Diploma in Electronics And Communication Engineering माहिती

Diploma in Electronics And Communication Engineering माहिती

Diploma in Electronics And Communication Engineering हा कोर्स काय आहे ?

दहावी किंवा बारावीनंतर इंजीनियरिंग हे जर नाव डोळ्यासमोर येत असेल पण इंजिनिअरिंग मध्येही जर शाखा निवडायचे असेल तर आजच्या डिजिटल युगाचा कणा असलेली इलेक्ट्रॉनिक्स अँड कम्युनिकेशन इंजीनियरिंग या कोर्स बद्दल तुम्ही पाहू शकता.

हा कोर्स प्रामुख्याने इलेक्ट्रॉनिक्स उपकरणे, तसेच कम्युनिकेशन सिस्टीम जसे की मोबाईल, सॅटेलाईट आणि सर्किट डिझाइनिंग वर आधारित आहे. जर तुम्हाला गॅजेट्स कसे काम करतात रेडिओ सिग्नल कसे जातात किंवा चिप्स कशा तयार होतात यात जर आवड असेल तर हा कोर्स तुमच्यासाठी आहे.

Diploma in Electronics And Communication Engineering याचा कालावधी

हा तीन वर्षाचा फुल टाइम डिप्लोमा चा कोर्स आहे.

याचा हेतू

विद्यार्थ्यांना इलेक्ट्रॉनिक क्षेत्रातील तांत्रिक ज्ञान देऊन त्यांना इंडस्ट्रीसाठी तयार करणे त्यांचे स्किल्स वाढवणे हा याचा मुख्य उद्देश आहे.

याचे मुख्य विषय

यात डिजिटल इलेक्ट्रॉनिक्स तसेच मायक्रोप्रोसेसर आणि नेटवर्क थेरी तसेच कम्युनिकेशन सिस्टीम यांचा समावेश होतो.

याची अध्ययन पद्धत

हा कोर्स थेरी आणि प्रॅक्टिकल यांचा उत्तम संगम आहे. यात लॅब वर्क्सला जास्त महत्व दिले जाते.

विद्यार्थी मित्रांनो माझ्या माहितीप्रमाणे यामध्ये मोबाईल सॅटेलाईट तसेच सर्किट डिझाईनिंग या गोष्टींवर जास्त भर दिला जातो त्यामुळेच याचे नाव इलेक्ट्रॉनिक्स अँड कम्युनिकेशन इंजीनियरिंग आहे आणि मुख्य अभ्यास या अंतर्गत येतो. – पृथ्वीराज चंदनशिव

Diploma in Electronics And Communication Engineering यासाठी शैक्षणिक पात्रता कोणती ?

इलेक्ट्रॉनिक इंजिनिअरिंग मध्ये प्रवेश घेण्यासाठी तुम्हाला काही मूलभूत अटी पूर्ण कराव्या लागतात.

याची पात्रता

विद्यार्थी दहावी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे तसेच बारावीनंतर सायन्स मधून डायरेक्टली दुसऱ्या वर्षात डिग्रीमध्ये प्रवेश मिळू शकतो

कमीत कमी गुण

यासाठी कोणतेही ठराविक उच्च वयोमर्यादा नाही पण प्रवेश घेताना मात्र विद्यार्थ्यांचे वय किमान 15 वर्ष पूर्ण असावे.

याचा प्रवाह

विज्ञान आणि गणित या विषयांची आवड असल्यास हा कोर्स समजणे तुम्हाला सोपे जाईल.

मित्रांनो याची शैक्षणिक पात्रता दहावी पास यामुळे आहे कारण हा डिप्लोमा स्तरावरील कोर्स आहे आणि दहावीनंतरच विद्यार्थी हा कोर्स करू शकतो. – पृथ्वीराज चंदनशिव

याची ऍडमिशन प्रोसेस

महाराष्ट्रात डिप्लोमा प्रवेश प्रक्रिया डायरेक्ट रेट ऑफ टेक्निकल एज्युकेशन द्वारे राबवली जाते.

पात्रता चेक करा

तुमचे दहावीचे गुण आणि त्याचे विषयांची पडताळणी करा.

कॉलेज निवडा

तुम्हाला दहावी मध्ये पडलेल्या गुणांच्या आधारे जिल्ह्यानुसार आणि गुणांनुसार चांगल्या कॉलेजेस ची यादी तयार करा.

अर्ज करा

ज्यावेळेस याचे ऍडमिशन सुरू होतात त्यावेळेस पोर्टलवर ऑनलाईन नोंदणी तुम्ही करू शकता.

प्रवेश परीक्षा

दहावी नंतरच्या डिप्लोमाला सहसा वेगळी प्रवेश परीक्षा नसते. दहावीच्या गुणांवरच प्रवेश मिळतो.

गुण मिळवा

कॅप राऊंड मध्ये सहभागी होऊन मेरिटनुसार कॉलेज मिळवा.

डॉक्युमेंट वेरिफिकेशन

निवड झालेल्या कॉलेजमध्ये जाऊन मूळ कागदपत्रांची पडताळणी करावी लागते आणि फी भरून तुमचा प्रवेश निश्चित करून घ्या.

याचा कालावधी आणि रचना

हा कोर्स तीन वर्षाचा असून तो सहा सेमिस्टर मध्ये विभागलेला आहे. एका वर्षामध्ये दोन सेमिस्टर असे तीन वर्षांमध्ये तुम्हाला सहा सेमिस्टर चा अभ्यास करावा लागतो.

याची रचना

प्रत्येक वर्षी दोन सेमिस्टर पाहायला मिळतात प्रत्येक सेमिस्टर च्या शेवटी परीक्षा आणि प्रॅक्टिकल तसेच असेसमेंट असते.

यात तुम्ही काय शिकता ?

पहिल्या वर्षी मूलभूत विज्ञान जसे फिजिक्स केमिस्ट्री मॅथेमॅटिक्स असते तर दुसऱ्या व तिसऱ्या वर्षी कोर सब्जेक्ट वर लक्ष केंद्रित केले जाते.

याचे विषय आणि अभ्यासक्रम.

  • प्रॅक्टिकल्स

ऐच्छिक विषय (कोणताही एक)  व्यावसायिक संवाद  अनुप्रयुक्त गणित II  ५०-५२  औद्योगिक व्यवस्थापन आणि उद्यमशीलता विकास  आधुनिक संवाद प्रणाली  अनुप्रयुक्त गणित  विद्युत अभियांत्रण II सर्किट बनवणे तसेच पीसीबीची डिझाईनिंग करणे आणि सॉफ्टवेअर सिमुलेशन यामध्ये जास्त भर दिला जातो.

  • प्रथम वर्षात काय शिकता ?

पर्यावरण शिक्षण आणि आपत्ती व्यवस्थापन  प्रगत मायक्रोप्रोसेसर आणि इंटरफेस  अनुप्रयुक्त भौतिकशास्त्र  औद्योगिक इलेक्ट्रॉनिक्स आणि ५६-७०  ट्रान्सड्यूसर्स  संवाद प्रणाली  बायो मेडिकल इलेक्ट्रॉनिक्स  अनुप्रयुक्त रसायनशास्त्र  नेटवर्क फिल्टर्स आणि ट्रान्समिशन लाइन्स  इंजीनियरिंग चा पाया आणि मूलभूत विज्ञानाची ओळख तुम्ही प्रथम वर्षात शिकता.

  • शेवटच्या वर्षात काय शिकता ?

विद्युत अभियांत्रण I  डिजिटल इलेक्ट्रॉनिक्सची तत्त्वे  दूरदर्शन अभियांत्रण  आधुनिक ग्राहक इलेक्ट्रॉनिक्स उपकरणे  इलेक्ट्रॉनिक घटक आणि साधने  इलेक्ट्रॉनिक्स वर्कशॉप  मायक्रोप्रोसेस आधुनिक तंत्रज्ञान जसे की इंटरनेट ऑफ थिंग्स तसेच रोबोटिक्स आणि सॅटॅलाइट कम्युनिकेशन बद्दल तुम्ही शिकता.

  • महाराष्ट्रातील प्रमुख कॉलेजेस आणि फी.

सरकारी पॉलिटेक्निक गव्हर्मेंट 7000 ते 10,000 शुल्क वार्षिक

खाजगी पॉलिटेक्निक 40000 ते 80 हजार शुल्क वार्षिक

  • सरासरी शुल्क

तुमच्या कास्ट कॅटेगरीनुसार स्कॉलरशिप मिळू शकते ज्यामुळे फी कमी होते.

  • प्लेसमेंट

चांगल्या कॉलेजमध्ये ट्रेनिंग अँड प्लेसमेंट सेल असतो जो विद्यार्थ्यांना नोकरी मिळून देण्यास मदत करतो.

करिअर आणि संधी

या क्षेत्रात करिअरच्या अफाट संधी उपलब्ध आहेत

  • सरकारी नोकऱ्या

इजरो तसेच डीआरडीओ आणि बीएसएनएल तसेच रेल्वे आणि संरक्षण दलात तांत्रिक सहाय्यक म्हणजेच टेक्निकल असिस्टंट म्हणून नोकरी मिळू शकते.

  • खाजगी नोकऱ्या

मोठ्या टेक कंपन्या जसे सॅमसंग एलजी इंटेल रिलायन्स जिओ यांसारख्या कंपन्यांमध्ये मोठी संधी उपलब्ध आहे.

  • उच्च शिक्षण

डिप्लोमा नंतर तुम्ही थेट बी टेक च्या दुसऱ्या वर्षाला प्रवेश घेऊ शकता.

  • स्वतःचा व्यवसाय

तुम्ही स्वतःचे इलेक्ट्रॉनिक रिपेरिंग सेंटर तसेच पीसीबी डिझायनिंग फर्म किंवा होम ऑटोमेशन चा व्यवसाय सुरू करू शकता.

पुढील संधी आणि पगार

इलेक्ट्रिकल इंजिनियर्स  INR 3,50,084
इंजिनियर INR 3,37,899
प्रोफेसर्स INR 9,13,657
नेटवर्क प्लॅनिंग इंजिनियर INR 2,94,275
बिझनेस डेव्हलपमेंट मॅनेजर INR 5,63,674

मुख्य नोकऱ्या कंपन्या

फॉक्स कॉन तसेच टाटा कम्युनिकेशन आणि हॅवेल्स यासारख्या आयटी कंपन्यांमध्ये नोकरी मिळू शकते.

सरासरी पगार

सुरुवातीला वार्षिक दोन ते चार लाख पर्यंत पॅकेज मिळू शकते आणि ते अनुभवानुसार वाढत राहते.

हा कोर्स का आणि कोणी निवडावा ?

जर तुम्हाला गणिताची भीती वाटत नसेल आणि नवीन तंत्रज्ञान जाणून घेण्याची ओढ असेल तर हा कोर्स तुमच्यासाठी बेस्ट आहे.

मागणी

5g तंत्रज्ञान आणि सेमीकंडक्टर मिशनमुळे या क्षेत्रातील इंजिनियर्सला मोठी मागणी आहे

संशोधन

नवनवीन चिप्स आणि संसर बनवण्याचे संशोधन यात चालते

निवडण्याचे कारण

हे क्षेत्र कधीही न संपणारे आहे कारण जग आता पूर्णपणे इलेक्ट्रॉनिक्स वर अवलंबून आहे.

व्हिडिओ पहा

मित्रांनो तुम्हाला पडलेल्या प्रश्नांबद्दल खाली सविस्तर माहिती दिलेली आहे ती वाचा. – पृथ्वीराज चंदनशिव

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *