BE Civil Engineering हा कोर्स काय आहे ?
हा कोर्स इंजिनिअरिंग अभ्यासक्रमांतर्गत येणारा चार वर्षाचा डिग्रीस्तरावरील कोर्स आहे ज्यामध्ये रस्ते बांधकाम धरण इमारत अशा प्रकारच्या वेगवेगळ्या आर्किटेक्चर कसे बनवले जाते त्यांना कसे मेंटेन केले जाते याबद्दल सविस्तर अभ्यासक्रम या मध्ये पाहायला मिळतो.
यामध्ये काही विशिष्ट अभ्यासक्रमावर लक्ष केंद्रित असते ज्यामध्ये इंजीनियरिंग फिजिक्स स्ट्रक्चरल डिझाईन फाउंडेशन इंजीनियरिंग फ्लूड मेकॅनिक्स एनवोर्मेंटल इंजीनियरिंग ट्रान्सपोर्टेशन आणि काँक्रीट टेक्नॉलॉजी अशा वेगवेगळ्या अभ्यासक्रमावर हा अभ्यासक्रम बनलेला आहे. ज्यामध्ये विद्यार्थ्यांना प्रॅक्टिकल्स जसे बांधकाम करणे त्याचे मेंटेनन्स पाहणे वेगवेगळे टूल्स वापरून अधिक उन्नत पद्धत विकसित करणे यांबद्दल विशेष माहिती शिकवली जाते.
याचा कालावधी
या कोर्स कालावधी चार वर्षाचा असून यामध्ये आठ सेमिस्टर पाहायला मिळतात.
याचा हेतू
आजच्या दुनिया मध्ये आवश्यक असणाऱ्या पायाभूत सुविधा जसे की रस्ते रेल्वे विमानतळ आणि पाणीपुरवठा तसेच सुरक्षित यंत्रणा आणि यांचा पद्धतीने कार्यक्षम विकसित करणे हा या कोर्सचा मेन हेतू आहे.
याचे मुख्य विषय
यात प्रामुख्याने स्ट्रक्चरल इंजिनिअरिंग तसेच जिओ टेक्निकल इंजिनिअरिंग आणि ट्रान्सपोर्टेशन आणि वॉटर रिसोर्सेस इंजीनियरिंग यांसारख्या वेगवेगळ्या विषयांचा समावेश होतो जे सर्व विषय सिविल इंजिनिअरिंगशी निगडित आहेत.
याची अध्ययन पद्धती
यामध्ये क्लासरूम शिक्षणासोबत ऑन साईट अनुभव म्हणजेच प्रॅक्टिकल तसेच सर्वेक्षण आणि लायब्ररी टेस्टिंगला खूप महत्त्व दिले जाते.
BE Civil Engineering यासाठी शैक्षणिक पात्रता कोणती ?
यासाठी विद्यार्थ्यांना बारावी पास असणे गरजेचे आहे आणि बारावी मध्ये विद्यार्थी 50 ते 60% गुण घेऊन पास असणे गरजेचे आहे आणि यामध्ये बारावी पास असताना विद्यार्थ्याने फिजिक्स केमिस्ट्री आणि मॅथेमॅटिक्स मध्ये बारावी पास केलेली असावी. ज्या विद्यार्थ्यांनी यासाठी पहिलेच डिप्लोमा केलेला आहे त्यांना डायरेक्ट या अभ्यासक्रमाच्या दुसऱ्या वर्षांमध्ये प्रवेश मिळतो.
याची पात्रता
विद्यार्थी बारावी पास असणे गरजेचे आहे.
किमान गुण
विद्यार्थ्याने कमीत कमी 45% गुण घेणे गरजेचे आहे आणि तो बारावी पास फिजिक्स केमिस्ट्री आणि मॅथेमॅटिक्स विषयांमध्ये असावा.
वयोमर्यादा
प्रवेशासाठी कोणतीही उच्च वयोमर्यादा यामध्ये पाहायला मिळत नाही मात्र किमान वय 16 वर्षे पूर्ण असायला पाहिजे.
याचा प्रवाह
अकरावी आणि बारावी मध्ये मॅथ हा विषय असणे अनिवार्य आहे कारण सिव्हिल इंजिनिअरिंग मध्ये आकडेमोड पद्धत महत्त्वाची आहे.
BE Civil Engineering याची ऍडमिशन प्रोसेस
याची ऍडमिशन प्रोसेस खूप सोपी आहे ज्यामध्ये विद्यार्थ्यांना बारावी पास असणे गरजेचे आहे आणि वरील शैक्षणिक पात्रता पूर्ण करणे गरजेचे आहे. ज्या विद्यार्थ्यांनी ही शैक्षणिक पात्रता पूर्ण केलेली आहे अशा विद्यार्थ्यांना महाराष्ट्र तसेच महाराष्ट्राच्या बाहेर खूप विद्यापीठे आहेत तसेच कॉलेज आहेत जिथे हा कोर्स शिकवला जातो अशा विद्यापीठांना आणि कॉलेजेस ना भेट देऊन विद्यार्थी ऍडमिशन घेऊ शकतो.
तसेच विद्यार्थी यांच्या संकेतस्थळांचा वापर करून सुद्धा ऍडमिशन मिळू शकतो पण त्यासाठी विद्यार्थ्यांना जेव्हा केव्हा याचे ऍडमिशन सुरू होतात तर त्यासाठी सतर्क राहणे गरजेचे आहे.
यासाठी काही कॉलेजेस जेईई मेन्स तसेच जे ऍडव्हान्स या परीक्षांचे गुणही पाहतात महाराष्ट्रामध्ये काही कॉलेजेस एम एच सी इ टी या परीक्षेचेही गुण पाहतात. पण खूप कॉलेजेस असे आहे जिथे तुम्हाला बारावीच्या मार्कच्या आधारेच प्रवेश मिळून जातो.
पात्रता चेक करा
तुमचे बारावीचे मार्क आणि प्रवेश परीक्षेचा स्कोर पहिले तपासा
प्रवेश परीक्षा
महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांसाठी सीईटी आणि राष्ट्रीय स्तरावर जेईई-मेन ही परीक्षा देणे आवश्यक आहे.
अर्ज करा
जेही कॉलेज हा कोर्स देत आहेत त्या कॉलेजच्या वेबसाईट वरती जाऊन तुम्ही अर्ज करू शकता.
कॉलेज निवडा
आमचे व्हिडिओ तसेच आर्टिकल पाहून तुम्ही योग्य कॉलेज निवडू शकता आणि त्याचा ऑप्शन फॉर्म भरू शकता.
डॉक्युमेंट वेरिफिकेशन
निवडलेल्या स्कॅनिंग सेंटर किंवा कॉलेजवर जाऊन मूळ कागदपत्राची पडताळणी करा.
मित्रांनो माझ्या माहितीप्रमाणे वेगवेगळी कॉलेजेस महाराष्ट्रामध्ये हा कोर्स ऑफर करतात याची माहिती तुम्हाला खाली सविस्तर वाचायला मिळेल – पृथ्वीराज चंदनशिव
BE Civil Engineering याचा कालावधी
या कोर्सचा कालावधी तुम्हाला चार वर्षाचा पाहायला मिळतो आणि या चार वर्षांमध्ये तुम्हाला आठ सेमिस्टर पाहायला मिळतात. या आठ सेमिस्टर चा अभ्यास पूर्ण चार वर्षांमध्ये घेतला जातो ज्यामध्ये कॉलेजतर्फे होणाऱ्या परीक्षा , तसेच प्रॅक्टिकल्स , वायवा , या गोष्टींचा यामध्ये समावेश असतो ज्यावेळेस तुम्ही हे चार वर्षे पूर्ण कराल तुम्हाला डिग्रीचे सर्टिफिकेट मिळून जाते जे तुम्ही पुढे कुठेही नोकरी मिळवण्यासाठी तसेच उच्च शिक्षणासाठी वापर करू शकता.
याची रचना
प्रथम वर्षामध्ये तुम्हाला बेसिक इंजीनियरिंग शिकवली जाते तसेच तुम्हाला द्वितीय वर्षामध्ये सिव्हिलचे मूलभूत विशेष शिकवले जातात तसेच तुम्हाला तृतीय वर्षांमध्ये प्रगत विषय आणि सॉफ्टवेअर ट्रेनिंग बद्दल माहिती शिकवली जाते आणि अंतिम वर्षात स्पेसिलायझेशन विषय आणि मेजर प्रोजेक्ट्स दिले जातात.
यात तुम्ही काय शिकता
तुम्ही जमिनीचे सर्वेक्षण, करणे तसेच इमारतीचे नकाशे, तयार करणे सिमेंट काँक्रीटची कॉलिटी तपासणे. आणि पाण्याचे नियोजन कसे करावे या सर्व गोष्टी शिकतात.
BE Civil Engineering याचे विषय आणि अभ्यासक्रम
| सेमिस्टर I | सेमिस्टर II |
| अभियांत्रिकी गणित-I अभियांत्रिकी गणित-I अभियांत्रिकी भौतिकशास्त्र अभियांत्रिकी भौतिकशास्त्र/ अभियांत्रिकी रसायनशास्त्र अभियांत्रिकी रसायनशास्त्र मूलभूत विद्युत अभियांत्रिकी / मूलभूत इलेक्ट्रॉनिक्स अभियांत्रिकी यांत्रिक अभियांत्रिकीमधील प्रणाली | प्रोग्रामिंग आणि समस्या सोडवणे / अभियांत्रिकी यांत्रिकी मूलभूत विद्युत अभियांत्रिकी / मूलभूत इलेक्ट्रॉनिक्स अभियांत्रिकी अभियांत्रिकी ग्राफिक्स (अभियांत्रिकी रेखाचित्र) प्रोग्रामिंग आणि समस्या सोडवणे / अभियांत्रिकी यांत्रिकी प्रकल्प-आधारित शिक्षण कार्यशाळा शारीरिक शिक्षण-व्यायाम आणि फील्ड क्रियाकलाप |
| सेमिस्टर III | सत्र IV |
| इमारत तंत्रज्ञान आणि वास्तुशिल्प नियोजन भू-तंत्रज्ञान अभियांत्रिकी संरचना सर्वेक्षणाचे यांत्रिकी द्रव यांत्रिकी काँक्रीट तंत्रज्ञान अभियांत्रिकी गणित III संरचनात्मक विश्लेषण अभियांत्रिकी | भूविज्ञान प्रकल्प व्यवस्थापन सिव्हिल अभियांत्रिकी पद्धती / रस्ता सुरक्षा व्यवस्थापन / परदेशी भाषा प्रकल्प-आधारित शिक्षणाची जाणीव |
| सेमिस्टर V | सत्र VI |
| जलविज्ञान आणि जल संसाधन अभियांत्रिकी प्रगत सर्वेक्षण पायाभूत सुविधा अभियांत्रिकी आणि बांधकाम तंत्रे प्रकल्प व्यवस्थापन आणि अभियांत्रिकी | अर्थशास्त्र स्ट्रक्चरल डिझाइन-I फाउंडेशन इंजिनिअरिंग स्ट्रक्चरल विश्लेषण-II स्ट्रक्चरल डिझाइन-II द्रव यांत्रिकी – II पर्यावरण अभियांत्रिकी-I |
| सेमिस्टर VII | सेमिस्टर VIII |
| पर्यावरण अभियांत्रिकी II धरणे आणि जलविद्युत संरचना वाहतूक अभियांत्रिकी प्रमाण सर्वेक्षण, करार आणि निविदा | स्ट्रक्चरल डिझाइन आणि ड्रॉइंग III ऐच्छिक – III ऐच्छिक-I ऐच्छिक -IV |
प्रॅक्टिकल्स
यामध्ये सर्वे कॅश आणि मातेची तपासणी यांसारखी महत्त्वाची प्रॅक्टिकल्स असतात.
प्रथम वर्ष
या वर्षांमध्ये इंजीनियरिंगचा पाया रचला जातो
शेवटचे वर्ष
येथे तुम्हाला प्रत्यक्ष साइटवर जाऊन किंवा प्रोजेक्टच्या माध्यमातून काम करावे लागते.
BE Civil Engineering याचे कॉलेजेस
| कॉलेज | फीस |
| सरकार/सरकारी अनुदानित: आयआयटी मुंबई: (टॉप टियर) व्हीजेटीआय, मुंबई: (सरकारी अनुदानित) ~ | ₹१.३ लाख (एकूण, एका स्रोतानुसार) ; |
| सीओईपी टेक्नॉलॉजिकल युनिव्हर्सिटी, पुणे: ~ | ₹१.३ लाख – ₹३.५ लाख (एकूण)वालचंद कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, सांगली: ~ |
| सरकारी पॉलिटेक्निक, पुणे: | कमी फी ₹१.३ लाख |
| जीसीई कराड/अमरावती/नागपूर: (सरकारी) खूप कमी फी | (~₹९ लाख-₹२३ लाख) |
| खाजगी/स्वायत्त: पिंपरी चिंचवड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग (पीसीसीओई), पुणे: ~ | ₹४.२ लाख – ₹४.८ लाख (एकूण) |
| विश्वकर्मा इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (व्हीआयटी), पुणे: ~ | ₹६.५ लाख (एकूण) |
| डी.वाय. पाटील कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, आकुर्डी: ~ | ₹३.१९L – ₹४.७L (एकूण) |
| एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटी (एमआयटी डब्ल्यूपीयू), पुणे: उच्च श्रेणी | ₹१.३ लाख – ₹३.५ लाख (एकूण)वालचंद कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, सांगली: ~ |
| अॅमिटी युनिव्हर्सिटी, मुंबई: (खाजगी) जी. एच. रायसोनी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, नागपूर: | ₹३.१९L – ₹४.७L (एकूण) |
सरासरी शुल्क
सरकारी कॉलेजमध्ये फिका मी असते तर खाजगी कॉलेजमध्ये ती सोयी सुविधा नुसार जास्त असू शकते.
प्लेसमेंट
शेवटच्या वर्षामध्ये कॅम्पस प्लेसमेंट साठी तांत्रिक ज्ञानासोबत सॉफ्टवेअरच्या स्किल्स असणे आवश्यक आहे त्यावर तुम्हाला प्लेसमेंट मिळू शकते.
BE Civil Engineering यामध्ये करिअर आणि संधी
- हा कोर्स केल्यानंतर विद्यार्थ्यांना पुढील संधी खूप आहेत जसं कन्स्ट्रक्शन म्हणजेच बांधकाम विभाग अर्बन डेव्हलपमेंट गव्हर्मेंट नोकरी ज्यामध्ये पीडब्ल्यूडी आहे तसेच चे इन्फ्रास्ट्रक्चर प्रोजेक्ट असतात येथे नोकरी मिळू शकते.
- यामध्ये जॉब्स जसे की डिझाईन इंजिनियर कन्सल्टंट प्रोजेक्ट मॅनेजर साईट इंजिनियर अशा वेगवेगळ्या जॉब्स विद्यार्थ्यांना मिळू शकतात
- तसेच विद्यार्थी पुढे उच्च शिक्षणासाठी जाऊ शकतात ज्यामध्ये विद्यार्थी एम इ एम टेक करू शकतात.
सरकारी नोकऱ्या
- सार्वजनिक बांधकाम विभाग तसेच जलसंपदा विभाग किंवा महापालिका रेल्वे आणि मेट्रोमध्ये मोठ्या प्रमाणात सरकारी जागा निघतात या जागेसाठी तुम्ही परीक्षा देऊ शकता.
खाजगी नोकऱ्या
- टाटा प्रोजेक्ट शहापूर जि पलोंजी यांसारख्या मोठ्या खाजगी कंपन्यांमध्ये साईट इंजिनियर किंवा डिझायनर इंजिनियर म्हणून तुम्ही काम करू शकता.
उच्च शिक्षण
- तुम्ही हे शिक्षण पूर्ण झाल्यानंतर पुढे एम इ तसेच एम टेक करून स्ट्रक्चरल किंवा ट्रान्सपोर्टेशन इंजिनिअरिंग मध्ये स्पेसिलायझेशन निवडू शकता किंवा कन्स्ट्रक्शन मॅनेजमेंट करू शकता.
स्वतःचा व्यवसाय
- अनुभवानंतर तुम्ही स्वतःची कन्स्ट्रक्शन कंपनी किंवा कन्सल्टन्सी किंवा गव्हर्मेंट कॉन्ट्रॅक्टर म्हणून काम करू शकता.
मित्रांनो तुम्ही माझं ओपिनियन घ्याल तर तुमच्या माहितीसाठी हे सांगू इच्छितो की हे सर्व तुमच्या डेडिकेशन तुमच्या अभ्यासावर आणि तुमच्या मनाच्या तयारीवर डिपेंड आहे – पृथ्वीराज चंदनशिव
BE Civil Engineering हा कोर्स केल्यानंतर पुढील संधी
| नौकरी | पगार |
| सिव्हिल साईट इंजिनिअर: साइटवरील बांधकाम, टीम्सचे व्यवस्थापन, गुणवत्ता आणि वेळापत्रकांचे निरीक्षण करतो. | पगार आठ लाख वार्षिक |
| स्ट्रक्चरल इंजिनिअर: इमारती आणि पायाभूत सुविधांचा सांगाडा डिझाइन करतो, भार सहन करण्याच्या क्षमतेवर लक्ष केंद्रित करतो. | पगार सात लाख वार्षिक |
| प्रकल्प/बांधकाम व्यवस्थापक: मोठ्या प्रकल्पांसाठी नियोजन, अंमलबजावणी आणि बजेट हाताळतो. | पगार आठ लाख वार्षिक |
| गुणवत्ता हमी/क्यूसी इंजिनिअर: साहित्य आणि कारागिरीमध्ये मानकांचे पालन सुनिश्चित करतो. | पगार आठ लाख वार्षिक |
| डिझाइन इंजिनिअर/ड्राफ्ट्समन: योजना आणि तपशीलवार रेखाचित्रे तयार करतो (पाइपिंग, स्ट्रक्चरल). | पगार साडेसहा लाख वार्षिक |
| महामार्ग/वाहतूक अभियंता: रस्ते, पूल आणि वाहतूक व्यवस्थांवर लक्ष केंद्रित करतो. | पगार साडेसात लाख वार्षिक |
मुख्य कंपन्या
- एल अँड टी कन्स्ट्रक्शन,
- आप कोन्स,
- रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चर
सरासरी पगार
सुरुवातीला वार्षिक तीन ते सहा लाखापर्यंत तुम्हाला पगार मिळू शकतो सरकारी नोकरीत आकडा जास्त असू शकतो. पण जर तुमच्याकडे वेगळी स्किल्स असतील तर तुम्हाला खूप जास्त पगार सुद्धा पाहायला मिळतो.
BE Civil Engineering हा कोर्स का आणि कोणी निवडावा.
तर विद्यार्थी मित्रांनो जर तुम्हाला बिल्डिंग बनवणे किंवा रियल वर्ड प्रॉब्लेम सॉल करणे जे तुम्ही चार वर्षांमध्ये गणित आणि वेगवेगळ्या विषयांचा अभ्यास केलेला आहे त्याच्या मदतीने त्रुटी दूर करणे रस्ते बांधकाम पूल यांसारखे प्रोजेक्ट हाती घेणे आवडत असेल आणि जर तुम्हाला भविष्यामध्ये वेगवेगळ्या संधी हाताळायच्या असतील तर तुम्ही हा कोर्स निवडू शकता.
यामध्ये अशा विद्यार्थ्यांची गरज असते ज्यांना गणित आणि फिजिक्स आवडते जे त्यामध्ये उच्चतम गुणवत्ता मिळवू शकतात तसेच ज्यांना. कॉम्प्लेक्स स्ट्रक्चर मध्ये वेगवेगळे प्रॉब्लेम्स दिसून येतात आणि ते प्रॉब्लेम्स दूर करू शकतात असे विद्यार्थी जे विचाराने क्रिएटिव्ह आहेत असे विद्यार्थी हा कोर्स निवडू शकता.
मागणी
- भारतासारख्या विकसनशील देशात स्मार्ट सिटी आणि मेट्रो प्रकल्प होत आहेत यामध्ये सिव्हिल इंजिनियर्सला खूप मागणी आहे.
पगार
- तुमच्या अनुभवानुसार पगार झपाट्याने वाढतो तसेच विशेषतः जर आपण पाहिले आखाती देश म्हणजेच गल्फ कंट्रीज इथे मोठ्या संधी उपलब्ध आहेत.
निवडण्याचे कारण
- हे क्षेत्र तुम्हाला समाजात एक वेगळी ओळख मिळवून देते तसेच तुम्ही बांधलेली वास्तु वर्षानुवर्ष उभी राहते जो एक मोठा अभिमान दर्शवतो.
Btech Information Technology बद्दल माहिती
BE Civil Engineering याबद्दल विचारली गेलेली प्रश्न
BE Civil Engineering या कोर्सला मागणी आहे का ?
हो BE Civil Engineering या कोर्सला उच्चतम मागणी आहे कारण सध्याच्या युगामध्ये याची डिमांड वाढत चालली आहे वेगवेगळे इन्फ्रास्ट्रक्चर बनत आहेत ज्यामध्ये रोड्स ब्रिज वॉटर एनर्जी या सेक्टरचा समावेश आहे.
BE Civil Engineering या कोर्स बद्दल बाकीच्यांची नजर कशी आहे ?
BE Civil Engineering हा कोर्स कम्प्लीट केल्यानंतर विद्यार्थ्यांची जी भर असते ते असतं इम्प्रोविंग कॉलिटी ऑफ लाइफ ‘ ज्यामध्ये विद्यार्थी या जगाला अजून चांगलं बनवण्यासाठी मदत करू शकतात त्यामुळे हा एक चांगला कोर्स आहे.
BE Civil Engineering यामध्ये स्पेसिलायझेशन काय आहे ?
BE Civil Engineering यामध्ये वेगवेगळ्या संधी आहेत जसं स्ट्रक्चरल ट्रान्सपोर्टेशन एन्व्हायरमेंटल जिओ टेक्निकल आणि वॉटर रिसोर्सेस इंजिनिअरिंग.
BE Civil Engineering यामध्ये इनोवेशन काय आहे ?
BE Civil Engineering यामध्ये इनोवेशन हे आहे ज्या स्मार्ट सिटी बनत आहेत त्याचे प्रोजेक्ट ते बनवणे पण पर्यावरणाचा समतोल राखून.
BE Civil Engineering यामध्ये डेस्क जॉब मिळते का ?
हो पण काही प्रमाणामध्ये कारण BE Civil Engineering यामधून विद्यार्थी नोकरी मिळून जी नोकरी मिळू शकतो. ती मुख्यतः प्रत्यक्ष जिथे प्रोजेक्ट होत आहे त्या ठिकाणी जाऊन करावी लागते. पण काही जॉब्स आहेत ज्यामध्ये टेबल जॉब्स मिळतो जसे कम्प्युटरवर डिझाईन बनवणे किंवा एखादी अडचण दूर करणे.