BSc Environmental Science हा कोर्स काय आहे ?
बॅचलर ऑफ सायन्स इन एन्व्हायरमेंटल सायन्स हा एक पदवी पूर्व अभ्यासक्रम आहे. या अभ्यासक्रमाचा उद्देश पात्र उमेदवारांना शाश्वत विकास पर्यावरणीय शाश्वतता पर्यावरणीय आरोग्य आणि इतर अनेक विषयांवर ज्ञान देणे आहे. आजच्या काळात ग्लोबल वार्मिंग आणि प्रदूषण सारख्या समस्या वाढत आहेत तेव्हा एनवायरनमेंटल सायन्स पर्यावरण शास्त्र या विषयाचे महत्त्व प्रचंड वाढते आहे जर तुम्हाला निसर्गाची ओढ असेल आणि विज्ञानाच्या माध्यमातून पर्यावरणाचे संरक्षण करायचे असेल तर हा कोर्स तुमच्यासाठी चांगला आहे.
यामध्ये पर्यावरणाशी संबंधित भौतिक रासायनिक आणि जैविक घटकांचा अभ्यास केला जातो यामध्ये आपण पृथ्वीवरील नैसर्गिक संसाधने प्रदूषण नियंत्रण आणि शाश्वत विकास षष्टेनेबल डेव्हलपमेंट याबद्दल शिकतो. यामधील काही महत्त्वाच्या विषयांमध्ये जीवशास्त्र पर्यावरण विज्ञान पर्यावरण शास्त्र भूगोल सामाजिक विज्ञान आणि तंत्रज्ञान यांचा समावेश होतो संपूर्ण अभ्यासक्रमादरम्यान विद्यार्थ्यांना पर्यावरणाची वैज्ञानिक समज विकसित करण्यासाठी आणि विविध जागतिक पर्यावरणीय समस्यांचा शोध घेण्यासाठी प्रशिक्षण दिले जाते.
याचा कालावधी
हा कोर्स सामान्यता तीन वर्षांचा आहे
याचा हेतू
विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरणाबद्दल जागरूकता निर्माण करणे आणि तांत्रिक कौशल्यांच्या मदतीने पर्यावरणीय समस्यांवर उपाय शोधणे.
याचे मुख्य विषय
परिसंस्था इकॉलॉजी जैवविविधता हवामान बदल जल व्यवस्थापन आणि पर्यावरण कायदे.
याची अध्ययन पद्धत
या केवळ पुस्तकी ज्ञान नसून फील्ड विजिट लॅब प्रॅक्टिकल्स आणि प्रोजेक्ट वर्कवर जास्त भर दिला जातो.
BSc Environmental Science यासाठी शैक्षणिक पात्रता कोणती ?
बीएससी एन्व्हायरमेंटल सायन्स या कोर्सला ऍडमिशन घेण्यासाठी विद्यार्थ्यांनी खालील पात्रता निकष पूर्ण करावी लागतात
विद्यार्थ्यांनी मान्यता प्राप्त केंद्रीय मंडळातून आठवा राज्य मंडळातून 10+2 म्हणजेच बारावी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
विद्यार्थ्यांना दहावी आणि बारावीच्या दोन्ही परीक्षांमध्ये किमान 50 टक्के गुण आवश्यक आहेत अनुसूचित जाती जमाती ओबीसी दिव्यांग उमेदवारांना गुणांमध्ये काही प्रमाणात सूट दिली जाईल.
विद्यार्थी विद्यार्थ्यांनी बारावीची परीक्षा ही सायन्स साईड मधून उत्तीर्ण असावी.
याची पात्रता
विद्यार्थी बारावी विज्ञान उत्तीर्ण असावा
यासाठी कमीत कमी लागणारे गुण
खुल्या प्रवर्गासाठी किमान 50 टक्के आणि राखीव प्रवर्गासाठी 45 टक्के गुण आवश्यक आहेत.
याची वयोमर्यादा
साधारणपणे 17 ते 25 वर्ष. वयाची अट शिथिल असते.
याचा प्रवाह
बारावी मध्ये फिजिक्स केमिस्ट्री आणि बायोलॉजी पीसीबी हे विषय असणे फायदेशीर ठरते.
BSc Environmental Science याची ऍडमिशन प्रोसेस
महाराष्ट्र मध्ये या कोर्समध्ये प्रवेश घेण्यासाठीची प्रक्रिया सोपी आहे.
याची पात्रता चेक करा
तुमचे बारावीचे गुण तपासा आणि आपल्या आवडत्या टॉपच्या कॉलेजची लिस्ट तयार करा त्या लिस्टमधील कॉलेजेस चे गेल्या वर्षीचे कट ऑफ चे मार्क्सची यादी बनवा त्यानुसार तुम्हाला लक्षात येईल की कुठल्या कॉलेजमध्ये आपले ऍडमिशन होऊ शकते
याचे कॉलेज निवडा
तुमच्या शहरांमध्ये किंवा जवळच्या जिल्ह्यातील नामांकित कॉलेजची एक यादी करा.
यासाठी अर्ज करा
कॉलेजच्या अधिकृत वेबसाईटवर जाऊन फॉर्म भरा किंवा कॉलेजमध्ये जाऊन ऑफलाइन फॉर्म घेऊन तो भरा.
याची प्रवेश परीक्षा
सीईटी एंट्रन्स एक्झाम काही मोठ्या संस्था स्वतःची प्रवेश परीक्षा घेतात तर अनेक ठिकाणी बारावीच्या गुणांच्या मेरिट वर आधारित प्रवेश मिळतो.
याचे डॉक्युमेंट वेरिफिकेशन
दहावी बारावीचे मार्कशीट टीसी का सर्टिफिकेट असल्यास त्यानंतर डोमिसाईल सर्टिफिकेट या सर्व डॉक्युमेंट्स तयार ठेवा.
BSc Environmental Science याचा कालावधी
हा कोर्स तीन वर्षांचा असून तो सहा सेमिस्टर मध्ये विभागलेला असतो.
याची रचना
प्रत्येक वर्षात दोन सेमिस्टर असतात पहिल्या वर्षी मूलभूत विज्ञान शिकवले जाते तर दुसऱ्या आणि तिसऱ्या वर्षी पर्यावरणाशी संबंधित सखोल विषयांचा अभ्यास होतो.
यात तुम्ही काय शिकता
प्रदूषण कसे मोजायचे टाकाऊ पदार्थांचे व्यवस्थापन वेस्ट मॅनेजमेंट कसे करायचे आणि नवीन ऊर्जा स्रोत कसे निवडायचे शोधायचे याचे प्रशिक्षण तुम्हाला मिळते.
BSc Environmental Science याचे विषय आणि अभ्यासक्रम
याचा सेमिस्टर वाईस सिल्याबस आपण पाहूया:
| सेमिस्टर वन | सेमिस्टर टू |
|
|
| सेमिस्टर थ्री | सेमिस्टर फोर |
|
|
| सेमिस्टर फाइव | सेमिस्टर सिक्स |
|
|
यामधील प्रॅक्टिकल्स
यामध्ये पाण्याचे टेस्टिंग हवेचे गुणवत्ता पासने आणि मातीचे परीक्षण करणे यासारखे प्रॅक्टिकल्स असतात.
प्रथम वर्षात काय शिकण्यास मिळते ?
प्रथम वर्षामध्ये विज्ञानाच्या मूलभूत संकल्पना आणि पर्यावरणाची ओळख हे शिकवले जाते.
शेवट वर्षात काय शिकण्यास मिळते ?
शेवटचे वर्षे हे स्पेशलिझेशन आणि प्रत्यक्ष फिल्ड प्रोजेक्ट वर काम करणे हे असते.
BSc Environmental Science याचे कॉलेजेस
आपण याचे महाराष्ट्रातील टॉप कॉलेजेस पाहूया.:
|
सर्व कॉलेजेस चे सरासरी शुल्क
शासकीय कॉलेजेस मध्ये फिका मी असते तर खाजगी कॉलेजमध्ये ती 50 हजारापासून एक लाखापर्यंत दरवर्षीसाठी असू शकते.
मध्ये प्लेसमेंट साठी काय करावे ?
शेवटच्या वर्षात एंट्रन्स शिप केल्यास चांगल्या कंपनीत नोकरी मिळण्याची संधी वाढते.
BSc Environmental Science यामध्ये करिअर आणि संधी
बीएससी एन्व्हायरमेंटल सायन्स कोर्स केल्यानंतर विद्यार्थ्यांना काही सामान्य नोकरी प्रोफाइल्स व त्यांच्या संबंधित नोकरीच्या वर्णनांसह पगार याबद्दल माहिती दिलेली आहे आपण खाली पाहूया.:
| एन्व्हायरमेंटल जर्नालिस्ट | पर्यावरण पत्रकार हे पत्रकार असतात जे पर्यावरणाशी संबंधित विविध माहिती गोळा करतात आणि जगासमोर सादर करतात. लोकांमध्ये पर्यावरणाबद्दल जागरूकता निर्माण करतात. | पगार चार ते सहा लाख रुपये |
| एन्व्हायरमेंट फोटोग्राफर | पर्यावरण छायाचित्रकार बहुतेक दोघांचा ठिकाणी काम करतात आणि महत्त्वाच्या प्रतिमा गोळा करतात नंतर ते फोटो जर्नल वर्तमानपत्रे आणि मासिकांमध्ये प्रकाशित करतात. | पगार सहा ते आठ लाख रुपये |
| कंजर्वेशन हायड्रोलॉजिस्ट | संवर्धन जलतज्ञ एक संवर्धन जलशास्त्रज्ञ प्रामुख्याने जलसाठ्यांची काळजी घेतात, पाण्याचे नमुने गोळा करतात, आणि प्रदूषण पातळी पीएच इत्यादी तपासणी साठी त्याची टेस्टिंग करतात. | पगार चार ते सहा लाख रुपये |
| डिरेक्टर ऑफ वेस्ट मॅनेजमेंट | कचरा व्यवस्थापन अधिकारी कचऱ्याचे व्यवस्थापन आणि विल्हेवाट लावण्याची काळजी घेतात. | पगार पाच ते आठ लाख रुपये |
| Catastrophe मॉडलर | आपत्ती व्यवस्थापन किंवा आपच आपत्ती मॉडलर विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या विविध घटकांना एकत्र करून मानवी निर्मित आपत्ती किंवा निसर्गनिर्मित आपत्ती यांचा सांख्य डेटा तयार करतो | पगार सहा ते आठ लाख रुपये |
यामधील सरकारी नोकऱ्या
एमपीसीबी महाराष्ट्र पॉल्युशन कंट्रोल बोर्ड फॉरेस्ट डिपार्टमेंट आणि विविध महानगरपालिकांमध्ये एन्व्हायरमेंटल ऑफिसर म्हणून काम करू शकतात.
यामधील खाजगी नोकऱ्या
कंपन्यांमध्ये एन्व्हायरमेंटल कन्सल्टंट हेल्थ अँड सेफ्टी ऑफिसर किंवा एनजीओ मध्ये काम करण्याची संधी मिळते.
यामधून पुढे उच्च शिक्षण
तुम्ही एम एस सी पी एचडी किंवा एमबीएनवायरनमेंटल मॅनेजमेंट करू शकता.
यामधून पुढे स्वतःचा व्यवसाय
तुम्ही वेस्ट मॅनेजमेंट कन्सल्टन्सी किंवा सेंद्रिय शेती सल्ला केंद्र सुरू करू शकता.
BSc Environmental Science हा कोर्स केल्यानंतर पुढील संधी
आपण पुढील संधी पाहूया.:
पदव्यूत्तर पदवी किंवा पोस्ट ग्रॅज्युएट
बीएससी एन्व्हायरमेंटल सायन्स पदवीधर हे पुढे एमएससी एन्व्हायरमेंट सायन्स, मास्टर्स इन सस्टेनेबल फॉरेस्ट रिसोर्स मॅनेजमेंट, मास्टर्स इन डिझास्टर मॅनेजमेंट, मास्टर्स इन रिन्यूएबल एनर्जी, मास्टर्स इन रिमोट सेन्सिंग यामध्ये पोस्ट ग्रॅज्युएट शिक्षण घेऊ शकतात.
व्यवस्थापन अभ्यासक्रम
ते एमबीए करू शकतात जे कोणत्याही क्षेत्रातील पदवीधरांसाठी पात्र आहे उमेदवारांना किंवा विद्यार्थ्यांना कंपनीमध्ये उच्च पगार मिळण्यासाठी सहाय्यक ठरते.
उद्योजक
टाकाऊ साहित्यावर काम करून त्याचे पुनर्व्यवस्थापन अथवा त्यावर काम करणारे व्यावसायिक उद्योजक होऊ शकता.
यामध्ये मुख्य नोकरी कंपन्या
टाटा पावर रिलायन्स इंडस्ट्रीज युनिसेफ आणि विविध जल शुद्धीकरण प्रकल्प.
यामध्ये मिळणारा सरासरी पगार
सुरुवातीला वार्षिक पगार तीन ते पाच लाख रुपयांपर्यंत मिळू शकतो अनुभवानुसार हा आकडा वाढत जातो.
BSc Environmental Science हा कोर्स का आणि कोणी निवडावा.
ज्यांना निसर्ग संवर्धनाचे मनापासून आवड आहे आणि ज्यांना विज्ञानाद्वारे समाजासाठी काही करायचे आहे त्यांच्यासाठी हा कोर्स सर्वोत्तम आहे.
याची मागणी
भविष्यात ग्रीन जॉब ची मागणी खूप वाढणार आहे.
यामध्ये होणारे संशोधन
त्यात नवनवीन शोध लावण्यास भरपूर वाव आहे.
हे निवडणे उत्तम कारण
केवळ पगार मिळवून देणारा जॉब नसून पृथ्वी वाचवण्यासाठी दिलेले योगदान असते त्यामुळे हा कोर्स निवडणे चांगले आहे.
BSc Geography Honours कोर्सची संपूर्ण माहिती वाचा .
BSc Environmental Science याबद्दल विचारली गेलेली प्रश्न
या कोर्स साठी गणित मॅथ्स विषय बारावीला असणे आवश्यक आहे का ?
नाही जीवशास्त्र बायोलॉजी असणारे विद्यार्थी सुद्धा हा कोर्स करू शकतात.
या क्षेत्रामध्ये सरकारी नोकरी मिळते का ?
हो प्रदूषण नियंत्रण मंडळ आणि वन विभागात नियमितपणे भरती निघत असते.
बीएससी नंतर एमएससी करणे गरजेचे आहे का ?
जर तुम्हाला रिसर्च किंवा मोठे पदावर काम करायचे असेल तर एम एस सी करणे फायदेशीर ठरते.
महाराष्ट्र मध्ये या कोर्सला वाव आहे का, अथवा या कोर्सला फ्युचर स्कोप आहे का ?
नक्कीच महाराष्ट्रातील औद्योगिक पट्टा आणि वाढते शहरीकरण यामुळे पर्यावरण तज्ञांची मोठी गरज आहे.
हा कोर्स केल्यानंतर पगार किती मिळू शकतो ?
सुरुवातीला पगार 25 ते 40 हजार प्रति महिना असू शकतो जो अनुभवणे वाढत जातो.