Warning: Constant PRODUCTION_FACTORY_BUY_BUNDLE already defined in /home2/studyflo/public_html/wp-content/themes/production-factory/get-started/notice.php on line 5
BTech Electrical Engineering बद्दल माहिती पहा

BTech Electrical Engineering बद्दल माहिती 2026 । पात्रता, अभ्यासक्रम , कालावधी

BTech Electrical Engineering बद्दल माहिती 2026 । पात्रता, अभ्यासक्रम , कालावधी
Key Points hide

BTech Electrical Engineering हा कोर्स काय आहे ?

बी टेक इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग हा इंजिनिअरिंगच्या क्षेत्रातील एक पायाभूत आणि अत्यंत महत्त्वाचा अभ्यासक्रम आहे यामध्ये प्रामुख्याने वीज निर्मिती म्हणजेच पावर जनरेशन तसेच डिस्ट्रीब्यूशन म्हणजेच वीज वितरण आणि विविध इलेक्ट्रिकल्स उपकरणाचे डिझाईन कसे करावे याचे पूर्णपणे शिक्षण दिले जाते.

आपल्या घरात येणाऱ्या विजेपासून ते मोठ्या फॅक्टरी मधील मशनरी कशा चालतात याचे सर्व काही या इंजिनिअरिंगच्या क्षेत्राच्या कक्षेत येतात.

याचा कालावधी

हा कोर्स चार वर्षाचा असतो जो आठ सेमिस्टर मध्ये विभागलेला आहे.

याचा हेतू

विद्यार्थ्यांना इलेक्ट्रिक सिस्टीमचे सखोल ज्ञान देऊन त्यांना उद्योगातील आवाहनांसाठी तयार करणे हा या कोर्सचा मुख्य हेतू आहे.

याचे मुख्य विषय

यात प्रामुख्याने इलेक्ट्रोमॅग्नेटिसम कंट्रोल सिस्टिम पावर इलेक्ट्रॉनिक्स आणि सिग्नल प्रोसेसिंग यासारखे महत्त्वाचे विशेष शिकवले जातात.

याची अध्ययन पद्धत

यामध्ये थेअरी लेक्चर सोबत प्रॅक्टिकल तसेच लॅब्स आणि प्रोजेक्टवर विशेष भर दिला जातो .

BTech Electrical Engineering यासाठी शैक्षणिक पात्रता कोणती ?

यासाठी प्रवेश घेण्यासाठी तुम्हाला ठराविक शैक्षणिक टप्पे पूर्ण करणे आवश्यक आहे जसे की बारावी उत्तीर्ण करणे कारण हा एक डिग्री स्तरावरील कोर्स आहे जो फक्त बारावी उत्तीर्ण विद्यार्थी करू शकतो.

याची पात्रता

विद्यार्थी बारावी उत्तीर्ण असावा

यासाठी कमीत कमी लागणारे गुण

सामान्य प्रवर्ग यांसाठी किमान 50 ते 60 टक्के गुण असणे आवश्यक आहे आणि त्यामध्ये फिजिक्स केमिस्ट्री मॅथ हे विषय आवश्यक आहेत तर राखीव प्रवर्गासाठी यामध्ये सवलती पाहायला मिळतात.

याची वयोमर्यादा

प्रवेशासाठी सहसा वयाची अट नसते परंतु विद्यार्थ्यांनी पदवी पूर्ण करेपर्यंत वय विचारात घेतले जाते. म्हणजे एक ठराविक वय असते विद्यार्थ्यांचे हा अभ्यासक्रम पूर्ण करण्यासाठी.

याचा प्रवाह

दहावीनंतर दोन वर्षाचा जुनिअर कॉलेज म्हणजेच अकरावी बारावी किंवा दहावी नंतर तीन वर्षासाठी डिप्लोमा जो पॉलिटेक्निकच्या अंतर्गत येतो तो करून तुम्ही थेट या अभ्यासक्रमाच्या दुसऱ्या वर्षाला प्रवेश घेऊ शकता.

BTech Electrical Engineering याची ऍडमिशन प्रोसेस

महाराष्ट्रात या अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेण्यासाठी काही प्रवेश प्रक्रिया आहेत या पूर्णपणे गुणवत्तेवर आधारित असतात म्हणजे काही कॉलेज स्वतःची परीक्षा ठेवतात आणि काही कॉलेजमध्ये तुमच्या गुणांच्या आधारे तुम्हाला प्रवेश दिला जातो पण हे त्या कॉलेज वरती डिपेंड आहे.

याची पात्रता चेक करा

सर्वात आधी तुमचे बारावीचे निकाल आणि विषयांची अट तपासा

यासाठी अर्ज करा

तुमच्या आवडीनुसार आणि सोयीनुसार कॉलेजेस ची यादी तयार करा

याची प्रवेश परीक्षा

कॉलेजच्या वेबसाईटवर कॅप राऊंड साठी नोंदणी करा.

यात गुण मिळवा

प्रवेश परीक्षेत जितके चांगले गुण तितके चांगले कॉलेज मिळण्याची शक्यता असते म्हणून चांगले गुण घेण्याचा प्रयत्न करा.

याचे डॉक्युमेंट वेरिफिकेशन

शेवटचा टप्पा म्हणजे आपल्या कागदपत्रांची पडताळणी केंद्रावर जाऊन करणे. हे केल्यास तुमचे ऍडमिशन पक्के होते.

विद्यार्थी मित्रांनो माझ्या माहितीनुसार महाराष्ट्रामध्ये खूप सारे कॉलेजेस आहेत जे यामध्ये डायरेक्ट ऍडमिशन देतात ते पाहण्यासाठी खालील तक्ता तपासा – पृथ्वीराज चंदनशिव

BTech Electrical Engineering याचा कालावधी

याचा कालावधी हा चार वर्षाचा असतो आणि यामध्ये आठ सेमिस्टर पाहायला मिळतात याची रचना सर्व इंजिनिअरिंगच्या अभ्यासक्रमावरच असते आणि याचे मूळ जे आहेत विषय ते इलेक्ट्रॉनिक्स अंतर्गत येतात.

याची रचना

प्रथम वर्ष : सर्व इंजिनिअरिंग शाखांसाठी समान विषय यामध्ये तुम्हाला पाहायला मिळतात.

द्वितीय वर्ष : इलेक्ट्रिकल शे मुळ विषय सुरू होतात.

तृतीय व चतुर्थ वर्ष : यात स्पेशलिजेशन आणि मोठे प्रोजेक्ट्स करावे लागतात.

यात तुम्ही काय शिकता : तुम्ही यामध्ये ट्रान्सफॉर्मर्स मोटर्स जनरेटर्स पावर ग्रिड आणि अगदी रिन्यूएबल एनर्जी म्हणजेच सौर आणि पवन ऊर्जा या विषयांबद्दल सखोल माहिती शिकता.

BTech Electrical Engineering याचे विषय आणि अभ्यासक्रम

सेमेस्टर १  सेमेस्टर २
व्यावसायिक संवाद – I व्यावसायिक संवाद – II
अभियांत्रिकी गणित – I अभियांत्रिकी गणित – II
विज्ञान अभियांत्रिकी अभियांत्रिकी ग्राफिक्स – II
अभियांत्रिकी ग्राफिक्स – I अभियांत्रिकी 
रसायनशास्त्र
नैतिक व मूल्य शिक्षाशास्त्र संगणक व भाषा
अभियांत्रिकी भौतिकशास्त्र – I मूलभूत इलेक्ट्रॉनिक्स
अभियांत्रिकी यांत्रिकी कार्यशाळा प्रॅक्टिस व तंत्रज्ञान
निर्माण प्रक्रियेची ओळख अभियांत्रिकी भौतिकशास्त्र – II
सेमेस्टर ३  सेमेस्टर ४
नेटवर्क व सिस्टीम्स सिग्नल्स व सिस्टीम
अभियांत्रिकी गणित – III संगणक संस्था
विद्युत मापन व मापन उपकरणे विद्युत यंत्रे – I
ठोस अवस्था उपकरणे व परिपथ विद्युत अभियांत्रिकी साहित्य

स्विचिंग सिद्धांत व लॉजिक डिझाइन विद्युत चुंबकीय क्षेत्र सिद्धांत
माहिती तंत्रज्ञानाची ओळख संगणक आधारित संख्याशास्त्री व सांख्यिकीय तंत्र
पर्यावरण अभ्यास – I पर्यावरण अभ्यास – II
इलेक्ट्रॉनिक कार्यशाळा व PCB लॅब विद्युत अभियांत्रिकी रेखाटन
सेमेस्टर ५  सेमेस्टर ६

अर्थशास्त्राचे घटक व तत्त्वे

व्यवस्थापन विज्ञान पॉवर इलेक्ट्रॉनिक्स इलेक्ट्रिकल मशीन्स – II पॉवर सिस्टम विश्लेषण नियंत्रण प्रणाली पॉवर स्टेशन सराव पॉवर सिस्टमचे घटक इलेक्ट्रिकल मशीन डिझाइन – I 

इलेक्ट्रॉनिक्स सर्किट डिझाइन अॅडव्हान्स इलेक्ट्रिकल मशीन इलेक्ट्रिकल एनर्जीचा वापर मायक्रोप्रोसेसर आणि अॅप्लिकेशन प्रशिक्षण – I
सेमिनार -I
सेमिस्टर 7  सेमिस्टर 8
अपारंपरिक ऊर्जा स्रोत उपकरणे आणि प्रक्रिया नियंत्रण स्विच गियर आणि संरक्षण ऐच्छिक –I इलेक्ट्रिकल मशीन डिझाइन – II ऐच्छिक –II  आधुनिक नियंत्रण प्रणाली ऐच्छिक –III प्रशिक्षण – II प्रकल्प (प्रकल्प अंमलबजावणी आणि अहवाल) सेमिनार -II – प्रकल्प (प्रकल्प सूत्रीकरण) –

यामधील प्रॅक्टिकल्स

विद्यार्थ्यांना मशीन लॅब तसेच सर्किट लॅब आणि सिमुलेशन सॉफ्टवेअर यांवर काम करावे लागते.

प्रथम वर्षात काय शिकण्यास मिळते ?

इंजीनियरिंग चा पाया मजबूत करणारे विषय आणि सर्व शाखांची ओळख या प्रथम वर्षात पाहायला मिळेल.

याचे व्हिडिओ स्वरूप पहा 

शेवट वर्षात काय शिकण्यास मिळते ?

प्रत्यक्ष कामाच्या ठिकाणी लागणारे प्रगत तंत्रज्ञान तसेच मोठे प्रोजेक्ट्स कशी हाताळायचे यांबद्दल सखोल माहिती.

BTech Electrical Engineering याचे कॉलेजेस

  1. महाराष्ट्रात अनेक नामवंत सरकारी आणि खाजगी कॉलेज आहेत.
  2. सीओईपी टेक पुणे 90000 ते एक लाख वीस हजार
  3. व्ही जे टी आय मुंबई 80 हजार ते एक लाख
  4. शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय औरंगाबाद 60 ते 80 हजार
  5. खाजगी कॉलेज पुणे/मुंबई एक लाख ते अडीच लाख

सर्व कॉलेजेस चे सरासरी शुल्क

सरासरी पाहता चार वर्षाचा खर्च अंदाजे चार लाख ते दहा लाख पर्यंत येऊ शकतो आणि प्रवर्गानुसार सवलती पाहायला मिळतील.

मध्ये प्लेसमेंट साठी काय करावे ?

चांगल्या प्लेसमेंट साठी तुमचे स्किल्स सुधारा इंटर्नशिप करा आणि ॲप्टीट्यूड टेस्ट तयारी पहिल्यापासूनच ठेवा

BTech Electrical Engineering यामध्ये करिअर आणि संधी

यामध्ये गव्हर्मेंट नोकरी प्रायव्हेट नोकरी आणि पुढे उच्च शिक्षणाबद्दल थोडी माहिती लिहायची म्हणजे दोन ते तीन पॅरेग्राफ मध्ये.

यामधील सरकारी नोकऱ्या

  • महावितरण
  • रेल्वे
  • भेल
  • ओएनजीसी
  • एनटीपीसी

यामधील खाजगी नोकऱ्या

  • टाटा पावर
  • रिलायन्स एनर्जी
  • सिमेन्स
  • एल अँड टी
  • सीनिडर इलेक्ट्रिक

यामधून पुढे उच्च शिक्षण

पुढे तुम्ही एम टेक करू शकता किंवा एमबीए करू शकता मॅनेजमेंट क्षेत्रामध्ये जाऊ शकता तसेच गेट परीक्षा देऊनही परदेशात शिकायला जाऊ शकता.

यामधून पुढे स्वतःचा व्यवसाय

तुम्ही इलेक्ट्रिकल्स कन्सल्टन्सी तसेच सोलार पॅनल इंस्टॉलेशन किंवा इलेक्ट्रिकल ऑडिटिंगचा स्वतःचा व्यवसाय सुरू करू शकता.

Be Computer Science & Engineering बद्दल माहिती

BTech Electrical Engineering हा कोर्स केल्यानंतर पुढील संधी

थोडक्यात सांगायचे तर तुम्ही केवळ इलेक्ट्रिकल्स पुरते मर्यादित न राहता सॉफ्टवेअर क्षेत्रातही जाऊ शकता त्यामुळे यामध्ये तुम्हाला मुख्य नोकऱ्या तसेच गव्हर्मेंट सेक्टर प्रायव्हेट सेक्टर मध्ये पाहायला मिळतात त्याचबरोबर पगारही चांगला मिळतो.

यामध्ये मुख्य नोकरी कंपन्या

  1. हॅवेल्स
  2. बजाज इलेक्ट्रिक्स
  3. ए बी बी
  4. जी इ

यामध्ये मिळणारा सरासरी पगार

सुरुवातीला वार्षिक पगार हा तीन ते सहा लाख पर्यंत असू शकतो अनुभवानंतर हा आकडा वाढतो.

  1. साइट इंजिनिअर (इलेक्ट्रिकल) ते डिझाइन प्लॅनचा अभ्यास करून आर्किटेक्ट आणि मॅनेजमेंट टीमसोबत प्रकल्पांचे समन्वय साधतात. प्रकल्प अंमलबजावणीसाठी ते कामगार आणि मजुरांशी देखील समन्वय साधतात. INR 4 LPA
  2. नियंत्रण आणि उपकरण अभियंता त्यांची मुख्य जबाबदारी अभियांत्रिकी प्रणाली, यंत्रसामग्री आणि प्रक्रियांचे निरीक्षण आणि नियंत्रण करणे आहे. INR 4.5 LPA
  3. वरिष्ठ विद्युत व्यवस्थापक विद्युत व्यवस्थापक विविध विद्युत साधने आणि उपकरणांच्या नियोजन, डिझाइन, अंमलबजावणी आणि चाचणीची देखरेख करतात. INR 6 LPA
  4. प्राध्यापक एक प्राध्यापक त्यांच्या संबंधित अभ्यास क्षेत्रातील विद्यार्थ्यांना ज्ञान पुरवतो. ते विद्यार्थ्यांसाठी खूप कठीण संकल्पना समजावून सांगतात ज्या अन्यथा समजणे कठीण असते. INR 9 LPA
  5. यांत्रिक अभियंता एक यांत्रिक अभियंता विविध विद्युत चुंबकीय आणि यांत्रिक प्रणालींचे मूल्यमापन करतो आणि यंत्रशास्त्राचे विविध महत्त्वाचे तत्त्व लागू करतो. INR 3 LPA
  6. देखभाल अभियंता देखभाल अभियंत्याची जबाबदारी ही औद्योगिक संस्थांमधील विद्युत प्रणाली आणि उपकरणांची देखभाल करणे आहे. INR 3 LPA
  7. व्याख्याता एक व्याख्याता विद्यार्थ्यांसाठी व्याख्याने तयार करतो आणि त्यांच्या अभ्यास क्षेत्रात संशोधन कार्य देखील करतो. INR 2 LPA
  8. सल्लागार व डिझाईन अभियंता ते विद्युत प्रणाली, उत्पादने, घटक व अनुप्रयोग यांचे मूल्यमापन करून संशोधन कार्यक्रम डिझाइन आणि चालवतात. INR 6 LPA

मित्रांनो माझ्या माहितीप्रमाणे यामध्ये पगार हा 10 ते 20 लाखांमध्ये सुद्धा तुम्हाला मिळू शकतो पण हे सर्व तुमच्या मनस्थिती तुमच्या तयारी आणि तुमच्या निर्णयावर डिपेंड आहे – पृथ्वीराज चंदनशिव

BTech Electrical Engineering हा कोर्स का आणि कोणी निवडावा.

ज्यांना गणिते सोडवायला आवडतात आणि ज्यांना हे उपकरण जे असतात कशाप्रकारे चालतात कसे हे वर्क करतात हे जाणून घेण्याची उत्सुकता असेल त्यांच्यासाठी हा कोर्स उत्तम आहे.

याची मागणी

इलेक्ट्रिकल गाड्या आणि सौर ऊर्जेमुळे या क्षेत्राची मागणी कधीही कमी होणार नाही.

यामध्ये मिळणारा पगार

तांत्रिक कौशल्य चांगले असल्यास पगारही खूप चांगला मिळतो.

यामध्ये होणारे संशोधन

स्मार्ट ग्रिड आणि वायरलेस पॉवर ट्रान्समिशन मध्ये मोठे संशोधन सुरू आहे.

हे निवडणे उत्तम कारण

हे एक एव्हरग्रीन क्षेत्र आहे ज्यामध्ये खूप ऑपॉर्च्युनिटीज म्हणजेच संधी उपलब्ध आहेत त्याचबरोबर खाजगी आणि सरकारी शाखेमध्ये नोकरी सुद्धा मिळवायची संधी यामध्ये मिळू शकते.

BTech Electrical Engineering याबद्दल विचारली गेलेली प्रश्न

BTech Electrical Engineering कठीण का आहे ?

हे थोडे आव्हानात्मक आहे कारण यात गणित आणि फिजिक्स जास्त वापर होतो पण नियमित अभ्यासाने ते सोपे होते.

BTech Electrical Engineering यासाठी कोणती प्रवेश परीक्षा देणे गरजेचे आहे ?

BTech Electrical Engineering यासाठी महाराष्ट्रात एमएचटी-सीईटी ही परीक्षा महत्त्वाची आहे.

BTech Electrical Engineering आयटी क्षेत्रात नोकरी मिळू शकते का ?

नक्कीच हा अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर तुम्हाला वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये नोकरीच्या खूप संधी उपलब्ध आहेत.

मुलींसाठी BTech Electrical Engineering हे क्षेत्र सुरक्षित आणि योग्य आहे का ?

हो यामध्ये डिझाईन तसेच टेस्टिंग आणि रिसर्च विभागांमध्ये मुलींसाठी उत्तम संधी उपलब्ध आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *