Diploma In Mechatronics अपेक्षा vs वास्तव

Diploma In Mechatronics अपेक्षा vs वास्तव

Diploma In Mechatronics हा कोर्स निवडण्याआधी विद्यार्थ्यांनी काय लक्षात ठेवावे?

आजच्या काळात नुसतं ‘मेकॅनिकल’ किंवा नुसतं ‘इलेक्ट्रॉनिक्स’ शिकून भागत नाही. जग झपाट्याने ऑटोमेशनकडे जातंय. मेकाट्रॉनिक्स म्हणजे मेकॅनिकल, इलेक्ट्रॉनिक्स आणि सॉफ्टवेअर या तिन्हींची खिचडी आहे. हा कोर्स निवडण्याआधी एक गोष्ट डोक्यात फिट ठेवा—तुम्हाला कोणत्याही एका विषयाचा मास्टर व्हायचं नाहीये, तर तुम्हाला या सगळ्यांना एकत्र जोडून एक स्मार्ट मशिन तयार करायची आहे. जर तुम्हाला नुसतं एखादं यंत्र कसं चालतं हे बघायला आवडत असेल, तर ठीक आहे; पण ते यंत्र स्वतःहून निर्णय कसं घेईल, हे शिकण्याची जिद्द असेल तरच या वाटेला या.

Diploma in mechatronics हा तीन वर्षांचा डिप्लोमा सर्टिफिकेट प्रोग्रॅम आहे.

आपण आता अशा आपण आता आशा काळामधून जात आहोत जिथे जगातील कोणतेही उत्पादन केवळ इलेक्ट्रॉनिक इलेक्ट्रिकल किंवा मेकॅनिकल स्वरूपाचे नाही आणि इलेक्ट्रॉनिकच्या क्षमता जशा जशा सुधारत जातात तसेच असे आधुनिक यांत्रिक टेक्नॉलॉजी इलेक्ट्रॉनिक्स आणि कंट्रोल इन्क्लुड केली जातात याचा अर्थ असा आहे की प्रत्येक विषयातील बॉण्ड्री अधिकाधिक संपत चाललेले आहे. या सर्व गोष्टी आता एकत्रितपणेच होत आहेत आणि गरजेचे आहेत.

२०२६ मध्ये हा कोर्स करणे फायदेशीर आहे का? (अपेक्षा vs वास्तव)

हो, नक्कीच फायदेशीर आहे, पण एक ‘कंडिशन’ आहे. जर तुमची अपेक्षा अशी असेल की डिप्लोमा झाला की लगेच टेस्ला किंवा टाटा मोटर्समध्ये मोठ्या हुद्द्यावर नोकरी मिळेल, तर ते वास्तव नाही. २०२६ मध्ये कंपन्यांना अशा मुलांची गरज आहे ज्यांना प्रत्यक्ष कामाचा अनुभव (Hands-on experience) आहे. मेकाट्रॉनिक्समध्ये भविष्यात खूप वाव आहे कारण आता छोट्या पिठाच्या गिरणीपासून ते मोठ्या कारखान्यांपर्यंत सगळीकडे सेन्सर्स आणि ऑटोमेशन येतंय. पण लक्षात ठेवा, इथं फक्त सर्टिफिकेट चालत नाही, तुमची स्किल चालतात.

आणि त्यामुळेच या क्षेत्रांमध्ये मजबूत ज्ञान असलेल्या मेकॅट्रॉनिकस अभियंत्रांची मागणी वाढत आहे मेकॅट्रॉनिक्स इंजिनियर्स उत्पादनाच्या विकासाच्या सर्वच पैलनमध्ये काम करता डिझाईन आणि टेस्टिंग पासून ते प्रोडक्शन पर्यंत.

हा कोर्स सर्व विद्यार्थ्यांसाठी योग्य आहे का?

प्रामाणिकपणे सांगायचं तर, हा कोर्स सर्वांसाठी योग्य नाही कारण… यात तुम्हाला सतत डोकं चालवावं लागतं. जर तुम्हाला साचेबद्ध अभ्यास करायला आवडत असेल, तर तुम्ही इथे बोअर व्हाल. ज्याला हाताने काम करायला, वायर्स जोडायला, कोडिंग करायला आणि नट-बोल्ट्स फिरवायला एकाच वेळी आवडतं, अशा अष्टपैलू मुलांसाठीच हा कोर्स बनला आहे. महाराष्ट्रातील ग्रामीण भागातील मुलांसाठी ही एक मोठी संधी आहे कारण शेतीमधील आधुनिक यंत्रसामग्रीमध्ये मेकाट्रॉनिक्सचा मोठा वापर होऊ लागला आहे.

  • विज्ञान शाखेमध्ये दहावी किंवा बारावी उत्तीर्ण असणारी मुले विद्यार्थी अभ्यासक्रम करू शकतात.
  • मेकॅट्रॉनिक्स इंजिनिअरिंग ही एक नवीनच शाखा आहे इंजीनियरिंग शाखा मधली त्यामुळ त्यामुळे आपल्याला या शाखेमध्ये नवीन असल्यामुळे भरपूर स्कोप आहे.
  • मेकॅट्रॉनिक्स इंजिनिअरिंगच्या अभ्यासक्रमामध्ये मेकॅनिकल इलेक्ट्रॉनिकल  कॉम्प्युटर टेक्नोलॉजी आणि कंट्रोल इंजिनिअरिंगचे अनेक घटक समविष्ट आहेत.
  • मेकॅट्रॉनिक्स इंजिनिअर इलेक्ट्रॉनिक्स कॉम्प्युटर टेक्नोलॉजी सायन्स इंजिनिअरिंगच्या तत्त्वांचा वापर करून टेक्नॉलॉजी मशीन आणि युजेस विकसित करतात जे प्रोडक्शन आणि प्रक्रिया किंवा उत्पादनाचे कार्यक्षमता सुधारण्यासाठी लागू केले जाऊ शकतात त्यांनी विकसित केलेल्या टेक्नॉलॉजी उद्योगांमध्ये व्यापक प्रमाणात लागू आहे.
  • प्रोडक्शन क्षेत्रामध्ये ऑटोमेटेड तंत्रज्ञानावरील अवलंबून राहणे वाढत असल्यामुळे मेकेट्रोनिक्स इंजिनिअरची मागणी देखील वाढत आहे या अभ्यासक्रमांमध्ये प्रवेश घेण्यासाठी उमेदवारांनी विज्ञान आणि गणित विषयांसह दहावी उत्तीर्ण केलेली असावी आणि कमीत कमी 50% गुणासह उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.

शैक्षणिक पात्रता

  • दहावी उत्तीर्ण झाल्यानंतर मेकॅट्रॉनिक्स इंजिनिअरिंग मध्ये डिप्लोमा करू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांनी खालील पात्रता निकष पूर्ण करणे आवश्यक आहे.
  • विज्ञान गणित आणि इंग्लिश या मुख्य विषयांमध्ये दहावीच्या परीक्षेत किमान 55 टक्क्यांनी उत्तीर्ण होणे गरजेचे आहे.
  • अभ्यासक्रमाचा अभ्यास करण्यासाठी वेगवेगळ्या संस्थांद्वारे घेतले जाणाऱ्या आणि कॉलेजेसच्या प्रवेश परीक्षांमध्ये उत्तीर्ण होणे आवश्यक आहे.

कोर्स निवडताना स्वतःला विचारायचे प्रश्न

प्रवेश घेण्यापूर्वी स्वतःला हे तीन प्रश्न विचारा:

  • मला यंत्रांसोबत खेळायला आणि ती बिघडली तर दुरुस्त करायला आवडतं का?

  • मला कॉम्प्युटरवर कोडिंग करायचा कंटाळा तर येणार नाही ना?

  • मी एकाच वेळी दोन-तीन वेगळ्या गोष्टी (उदा. करंट आणि मेकॅनिझम) शिकायला तयार आहे का? जर या प्रश्नांची उत्तरं ‘हो’ असतील, तर तुम्ही मेकाट्रॉनिक्ससाठी बनला आहात.

मेकेट्रोनिक्स मधील डिप्लोमा साठी प्रवेश प्रक्रिया सोपे आहे

प्रवेश प्रक्रिया आणि टाळावयाच्या चुका

महाराष्ट्रात Admission Process प्रामुख्याने १० वीच्या गुणांवर (CAP Rounds) चालते. काही संस्थांमध्ये CET/Entrance Exams असू शकतात. अनेक विद्यार्थी इथे चूक करतात… ते फक्त मोठ्या शहरातलं कॉलेज निवडतात. मेकाट्रॉनिक्ससाठी कॉलेज निवडताना त्यांचं ‘वर्कशॉप’ किती अद्ययावत आहे आणि तिथे पीएलसी (PLC) किंवा रोबोटिक्सच्या लॅब्स आहेत का, हे आधी तपासा. नुसत्या चकाचक क्लासरूम्स तुम्हाला इंजिनिअर बनवू शकत नाहीत.

दहावीच्या बोर्ड परीक्षेत अर्जदारांनी मिळवलेल्या गुणांच्या आधारे जागावाटप केल्या जातात मेरिटनुसार ऍडमिशन प्रोसेस होते ज्यामध्ये गणित आणि विज्ञान विषयांवर जास्त भर दिला जातो.

बहुतेक संस्थांमध्ये गुणवत्तेवर आधारित प्रवेश प्रक्रिया असते इच्छुक उमेदवारांनी आणि विद्यार्थ्यांनी संस्थेत जाऊन प्रवेश अर्ज भरावा लागतो.

सरकारी व खाजगी कॉलेजमध्ये प्रवेशाचा फरक

सरकारी पॉलिटेक्निकमध्ये फी खूप कमी असते आणि तिथली शिस्त तुम्हाला ‘राकट’ बनवते. खाजगी कॉलेजेसमध्ये सुविधा जास्त असू शकतात, पण तिथे ‘इंडस्ट्री एक्स्पोजर’ किती आहे हे पाहणं महत्त्वाचं आहे. मध्यमवर्गीय पालकांसाठी सरकारी कॉलेज हा नेहमीच सर्वोत्तम आणि सुरक्षित पर्याय असतो.

 

याची सविस्तर माहिती पहा 

Diploma In Mechatronics Information In Marathi याचा कालावधी

तीन वर्ष कालावधी सेमिस्टर आणि वार्षिक

 महत्त्वाचे विषय

या कोर्समध्ये तुम्हाला काय शिकावं लागेल?

  • मेकॅनिक्स: मशिन्सचे भाग आणि त्यांची हालचाल.

  • इलेक्ट्रॉनिक्स: सेन्सर्स, मोटर्स आणि सर्किट बोर्ड्स.

  • कंट्रोल सिस्टिम्स: मशिन्सना ‘बुद्धी’ देणारी सॉफ्टवेअर्स (PLC/Microcontrollers). हा अभ्यासक्रम खूप ‘डिलॅमिक’ आहे, म्हणजे तो सतत बदलत असतो. त्यामुळे तुम्हाला फक्त पुस्तकावर अवलंबून राहून चालणार नाही.

डिप्लोमा इन मेकॅट्रॉनिक्स याचा अभ्यासक्रम:

हा तीन वर्षांचा कोर्स आहे आणि सेमिस्टर पद्धतीचा असतो त्यानुसार आपण अभ्यासक्रम पाहूया.:

सेमिस्टर वन:
  • Applied सायन्स
  • अप्लाइड मॅथेमॅटिक्स
  • मॅन्युफॅक्चरिंग टेक्नॉलॉजी
  • बेसिक्स ऑफ इलेक्ट्रिकल अँड इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंग
  • सायन्स लॅब
  • बेसिक इलेक्ट्रिकल अँड इलेक्ट्रॉनिक्स
  • बेसिक कॉम्प्युटर स्किल
सेमीस्टर टू 
  • अप्लाईड मॅथेमॅटिक्स टू
  • C’ प्रोग्रामिंग लँग्वेज
  • Analog इलेक्ट्रॉनिक्स
  • इंग्लिश कम्युनिकेशन
  • Analog electronics lab
  • Machine shop practice
सेमिस्टर थ्री
  • मेजरमेंट सिस्टीम
  • डिजिटल इलेक्ट्रॉनिक्
  • बेसिक ऑफ मेकॅनिक्स अँड थर्मल इंजिनिअरिंग
  • Fluid पावर इंजिनिअरिंग
  • डिजिटल इलेक्ट्रॉनिक्स
  • कॉम्प्युटर aided इंजिनिअरिंग  ग्राफिक्स लॅब
  • इलेक्ट्रो न्यूमॅटिक लॅब
सेमिस्टर फोर 
  • मायक्रो कंट्रोलर अँड एप्लीकेशन्स
  • सीएनसी मशीन टूल टेक्नॉलॉजी
  • ऑटोमेशन अँड कॉम्प्युटर इंटिग्रेटेड मॅन्युफॅक्चरिंग सिस्टीम
  • इंडस्ट्रियल इलेक्ट्रॉनिक्स लॅब
  • मायक्रो कंट्रोलर लॅब
  • सीएनसी लॅब
  • इंडस्ट्रियल इलेक्ट्रॉनिक्स
सेमिस्टर फाईव्ह 
  • प्रोजेक्ट वर्क अँड इंडस्ट्रियल व्हिजिट
  • पी एल सी लॅब
  • पीएलसी अँड इट्स एप्लीकेशन
  • बेसिक मॅनेजमेंट स्किल्स अंड इंडियन कॉन्स्टिट्यूशन मायक्रोस्केल मेकॅनिकल सिस्टीम
  • कंट्रोल सिस्टीम लॅब
  • कंट्रोल सिस्टीम
सेमिस्टर सिक्स
  • सी ए एस पी लॅ
  • रोबोटिक्स लॅब
  • प्रोजेक्ट वर्क
  • इंडस्ट्रियल रोबोटिक्स
  • डिझाईन ऑफ मेकॅट्रॉनिक सिस्टीम ऑटोमॅटिक इलेक्ट्रॉनिक्स इलेक्टिव

डिप्लोमा इन मेकॅट्रॉनिक्स कॉलेजेस इन महाराष्ट्र

गव्हर्मेंट कॉलेजेस:
  • कॉलेज ऑफ इंजिनियरिंग पुणे COEP पुणे
  • इंडो जर्मन टू रूम आय जी टी आर संभाजीनगर
  • इन्स्टिट्यूट फॉर डिझाईन ऑफ इलेक्ट्रिकल मेजरिंग इन्स्ट्रुमेंट्स आय डी इ एम आय मुंबई
  • गव्हर्नमेंट पॉलीटेक्निक कराड
  • गव्हर्नमेंट पॉलीटेक्निक नाशिक
खाजगी कॉलेजेस : 
  • अलामुरी रत्नमाला इन्स्टिट्यूट ऑफ इंजीनियरिंग अँड टेक्नॉलॉजी ए आर एम आय इ टी ठाणे
  • डिप्लोमा सर्विस प्रदान करते आणि फर्स्ट इयरची फ्री जवळपास 60 हजार रपये आहे.
  • मराठवाडा मित्र मंडळ पॉलीटेक्निक पुणे
  • संजीवनी के बी पी पॉलिटेक्निक कोपरगाव
  • गुरुगोविंद सिंग पॉलिटेक्निक नाशिक
  • शरद इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी पॉलीटेक्निक यड्राव कोल्हापूर
  • अंजुमन इस्लाम AR कळसेकर पॉलिटेक्निक नवी मुंबई
  • डी के टी ई सोसायटीज यशवंतराव चव्हाण पॉलीटेक्निक इचलकरंजी

कोर्सनंतर लगेच नोकरी मिळते का? (अनुभव का महत्त्वाचा आहे?)

सत्य हे आहे की, कोर्स झाल्यावर तुम्हाला लगेच ‘व्हाईट कॉलर’ जॉब मिळेलच असं नाही. सुरुवातीला तुम्हाला शॉप फ्लोअरवर (Shop Floor) काम करावं लागेल. तुमचा सुरुवातीचा पगार ₹१२,००० ते ₹१८,००० च्या दरम्यान असू शकतो. पण जसा अनुभव वाढतो आणि तुम्हाला मशिन्सचे ‘नखरे‘ समजायला लागतात, तसा तुमचा पगार वेगाने वाढतो. या क्षेत्रात ‘अनुभव’ हीच सर्वात मोठी पदवी आहे.

हा कोर्स केल्यानंतर कोणत्या नोकऱ्या मिळतात?

मेकाट्रॉनिक्स डिप्लोमा होल्डर्सना अनेक क्षेत्रांत मागणी आहे:

  • ऑटोमेशन इंजिनिअर (ज्युनिअर लेव्हल)

  • रोबोटिक्स टेक्निशियन

  • मेंटेनन्स इंजिनिअर (MNCs मध्ये)

  • डिझाइन असिस्टंट सरकारी क्षेत्रात (उदा. रेल्वे, इस्रो, संरक्षण विभाग) देखील तांत्रिक सहाय्यक म्हणून जागा निघतात, पण तिथे स्पर्धा खूप असते.

डिप्लोमा इन मेकॅट्रॉनिक्स मध्ये जॉब्स नोकरीच्या संधी:

मेकॅट्रॉनिक्स मधील डिप्लोमा चे भविष्य उज्वला आहे जो ऑटोमॅटिक एरोस्पेस आरोग्यसेवा आणि प्रोडक्शन यांसारखे उद्योगांमध्ये ऑटोमेशन आणि स्मार्ट सिस्टिम ची वाढती मागणी यासाठी गरजेचे आहे.

  • पदवीधर रोबोटिक्स ऑटोमेशन आणि इलेक्ट्रॉनिक्स अभियंता म्हणून किंवा सिस्टीम इंटिग्रेशन आणि मेकॅट्रोनिक्स डिझाईन यांसारख्या विशेष भूमिकांमध्ये करिअर करू शकतात. नवीन क्षेत्र उदाहरणार्थ एरोस्पेस
  • यामध्ये व्यावसायिक विमानांपासून ते अवकाश संशोधनापर्यंतचा अनुप्रयोग यामध्ये गरज दिसून येते त्याचप्रमाणे विमान ड्रोन आणि उपग्रहांसाठी अचूक कंट्रोल सिस्टीम डिझाईन करण्याचे काम.
  • आरोग्य सेवा प्रोग्रेसिव्ह वैद्यकीय उपकरणे रोबोटिक ऑपरेशन टेक्नॉलॉजी आणि prosthetics च्या विकासात योगदान.
  • ऑटोमोटीव आधुनिक वाहने किंवा फोर व्हीलर यामध्ये मे पेट्रोल एक्स प्रिन्सिपल्स लागू करणे ज्यामध्ये सेल्फ ड्रायव्हिंग सिस्टीम ऑटोमॅटिक ट्रान्समिशन आणि ऍडव्हान्स ब्रेकिंग यांसारख्या वैशिष्ट्यांचा समावेश आहे.

करिअरमध्ये किती वाढ शक्य आहे?

मेकाट्रॉनिक्समध्ये सॅच्युरेशन (Saturation) येणं कठीण आहे कारण तंत्रज्ञान रोज बदलतंय. जर तुम्ही डिप्लोमानंतर Lateral Entry घेऊन थेट पदवीच्या (B.E./B.Tech) दुसऱ्या वर्षाला प्रवेश घेतला, तर तुमच्या संधी दुणावतात. याशिवाय पीएलसी (PLC), स्काडा (SCADA) किंवा एआय (AI) सारखे शॉर्ट-टर्म Skill Courses करणं खूप फायदेशीर ठरतं.

Diploma In Petroleum Engineering बद्दल माहिती

गणित आणि विज्ञान कमकुवत असल्यास?

अनेक मुलांचा हा मोठा प्रश्न असतो. बघा, इंजिनिअरिंग म्हटलं की गणित आलं. पण मेकाट्रॉनिक्समध्ये तुम्हाला ‘रॉकेट सायन्स’ लेव्हलचं गणित रोज सोडवावं लागत नाही. तुम्हाला लॉजिक (तर्क) चांगलं वापरता आलं पाहिजे. जर तुमचं विज्ञान आणि गणित १० वी पर्यंत सरासरी असेल तरी तुम्ही मेहनत घेऊन हा कोर्स पूर्ण करू शकता. फक्त ‘लॉजिक’ लावण्याची तयारी ठेवा, बाकी प्रॅक्टिकल करताना गोष्टी सोप्या होत जातात.

अभ्यासक्रम विद्यार्थ्यांना अभियांत्रिकी सहाय्यक पर्यवेक्षक देखभाल आणि सेवा कर्मचारी यासारख्या मानवाच्या पदांवर काम करण्यासाठी तयार करणे

या अभ्यासक्रमामुळे विद्यार्थी बहुउद्देशाख्य कशल्य आणि ज्ञान प्राप्त करतात ज्यामध्ये यांत्रिक अभियांत्रिकी इलेक्ट्रॉनिक्स आणि  कॉम्प्युटर टेक्नोलॉजी या विषयांचा समावेश आहे.

माझा प्रामाणिक सल्ला

पालकांनो आणि मुलांनो, फक्त ‘ट्रेंड’ आहे म्हणून या कोर्सला येऊ नका. मेकॅनिकल आणि इलेक्ट्रॉनिक्सचं हे ‘फ्युजन’ आहे, त्यामुळे दोन्ही विषयांचा अभ्यास करावा लागतो. कधी कधी मुलांना वाटतं की हे खूप कठीण आहे, पण जर तुम्हाला प्रॅक्टिकलची गोडी लागली तर हा जगातील सर्वात सुंदर विषय आहे. माझं स्पष्ट मत आहे की, ज्याला भविष्यात स्वतःचा ऑटोमेशनचा छोटा व्यवसाय सुरू करायचा आहे, त्यांच्यासाठी हा डिप्लोमा एक भक्कम पाया आहे.

हा कोर्स तुमच्यासाठी आहे का?

जर तुमच्यात संयम असेल, तुम्हाला नवनवीन गॅजेट्स आणि मशिन्स कशा बनतात हे जाणून घ्यायची ओढ असेल, तर मेकाट्रॉनिक्स तुमच्यासाठी नक्कीच आहे. हा कोर्स तुम्हाला फक्त नोकरी देणार नाही, तर तुम्हाला विचार करायला आणि समस्या सोडवायला शिकवेल.

2 responses to “Diploma In Mechatronics अपेक्षा vs वास्तव”

  1. This information was very useful for me in understanding about career opportunities in Mechatronics branch

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *