायकॉलॉजी शिकवली जाते
याचे विषय आणि अभ्यासक्रम
वर्ष सेमिस्टर मुख्य विषय
प्रथम वर्ष १ आणि २ General Psychology, Social Psychology, Basic Psychological Processes
द्वितीय वर्ष ३ आणि ४ Developmental Psychology, Psychological Testing, Health Psychology
तृतीय वर्ष ५ आणि ६ Abnormal Psychology, Counseling Psychology, Industrial Psychology, Research Methodology
यामधील प्रॅक्टिकल्स
हा अभ्यासक्रम पार पाडताना या तीन वर्षाच्या कालावधीमध्ये अनेक प्रॅक्टिकल घेतले जातात जसे की बुद्धिमत्ता चाचणी म्हणजेच आयक्यू टेस्ट, व्यक्तिमत्व चाचणी आणि मेमरी टेस्ट घेतल्या जातात.
प्रथम वर्षात काय शिकण्यास मिळते ?
हा अभ्यासक्रम पार पाडताना प्रथम वर्षामध्ये मानसशास्त्र या मागील इतिहास आणि मानवी मन हे कसे काम करते याबद्दल विद्यार्थ्यांना शिकण्यास मिळते.
शेवट वर्षात काय शिकण्यास मिळते ?
या तीन वर्षाच्या कालावधीमध्ये विद्यार्थ्यांना बऱ्याच गोष्टीचे शिक्षण दिले जाते आणि काही कौशल्य अवगत करण्याचे विद्यार्थ्यांना मिळतात.
तसे पाहायला गेले तर शेवटच्या वर्षामध्ये मानसिक आजार व त्याबद्दलचे उपचार आणि समुपदेशन कौशल्य ( Counseling ) याबद्दलची पुरेपूर माहिती विद्यार्थ्यांना दिली जाते
याचे कॉलेजेस
- सेंट झेविअर्स कॉलेज (St. Xavier’s) ₹८,००० – ₹१०,०००
- सोफिया कॉलेज (Sophia College) ₹५,००० – ₹७,०००
- मिठीबाई कॉलेज (Mithibai College) ₹१०,००० – ₹१५,००0
- के. जे. सोमय्या (K. J. Somaiya) ₹१२,००० – ₹४८,०००
- रुपारेल कॉलेज (D. G. Ruparel) ₹५,००० – ₹८,०००
- फर्ग्युसन कॉलेज (Fergusson) ₹५,५०० – ₹२८,०००
- मॉडर्न कॉलेज (Modern College) ₹५,००० – ₹१२,०००
- सर परशुरामभाऊ कॉलेज (S.P. College) ₹४,५०० – ₹८,०००
- सिम्बायोसिस (Symbiosis Liberal Arts) ₹२,५०,०००+
- नौरोसजी वाडिया (Nowrosjee Wadia) ₹६,००० – ₹१०,०००
- हिस्लॉप कॉलेज (Hislop College) ₹५,००० – ₹१२,०००
- नाशिक के.टी.एच.एम. कॉलेज (KTHM College) ₹४,००० – ₹८,०००
- ठाणे जोशी बेडेकर कॉलेज (Joshi Bedekar) ₹३६,००० (Self Finance)
- जळगाव मूळजी जेठा कॉलेज (M. J. College) ₹३,५०० – ₹७,०००
- कोल्हापूर विवेकानंद कॉलेज (Vivekanand) ₹४,००० – ₹८,०००
सर्व कॉलेजेस चे सरासरी शुल्क
सरकारी कॉलेजमध्ये ₹4000 ते ₹16,000 तर खासगी कॉलेजमध्ये ₹25,000 ते ₹60,000 इतकी फिश असू शकते.
मध्ये प्लेसमेंट साठी काय करावे ?
जर तुम्हाला प्लेसमेंट पाहिजे असेल तर तुम्हाला पदवी बरोबरच हॉस्पिटल तसेच एजन्सीज मध्ये इंटर्नशिप करणे गरजेचे असते.
यामध्ये करिअर आणि संधी
आजच्या तणावाच्या युगामध्ये मानसशास्त्र तज्ञांची मोठ्या प्रमाणामध्ये गरज भासत आहे. कारण जग हे वेगाने बदलत आहे त्यामुळे लोकांना सतत ताण, चिंता, नैराश्य आणि नातेसंबंधातील समस्यांचा सामना करावा लागत आहे.
मानसशास्त्रज्ञ तणाव व्यवस्थापन तसेच भावनिक आधार योग्य संवाद आणि मानसिक आरोग्य सुधारण्यासाठी आवश्यक असलेली कौशल्य देतात जेणेकरून लोक तणाव मुक्त होतात आणि निरोगी जीवन जगतात ज्यामुळे समस्या ज्यामुळे समस्या गंभीर होण्यापूर्वीच त्यावरती मात केली जाते
यामधील सरकारी नोकऱ्या
हा कोर्स केल्यानंतर नोकऱ्या पायाच्या झाल्या तर त्यामध्ये सरकारी नोकरी देखील उपलब्ध आहेत जसे की सरकारी रुग्णालय, पुनर्वसन केंद्र, त्याचबरोबर आर्मी मध्ये देखील तुम्हाला सरकारी नोकरी मिळू शकते.
यामधील खाजगी नोकऱ्या
खाजगी क्षेत्रामध्ये नोकरी पाहिजे झाली तर खाजगी हॉस्पिटलमध्ये मोठ्या प्रमाणात संधी उपलब्ध आहेत. मोठ्या मोठ्या कार्पोरेट कंपन्यांमध्ये सुद्धा संधी उपलब्ध असतात त्याचबरोबर खाजगी शाळांमध्ये देखील स्कूल काउंसलर ( समुपदेशक ) म्हणून काम करू शकतात.
यामधून पुढे उच्च शिक्षण
BA नंतर तुम्ही MA Psychology चा अभ्यास करणे अत्यंत गरजेचे असते. यानंतर तुम्ही क्लिनिकल सायकॉलॉजिस्ट देखील बनू शकतात. यामधून पुढे स्वतःचा व्यवसाय जर तुम्हाला खूप वर्षाचा अनुभव असेल तर तुम्ही स्वतःच्या समुपदेशन केंद्र देखील उभे करू शकतात.
हा कोर्स केल्यानंतर पुढील संधी
यामध्ये लिहायचं की कोणत्या प्रकारच्या जॉब्स मिळतात आणि पुढे काय करता येतं पण फक्त थोड्या शब्दांमध्ये
यामध्ये मुख्य नोकरी कंपन्या
शाळा, आयटी कंपन्या, हॉस्पिटल्स, एनजीओ (NGOs). अशा खूप साऱ्या क्षेत्रात नोकरीच्या संधी उपलब्ध आहेत.
यामध्ये मिळणारा सरासरी पगार
सुरुवातीला 12,000 ते 24,000 इतका पगार मिळू शकतो.
जर तुमच्याकडे अनुभव असेल त्याचबरोबर डिग्री सर्टिफिकेट असेल तर हाच पगार 60,000 पेक्षा जास्त मिळू शकतो.
हा कोर्स का आणि कोणी निवडावा.
ज्या विद्यार्थ्यांना लोकांचे प्रश्न ऐकून त्यांना मदत करण्याची इच्छा असते आणि मानवी वर्तनाचे कोडे सोडवण्यात रस आहे, त्या विद्यार्थ्यांनी हा कोर्स नक्कीच निवडावा .
याची मागणी
नोकरीच्या क्षेत्रात काम जास्त वाढल्यामुळे मानसिक ताण आणि नैराश्य यामुळे सायकॉलॉजिस्टची मोठ्या प्रमाणात गरज भासत आहे. त्या मुळे ह्या क्षेत्रात खूप साऱ्या नोकरीच्या संधी उपलब्ध आहेत.
यामध्ये मिळणारा पगार
जर तुमच्या या विषयांमध्ये स्पेशालिझेशन झालेले असेल तर तुम्हाला मोठ्या प्रमाणामध्ये पगार मिळतो.
यामध्ये होणारे संशोधन
ज्या विद्यार्थ्यांना मानवी मेंदू आणि मानवी वर्तन या गोष्टींवरती रिसर्च करायचा आहे त्या विद्यार्थ्यांनी या क्षेत्रामध्ये नक्कीच आपले करियर निवडावे त्यांच्यासाठी सुवर्णसंधी आहे.
हे निवडणे उत्तम कारण
ज्या विद्यार्थ्यांना वाटत आहे की बीए साएकॉलॉजी म्हणजे फक्त करिअरचा मार्ग आहे असे बिलकुल नाही, तर स्वतःला तसेच इतरांनाही समजून घेण्याचं एक प्रभावी माध्यम आहे.
One response to “BA Psychology करिअरची माहिती, संधी आणि पूर्ण अभ्यासक्रम”
[…] […]