Diploma In Petroleum Engineering १०वी नंतर हा कोर्स करणे योग्य आहे का?
१०वीचा निकाल लागला की आपण सहसा सिव्हिल, मेकॅनिकल किंवा आयटीकडे धावतो. पण ज्यांना काहीतरी वेगळं आणि आव्हानात्मक करायचं आहे, त्यांच्यासाठी हा डिप्लोमा एक चांगला पर्याय ठरू शकतो. मात्र, लक्षात घ्या की हा कोर्स फक्त ‘इंजिनिअरिंग’ नाही, तर हे ऊर्जेचं शास्त्र आहे. जर तुम्हाला विज्ञानाची आवड असेल आणि मोठ्या रिफायनरीज किंवा ऑइल फील्ड्सवर काम करण्याचं स्वप्न असेल, तर १०वी नंतर थेट या क्षेत्रात पाऊल टाकणं फायदेशीर ठरतं. यामुळे तुम्हाला क्षेत्राचा पाया लवकर भक्कम करता येतो.
Diploma in petroleum engineering हा डिप्लोमा अभ्यासक्रम तीन वर्षांचा आहे जो सहा सत्रांमध्ये विभागलेला असतो.
पेट्रोलियम इंजिनिअरिंग हे कच्च्या तेलाच्या किंवा क्रूड ऑइलच्या किंवा नैसर्गिक गॅसच्या व्यापक उत्पादनाशी संबंधित असते.
दहावी उत्तीर्ण झालेले उमेदवार या अभ्यासक्रमात प्रवेश घेण्यात पात्र आहे अर्ज करण्यासाठी त्यांना कमी कमीत कमी 55% गुणांची आवश्यकता असते.
पेट्रोलियम इंजिनिअरिंग डिप्लोमा अभ्यासक्रमामध्ये पेट्रोलियम उद्योगाची ओळख गॅस आणि लिक्विड यांचा प्रवाह टेस्टिंग टेक्नॉलॉजी यांसारख्या विषयांचा समावेश आहे विद्यार्थ्यांना पेट्रोलियम उद्योगात वापरल्या जाणाऱ्या पद्धती जलाशय टेक्नॉलॉजी चे optimization देखील शिकवले जाते
अभ्यासक्रमाचे पदवीधर पेट्रोलियम इंजिनिअरिंग मध्ये बी टेक बी सारख्या विषयांमध्ये पुढील शिक्षण घेऊ शकतात प्लेसमेंट देखील दिली जाते.
हा कोर्स कोणासाठी योग्य नाही? Diploma In Petroleum Engineering
हा कोर्स सर्वांसाठी योग्य नाही कारण… यात कामाचं स्वरूप खूप वेगळं असतं. जर तुम्हाला ९ ते ५ ची साचेबद्ध नोकरी आणि शहरातलं आरामदायी ऑफिस हवं असेल, तर पेट्रोलियम इंजिनिअरिंग तुमच्यासाठी नाही. अनेकदा तुम्हाला शहरापासून दूर, किनारपट्टीवर किंवा अतिशय दुर्गम भागात काम करावं लागतं. ज्यांना धुूळ, उन्हात काम करणं आणि शारीरिक कष्ट नको वाटतात, त्यांनी या वाटेला न गेलेलेच बरे. केवळ ‘मोठा पगार’ मिळतो या अफवेला बळी पडून इथे येऊ नका.
पात्रता
- उमेदवारांनी मान्यता प्राप्त मंडळामधून दहावी किंवा त्याच्या समग्रक्ष पदवी उत्तीर्ण केलेली असावी
- अर्जदारांनी दहावीच्या परीक्षेत प्रत्येक विषयात एकूण 55 टक्के गणांचा उत्तीर्ण होणे आवश्यक असते.
या कोर्ससाठी कोणती आवड आवश्यक आहे?
तुम्हाला पृथ्वीच्या पोटातील रहस्यांबद्दल कुतूहल आहे का? तेल आणि वायू (Oil and Gas) जमिनीतून बाहेर कसे काढले जातात, हे जाणून घ्यायला आवडतं का? जर तुमची भूगोल (Geology) आणि विज्ञानाची आवड चांगली असेल, तर हा कोर्स तुम्हाला रंजक वाटेल. इथे फक्त डोकं चालवून चालत नाही, तर प्रत्यक्ष मैदानावर उतरून यंत्रांशी मैत्री करण्याची तयारी लागते.
ऍडमिशन प्रोसेस Diploma In Petroleum Engineering
प्रवेश प्रक्रिया आणि विद्यार्थी कुठे चुकतात?
महाराष्ट्रातील Admission Process ही प्रामुख्याने १०वीच्या गुणांवर आधारित असते (CAP Rounds). काही वेळा विशिष्ट संस्था स्वतःची Entrance Exam ही घेऊ शकतात. विद्यार्थी सगळ्यात मोठी चूक ही करतात की ते कॉलेजचं लोकेशन पाहतात, लॅब नाही. पेट्रोलियमसाठी अशाच कॉलेजला प्राधान्य द्या जिथे वर्कशॉप आणि इंडस्ट्री व्हिजिट्सवर भर दिला जातो.
पेट्रोलियम इंजिनिअरिंग डिप्लोमा अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेण्यासाठी उमेदवारांना संस्थेने स्वीकारलेल्या संबंधित प्रवेश परीक्षेत बसणे आवश्यक असते इच्छुक उमेदवाराला समुपदेशन कागदांची पडताळणी admission detailing शुल्क भरणे यासारख्या काही प्रक्रिया पार पाडाव्या लागतात वेगवेगळ्या संस्थांमध्ये वेगवेगळी प्रक्रिया असू शकते.
| नोंदणी |
|
| तपशील भरणे |
|
| अर्ज शुल्क |
|
| प्रवेश पत्र डाऊनलोड करणे |
|
| परीक्षा व निकाल |
|
| समुपदेशन आणि प्रवेश |
|
याची सविस्तर माहिती पहा YouTube वर
कालावधी: तीन वर्ष सेमिस्टर पॅटर्न
साधारण दरवर्षीचे शुल्क हे 50 हजार ते दीड लाख रुपये इतके असते.
कमी मार्क्स असलेल्यांनी हा कोर्स करावा का?
हो, करू शकता. १०वी च्या मार्क्सवर तुमचं पूर्ण करिअर ठरत नाही. पेट्रोलियममध्ये तुमचं ‘प्रॅक्टिकल डोकं’ कसं चालतं याला जास्त महत्त्व आहे. अनेक विद्यार्थी इथे चूक करतात… त्यांना वाटतं की मार्क्स कमी आहेत म्हणून एखादा अनवट कोर्स निवडावा. पण लक्षात ठेवा, हे क्षेत्र तांत्रिक आहे. जर तुम्हाला गणिताची प्रचंड भीती वाटत असेल, तर डिप्लोमाच्या दुसऱ्या आणि तिसऱ्या वर्षात तुम्हाला खूप मेहनत घ्यावी लागेल.
अभ्यासक्रम किती Practical आहे? Diploma In Petroleum Engineering
पुस्तकात जे वाचता ते रिफायनरीमध्ये प्रत्यक्ष पाहताना खूप वेगळं असतं. या अभ्यासक्रमात तुम्हाला ड्रिलिंग, रिझर्व्होअर इंजिनिअरिंग आणि पेट्रोलियमच्या शुद्धीकरणाची प्रक्रिया शिकवली जाते. केवळ नोट्स पाठ करून इथे चालत नाही, तर तुम्हाला डायग्राम्स आणि मशिनरीचे वर्किंग समजून घ्यावे लागते.
अभ्यासक्रम
पेट्रोलियम इंजिनिअरिंग डिप्लोमा अभ्यासक्रमांचा अभ्यास करणे उद्योगाच्या गरजा पूर्ण करण्यासाठी आणि कुशल बिझनेसमन बनवण्यासाठी डिझाईन केलेला आहे तर खालील प्रमाणे:
| सेमिस्टर वन |
|
| सेमिस्टर टू |
|
| सेमिस्टर थ्री |
|
| सेमिस्टर फोर |
|
| सेमिस्टर फाईव्ह |
|
| सेमिस्टर सिक्स |
|
कॉलेज
| मुंबई | लोणेरे रायगड | अमरावती |
| इन्स्टिट्यूट ऑफ केमिकल टेक्नॉलॉजी आयसीटी | डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर टेक्नॉलॉजिकल युनिव्हर्सिटी (DBATU) | संत गाडगेबाबा अमरावती युनिव्हर्सिटी (SGBAU) |
डिप्लोमा नंतर नोकरी मिळते का?
नोकरी मिळते, पण पदवी (Degree) असलेल्यांच्या तुलनेत सुरुवातीला तुम्हाला ‘सुपरवायझर’ किंवा ‘टेक्निशियन’ लेव्हलला काम करावं लागेल. ONGC सारख्या सरकारी कंपन्यांमध्ये किंवा रिलायन्स, एस्सार सारख्या खाजगी रिफायनरीजमध्ये ज्युनिअर इंजिनिअरच्या जागा निघतात. पण लक्षात ठेवा, स्पर्धा खूप आहे, त्यामुळे केवळ पास होऊन चालणार नाही तर तुमच्याकडे जादा स्किल्स हवेत.
डिप्लोमा इन पेट्रोलियम इंजिनिअरिंग पदविका धारक अनेक नामांकित सरकारी आणि खास कंपन्यांमध्ये नोकरी करताना त्यांच्या कौशल्य आणि अनुभवानुसार वेतन दिले जाते पेट्रोलियम रीज रिफायनरी वाहतूक कंपन्या प्लास्टिक अँड पेट्रोलियम लाईक प्रॉडक्ट्स कंपन्यांमध्ये काम करू शकतात त्यांच्यासाठी योग्य सरकारी नोकरीच्या जागा किंवा खाजगी नोकरीच्या जागा खालील प्रमाणे आहे:
- सेल्स कोऑर्डिनेटर
- प्रोसेस ऑपरेटर
- पेट्रोलियम/ gas सर्विस स्टेशन
- जिओलॉजिस्ट /पेट्रोलियम जोलॉजिस्ट
- प्रोग्राम मॅनेजमेंट एक्सपर्ट
- फिल्ड ऑपरेटर
- प्रोजेक्ट मॅनेजर
- असिस्टंट मॅनेजर वेल टेस्टिंग
- टेस्टिंग इंजिनियर
यामध्ये टॉप recruiter कंपन्या म्हणजे
- आयओसीएल
- एचपीसीएल
- गेल
- शेल
- हॉलिबरटन
- Oil and gas corporation
- ऑटोमोबाईल इंडस्ट्रीज
अनुभव का महत्त्वाचा आहे?
पेट्रोलियम क्षेत्रात पदवीपेक्षा तुमच्या ‘अनुभवाचा’ कागद जास्त बोलतो. जो माणूस प्रत्यक्ष ड्रिलिंग साईटवर घाम गाळतो, त्याला एसीमध्ये बसून डिझाइन करणाऱ्यापेक्षा जास्त बारीकसारीक गोष्टी माहित असतात. त्यामुळे सुरुवातीची काही वर्षे पगार न बघता कामाचा अनुभव घेण्यावर भर द्या.
आपण काही जॉब प्रोफाइल्स पाहूया:
| फील्ड ऑपरेटर | देखभाली साठी उपकरणे तयार ठेवणे. | पगार तीन ते सहा लाख |
| वेल टेस्टिंग मॅनेजर | प्लांट मधील वेल ऑपरेशन टेस्टिंग आणि एकूण कामकाजाचे निरीक्षण | पगार चार लाख |
| प्रोसेस ऑपरेटर | प्रोडक्शन प्रोजेक्टच्या संपूर्ण प्रोडक्शन प्रक्रियेचे व्यवस्थापन करण्याची जबाबदारी. | चार ते सहा लाख |
| प्रोग्रॅम मॅनेजमेंट एक्सपोर्ट | धोरणात्मक बिजनेस उद्दिष्टांसाठी चालवल्या अनेक प्रकल्पाचे समन्वयन आणि व्यवस्थापन मॅनेजमेंट करणे. | पगार पाच ते सहा लाख |
| जिओलॉजिस्ट और पेट्रोलियम geologist | खडक आणि खनिजांचा रचना आणि संरचनेचा अभ्यास करणे आणि गॅस आणि ऑइल यांचा शोध घेणे. | पगार दोन लाख ते चार लाख |
| गॅस सर्विस स्टेशन | उपकरणे प्रणालींची स्थापना देखभाल आणि चाचणी सुरक्षा उपकरणांची तपासणी करण्याची जबाबदारी | पगार चार लाख पाच लाख |
| प्रोजेक्ट मॅनेजर | बजेट आणि व्याप्तीमध्ये वेळेवर क्लाइंटचे प्रकल्पाचे असे म्हणून आणि पूर्ण करणे. | पगार आठ लाख ते दहा लाख |
माझा प्रामाणिक सल्ला: फक्त ट्रेंड पाहून कोर्स निवडू नका
सध्या पेट्रोलियम किंवा ऑइल सेक्टरमध्ये ‘बूम‘ आहे म्हणून इथे येऊ नका. हे क्षेत्र लहरी आहे. कधी आंतरराष्ट्रीय बाजारात तेलाचे भाव पडले की नोकरभरती मंदावते. त्यामुळे तुमची आवड असेल तरच या. माझा अनुभव असा सांगतो की… जे मुले कष्ट करायला घाबरत नाहीत, तेच इथे १०-१५ वर्षांनंतर मोठ्या हुद्द्यावर पोहोचतात.
डिप्लोमा इन पेट्रोलियम इंजीनियरिंग मधील पदविका पूर्ण केल्यानंतर जर विद्यार्थी उच्च शिक्षण घेऊ इच्छित असेल तर तो दुसऱ्या वर्षाच्या पदवी अभियांत्रिकी अभ्यासक्रमांना थेट प्रवेश घेऊ शकतो. Diploma In Petroleum Engineering
ते खालील अभ्यासक्रमांमध्ये प्रवेश घेऊ शकतात . :
- पेट्रोलियम इंजिनिअरिंग मध्ये बी टेक
- बीइ पेट्रोलियम इंजिनिअरिंग
- मेकॅनिकल इंजिनिअरिंग मध्ये बी टेक
ते पेट्रोलियम भूगर्भशास्त्र प्रक्रिया, उपकरणे, पेट्रोलियम रिफायनरी, पेट्रोल केमिकल इंजिनिअरिंग, वेल टेस्टिंग आणि सर्विसिंग यासारखे काही क्षेत्रांमध्ये सुपर स्पेशालिटी घेऊ शकता.
Craftsmanship Course In Food Production बद्दल माहिती
हा कोर्स तुमच्यासाठी आहे का?
जर तुम्हाला यंत्रांशी खेळायला आवडतं, तुम्ही कष्टाला घाबरत नाही आणि तुम्हाला एका वेगळ्या विश्वात स्वतःचं नाव करायचंय, तर नक्कीच पेट्रोलियम इंजिनिअरिंग निवडा. पालकांनीही आपल्या मुलाची आवड ओळखून त्याला या क्षेत्रातील आव्हानांची कल्पना देऊनच प्रवेशाचा निर्णय घ्यावा.
हा एक अभ्यासक्रमाच्या मध्ये गॅस आणि पेट्रोलियम उद्योगाच्या सर्व क्षेत्रातील इंजीनियरिंग तंत्रज्ञांना प्रशिक्षण देण्यासाठी आणि उच्च कुशल लोकांच्या मागणीची पूर्तता करण्यासाठी डिझाईन केलेला आहे. Diploma In Petroleum Engineering
उच्च वेतन
कंपनी किंवा उद्योगांकडून पेट्रोलियम इंजिनिअर्सना दिले जाणारे वेतन हे खूप जास्त असते पदवीधरांसाठी वेतन श्रेणी देखील उच्च असते
कार्यक्षेत्र
उत्तीर्ण झाल्यानंतर विद्यार्थ्यांना सरकारी तसेच खाजगी क्षेत्रातील उद्योगांमध्ये अनेक संधी उपलब्ध असतात.
करिअरच्या संधी
भारतामध्ये पेट्रोलियम इंजिनिअरची मागणी सतत वाढत आहे.
त्यामुळे येथील करिअर हे आकर्षक आणि आव्हानात्मक आहे पेट्रोलियम इंजिनिअरच्या करिअरच्या संधी भारतात आणि भारताबाहेर खूप जास्त आहेत.
हाय लेवल बिजनेस
भारताबाहेर इंजिनिअरिंगची खूप जास्त व्याप्ती आहे.
कराड आणि लोणेरे यांसारख्या ठिकाणी काही नामांकित संस्था आहेत जिथे पेट्रोलियमशी संबंधित कोर्सेसची उत्तम सोय आहे. हा कोर्स केल्यावर परदेशात जाता येते का? हो, गल्फ देशांमध्ये (दुबई, सौदी) पेट्रोलियम इंजिनिअर्सना मोठी मागणी आहे, पण त्यासाठी किमान ३ वर्षांचा भारतीय अनुभव गरजेचा असतो.
आजकाल मुली रिफायनरीमध्ये आणि लॅबमध्ये मोठ्या पदावर काम करत आहेत. फक्त साईटवरच्या कामासाठी मानसिक तयारी हवी.सुरुवातीला थोडे कठीण जाईल, पण जर तुम्ही प्रॅक्टिकल्समध्ये चांगले असाल, तर सराव करून गणितं सोडवता येतात. घाबरण्याचं कारण नाही.
One response to “Diploma In Petroleum Engineering हा कोर्स तुम्हाला इंडस्ट्रीसाठी कसा तयार करतो?”
[…] Diploma In Petroleum Engineering बद्दल माहिती […]