BTech Cyber Security : करिअर, संधी आणि संपूर्ण मार्गदर्शक

BTech Cyber Security : करिअर, संधी आणि संपूर्ण मार्गदर्शक

आजच्या डिजिटल युगात ‘डेटा’ हेच सोनं आहे आणि हे सोनं चोरणारेही जगात कमी नाहीत. म्हणूनच, ‘सायबर सिक्युरिटी’ हे क्षेत्र सध्या तरुणाईमध्ये खूप चर्चेत आहे. पण, केवळ ग्लॅमर बघून या क्षेत्रात उडी मारण्यापूर्वी या कोर्सची नेमकी ए-बी-सी-डी काय आहे, हे समजून घेणं गरजेचं आहे. महाराष्ट्रातील विशेषतः मध्यमवर्गीय विद्यार्थ्यांच्या दृष्टीने हा लेख महत्त्वाचा आहे.

BTech Cyber Security हा कोर्स काय आहे ?

B.Tech सायबर सिक्युरिटी हा चार वर्षांचा इंजिनिअरिंग पदवी अभ्यासक्रम आहे. सोप्या भाषेत सांगायचं तर, इंटरनेट आणि कॉम्प्युटरच्या जगात ‘डिजिटल बॉडीगार्ड’ तयार करण्याचा हा कारखाना आहे. यात तुम्हाला हॅकिंगपासून बचाव कसा करायचा, डेटा सुरक्षित कसा ठेवायचा आणि सायबर गुन्ह्यांचा तपास कसा करायचा हे शिकवलं जातं.

या कोर्स चा पूर्ण कालावधी हा चार वर्षाचा असून यामध्ये तुम्हाला आठ सेमिस्टर पाहायला भेटतील तसेच याचे पूर्ण मेनली फोकस असते सायबर हल्ल्यापासून बँका तसेच सरकारी संस्था आणि खाजगी कंपन्यांचा डेटा सुरक्षित ठेवणे व त्याचे तज्ञ निर्माण करणे.

यामध्ये मुख्य विषय जर पाहिले तर यामध्ये नेटवर्किंग क्रिप्टोग्राफी म्हणजेच डेटा कोडी तसेच इतीकल हॅकिंग आणि डिजिटल फॉरेनची यांसारख्या खूप साऱ्या विषयांचा समावेश असतो याची अध्ययन पद्धती पाहिली तर हा फक्त थेरीचा विषय नाही यात 60 ते 70 टक्के वेळ तुम्हाला लॅब मध्ये प्रॅक्टिकल करावे लागते आणि खूप काही गोष्टी स्वतःहून अद्यावत करावा लागतात.

मित्रांनो माझ्या माहितीप्रमाणे आणि माझ्या अनुभवानुसार हा कोर्स अतिशय महत्त्वाचा आहे कारण सध्याच्या जगामध्ये कॉम्प्युटरचा वापर आणि इंटरनेटचा वापर हा खूप जास्त आहे सर्व कामे ऑनलाईन पद्धतीने होत आहेत त्यामुळे जे सायबर सिक्युरिटी एक्सपर्ट असतात त्यांची खूप सध्या गरज भासत आहे आणि गरज आहे सुद्धा.

BTech Cyber Security यासाठी शैक्षणिक पात्रता कोणती?

अनेकांना वाटतं की कॉम्प्युटर चालवता आला की झालं, पण तसं नाहीये. यासाठी काही तांत्रिक अटी आहेत.

  1. याची पात्रता: विद्यार्थी १२ वी विज्ञान (Science) शाखेतून उत्तीर्ण असावा.
  2. किमान गुण: १२ वी मध्ये फिजिक्स, केमिस्ट्री आणि मॅथ्स (PCM) विषयात किमान ४५% ते ५०% गुण असणे आवश्यक आहे (प्रवर्गानुसार यात सवलत असू शकते).
  3. वयोमर्यादा: साधारणपणे १७ ते २३ वर्षे वयोगटातील विद्यार्थी यासाठी अर्ज करू शकतात.
  4. याचा प्रवाह: १२ वी नंतर थेट ४ वर्षे किंवा डिप्लोमा (DTE) नंतर थेट द्वितीय वर्षात प्रवेश घेता येतो.

याची ऍडमिशन प्रोसेस (प्रवेश प्रक्रिया)

महाराष्ट्रात इंजिनिअरिंग ऍडमिशन हे प्रामुख्याने ‘कॅप राउंड’ (CAP Rounds) द्वारे चालतात.

  • पात्रता चेक करा: आधी तुमचे १२ वीचे गुण आणि प्रवेश परीक्षेचा निकाल तपासा.
  • कॉलेज निवडा: तुमच्या गुणांनुसार महाराष्ट्रातील सायबर सिक्युरिटी स्पेशलायझेशन देणारी कॉलेजेस निवडा.
  • प्रवेश परीक्षा: महाराष्ट्रात MHT-CET किंवा राष्ट्रीय स्तरावर JEE Main ही परीक्षा देणे बंधनकारक आहे.
  • अर्ज करा: महा-CET सेलच्या वेबसाईटवर रजिस्ट्रेशन करून अर्ज भरावा लागतो.
  • डॉक्युमेंट वेरिफिकेशन: तुमची जात वैधता, नॉन-क्रिमिलेअर आणि शैक्षणिक कागदपत्रे सुसज्ज ठेवा.

BTech Cyber Security चा कोर्सचा पाया कसा रचला जातो ?

हा कोर्स चार वर्षांचा असतो. पहिल्या दोन वर्षात तुम्हाला बेसिक कॉम्प्युटर सायन्स शिकवलं जातं आणि तिसऱ्या वर्षापासून खऱ्या अर्थाने ‘सायबर सिक्युरिटी’ सुरू होते.

याची रचना: ८ सेमिस्टरमध्ये विभागलेला अभ्यासक्रम. दर सहा महिन्यांनी परीक्षा आणि प्रोजेक्ट्स.

यामध्ये तुम्हाला आठ सेमिस्टर पाहायला भेटतात व आठ सेमिस्टर नुसार अभ्यासक्रम विभागला गेलेला आहे दर सहा महिन्यांमध्ये एक सेमिस्टर पूर्ण केले जाते आणि दर सहा महिन्यांना परीक्षा आणि प्रोजेक्ट घेतले जातात यामध्ये तुम्ही पहिल्या वर्षी मॅच आणि बेसिक इंजिनिअरिंग तसेच शेवटच्या वर्षांमध्ये तुम्हाला प्रगत हॅकिंग टूल्स आणि क्लाऊड सेक्युरिटी बाबत शिकवले जाते याचा अभ्यासक्रम खाली मेन्शन केलेला आहे.

  1. प्रथम वर्ष – Physics, Calculus, Basic Coding या विषयांद्वारे तुमचा पाया मजबूत केला जातो.
  2. द्वितीय वर्ष – Data Structures, OS, Networking याद्वारे तुम्ही कॉम्प्युटरच्या सिस्टीम बद्दल सविस्तर शिक्षण घेता
  3. तृतीय वर्ष – Cryptography, Ethical Hacking याद्वारे तुम्ही सुरक्षा तंत्रज्ञान शिकता.
  4. अंतिम वर्ष – Digital Forensics, Cloud Security अंतिम वर्षामध्ये तुम्ही स्पेशलायझेशन आणि प्रोजेक्ट बद्दल शिक्षण घेतात.
  5. प्रॅक्टिकल्स: यात लिनक्स (Linux) कमांड्स आणि पॅकेट ट्रेसरसारखी टूल्स वापरण्यावर जास्त भर असतो.

प्रथम वर्ष: इथे तुम्ही इंजिनिअरिंगचे बेसिक विषय शिकता.
शेवटचे वर्ष: इथे तुम्हाला इंडस्ट्रियल ट्रेनिंग आणि मोठे प्रोजेक्ट्स करावे लागतात.

महाराष्ट्रातील कॉलेजेस आणि फी
महाराष्ट्रात पुणे, मुंबई आणि नागपूर ही शिक्षणाची मुख्य केंद्रे आहेत.

सरकारी कॉलेज ₹६०,००० – ₹९०,०००उत्तम
खासगी युनिव्हर्सिटी ₹१.५ लाख – ₹४ लाख  मध्यम ते उत्तम

सरासरी शुल्क: ४ वर्षांचा खर्च ७ लाख ते १५ लाखांच्या दरम्यान जाऊ शकतो.

प्लेसमेंटसाठी टीप: केवळ कॉलेजच्या भरवशावर राहू नका. स्वतःहून Bug Bounty किंवा इंटरर्नशिप करा.

करिअर आणि संधी

  1. हा कोर्स सर्वांसाठी योग्य नाही कारण यात सतत अपडेट राहावे लागते. ज्यांना बसून राहून काम आवडते त्यांच्यासाठी हे क्षेत्र आव्हानात्मक आहे.
  2. सरकारी नोकऱ्या: बँका, पोलीस खात्यात सायबर सेल, आणि लष्करामध्ये ‘सायबर एक्सपर्ट’ म्हणून संधी असते.
  3. खाजगी नोकऱ्या: TCS, Infosys सारख्या आयटी कंपन्या किंवा सायबर सिक्युरिटी स्पेशलिस्ट फर्म्समध्ये नोकरी मिळते.
  4. उच्च शिक्षण: तुम्ही पुढे M.Tech किंवा MS करू शकता.
  5. स्वतःचा व्यवसाय: सायबर ऑडिटिंगची स्वतःची कन्सल्टन्सी सुरू करता येते.
  6. सायबर सिक्युरिटीमधील विविध नोकऱ्या, त्यामध्ये करायचे काम आणि मिळणारा पगार याची सविस्तर माहिती खालीलप्रमाणे आहे.

सायबर सिक्युरिटी अॅनॅलिस्ट (Cyber Security Analyst)

काम: या नोकरीत तुम्हाला एखाद्या पहारेकऱ्याप्रमाणे काम करावे लागते. कंपनीच्या नेटवर्कवर सतत लक्ष ठेवणे, कोणी अनधिकृत व्यक्ती आत शिरण्याचा प्रयत्न तर करत नाहीये ना हे तपासणे आणि रोजच्या रोज सुरक्षेचे रिपोर्ट तयार करणे हे तुमचे मुख्य काम असते.

पगार: सुरुवातीला (फ्रेशर म्हणून) तुम्हाला वार्षिक ४ ते ६ लाख रुपयांपर्यंत पगार मिळतो. ३-४ वर्षांच्या अनुभवानंतर हा आकडा १० ते १२ लाखांच्या पुढे जाऊ शकतो.

एथिकल हॅकर (Ethical Hacker / Penetration Tester)

काम: हे काम खूप आव्हानात्मक आणि मनोरंजक असते. कंपनी स्वतःहून तुम्हाला त्यांच्या सिस्टमवर ‘अटॅक’ करायला सांगते. तुमचे काम हे शोधणे असते की, चोर किंवा हॅकर कोणत्या मार्गाने आत येऊ शकतो. तुम्ही त्या त्रुटी (Vulnerabilities) शोधून त्या बंद करण्याबद्दल सल्ला देता.

पगार: या पदासाठी सुरुवातीला ५ ते ८ लाख रुपये पगार मिळू शकतो. जर तुम्ही ‘बग बाउंटी’ (Bug Bounty) सारख्या गोष्टींमध्ये तज्ज्ञ असाल, तर पगार आणि मानधन खूप जास्त असते.

Video

इन्सिडेंट रिस्पॉन्डर (Incident Responder)

काम: जेव्हा एखाद्या कंपनीवर सायबर हल्ला होतो किंवा डेटा चोरीला जातो, तेव्हा सर्वात आधी ‘इन्सिडेंट रिस्पॉन्डर’ला बोलावले जाते. जसे फायर ब्रिगेड आग विझवते, तसेच हे लोक सायबर हल्ला थांबवतात, झालेले नुकसान कमी करतात आणि सिस्टम पुन्हा चालू करतात.

पगार: हे जबाबदारीचे काम असल्याने सुरुवातीचा पगार ५ ते ९ लाख रुपयांच्या दरम्यान असतो. अनुभवानुसार यात मोठी पगारवाढ मिळते.

सिक्युरिटी आर्किटेक्ट (Security Architect)

काम: या पदावर काम करण्यासाठी किमान ५-७ वर्षांचा अनुभव लागतो. तुमचे काम कंपनीची संपूर्ण सुरक्षा व्यवस्था कशी असावी, याचा नकाशा तयार करणे असते. कोणते सॉफ्टवेअर वापरायचे आणि कोणते नियम लावायचे, हे तुम्ही ठरवता.

पगार: हे वरिष्ठ पद असल्याने पगारही भरघोस असतो. अनुभवी व्यक्तीला वर्षाला १५ ते ३० लाख रुपयांपर्यंत पगार सहज मिळतो.

BTech Chemical Engineering करिअरची निवड करण्यापूर्वी हे वाचाच !

डिजिटल फॉरेन्सिक तज्ज्ञ (Digital Forensics Examiner)

काम: एखादा सायबर गुन्हा घडल्यानंतर (उदा. बँक फ्रॉड किंवा डेटा चोरी), त्याचा तपास करणे हे तुमचे काम असते. संगणक, मोबाईल किंवा सर्व्हरमधून डिलीट केलेला डेटा शोधणे आणि न्यायालयात पुरावा म्हणून सादर करणे यात तुमची महत्त्वाची भूमिका असते.

पगार: सरकारी तपास यंत्रणा किंवा मोठ्या खासगी कंपन्यांमध्ये यांना ४ ते ८ लाख रुपयांपासून सुरुवात मिळते.

क्लाउड सिक्युरिटी इंजिनिअर (Cloud Security Engineer)

काम: सध्या बहुतेक कंपन्या आपला डेटा ‘क्लाउड’वर (उदा. AWS, Google Cloud) साठवत आहेत. हा क्लाउडवरचा डेटा सुरक्षित ठेवण्याचे काम या इंजिनिअरचे असते. सध्या या नोकरीला मार्केटमध्ये सर्वात जास्त मागणी आहे.

पगार: या क्षेत्रात पगाराचे आकडे खूप चांगले आहेत. फ्रेशरलाही ६ ते १० लाख रुपयांपर्यंत पगार मिळू शकतो आणि अनुभवानुसार तो ५० लाखांच्या वरही जाऊ शकतो.

एक खास गोष्ट लक्षात ठेवा: वरील सर्व पगार हे सरासरी आहेत. जर तुम्ही पुणे किंवा मुंबईसारख्या शहरात मोठ्या ‘मल्टीनॅशनल’ कंपनीत (MNC) काम करत असाल आणि तुमच्याकडे आंतरराष्ट्रीय सर्टिफिकेट्स असतील, तर हे आकडे यापेक्षाही जास्त असू शकतात. अनेक विद्यार्थी इथे चूक करतात, ते फक्त पदवी घेतात; पण या नोकऱ्या मिळवण्यासाठी तुम्हाला प्रॅक्टिकल ज्ञान असणे अत्यंत गरजेचे आहे.

विद्यार्थ्यांचा अनुभव कसा पुढे कसा असेल ?

अनेक विद्यार्थी इथे चूक करतात – त्यांना वाटतं डिग्री मिळताच ५० लाखांचं पॅकेज मिळेल. सुरुवातीला पगार मध्यम असतो, पण अनुभवाने तो वेगाने वाढतो.

  • मुख्य कंपन्या: Microsoft, Google, Quick Heal, KPMG, Deloitte.
  • सरासरी पगार: फ्रेशरसाठी वर्षाला ₹३.५ लाख ते ₹७ लाख. ५ वर्षांच्या अनुभवानंतर ₹१५-२० लाखांपर्यंत जाऊ शकतो.

फक्त या विद्यार्थ्यांनी हा कोर्स निवडावा

तुमची तार्किक शक्ती (Logic) चांगली असेल आणि तुम्हाला कोड्समधील गुपिते शोधायला आवडत असतील, तरच हा कोर्स निवडा.
जग ऑनलाइन जात आहे त्यामुळे ही मागणी कधीच संपणार नाही तसेच यात नवनवीन मालवेअर म्हणजेच वायरस व रिसर्च करण्याची संधी मिळते आणि हे क्षेत्र आवाहनात्मक आहे आणि यात बोरीयत कमी असते.

या कोर्स बाबत महत्त्वाच्या गोष्टी लक्षात ठेवा.

या कोर्ससाठी डेटा इनस्क्रिप्शन आणि अलगोरिदम समजून घेण्यासाठी गणिताचा पाया मजबूत असणे आवश्यक आहे तसेच इंजीनियरिंग बीटेक साठी बारावी सायन्स आनिवारी आहे तुम्ही त्याआधी सर्टिफिकेट कोर्सही करू शकता पण पदवी नाही पदवीसाठी तुम्हाला हा कोर्सच करावा लागेल.

तसेच सेंट्रल ब्युरो ऑफ इंटेलिजन्स आणि राज्य पोलिसांच्या सायबर सेलमध्ये सल्लागार म्हणून तुम्हाला नोकरी लागू शकते ही एक चांगली संधी हा कोर्स जो आहे तो देतो.

यामध्ये पगार गॅरंटीड नाहीये हा पगार तुमच्या कौशल्यावर अवलंबून आहे फक्त पदवी घेऊ नोकरी मिळेल असे नाही तुम्हाला तुमचे स्किल सुद्धा सिद्ध करावे लागेल त्यानुसार तुमचा पगारही ठरवला जातो किंवा गव्हर्मेंट नोकरीमध्ये लागल्यानंतर तुमचा पगारही निश्चित असतो.

टीप: वरील माहिती महाराष्ट्रातील सध्याच्या शैक्षणिक परिस्थितीनुसार आहे. तसेच माझ्या पर्सनल एक्स्पिरियन्स नुसार देण्यात आलेली आहे. अधिक माहितीसाठी ‘DTE Maharashtra’ च्या वेबसाईटला नक्की भेट द्या.

 

One response to “BTech Cyber Security : करिअर, संधी आणि संपूर्ण मार्गदर्शक”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *