Diploma In Architecture Engineering नंतर परदेशात संधी आहेत का?

Diploma In Architecture Engineering बद्दल माहिती । Diploma In Architecture Engineering Information In Marathi 2026 |

Diploma In Architecture Engineering २०२६ मध्ये हा कोर्स करणे योग्य आहे का?

२०२६ च्या काळात जेव्हा आपण ‘स्मार्ट सिटीज’ आणि शाश्वत घरांबद्दल (Sustainable Housing) बोलतोय, तेव्हा आर्किटेक्चर या क्षेत्राला मरण नाही. पण एक गोष्ट स्पष्ट सांगतो, हे क्षेत्र आता फक्त सिमेंट आणि विटांचं राहिलेलं नाही. आता यात तंत्रज्ञान, एआय (AI) आणि पर्यावरणाचा विचार जास्त होतोय. जर तुम्हाला असं वाटत असेल की फक्त चित्र काढता येतात म्हणून या कोर्सला यावं, तर थोडं थांबा. २०२६ मध्ये कंपन्यांना अशा मुलांची गरज आहे जे कागदावरचे प्लॅन सॉफ्टवेअरमध्ये तितक्याच ताकदीने उतरवू शकतील.

Diploma in architectural engineering तीन वर्षांचा डिप्लोमा लेवल चा प्रोग्रॅम असतो ज्यामध्ये बिल्डिंगची रचना लेआउट डिझाइनिंग आणि प्लॅनिंग या मूलभूत गोष्टी एकत्र करतो. या कोर्ससाठी पात्र होण्यासाठी उमेदवारांनी आणि विद्यार्थ्यांनी मान्यताप्राप्त शैक्षणिक मंडळ किंवा बोर्ड मधून किमान 55 टक्के गुणांसह दहावी उत्तीर्ण केलेली असणे आवश्यक असते.
अभ्यासक्रम बांधकामांची रचना व्यवस्था आणि बांधणी यांच्याशी संबंधित आहे.
या अभ्यासक्रम मध्ये विद्यार्थ्यांना कोणत्याही बांधकाम प्रकल्पाच्या डिझाईन साठी आणि जागेच्या सौंदर्यात्मक विकासासाठी संबंधित आवश्यक असलेले सर्व धडे शिकवले जातात.
टेक्निकल अँड ऍनालिटीकल मायबिलिटीज सह बांधकाम संबंधित कामे इमारतीच्या डिझाईन मध्ये रस असलेल्या विद्यार्थ्यांसाठी हा अभ्यासक्रम परिपूर्ण असतो
या अभ्यासक्रमाचा उद्देश बिल्डिंग डिझाईनिंग रस्ते पूल  बांधणी लेआउट डिझाईन आणि नियोजन या संकल्पनेवर टेक्निकल आणि व्यवहारिक ज्ञान प्रदान करणे

हा कोर्स खरंच फायदेशीर आहे का? (अपेक्षा vs वास्तव) Diploma In Architecture Engineering

फायदेशीर नक्कीच आहे, पण ते तुमच्या संयमावर अवलंबून आहे. अनेक पालकांना वाटतं की आर्किटेक्चर म्हणजे खूप पैसा आणि ग्लॅमर. वास्तव असं आहे की, सुरुवातीची काही वर्ष तुम्हाला ‘ड्रॉफ्ट्समन’ म्हणून ऑफिसमध्ये तासनतास एकाच प्लॅनवर काम करावं लागतं. जर तुम्ही स्वतःचा छोटा व्यवसाय किंवा कन्सल्टन्सी सुरू करण्याच्या विचारात असाल, तर हा डिप्लोमा तुम्हाला व्यवसायाचा पाया भक्कम करून देतो. १० वी नंतर लगेच तांत्रिक कौशल्य आत्मसात करण्यासाठी हा एक चांगला मार्ग आहे.

कोर्स ची कठीणता Diploma In Architecture Engineering

हा कोर्स सर्वांसाठी योग्य नाही कारण… यात फक्त बुद्धी नाही, तर शारीरिक कष्टाचीही तयारी लागते. आर्किटेक्चरमध्ये ‘डेडलाईन्स’ नावाचा एक प्रकार असतो, जो पाळताना तुमची रात्रीची झोप उडू शकते. हा कोर्स कठीण आहे असं मी म्हणणार नाही, पण तो ‘वेळखाऊ’ नक्कीच आहे. तुम्हाला एका बाजूला डिझाईनचं सौंदर्य पाहायचं असतं आणि दुसऱ्या बाजूला ते स्ट्रक्चर उभं राहताना तांत्रिकदृष्ट्या किती सुरक्षित असेल, याचा हिशोब मांडायचा असतो.

याची सविस्तर माहिती पहा YouTube वर 

सरासरी विद्यार्थ्यांसाठी हा कोर्स कसा आहे? Diploma In Architecture Engineering

जर तुम्ही १० वी मध्ये ‘एव्हरेज’ असाल, म्हणजे तुम्हाला ६०-७०% मार्क्स असतील, तरी तुम्ही या क्षेत्रात बाजी मारू शकता. आर्किटेक्चरला तुमच्या गणितातल्या गुणांपेक्षा तुमच्या ‘व्हिज्युअलायझेशन’ (Visualization) क्षमतेची जास्त गरज असते. महाराष्ट्रातील ग्रामीण भागातील मुलं, ज्यांनी कष्ट पाहिले आहेत, ते या क्षेत्रातील प्रॅक्टिकल कामात खूप चांगली प्रगती करतात. फक्त तुमची रेखाटनं (Sketching) सुधारण्याची आणि नवीन सॉफ्टवेअर्स शिकण्याची तयारी हवी.

प्रवेश प्रक्रियेतील महत्त्वाचे टप्पे आणि टाळावयाच्या चुका

महाराष्ट्रात या डिप्लोमाला प्रवेश घेण्यासाठी Admission Process ही प्रामुख्याने १० वीच्या गुणांवर (CAP Rounds) चालते. अनेक विद्यार्थी इथे चूक करतात… ते फक्त कॉलेजचं नाव बघतात. आर्किटेक्चरसाठी कॉलेज निवडताना त्यांचं ‘स्टुडिओ’ (Studio) कसं आहे आणि तिथले शिक्षक प्रत्यक्ष प्रॅक्टिस करणारे आहेत का, हे तपासा. नुसत्या मोठ्या इमारती म्हणजे चांगलं आर्किटेक्चर कॉलेज नव्हे.

  • प्रवेश घेण्यासाठी इच्छुक विद्यार्थ्यांनी मान्यतापराज्य किंवा केंद्रीय मंडळ किंवा परिषदेकडून दहावी बोर्डाची परीक्षा उत्तीर्ण केलेले असावे आणि त्यामध्ये किमान 55 टक्के गुण असणे अपेक्षित आहे ( एससी एसटी ओबीसी उमेदवारांसाठी सवलत उपलब्ध आहे.)
  • त्यांच्या दहावीच्या वर्गामध्ये विज्ञान आणि गणित हे विषय असायला हवेत आणि त्यामध्ये मार्कही असायला हवेत
  • विद्यार्थ्यांकडे दहावीच्या कुठल्याही विषयात कोणतेही बॅकलॉग किंवा विषयांमध्ये फेल असू नये.

प्रवेश प्रक्रिया

  1. डिप्लोमा इन आर्किटेक्चर इंजिनिअरिंग मध्ये प्रवेश हा बहुतेकदा दहावीच्या बोर्ड परीक्षेतील गुणवत्तेच्या किंवा मेरिटच्या आधारावरच घेतला जातो.
  2. कॉमन एंट्रन्स एक्झाम च्या आणि त्यावरील मार्कांच्या आधारे प्रवेश देणारे महाविद्यालय कमी आहेत.
  3. यामध्ये काही कॉलेजेस मध्ये मेरीट वर माझे दहावीच्या मार्कांवर
  4. गुणवत्तेवर आधारित

प्रवेश दिला जातो त्याची प्रक्रिया पुढील प्रमाणे:

  1. आपल्या पसंतीनुसार अर्जदार  महा विद्यालय निवडून त्यांच्या मध्ये अधिकृत वेबसाईटवर जाऊन अर्ज भरू शकतात.
  2. गुणवत्तेवर आधारित प्रवेशासाठी इच्छुकांना त्यांच्या दहावीच्या स्तरावर उत्तम टक्केवारी असणे आवश्यक आहे.
  3. सर्व अर्जांची योग्य तपासणी झाल्यानंतर मेरिट लिस्ट लावली जाते त्यामध्ये कट ऑफ च्या वरच्या रँक मध्ये उत्तीर्ण झालेले विद्यार्थी अभ्यासक्रमात प्रवेश घेण्यास पात्र असतात.
  4. प्रवेश घेण्यासाठी आवश्यक प्रमाणपत्र हे दहावीची गुणपत्रिका त्यानंतर ओळखपत्र जातीचा दाखला आवश्यक असल्यास छायाचित्रे स्वाक्षरी आपली डोमिसाईल आणि रहिवासी प्रमाणपत्र इत्यादी आवश्यक कागदपत्रांची पडताळणी करून अभ्यासक्रम शुल्क भरून आपली जागा निश्चित करतात.

Diploma in Automobile Engineering बद्दल माहिती

प्रवेश परीक्षा वर आधारित

  1. विद्यार्थिनी ईमेल आयडी फोन नंबर पासवर्ड इत्यादी मूलभूत माहिती वापरून प्रवेश परीक्षेसाठी नोंदणी करायला लागेल नोंदणीसाठी चा अर्ज भरून आवश्यकता तपशीलांसह काळजीपूर्वक भरला गेला पाहिजे दिली गेलेली माहिती ही पूर्णपणे अचूक असावी नाहीतर आपला अर्ज अर्ज केला जाऊ शकतो
  2. आवश्यक कागदपत्रे स्कॅन करून झेरॉक्स स्वरूपात अपलोड करावे लागतात अर्ज शुल्क ऑनलाईन किंवा ऑफलाइन भरावी लागते आणि फॉर्म सबमिट करावा लागतो
  3. सर्व अर्जांची योग्य चांदनी केल्यानंतर महाविद्यालयाने अधिकारी पात्र उमेदवारांसाठी प्रवेश पत्र जारी करतात
    घोषित तारखेला प्रवेश परीक्षेला उपस्थित राहून प्रवेश परीक्षा उत्कृष्टपणे पार पाडायचे आहे.
  4. त्यानंतर पात्र उमेदवार यांना वैयक्तिक मुलाखत पर्यतून जावे लागते त्यासाठी परत एक्झाम नंतर मेरिट लिस्ट लागते आणि शेवटी निवडलेले उमेदवार संबंधित व शैक्षणिक वर्षासाठी ऍडमिशन घेऊ शकतात.

याचा कालावधी हा तीन वर्षांसाठी असतो आणि सेमिस्टर हे सहा असतात.

अभ्यासक्रम किती Practical आहे?

पुस्तकांपेक्षा इथे तुमच्या ‘ड्रॉईंग बोर्ड’ आणि ‘कॉम्प्युटर’ला जास्त महत्त्व आहे. अभ्यासक्रमात तुम्हाला बिल्डिंग मटेरियल, कन्स्ट्रक्शन टेक्नॉलॉजी आणि आर्किटेक्चरल ड्रॉईंग शिकावं लागतं. सर्वात महत्त्वाचं म्हणजे, तुम्हाला वेगवेगळ्या इमारतींना भेटी देऊन त्यांचं स्ट्रक्चर अभ्यासावं लागतं. हे शिक्षण चार भिंतींच्या बाहेर जास्त घडतं.

वर्ष एक वर्ष दोन वर्ष तीन
  • गणित किंवा मॅथेमॅटिक्स
  • Strength ऑफ मटेरियल
  • सिव्हिल ड्राफ्ट्समन अँड आर्किटेक्चर
  • बिझनेस कम्युनिकेशन
  • इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी
  • प्रॅक्टिकल
  • कन्स्ट्रक्शन प्रोजेक्ट मॅनेजमेंट
  • इंटिरियर अँड एक्स्टिरियर डिझाईन
  • बिल्डिंग कन्स्ट्रक्शन
  • स्ट्रक्चरल इंजिनिअरिंग
  • डिझाईन
  • प्रॅक्टिकल
  • इस्टिमेशन्स  कॉस्टिंग अँड स्पेसिफिकेशन
  • फाउंडेशन डिझाईन
  • काँक्रीट टेक्नॉलॉजी
  • सब्जेक्ट
  • प्रोजेक्ट

Diploma In Architecture Engineering Information In Marathi कॉलेज

पुणे येथील कॉलेजेस

पुणे 
 
मुंबई
 
नाशिक
  1. भारती विद्यापीठ कॉलेज ऑफ आर्किटेक्चर
  2. मराठवाडा मित्र मंडळ कॉलेज ऑफ आर्किटेक्चर
  3. अनंतराव पवार कॉलेज ऑफ आर्किटेक्चर
  4. सिंहगड कॉलेज ऑफ आर्किटेक्चर
  5. vit’s पीव्हीपी कॉलेज ऑफ आर्किटेक्चर
  6. अलाना कॉलेज ऑफ आर्किटेक्चर
  7. डॉक्टर भानू बेन नाना वटी कॉलेज ऑफ आर्किटेक्चर फोर वुमन
  8. आयोजन स्कूल ऑफ आर्किटेक्चर अँड डिझाईन
  1. विवेकानंद एज्युकेशन सोसायटीज कॉलेज ऑफ आर्किटेक्चर vescoa
  2. कमला रहेजा विद्यानिधी इन्स्टिट्यूट ऑफ आर्किटेक्चर अँड एन्व्हायरमेंटल स्टडीज
  3. रिझवी कॉलेज ऑफ आर्किटेक्चर
  4. अकॅडमी ऑफ आर्किटेक्चर
  5. एल एस रहेजा स्कूल ऑफ आर्किटेक्चर
  1. एम इ टी स्कूल ऑफ आर्किटेक्चर अँड इंटरियर डिझाईन
  2. MET भुजबळ नॉलेज सिटी.

हा कोर्स केल्यानंतर कोणत्या नोकऱ्या मिळतात?

डिप्लोमा पूर्ण केल्यावर तुम्ही खालील पदांवर काम करू शकता:

  • आर्किटेक्चरल असिस्टंट

  • कनिष्ठ ड्रॉफ्ट्समन (Junior Draftsman)

  • ३डी व्हिज्युअलायझर (3D Visualizer)

  • इंटिरिअर डिझाईन असिस्टंट

  • साईट सुपरवायझर सरकारी नोकरीसाठी ‘पीडब्ल्यूडी’ (PWD) किंवा ‘म्हाडा’ (MHADA) सारख्या विभागांत तांत्रिक सहाय्यक म्हणून जागा निघतात, पण तिथे पदवीधरांशी स्पर्धा असते.

आर्किटेक्चर इंजिनिअरिंग मधील डिप्लोमा कोर्स यशस्वीरित् पूर्ण केल्यानंतर विद्यार्थ्यांना करियर आणि नोकरीच्या भरपूर संधी उपलब्ध आहेत हे विद्यार्थी शैक्षणिक संस्था स्थापत्य अभियांत्रिकी विभाग बांधकाम कंपन्या विमान गृहनिर्माण उद्योग रेल्वे इत्यादी ठिकाणी नोकरी करू शकतात

त्यांच्या कौशल्यावर अनुभवावर आणि संबंधित क्षेत्रातील नोकरीच्या पदावर आधारित ते दहा ते वीस लाख रुपयांपर्यंत पगाराची पॅकेज सहज मिळू शकतात.
आशा डिप्लोमाला धारकांना बिल्डिंग डिजाइनर असिस्टंट आर्किटेक्चर लेआर डिझायनर इंटेरियर डिझायनर ऑटोमेटिव्ह डिझायनर यांसारख्या संभाव्य क्षेत्रात नोकरीच्या संधी मिळू शकतात

काही जॉब प्रोफाइल आणि त्यांचे जॉब वर्णन व सरासरी वार्षिक पगार पॅकेज खालील नमूद केले आहे :

असिस्टंट आर्किटेक्चर  त्या मुख्य आर्किटेक सोबत आर्किटेक्चरल डिझाईन उंची तयार करण्यासाठी आणि इमारतींचे थ्रीडी सर्वेक्षण करण्यात मदत करण्यासाठी काम करत असतात. पगार
नऊ लाख ते अकरा लाख
इंटरियर डिजाइनर  बांधकाम कामांसाठी वेगवेगळ्या बांधकामाच्या  आतील डिझाईनचे ड्रॉईंग करणे त्यांची मुख्य जबाबदारी असते. पगार
पंधरा लाख ते एकोणीस लाख
Automotive डिझायनर  वेगवेगळ्या कार आणि वाहनांच्या इंटरियर डिझाईनिंग मध्ये थेट सहभागी असतात. पगार
पंधरा लाख ते सतरा लाख
लेआउट डिझायनर बिल्डिंग संबंधित प्रोजेक्ट साठी विचारात घेतलेल्या वर्णनात्मक प्लॅन्स आणि डिझाईन तयार करण्याची जबाबदारी असते यांच्यावर. पगार
सोळा लाख ते वीस लाख

अपेक्षा आणि प्रत्यक्ष पगार Diploma In Architecture Engineering

चला स्पष्ट बोलूया. फ्रेशर म्हणून पगार खूप कमी असू शकतो. शहरात साधारणपणे ₹१०,००० ते ₹१५,००० महिना इथून सुरुवात होते. काही लोक याला ‘एक्सप्लॉईटेशन’ म्हणतात, पण हे या क्षेत्रातील ‘शिकण्याचे दिवस’ असतात. एकदा का तुम्हाला ऑटोकॅड (AutoCAD), रिव्हिट (Revit) किंवा स्केचअप (SketchUp) मध्ये मास्टरकी मिळाली, की तुमचा पगार अनुभवासोबत झपाट्यानं वाढतो.

स्वतःचा व्यवसाय करता येईल का? Diploma In Architecture Engineering

हो, पण त्यासाठी लायसन्स आणि अनुभवाची गरज असते. डिप्लोमानंतर लगेच मोठे प्रोजेक्ट्स डिझाईन करण्यापेक्षा तुम्ही ‘फ्लोअर प्लॅनिंग’ किंवा ‘इंटिरिअर डेकोरेशन’ मध्ये छोटं पाऊल टाकू शकता. पुढील १० वर्षांचा विचार करता, रिडेव्हलपमेंट आणि अफोर्डेबल हाऊसिंगमध्ये डिप्लोमा होल्डर्सना मोठी मागणी असेल.

आर्किटेक्चर इंजिनिअरिंग मध्ये डिप्लोमा असलेले विद्यार्थी नोकरीच्या संभाव्य पर्यायांपैकी एक निवडू शकतात वरील दिलेल्या प्रमाणे नोकरीसाठी पर्याय निवडू शकतात अथवा त्यांच्या कौशल्य अजून जास्त वाढवण्यासाठी संबंधित क्षेत्रात पुढील उच्च शिक्षण घेऊ शकतात यामधील काही संदर्भ खाली दिलेले आहेत ते आपण बघू शकता

बी आर्किटेक:

ज्या विद्यार्थ्यांना त्या क्षेत्रात पुढील शिक्षण सुरू करायचे आहे आणि ठेवायचे आहे किंवा कोणतीही पदवी पूर्व पदवी कार्यक्रम करायचा आहे पाच वर्षांचा पूर्ण वेळ बॅचलर ऑफ आर्किटेक्चर हा कोर्स करू शकतात ज्या विद्यार्थ्यांनी म्हणून नेता प्राप्त बोर्ड केव्हा संस्थेतून दहावीनंतर संबंधित फ्लो मध्ये टेन प्लस टू लेवल किंवा तीन वर्षांचा डिप्लोमा लेवल कोर्स किमान 45% गुणांसह उत्तीर्ण केलेला आहे ते या कोर्ससाठी अर्ज करू शकतात यामध्ये सहभागी होऊ शकतात. Diploma In Architecture Engineering

माझा प्रामाणिक सल्ला

पालकांनो, मुलाला चित्र काढायला आवडतं म्हणून त्याला बळजबरीने या कोर्सला टाकू नका. आर्किटेक्चर म्हणजे फक्त चित्रकला नाही, त्यात सिव्हिल इंजिनिअरिंगचाही भाग असतो. मुलांनो, तुम्हाला जर तासनतास एका खुर्चीवर बसून बारीकसारीक रेषा ओढण्याचा कंटाळा येत असेल, तर हा कोर्स तुमच्यासाठी डोकेदुखी ठरेल. या क्षेत्रात ‘क्रिएटिव्हिटी’ सोबत ‘चिकाटी’ (Patience) सगळ्यात जास्त लागते.

 हा कोर्स का आणि कोणी निवडावा.

  1. आर्किटेक्चर इंजीनियरिंग मध्ये डिप्लोमा पूर्ण केलेल्या विद्यार्थ्यांना जास्त मागणी असते त्यांना सार्वजनिक खाजगी क्षेत्रात दोन्ही प्रमाणात करीर आणि नोकरीच्या चांगल्या संधी मिळू शकतात त्यामुळे ज्यांना लवकरात लवकर शिक्षण पूर्ण करून नोकरीच्या चांगल्या संधी उपलब्ध करून घ्यायचे आहेत त्यांच्यासाठी हा कोर्स उत्कृष्ट मार्गदर्शक ठरू शकतो.
  2. आशा डिप्लोमाधारकांना सिव्हल इंजिनिअरिंग विभाग बांधकाम कंपन्या विमानतळ गृहनिर्माण उद्योग रेल्वे इत्यादी विविध क्षेत्रात नोकरीच्या संधी मिळू शकतो.
    त्यामध्ये आर्किटेक्चरल इंजिनिअरिंग डिप्लोमा पदवीधारकांना त्यांच्या कौशल्य अनुभव आणि संबंधित क्षेत्रातील नोकरीच्या भूमिकेच्या आधारावर दरवर्षी सरासरी 12 ते 18 लाख रुपयांचे पॅकेज मिळू शकते जे इतर कोर्सच्या तुलनेत खूप चांगले आहे.
  3. या अभ्यासक्रमाचा अभ्यास पूर्ण केल्यानंतर विद्यार्थ्यांना संबंधी क्षेत्रात अजून पुढे जाण्यासाठी बॅचलर ऑफ आर्किटेक्चर बी टेक एम टेक आणि पीएचडी यासारख्या उच्च शिक्षणाच्या संधी मिळतात. Diploma In Architecture Engineering

पुढील १० वर्षांचा विचार आणि निर्णय

येणारा काळ हा ‘ग्रीन बिल्डिंग्स’चा आहे. जर तुम्ही पर्यावरणाचा विचार करून घरं डिझाईन करू शकलात, तर तुमचं भविष्य उज्ज्वल आहे. डिप्लोमानंतर ‘लॅटरल एंट्री’ घेऊन डिग्री (B.Arch) करणं हा सर्वात सुरक्षित आणि प्रगतीचा मार्ग आहे.

One response to “Diploma In Architecture Engineering नंतर परदेशात संधी आहेत का?”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *