Bsc Biotechnology कोर्स ची माहिती ।

Bsc Biotechnology बद्दल माहिती । Bsc Biotechnology Information In Marathi 2026 |

Bsc Biotechnology हा कोर्स काय आहे 

बीएससी बायोटेक्नॉलॉजी हा तीन वर्षांचा पदवी पूर्व अभ्यासक्रम असतो.
ज्यामध्ये पेशीय आणि जीवन प्रक्रियांचा अभ्यास करण्यासाठी तंत्रज्ञानाची वापरावर लक्ष केंद्रित करतो.
बायोटेक्नॉलॉजी एक विज्ञान व तंत्रज्ञान आहे जे आरोग्य सेवा, औषध, शेती, अन्न, औषध, निर्माण आणि पर्यावरण नियंत्रण यांना प्रोत्साहन देणारे उत्पादने तयार करण्यासाठी सजीव जीव आणि जैविक प्रक्रियांचा वापर करते.

आधुनिक वैज्ञानिक संशोधनातील जैवतंत्रज्ञान हे सर्वात महत्त्वाचे क्षेत्र आहे कारण हे क्षेत्र जीवशास्त्र आणि उत्पादनांमध्ये बदल करण्यासाठी विविध तंत्रांचा वापर करते जेणेकरून ते मानवी गरजा साठी वापरले जाऊ शकते विविध सजीवांच्या डी एन ए मध्ये देखील बदल केला जाऊ शकतो आणि त्यासाठीच्या सर्व कौशल्य हा अभ्यासक्रम पदान करतो.

Bsc Biotechnology साठी शैक्षणिक पात्रता कोणती ?

भारतामध्ये काही बायोटेक्नॉलॉजी मध्ये बीएससी हा कोर्स महाविद्यालय किंवा विद्यापीठे देतात त्यासाठी पात्रता खालील प्रमाणे.:

  • उमेदवारांनी किंवा विद्यार्थ्यांनी मान्यता प्राप्त बोर्डातून टेन प्लस टू म्हणजेच बारावी मध्ये किमान 60% टक्के गुणांसह उत्तीर्ण होणे आवश्यक आहे.
  • प्रवेश हे गुणवत्ता यादी मधील मेरिटानुसार दिले जातात.
  • काही कॉलेजेस मध्ये प्रवेश परीक्षा हे देखील घेतली जाते त्यानुसार त्यामध्ये मिळालेल्या गुणांनुसार विद्यार्थी निवडले जातात.
  • बारावी मध्ये आपले भौतिकशास्त्र रसायनशास्त्र आणि जीवशास्त्र हे विषय असणे अनिवार्य असते.
  • पीसीएम व पीसीबी हे दोन्ही मधील विद्यार्थी प्रवेश अर्ज करण्यासाठी पात्र असतात.
  • बीएससी बायोटेक्नॉलॉजी मध्ये प्रवेश हा उच्च माध्यमिक स्तरावर म्हणजेच उमेदवाराच्या बारावीच्या मिळालेल्या गुणांच्या आधारावर दिला जातो.
Bsc In Zoology बद्दल माहिती वाचा।

Bsc Biotechnology ची ऍडमिशन प्रोसेस

गुणवत्ते वर आधारित प्रवेश:

  • विद्यार्थ्यांना बारावी मध्ये फिजिक्स केमिस्ट्री बायोलॉजी किंवा गणित यामध्ये हे विषय असणे अनिवार्य असते.
  • त्यामध्ये किमान 60% गुण मिळवणे आवश्यक आहे.
  • विद्यार्थ्यांनी सतत त्यांच्या पसंतीच्या कॉलेजेसच्या आणि विद्यापीठांच्या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन दिलेल्या सूचना व अधिसूचना तपासत राहणे महत्त्वाचे आहे.
  • विद्यार्थ्यांनी दिलेल्या तारखेला प्रवेश अर्ज भरावा व आवश्यक कागदपत्रे आणि शुल्कासह अर्ज सादर करणे आवश्यक असते.
  • नियमित अपडेट साठी वेबसाईट तपासत राहणे गरजेचे आहे जर शॉर्टलिस्ट झाला असाल आणि मेरिट लिस्ट मध्ये आपण कट ऑफ
  • मार्कच्या वरच्या यादीमध्ये असाल तर आपण शॉर्टलिस्ट होतात व ऍडमिशन पुढील प्रोसिजर साठी प्रवेश शुल्क भरून अर्ज पूर्ण करणे व ऍडमिशन घेणे.

प्रवेश परीक्षा आधारित प्रवेश:

  • यामध्ये विद्यार्थ्यांना सर्वप्रथम आपल्या प्रवेश परीक्षेसाठी संकेतस्थळावर जाऊन नोंदणी करणे आवश्यक असते. त्यामध्ये विद्यार्थ्यांना त्यांचा ईमेल पत्ता मोबाईल नंबर पासवर्ड देऊन प्रवेश परीक्षेसाठी नोंदणी करून अर्ज साठी साइन अप करावी लागेल
    त्यानंतर लॉगिन आयडी तयार करून आवश्यक ती माहिती भरणे अर्ज भरने 
  • कागदपत्र अपलोड करणे
    या स्टेप मध्ये आवश्यक ती कागदपत्रे जसे की फोटो आपले स्वाक्षरी किंवा अंगठा ओळखपत्र दहावी बारावीचे प्रमाणपत्र बॅचलर पदवी इत्यादी अपलोड करावी लागते.
  • शेवटी अर्ज शुल्क भरावी लागते अर्ज शुल्काची रक्कम ही ऑनलाइन बारावी लागते त्यानंतरच आपला अर्ज complete होतो.
  • प्रवेश परीक्षा
  • दिलेला तारखेला जाऊन व्यवस्थितरित्या प्रवेश परीक्षा देणे
  • निकालाची घोषणा
  • अंतिम टप्प्यात प्रवेश अधिकारी त्यांनी दिलेल्या प्रवेश परीक्षेचे निकाल जाहीर करतात व मेरिट लिस्ट लावली जाते त्यानुसार आपले कट ऑफ द्वारे सिलेक्शन होते व सिलेक्शन झालेले असल्यास विद्यार्थ्यांना ऍडमिशन घेण्यासाठी आमंत्रित केले जाते.

बीएससी बायोटेक मध्ये ऍडमिशन घेण्यासाठी काही महाविद्यालय हे स्वतःच्या प्रवेश परीक्षा घेतात.:

  1. डी यु इ टी
  2. के सी इ ट
  3. के आय आय टी इ इ
  4. एमएच-सीईटी

इत्यादी परीक्षा महत्त्वाच्या आहेत. यामध्ये काही महाविद्यालय पूर्ण वेळ अर्धवेळ आणि दूरस्थ शिक्षण देखील देतात.

Bsc Biotechnology चा कालावधी

हा तीन वर्षाचा पूर्ण वेळ कोर्स आहे.
आणि यामध्ये सेमिस्टर पॅटर्न आहे त्यामुळे टोटल सेमिस्टर हे सहा होतात.
बीएससी बायोटेक्नॉलॉजी या अभ्यासक्रमाचे वार्षिक सरासरी शुल्क हे 50 हजार ते दोन लाख रुपये असू शकते ते कॉलेज आणि विद्यापीठ यानुसार तसेच विद्यार्थ्यांच्या प्रवर्गानुसार बदलू शकते.

Bsc Biotechnology चे विषय

बीएससी बायोटेक्नॉलॉजी अभ्यासक्रमांमध्ये तीन वर्ष असतात व सेमिस्टर पॅटर्ननुसार सहा सेमिस्टरचा हा संपूर्ण अभ्यासक्रम असतो यामध्ये थेरॉटिकल आणि प्रॅक्टिकल दोन्ही नॉलेजचा समावेश आहे आपण खालील प्रमाणे सेमिस्टर वाईज याचे विषय पाहूया.

सेमिस्टर वन
  • मॅक्रो मॉलिक्युलर स्ट्रक्चर अँड ऍनालिसिस
  • बायो फिजिक्स अँड इन्स्ट्रुमेंटेशन
  • सेल स्ट्रक्चर अँड डायनामिक्स
  • बायो मॅथेमॅटिक्स वन
  • केमिस्ट्री
सेमिस्टर टू
  • ऑरगॅनिक मेकॅनिझम इन बायोलॉजी
  • प्रिन्सिपल्स ऑफ ट्रान्समिशन जेनेटिक्स
  • प्रिन्सिपल्स ऑफ मायक्रोबायोलॉजी
  • बायो मॅथेमॅटिक्स टू
  • इंट्रोडक्शन टू सी प्रोग्रामिंग अँड डिजिटल लॉजिक
सेमिस्टर थ्री
  • मायक्रोबियल जेनेटिक्स
  • प्रिन्सिपल्स ऑफ इम्युनोलॉजी
  • प्लांट अँड ॲनिमल टिशू कल्चर टेक्निक्स अँड एप्लीकेशन
  • प्लांट बायोटेक्नॉलॉजी
  • इंट्रोडक्शन टू डेटा स्ट्रक्चर अँड कॉम्प्युटर ऑर्गनायझेशन
सेमिस्टर फोर
  • मॉलिक्युलर जेनेटिक्स
  • कॉम्पिटिशनल बायोलॉजी अँड बायो इन्फॉर्मेटिक्स
  • बायोडायव्हर्सिटी अँड टेक्सनोमी
  • ॲनिमल बायो टेक्नॉलॉजी
  • इंट्रोडक्शन टू डी बी एम एस कॉम्प्युटर नेटवर्क अँड न्यूमेरिकल एनालिसिस
सेमिस्टर फाईव्ह
  • डी एन ए टायपिंग, प्रोटीओ मिक्स अँड beyond
  • रिकॉमबिनेन्ट डीएनए टेक्नॉलॉजी
  • एन्व्हायरमेंटल बायो टेक्नॉलॉजी
  • इंडस्ट्रियल बायोटेक्नॉलॉजी
सेम सिक्स
  • मॉडेल ऑरगॅनिझमस इन ह्युमन जीनोम प्रोजेक्ट
  • एलिमेंट्स ऑफ मॅनेजमेंट इंट्रोडक्शन अँड Entrepreneurship
  • मेडिकल बायोटेक्नॉलॉजी
  • बायोटेक्नॉलॉजी – सोशल लीगल अँड इथिकल इशूज


बीएससी बायोटेक्नॉलॉजी मधील काही महत्त्वाची पुस्तके

जीन क्लोनिंग अँड डीएनए ऍनॅलिसिस
टीए ब्राऊन
Lehninger प्रिन्सिपल ऑफ बायोकेमिस्ट्री फिफ्थ एडिसन
डेव्हिड एल नेल्सन

मॉलिक्युलर बायोलॉजी ऑफ द जीन
जेडी वॉटसन

मॉलिक्युलर सेल बायोलॉजी
हार्वे लॉडिस

Bsc Biotechnology चे कॉलेजेस’

गव्हर्नमेंट आणि गव्हर्मेंट ची संलग्नित कॉलेजेस
  • इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स आयसीएम मुंबई
  • गव्हर्मट इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स जीआयएस छत्रपती संभाजी नगर:
  • डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा युनिव्हर्सिटी संलग्न
  • गोंडवाना युनिव्हर्सिटी
  • राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर युनिव्हर्सिटी
  • मौलाना आझाद कॉलेज ऑफ आर्ट सायन्स अँड कॉमर्स छत्रपती संभाजी नगर
प्रायव्हेट कॉलेजेस:
  • अमिटी amity युनिव्हर्सिटी मुंबई
  • एमआयटी वर्ल्ड पीस यूनिवर्सिटी एमआयटी डब्ल्यू पी यु पुणे
  • डी वाय पाटील युनिव्हर्सिटी पुणे
  • किशनचंद जलाराम कॉलेज मुंबई
  • फर्ग्युसन कॉलेज पुणे
  • मॉडर्न कॉलेज ऑफ आर्ट सायन्स अँड कॉमर्स गणेश खिंड पुणे
  • ठाकूर कॉलेज ऑफ सायन्स अँड कॉमर्स मुंबई
  • एस के बिर्ला कॉलेज ठाणे
  • एस आय एस कॉलेज ऑफ आर्ट सायन्स अँड कॉमर्स मुंबई.

Bsc Biotechnology मध्ये करिअर आणि संधी

बीएससी बायोटेक्नॉलॉजी नोकऱ्या आणि पगार
बीएससी बायोटेक्नॉलॉजी अभ्यासक्रमाचे पदवीधर हे वैद्यकशास्त्र संशोधन बायोईनफॉर्मेटिक्स कॉम्प्युटर संलग्न किंवा सहाय्यक संशोधन यांचा विविध क्षेत्रांमध्ये नोकऱ्या शोधू शकतात.
सार्वजनिक आणि खाजगी अशा दोन्ही क्षेत्रांमध्ये व सरकारी क्षेत्रांमध्ये ह वेगवेगळ्या प्रकारच्या नोकरीच्या संधी उपलब्ध असतात.
त्यामधील काही पर्यायही बायो फिजिस्ट बायोकेमिस्ट रिसर्च असोसिएट एपिडेमिओलॉजिस्ट लॅब टेक्निशियन हे आहेत
आपण काही व्यावसायिक नोकऱ्या आणि संबंधित पगार बघूया.:

रिसर्च सायंटिस्ट संशोधन शास्त्रज्ञ हे संशोधनाचा प्रस्ताव तयार करतात आवश्यक निधी मिळवतात प्रयोगाच नियोजन करतात अंमलबजावणी करतात तसेच रेकॉर्ड बनवतात व मेंटेन ठेवतात निकाल आणि डेटा चे विश्लेषण करतात. पगार
पाच ते सात लाख रुपये
लेक्चरर / प्रोफेसर अनुभवी व्यक्ती त्यांच्या क्षेत्रात व्याख्याते किंवा प्राध्यापक म्हणून शिक्षण क्षेत्रात प्रवेश करतात व जैवतंत्रज्ञान क्षेत्रात काम करण्यासाठी आवश्यक असणारे कौशल्य आणि ज्ञान विद्यार्थ्यांना देतात पगार
सहा ते आठ लाख रुपये
बायोटेक ऍनालिस्ट हे जैवतंत्र यांच्यातील विविध उत्पादने कल्पना आणि उपक्रमाच्या जोखीम विरुद्ध फायद्याचे विश्लेषण करतात व संभाव्य गुंतवणूकदारांना मौल्यवान तांत्रिक माहिती देखील देतात. पगाr
सहा ते आठ लाख रुपये
बायोकेमिस्ट विविध प्रोटीन आणि मॉलिक्युल्स अथवा रेणू च्या वर्तनांचा अभ्यास करणाऱ्या टेस्ट वैज्ञानिक प्रयोग आणि विश्लेषण करतात ते संशोधन करतात आणि विद्यापीठ तसेच खाजगी संस्था आणि सरकारला निष्कर्ष सांगतात. पगार
आठ ते दहा लाख रुपये
एपी डेमिओलॉजिस्ट  साथीचे रोग तज्ञ त्या रोगांचा अभ्यास व प्रयोग करण्यासाठी जबाबदार असतो त्यांचे संबंधित निष्कर्ष हे संबंधित संस्थांना कळवतात कॅन्सर व एचआयव्ही सारख्या विविध आजारांवर होणारे परिणाम आणि संभाव्य उपचारांचा अंदाज घेण्यासाठी त्यांच्या कौशल्यांचा वापर करतो पगार
पाच ते सात लाख रुपये
लॅब टेक्निशन तपशीलवार नोंदी ठेवणे पगार
तीन लाख ते पाच लाख

काही टॉप चे recruiter:

  • अमेझॉन  
  • नोव्हो नॉर्डिस्क  
  • टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस लिमिटेड
  • एक्सेंचर टेक्नॉलॉजी सोल्युशन्स
  • सिंजीन

Bsc Biotechnology हा कोर्स केल्यानंतर पुढील संधी

हा कोर्स केल्यानंतर विद्यार्थ्यांमध्ये करिअर चे विविध उपलब्ध पर्याय असतात तर त्यांना पुढील उच्च शिक्षण घेण्यासाठी देखील पर्याय निवडू शकतात ते खालील प्रमाणे दिले आहेत.
बी.एड.:

ज्यांना सार्वजनिक शाळा किंवा खाजगी शाळांमध्ये शिक्षक म्हणून करिअर करायचे आहे त्यांनी बी.एड पदवी अभ्यासक्रमात प्रवेश घेण्याचा विचार करू शकता. हा अभ्यासक्रम त्यांना वेगवेगळ्या शालेय स्तरावर अध्यापनासाठी आवश्यक असलेली आवश्यक माहिती प्रदान करू शकतो.
एमएससी biotechnology.:

जर एखाद्याला त्याच क्षेत्रात शिक्षण घ्यायचे असेल तर तो बायोटेक्नॉलॉजीमध्ये एमएससी करू शकतो . हा दोन वर्षांचा अभ्यासक्रम आहे आणि पात्रता निकषांमध्ये बायोटेक्नॉलॉजीमध्ये बीएससी पदवी असणे समाविष्ट आहे.

Bsc Biotechnology बद्दल माहिती YouTube वर पहा|

Bsc Biotechnology हा कोर्स का आणि कोणी निवडावा.

या अभ्यासक्रमात वैद्यकीय क्षेत्रात आवश्यक असलेल्या विविध पद्धती आणि तांत्रिक ज्ञानाचा समावेश असल्याने, उमेदवारासाठी अनेक करिअरच्या संधी उपलब्ध होतात
बीएससी बायोटेक्नॉलॉजी पदवीधराचा सरासरी वार्षिक पगार INR 3,00,000 ते 8,00,000 दरम्यान असतो
हा अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर उमेदवारांना बायोइन्फॉरमॅटिक्स आणि कॉम्प्युटर-बेस्ड संशोधन आणि analytics मध्ये उत्कृष्ट कामगिरी करण्यासाठी skills दिले जातात.

Bsc Biotechnology बद्दल विचारली गेलेली प्रश्न

बारावीमध्ये गणित न घेता बीएससी बायोटेक्नॉलॉजी करणे शक्य आहे का ?

हो. बीएससी बायोटेक्नॉलॉजीसाठी किमान पात्रता म्हणजे दहावी आणि बारावी उत्तीर्ण असणे आणि त्यात भौतिकशास्त्र, जीवशास्त्र आणि रसायनशास्त्र हे मुख्य विषय असणे आवश्यक आहे, एकूण किमान ५०% (एससी/एसटी उमेदवारांसाठी ४५%) आणि प्रत्येक मुख्य विषयात ६०% गुण असणे आवश्यक आहे. हा बीएससी अभ्यासक्रम असल्याने, बारावीमध्ये पीसीएम किंवा पीसीबी केलेले बीटेक विद्यार्थी प्रवेशासाठी पात्र आहेत.

हा कोर्स झाल्यानंतर मी एमटेक बायोटेक्नॉलॉजी करू शकतो का ?

होय. ज्या उमेदवारांनी बीएससी बायोटेक्नॉलॉजी पदवी किमान ५०% गुणांसह घेतली आहे ते एमटेक बायोटेक्नॉलॉजीसाठी अर्ज करण्यास पात्र आहेत.

बीएससी बायोटेक्नॉलॉजीची व्याप्ती किती आहे ?

बायोटेक्नॉलॉजीमध्ये विज्ञान पदवी ( बी.एससी .) यासारख्या क्षेत्रात विस्तृत संधी आहेऔषधनिर्माण, आरोग्यसेवा, कृषी आणि पर्यावरण विज्ञान, संशोधन सहाय्यक, गुणवत्ता नियंत्रण विश्लेषक आणि प्रयोगशाळा तंत्रज्ञ असे करिअर मार्ग प्रदान करतात.. पदवीधर बायोटेक फर्म्स, डायग्नोस्टिक लॅब आणि सरकारी संशोधन संस्थांसह विविध क्षेत्रांमध्ये काम करू शकतात. बायोइन्फॉरमॅटिक्स आणि जीन थेरपीसारख्या क्षेत्रातील प्रगतीमुळे हे क्षेत्र वाढत आहे, नवीन औषधे विकसित करण्यासाठी, अनुवांशिकरित्या सुधारित पिके तयार करण्यासाठी आणि शाश्वत पर्यावरणीय उपाय शोधण्यासाठी कुशल व्यावसायिकांची वाढती मागणी आहे.

पुणे विद्यापीठात बीएससी बायोटेक्नॉलॉजी आहे का ?

बी.एससी. (बायोटेक्नॉलॉजी) हा सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाशी संलग्न असलेल्या विज्ञान आणि तंत्रज्ञान विद्याशाखेअंतर्गत तीन वर्षांचा व्यावसायिक पदवी कार्यक्रम आहे .

बी.एससी. बायोटेक्नॉलॉजीचा पगार किती आहे ?

भारतात बीएससी बायोटेक्नॉलॉजीचा सरासरी पगार दरवर्षी ५ ते १० लाख रुपयांच्या दरम्यान असतो परदेशामध्ये बायोटेक्नॉलॉजीमध्ये ५ करिअर कोणते आहेत? प्रचंड मागणी असलेले बायोटेक्नॉलॉजी करिअर: बायोमेडिकल इंजिनिअर. सरासरी वेतन: $१००,७३०. बायोकेमिस्ट. सरासरी वेतन: $१०७,४६० वैद्यकीय शास्त्रज्ञ. सरासरी वेतन: $१००,८९० जैविक/क्लिनिकल तंत्रज्ञ. सरासरी वेतन: $६०,७८० सूक्ष्मजीवशास्त्रज्ञ. सरासरी वेतन: $८५,४७०

One response to “Bsc Biotechnology कोर्स ची माहिती ।”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *