Warning: Constant PRODUCTION_FACTORY_BUY_BUNDLE already defined in /home2/studyflo/public_html/wp-content/themes/production-factory/get-started/notice.php on line 5
Be Computer Science & Engineering माहिती पहा

Be Computer Science & Engineering बद्दल माहिती 2026 । पात्रता, अभ्यासक्रम , कालावधी

Key Points hide

Be Computer Science & Engineering हा कोर्स काय आहे ?

बीई कॉम्प्युटर सायन्स अँड इंजीनियरिंग हा एक डिग्रीस्तरावरील अभ्यासक्रम आहे जो पूर्णपणे संगणक त्याची प्रणाली तसेच सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट आणि हार्डवेअरच्या अभ्यासक्रमावर आधारित आहे. यामध्ये कोडी सॉफ्टवेअर गेम्स आणि नवनवीन ॲप्स कसे बनतात याबद्दल सविस्तर माहिती शिकवली जाते.

आर्टिफिशल इंटेलिजन्स कसे विकसित करायचे आणि जगातील समस्या सॉफ्टवेअर द्वारे कशा सोडवायच्या याचे मुख्य उद्देश आहे.

याचा कालावधी

याचा कालावधी तुम्हाला चार वर्षाचा पहिला मिळतो ज्यामध्ये आठ सेमिस्टर असतात.

याचा हेतू

विद्यार्थ्यांना लॉजिकल थिंकिंग तसेच प्रोग्रामिंग स्किल्स आणि सिस्टीम डिझाईन मध्ये तज्ञ बनवणे हा या कोर्सचा मुख्य उद्देश्य आहे.

याचे मुख्य विषय

यात प्रामुख्याने डेटा स्ट्रक्चर तसेच अलगिरी दम तसेच डेटाबेस मॅनेजमेंट आणि क्लाऊड कॉम्पिटिंग यासारख्या महत्त्वाच्या विषयांचा समावेश होतो.

याची अध्ययन पद्धत

यात वर्गातील शिक्षणासोबतच प्रॅक्टिकल कोडींग तसेच हॅकतोंस आणि इंडस्ट्रियल प्रोजेक्टवर जास्त भर दिला जातो.

Be Computer Science & Engineering यासाठी शैक्षणिक पात्रता कोणती ?

इंजीनियरिंग च्या या अभ्यासक्रमाला प्रवेश घेण्यासाठी विद्यार्थ्यांचे बारावी पास असणे गरजेचे आहे कमीत कमी 60% गुण त्यामध्ये घेतलेल्या असावे कारण हा डिग्रीस्तरावरील कोर्स आहे आणि फक्त बारावी पास विद्यार्थी यासाठी प्रवेश मिळू शकतात.

याची पात्रता

विद्यार्थ्याने बारावी परीक्षा उत्तीर्ण केलेल्या असावी. बारावी मध्ये फिजिक्स म्हणजेच भौतिकशास्त्र मॅथमॅटिक्स म्हणजेच गणित हे विषय अनिवार्य आहेत. तिसरा विषय केमिस्ट्री किंवा बायोलॉजी किंवा कोणताही वोकेशनल विषय असला तरी चालतो.

यासाठी कमीत कमी लागणारे गुण

सामान्य प्रवर्गासाठी किमान 45 ते 50 टक्के गुण असणे आवश्यक आहे. राखीव प्रवर्गासाठी 40 ते 45% गुण असले तरी चालतात.

याची वयोमर्यादा

प्रवेशासाठी सहसा वयाची कोणतीही वरची मर्यादा नसते पण वयाची 18 वर्षे पूर्ण झालेली असावीत.

याचा प्रवाह

तुम्ही बारावीनंतर प्रवेश घेऊ शकता किंवा तीन वर्षाचा इंजीनियरिंग चा डिप्लोमा पूर्ण करू शकता ज्यामध्ये तुम्हाला थेट दुसऱ्या वर्षामध्ये प्रवेश मिळतो.

Be Computer Science & Engineering याची ऍडमिशन प्रोसेस

महाराष्ट्रात इंजिनिअरिंगची प्रवेश प्रक्रिया प्रामुख्याने सीईटी सेलद्वारे राबवली जाते.

याची पात्रता चेक करा

तुमचे बारावीचे गुण आणि प्रवेश परीक्षेचा निकाल तुम्ही तपासा

याचे कॉलेज निवडा

तुमच्या गुणांनुसार टॉप कॉलेजची यादी तयार करा जिथे हा कोर्स शिकवला जातो.

यासाठी अर्ज करा

सीईटी सेलच्या पोर्टलवर नोंदणी करा आणि परीक्षा द्या.

याची प्रवेश परीक्षा

महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांसाठी सीईटी ही सर्वात महत्त्वाची परीक्षा आहे. याशिवाय तुम्ही जे ई मेंद्वारेही अर्ज करू शकता.

यात गुण मिळवा

प्रवेश परीक्षेत जितके जास्त मार्क ्स तुम्हाला मिळतील तितके उत्तम कॉलेज मिळण्याची खात्री होते.

याचे डॉक्युमेंट वेरिफिकेशन

याचे डॉक्युमेंट वेरिफिकेशन निवड झालेल्या कॉलेजमध्ये जाऊन करावी लागते मूळ कागदपत्र तुम्हाला घेऊन जाऊन त्याची पडताळणी करणे अनिवार्य असते.

Be Computer Science & Engineering याचा कालावधी

या अभ्यासक्रमाचा कालावधी तुम्हाला चार वर्षाचा पाहायला मिळतो जो की पूर्णवेळ अभ्यासक्रम आहे आणि या अभ्यासक्रम मध्ये तुम्हाला आठ सेमिस्टर पाहायला मिळतात.

याची रचना

प्रत्येक वर्षी दोन सेमिस्टर पाहायला मिळतात पहिल्या वर्षी सर्व इंजिनिअरिंग शाखांचे विषय हे समान असतात तर दुसऱ्या वर्षापासून मुख्य कॉम्प्युटर विषयांना शिकवण्यास सुरुवात होते.

यात तुम्ही काय शिकता

तुम्ही यात वेगवेगळ्या प्रोग्रामिंग लँग्वेजेस शिकता. तसेच मोबाईल ॲप्स तयार करणे किंवा सायबर सुरक्षा याबद्दल सुद्धा शिकता.

Be Computer Science & Engineering याचे विषय आणि अभ्यासक्रम

सेमेस्टर I  सेमेस्टर II

इंग्रजी अभियांत्रिकी गणित II
कंप्यूटर सिस्टम आणि प्रोग्रामिंग संवाद तंत्रज्ञान
अभियांत्रिकी

गणित I अभियांत्रिकी यांत्रिकी
अभियांत्रिकी रसायनशास्त्र अभियांत्रिकी 

रसायनशास्त्र/भौतिकशास्त्र
अभियांत्रिकी

भौतिकशास्त्र यांत्रिकी अभियांत्रिकी
विद्युत आणि इलेक्ट्रॉनिक्स अभियांत्रिकी

पर्यावरण अभ्यास व आपत्ती व्यवस्थापन

सेमेस्टर III  सेमेस्टर IV

डेटा स्ट्रक्चर्स संवाद अभियांत्रिकी
डेटा-आधारित प्रोग्रामिंग प्रोग्रामिंग

भाषांच्या तत्त्वज्ञान
वियोगात्मक रचना संगणक संघटना व आर्किटेक्चर

डिजिटल इलेक्ट्रॉनिक्स डेटाबेस आणि फाइल प्रणाली
इलेक्ट्रॉनिक्स परिपथ अभियांत्रिकी

व्यवस्थापन व अर्थशास्त्र
अभियांत्रिकी गणित III प्रणाली सॉफ्टवेअर

सेमेस्टर V  सेमेस्टर VI

सॉफ्टवेअर अभियांत्रिकी

ऑपरेटिंग सिस्टम्स
मायक्रोप्रोसेसर आणि इंटरफेस संगणक

जाळे
ई-कॉमर्स 

अल्गोरिदमचे डिझाइन आणि विश्लेषण
कंप्यूटर ग्राफिक्स

एम्बेडेड सिस्टिम्स
दूरसंचार मूलतत्त्व

संगणनाचा सिद्धांत
तार्किक आणि मूलभूत प्रोग्रामिंग

डिजिटल सिग्नल प्रोसेसिंग
माहिती

सेमेस्टर VII  सेमेस्टर VIII

माहिती सिद्धांत आणि कोडिंग प्रगत सॉफ्टवेअर अभियांत्रिकी – मायक्रोवेव्ह आणि उपग्रह संप्रेषण

डेटा मायनिंग आणि वेअरहाऊसिंग माहिती प्रणाली आणि सिक्युरिटीज कंपायलर 

बांधकाम प्रगत संगणक आर्किटेक्चर्स लॉजिक सिंथेसिस VLSI साठी CAD डिझाइन्स

कृत्रिम बुद्धिमत्ता वितरित प्रणाली मल्टीमीडिया प्रणाली

प्रतिमा प्रक्रिया रिअल-टाइम प्रणाली नैसर्गिक भाषा प्रक्रिया ऑप्टिकल कम्युनिकेशन – सेवा-केंद्रित आर्किटेक्चर्स


यामधील प्रॅक्टिकल्स

विद्यार्थ्यांना लॅब मध्ये बसून प्रत्यक्ष कोडींग कशी करायची हे शिकवले जाते तसेच स्वतःची वेबसाईट बनवणे किंवा छोटे ॲप तयार करण्यासाठी लावले जातात.

प्रथम वर्षात काय शिकण्यास मिळते ?

प्रथम वर्षात या अभ्यासक्रमाचा पाया रचला जातो आणि मूलभूत विज्ञानाची ओळख दिली जाते.

शेवट वर्षात काय शिकण्यास मिळते ?

शेवटच्या वर्षांमध्ये इंडस्ट्री मधील लेटेस्ट टेक्नॉलॉजी जसे आर्टिफिशियल इंटेलिजन्स तसेच बिग डेटा आणि स्वतःचा एक मोठा सॉफ्टवेअर प्रोजेक्ट त्याबद्दल सखोल माहिती शिकवली जाते.

Be Computer Science & Engineering याचे कॉलेजेस

महाराष्ट्रात पुणे मुंबई आणि नागपूर ही इंजिनिअरिंगची मुख्य केंद्र आहेत येथे तुम्हाला खूप कॉलेजेस पाहायला मिळतात.

यामध्ये सरकारी तसेच खाजगी नावावरून ते कॉलेज आहेत आणि इतर खाजगी कॉलेजचाही समावेश आहे ज्यामध्ये अंदाजी वार्षिक फी 80 हजार ते एक लाख रुपये असते.

सर्व कॉलेजेस चे सरासरी शुल्क

सरासरी पाहता चार वर्षाचा खर्च पाच ते आठ लाख पर्यंत जाऊ शकतो आणि यामध्ये शिष्यवृत्ती तसेच सवलती पण मिळतात.

मध्ये प्लेसमेंट साठी काय करावे ?

चांगल्या नोकरीसाठी केवळ अभ्यासावर अवलंबून न राहता तुम्ही कोडींग प्लॅटफॉर्म्स वर सराव केला पाहिजे.

Be Computer Science & Engineering यामध्ये करिअर आणि संधी

कॉम्प्युटर सायन्स मध्ये करिअरच्या सर्दी सर्वाधिक उपलब्ध असतात कारण हे सध्याच्या जगाबरोबर मेळ असणारा अभ्यासक्रम आहे.

  1. संगणक अभियंता – संगणक विज्ञान, सॉफ्टवेअर आणि अनुप्रयोगांशी संबंधित नवीन तंत्रज्ञानाच्या शोधामागील प्राथमिक आधारस्तंभ संगणक अभियंते आहेत. त्यांना निर्बाध कार्यासाठी मूल्यांकन, चाचणी आणि विकास यासह विविध तंत्रांचे पालन करून सॉफ्टवेअरवर काम करणे आवश्यक आहे.
  2. सिस्टम प्रशासक – सिस्टम प्रशासकांना सिस्टमची योग्य जबाबदारी घेऊन सिस्टम हार्डवेअर आणि सॉफ्टवेअरचे व्यवस्थापन आणि निरीक्षण करणे आवश्यक आहे.
  3. नेटवर्क प्रशासक – नेटवर्क प्रशासक विविध नेटवर्कच्या कामगिरीचे विश्लेषण करून नेटवर्क आणि त्याच्या आवश्यकतांची देखभाल आणि देखरेख करण्यासाठी जबाबदार असतात.
  4. अॅप्लिकेशन कन्सल्टंट – अॅप्लिकेशन कन्सल्टंटना माहिती तंत्रज्ञान आणि सॉफ्टवेअर विकास क्षेत्रात योगदान देण्यासाठी नाविन्यपूर्ण संगणक सॉफ्टवेअर आणि मोबाइल अनुप्रयोग डिझाइन आणि विकसित करणे आवश्यक आहे.
  5. मोबाइल अॅप्लिकेशन – डेव्हलपर मोबाइल अॅप्लिकेशन डेव्हलपर हे मोबाइल अॅप्लिकेशनचे तज्ञ आहेत. त्यांचे काम जवळजवळ अॅप्लिकेशन कन्सल्टंट्ससारखेच आहे.

यामधील सरकारी नोकऱ्या

  1. इसरो
  2. डीआरडीओ
  3. एन आय सी
  4. बँकिंग क्षेत्रात आयटी ऑफिसर

यामधील खाजगी नोकऱ्या

  1. गुगल
  2. मायक्रोसॉफ्ट
  3. टीसीएस
  4. इन्फोसिस
  5. ॲमेझॉन

यामधून पुढे उच्च शिक्षण

तुम्ही पुढे एमइ किंवा एम टेक करू शकतात आणि परदेशात शिक्षणासाठी एम एस चा पर्याय सुद्धा निवडू शकता.

यामधून पुढे स्वतःचा व्यवसाय

जर तुमच्याकडे चांगली कल्पना असेल तर तुम्ही स्वतःची स्टार्टपही सुरू करू शकता.

मित्रांनो हा अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर माझ्या माहितीप्रमाणे खाजगी तसेच सरकारी नोकरी उपलब्ध आहेत पण हे सर्व तुमच्या अभ्यासावर तुम्ही हा कोर्स कोठून करता कशाप्रकारे करता या सर्व गोष्टींवर अवलंबून आहे – पृथ्वीराज चंदनशिव

Be Computer Science & Engineering हा कोर्स केल्यानंतर पुढील संधी

हा कोर्स केल्यानंतर मुख्यतः वेगवेगळ्या सरकारी तसेच खाजगी संस्था आहे तिथे नोकरी लागू शकते.

यामध्ये मुख्य नोकरी कंपन्या

  1. टीसीएस
  2. विप्रो
  3. कॉग्निजंट
  4. टेक महिंद्रा
  5. कॅफेजेमिनी

याचे व्हिडिओ स्वरूप पहा 

यामध्ये मिळणारा सरासरी पगार

सुरुवातीला वार्षिक पगार हा चार लाख ते आठ लाख पर्यंत असू शकतो तसेच आयआयटी किंवा मोठ्या कॉलेजमधून हा जर अभ्यासक्रम पूर्ण केला तर पॅकेज हे 30 लाखांच्याही वर जाऊ शकते.

Be Computer Science & Engineering हा कोर्स का आणि कोणी निवडावा.

ज्या विद्यार्थ्यांना समस्या सोडवण्यात आनंद मिळतो आवड आहे त्यासाठी हे क्षेत्र स्वर्गासारखे आहे कारण यामध्ये सध्याच्या दैनंदिन जीवनातल्या सर्व गोष्टींचा समावेश होतो जसे की आर्टिफिशियल इंटेलिजन्स असेल किंवा एखादे ॲप्लिकेशन बनवणे असेल तर या गोष्टी यामध्ये समाविष्ट आहेत म्हणून याच्यामध्ये करिअरच्या संधी पण खूप आहेत.

याची मागणी

  • सध्याच्या जगामध्ये प्रत्येक उद्योगाला सॉफ्टवेअरची गरज आहे त्यामुळे याची मागणी प्रचंड आहे.

यामध्ये मिळणारा पगार

  • इतर कोणत्याही इंजिनिअरिंगच्या शाखेपेक्षा इथे पगारवाढ जलद होते कारण हा आर्टिफिशल इंटेलिजन्स आणि सध्याच्या दैनंदिन जीवनातल्या समस्या सोडवण्यावर अभ्यासक्रम भर देतो.

यामध्ये होणारे संशोधन

  • आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि डेटा सायन्स मध्ये दररोज नवीन शोध लागत आहेत.

हे निवडणे उत्तम कारण

  • घरबसल्या काम करण्याची सोय आणि जागतिक स्तरावर करिअर करण्याची संधी यामध्ये उपलब्ध होते.

Be Electronics And Communication Engineering बद्दल माहिती

Be Computer Science & Engineering याबद्दल विचारली गेलेली प्रश्न

मला कोडिंग येत नाही मी Be Computer Science & Engineering हा कोर्स करू शकतो का ?

हो कारण कॉलेजमध्ये कोडींग अगदी शून्यापासून शिकवली जाते फक्त तुम्हाला शिकण्याची इच्छा असली पाहिजे.

कॉम्प्युटर इंजीनियरिंग आणि आयटी मध्ये काय फरक आहे ?

कॉम्प्युटर इंजिनिअरिंग मध्ये हार्डवेअर आणि सॉफ्टवेअर दोन्हींवर भर असतो तर आयटीमध्ये प्रामुख्याने सॉफ्टवेअर आणि इन्फॉर्मेशन मॅनेजमेंट वर लक्ष दिले जाते.

Be Computer Science & Engineering यासाठी लॅपटॉप घेणे आवश्यक आहे का ?

हो प्रॅक्टिससाठी आणि प्रोजेक्टसाठी लॅपटॉप स्वतःचा असणे अत्यंत फायदेशीर ठरते.

गणित कच्चे असेल तर अडचण येईल का ?

लॉजिक बिल्डिंग साठी गणिताची गरज असते पण तुम्ही सरावाने ते सुधारू शकता.

Be Computer Science & Engineering प्लेसमेंट साठी फक्त डिग्री पुरेशी असेल का ?

नाही कारण डिग्री सोबतच तुम्हाला कोडींग चे कौशल्य असणे गरजेचे आहे आणि प्रोजेक्ट्स पण हाताळता आले पाहिजे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *