BSC In Psychology Course बद्दल माहिती । BSC In Psychology Information In Marathi 2026 |

BSC In Psychology Information In Marathi
Key Points hide

BSC In Psychology Information In Marathi  हा कोर्स काय आहे ?

बीएससी मानसशास्त्र हा तीन वर्षांचा पदवी पूर्व अभ्यासक्रम आहे जो मन भावना सामाजिक विकास माणसाच्या व्यक्तिमत्त्वाच्या अभ्यासावर लक्ष केंद्रित करतो.
बीएससी मानसशास्त्रामध्ये माणसांचे मानसिक आजार त्यांचे डिझास्टर मॅनेजमेंट ची क्षमता व मानवी वर्तन व मानवी भावना इत्यादींशी संबंधित आहे. हा तीन वर्षांचा पूर्वी पूर्व अभ्यासक्रम आहे जो भारत सरकारने सुरू केलेला आहे. मानसशास्त्राचे मुख्य उद्दिष्ट हे मानवी वर्तन समजून घेणे आणि मानवी मेंदू आणि त्याच्या भावनांबद्दलची सर्व माहिती मिळवणे आहे.

मानसशास्त्र अभ्यासक्रम उमेदवारांना संज्ञानात्मक विज्ञानाच्या क्षेत्रात पात्रता मिळवून देण्यासाठी आणि प्रशिक्षित करण्यासाठी डिझाईन केलेला आहे. अभ्यासक्रम मानवी प्रतिक्रिया आणि ताण व्यवस्थापन यावर विस्तृत अभ्यास प्रदान करतो हे पदवीधरांना अनेक केस स्टडीज आणि निरीक्षण शिक्षणाद्वारे लोकांचे विचार कृती भावना आणि हेतू यांच्या विश्लेषण करण्यामध्ये मदत करते जेणेकरून ते संबंधित केस वरील अडचणींवरील उपाय शोधू शकतात.

सध्या अनेक आजारांमुळे व मानसिक ताणतणावांमुळे आपल्या बदलत्या जीवनशैलीमुळे मानसिक आजार निर्माण झालेले आहेत व ते त्यामुळे या पदवीधरांसाठी नोकरीच्या संधी मोठ्या प्रमाणात खुल्या झालेल्या आहेत.
बाल मार्गदर्शन केंद्र रुग्णालय आणि औद्योगिक संस्थांमध्ये थेरपिस्ट आणि मानसशास्त्रज्ञ म्हणून काम करण्याची मुभा मिळते.

BSC In Psychology Information In Marathi यासाठी शैक्षणिक पात्रता कोणती ?

बीएससी सायकॉलॉजी अभ्यासक्रमामध्ये प्रवेश घेण्यासाठी विद्यापीठ अनुदान आयोगाने विशिष्ट पात्रता निकष निश्चित केलेले आहेत बहुतेक देशभरातील विद्यापीठे आणि महाविद्यालयांमध्ये सामान्य आहेत जे मानसशास्त्रामध्ये बीएससी देतात ते आपण खाली पाहू.

  • उमेदवारांनी अथवा विद्यार्थ्यांनी मान्यताप्राप्त केंद्रीय अथवा राज्य मंडळातून बोर्डातून किमान 55% गुणांसह टेन प्लस टू अथवा बारावी किंवा त्याच्या समक्ष परीक्षा उत्तीर्ण होणे आवश्यक आहे.
  • विद्यार्थ्यांनी विज्ञान शाखेतील पात्रता परीक्षा उत्तीर्ण होणे आवश्यक आहे ज्यामध्ये जीवशास्त्र हा विषय अनिवार्य असतो म्हणजेच बायोलॉजी हा विषय अनिवार्य असतो.
  • प्रवेश घेण्याच्या वेळेस सर्व विषय उत्तीर्ण असणे आवश्यक असते.

BSC In Psychology Information In Marathi याची ऍडमिशन प्रोसेस

बीएससी सायकॉलॉजी मधील प्रवेश प्रक्रिया पात्रता निर्देशांवर आधारित आहे इतर सर्व बीएससी अभ्यासक्रमांसारखीच याचीही ऍडमिशन प्रोसेस आहे या बीएससी सायकॉलॉजीच्या प्रवेशच्या दोन प्रक्रिया असतात.:

पात्रता परीक्षेतील गुणवत्तेवर

अथवा व्यवस्थापन कोट्यावर आधारित

सामायिक प्रवेश परीक्षा द्वारे प्रवेश: नामांकित महाविद्यालय किंवा ऑटोनॉमस संस्थेमध्ये प्रवेश घ्यायचा असेल तर त्या संस्थेद्वारे घेतल्या जाणाऱ्या सामायिक प्रवेश परीक्षा द्वारे प्रवेश. 

अर्ज करण्याची प्रक्रिया:

  • विद्यार्थी अभ्यासक्रमासाठी ऑनलाईन अर्ज करू शकतात व त्यांच्या इच्छित महाविद्यालयानुसार ती विद्यालयांमध्ये जाऊन ऑफलाईन अर्ज करू शकता परंतु सध्या सर्व कॉलेजेसही ऑनलाइन प्रक्रिया राबवत आहेत.
  • विद्यार्थ्यांनी आवश्यक तपशील पूर्ण करावेत आणि आवश्यक कागदपत्रे महाविद्यालयाच्या अधिकृत वेबसाईटवर सादर करावी.
  • प्रवेश प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर जागांची अंतिम वाटप सुरू होते आणि निवडलेल्या सर्व उमेदवारांनी अभ्यासक्रमाचे शुल्क भरून स्वतःची ऍडमिशन प्रोसेस कम्प्लीट करावी.
  • निवडीचे निकष: कट ऑफ स्कोर वरील विद्यार्थ्यांची अंतिम निवड होते.
  • विद्यार्थ्यांचे टेन प्लस टू स्तरावरील म्हणजेच अर्थातच 12 वी चे एकत्रित गुण व प्रवेश परीक्षेतील गुण यांच्यावर मिळून कटऑफ स्कोर ठरवला जातो पात्र होणाऱ्या उमेदवारांना विद्यार्थ्यांना जागा वाटप करण्यापूर्वी काउंसलिंग साठी बोलवले जाते.

BSC In Psychology Information In Marathi याचा कालावधी

बीएससी सायकॉलॉजी हा तीन वर्षांचा पदवी पूर्व अभ्यासक्रम आहे. हा अभ्यासक्रम सेमिस्टर पॅटर्न मध्ये असतो म्हणजेच सत्र प्रकारचा असतो यामध्ये सहा सेमिस्टर टोटल असतात.
बीएससी सायकॉलॉजी फी हे सर्वसाधारणपणे पन्नास हजार ते एक लाख प्रति वर्ष असू शकते आणि ते विद्यार्थ्यांच्या प्रवर्गानुसार अथवा कॉलेज अनुसार बदलू शकते.

BSC Biochemistry Course बद्दल माहिती । 

BSC In Psychology Information In Marathi याचे विषय

बीएससी सायकॉलॉजी चे विषय यामध्ये मुख्यत्वे करून मानवी मेंदू आणि त्याच्या प्रतिक्रियांचे मूलभूत समज हे समाविष्ट असते त्यानुसार या अभ्यासक्रमाचे विषय निर्माण केलेले आहेत.

मुख्य विषय

  • सायको पॅथॉलॉजी
  • कम्युनिटी सायकॉलॉजी
  • ह्यूमन रिसर्च डेव्हलपमेंट
  • स्टॅटिस्टिक्स इन सायकॉलॉजी
  • डेव्हलपमेंटल सायकॉलॉजी
  •  कौन्सलिंग सायकॉलॉजी 
  • ऑर्गनायझेशनल बिहेवियर
  • फाउंडेशन ऑफ ह्युमन बिहेवियर
निवडक विषय
  • सायकॉलॉजी ऑफ लेट अडल्ट हूड
    स्पोर्ट सायकॉलॉजी
  •  हेल्थ सायकॉलॉजी 
  • कॉग्नेटिव्ह सायकॉलॉजी
  •  सायकॉलॉजिकल अनलिसिस
  •  करिअर सायकॉलॉजी
  •  फॉरेन्सिक सायकॉलॉजी

आपण सेमिस्टर वाइस याचे अभ्यासक्रम अथवा सिल्याबस बघूया.:

सेमिस्टर वन
  • मोटिवेशन
  • इमोशन्स
  • इंटेलिजन्स अँड क्रिएटिव्हिटी
  • नर्व्हस सिस्टिम 
  • स्टॅटिस्टिकल मेथड्स फॉर सायकॉलॉजिकल रिसर्च
  • इंट्रोडक्शन टू सायकॉलॉजी
  • प्रेस अँड वेलबिंइग
  • अटेंशन अँड पर्सेप्शन
सेमिस्टर टू
  • लर्निंग
  • कॉग्निशन
  • एंडोक्राइन सिस्टीम  
  • बायो सायकॉलॉजी
  • नेचर अँड मेथोडस ऑफ सायकॉलॉजिकल सायकॉलॉजी
  • मेमोरी
सेम थ्री
  • हायपोथीसिस
  • नॉन प्यारा मॅट्रिक अँड parametric स्टॅटिस्टिक्स ऑब्झर्वेशन, इंटरव्यू मेथोडस
  • प्रॉब्लेम्स अँड व्हेरिएबल्स
  • एप्लीकेशन ऑफ मेजर ऑफ सेंट्रल तेंडन सीज अंड व्हेरिएबिलिटी
  • क्वांटिटीव्ह एनालिसिस अंड क्वालिटीव अनालिसिस 
  • डेव्हलपमेंट ऑफ सायकॉलॉजिकल थॉट्स सायकॉलॉजिकल रिसर्च
  • सोशल सायकॉलॉजी
  • एक्सपेरिमेंटल अँड नॉन एक्सपेरिमेंटल रिसर्च
सेमिस्टर फोर
  • सोशल अँड कल्चरल कॉन्टॅक्ट इन ह्युमन डेव्हलपमेंट
  • प्रॉब्लेम्स अँड इशूज ऑफ ह्यूमन डेव्हलपमेंट
  • डेव्हलपमेंट काँसर्न्स ड्यूरिंग अडोलेसेन्स अर्ली युथ अँड अडल्ट हुड 
  • अंडरस्टँडिंग सायकॉलॉजिकल डिसऑर्डर्स
  • स्टॅटिस्टिकल मेथोडस ऑफ सायकॉलॉजिकल रिसर्च
  • अप्लाईड सोशल सायकॉलॉजी
  • इमोशनल अँड सोशल डेव्हलपमेंट
सेमिस्टर फाईव्ह
  • इंटर ग्रुप conflict
  • कल्चरल सायकॉलॉजी
  • थेरॉटिकल अँड मेथोडोलॉजिकल इशूज इन सेल्फ अँड पर्सनॅलिटी
  • असेसमेंट ऑफ सायको पॅथॉलॉजिकल बिहेवियर
  • पॅरामीटर्स ऑफ असेसमेंट सायकॉलॉजिकल स्टॅलिंग मेथोडस ऑफ स्कालिंग 
  • अंडरस्टँडिंग विथ सायकॉलॉजीकल डिसऑर्डर्स
  • डेव्हलपमेंट सायकॉलॉजी स्टेजेस ऑफ लाइफ स्पेन डेव्हलपमेंट prejudice अँड
  • डिस्क्रिमिनेशन
सेम सिक्स
  • कौन्सिलिंग सायकॉलॉजी
  • सायकॉलॉजिकल एप्रोचेस टू द एनवायरनमेंट
  • सोशल परसेप्शन
  • सोशल इकॉलॉजी अँड कम्युनिटी सायकॉलॉजी पर्सनॅलिटी अनालिसिस 
  • ऑर्गनायझेशनल behaviour
  • सोशल चेंज अँड कम्युनिटी पार्टसिफिकशन
बीएससी सायकॉलॉजी मधील काही महत्त्वाची पुस्तके
  • ऑर्गनायझेशनल बिहेवियर न्यू:  स्ट्रॉंग जेडब्ल्यू
  • थिअरी अँड प्रॅक्टिस ऑफ कौन्सिलिंग अँड सायकोथेरापी: जी कोरी
  • ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंट: डेस्पर G
  • सायकॉलॉजी फाउंडेशन: बीटी बसवंत आप्पा
  • एज्युकेशनल सायकॉलॉजी: s w Santrok
  • पॉलिटिकल सायकोलॉजी: के एन शर्मा.

BSC In Psychology Information In Marathi याचे कॉलेजेस

गव्हर्नमेंट कॉलेजेस
  • युनिव्हर्सिटी ऑफ मुंबई आयडीओएल
  • सावित्रीबाई फुले पुणे युनिव्हर्सिटी
  • एल्फिन्स्टंट कॉलेज
  • श्रीमती नथीबाई दामोदर ठाकर सी वुमन्स युनिव्हर्सिटी एस एन डी टी कोथरूड पुणे
प्रायव्हेट कॉलेजेस
  • टाटा  इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेस टीआयएसएस
  • सोफिया कॉलेज मुंबई
  • फरगुशन कॉलेज पुणे
  • नवरोस जी वाडिया कॉलेज पुणे
  • राम नारायण रुईया ऑटोनॉमस कॉलेज मुंबई
  • AFMC Pune आर्म्ड फोर्सस मेडिकल कॉलेज पुणे 
  • Bharatee vidyapeeth deemed yluniversity Pune
  • Bhonsala military college Nashik

BSC In Psychology Information In Marathi यामध्ये करिअर आणि संधी

बीएससी इन सायकॉलॉजी प्रोग्रॅम मधून उत्तीर्ण झालेले विद्यार्थी सरकारी आणि खाजगी क्षेत्रामध्ये नोकऱ्या मिळू शकतात.
बीएससी सायकॉलॉजी पदवीधरांसाठी काही लोकप्रिय करिअर आणि नोकऱ्यांच्या पदनामांची यादी.:

सायकॉलॉजिस्ट

पगार तीन ते पाच लाख रुपये

ह्यूमन रेसोर्स मॅनेजर

पगार पाच ते सात लाख रुपये

पर्सनल माईंड ट्रेनर

पगार चार ते सात लाख रुपये

लेक्चरर  पगार सहा ते दहा लाख रुपये
मार्केटिंग एक्झिक्युटिव्ह

पगार पाच ते आठ लाख रुपये

सोशल वर्कर  पगार दोन ते चार लाख रुपये

BSC In Psychology Information In Marathi हा कोर्स केल्यानंतर पुढील संधी

बीएससी सायकॉलॉजी कार्यक्रम क्षेत्रामध्ये असंख्य नोकरीचे संधी आहेत.
मानसिक रुग्णालय, मानसिक आरोग्य सेवा केंद्र, खाजगी मानसोपचार केंद्र, कौन्सिलिंग सेंटर, आयटी कंपन्या आणि विद्यापीठ क्षेत्र आहेत यामध्ये आपण नोकरी पाहू शकतो.
यामध्ये अजूनही काही जॉब स्कोप आहेत जे आपण पाहूया.:

  • डेटा विश्लेषण ( मानसशास्त्र )
  • बाल मानसशास्त्र
  • औद्योगिक सल्लागार
  • व्याख्यान आणि शैक्षणिक सेवा अंतर्गत
  • संशोधन आणि विकास

BSC In Psychology Information In Marathi हा कोर्स का आणि कोणी निवडावा.

ज्या विद्यार्थ्यांना या क्षेत्रामध्ये रस आहे ज्यांना मानवी वर्तन समजून घेण्याची उत्सुकता आहे यांना मानसोपचार तज्ञ अथवा थेरपिस्ट म्हणून करिअर करायचे आहे त्यांनी मानसशास्त्रामध्ये बीएससी ची निवड नक्कीच करावी.
बदलत्या जीवनशैलीमुळे व मानवी ताण-तणावांमुळे अनेक गंभीर मानसिक आजार बळावत आहेत व माणसाचे मानसिक आरोग्य बिघडलेले आहे त्यामुळे या क्षेत्राला भरपूर स्कोप आहे नोकरीच्या संधी मोठ्या प्रमाणात खुल्या झालेले आहेत तरी आपण या गोष्टीचा फायदा घ्यावा.

Watch Video

BSC In Psychology Information In Marathi याबद्दल विचारली गेलेली प्रश्न

बीएससी इन सायकॉलॉजी हा अभ्यास करणे कठीण आहे का ?

आपण वर दिलेल्या पोस्टमध्ये तुम्ही बीएससी एन्जॉयकॉलॉज साठी आवश्यक असलेली कौशल्य तपासू शकता जर तुम्हाला वाटत असेल की या अभ्यासक्रमासाठी तुमच्या आवड आणि कौशल्य आहेत तर त्यासाठी तुम्ही अर्ज करू शकता त्यासाठी ते इतकेही अवघड नाही सर्वात महत्त्वाचे म्हणजे तुम्हाला जर इंटरेस्ट असेल तर ते तुम्हाला अवघड जाणार नाही.

बीएससी इन सायकॉलॉजी करून मानसोपचार तज्ञ होणे शक्य आहे का ?

मानसोपचार तज्ञ म्हणजे मानसोपचारात विशेषज्ञता असलेला वैद्यकीय डॉक्टर. त्यासाठी आपल्याला वैद्यकीय शिक्षण डिग्री ही घ्यावी लागेल परंतु मानसशास्त्रामधील असलेली बीएससी पदवी तुम्हाला त्या क्षेत्रामध्ये उच्चशिक्षणासाठी तयार करू शकते आणि पात्र बनवू शकते.

बीए मानसशास्त्र बीएससी मानसशास्त्र पेक्षा चांगली आहे का ?

मानसशास्त्राचे दोन्ही अभ्यासक्रम हे शिकण्यासारखे आहे. बीए मध्ये मानसशास्त्रातील काही अभ्यासक्रमांचा समावेश आहे आणि त्यात महत्त्वाच्या क्षेत्राबाहेरील विषयांचा जास्त अभ्यास आहे. बीएससी मानसशास्त्रामध्ये विद्यार्थ्यांना प्रयोगशाळेच्या सत्रांमध्ये अधिक उपस्थिती दाखवावी लागते व प्रॅक्टिकल बेस्ट नॉलेज जास्त प्रमाणात असते.

दुरस्त बीएससी मानसशास्त्र मध्ये आपण अभ्यास करू शकतो का ?

दुरस्त शिक्षण म्हणजेच दूरवरून शिक्षण घेणे जे की आपल्याला प्रत्यक्षात त्या ठिकाणी उपस्थित राहायला लागण्याची गरज नसते तर आपण बीएससी मानसशास्त्र आहे प्रत्यक्ष उपस्थित राहून अथवा नियमितपणे ही करू शकतो तर आपण दुरुस्त अभ्यासक्रमापेक्षा नियमित हवामानाशास्त्र निवडणे चांगले आहे आणि त्यासाठी जी शिफारस केली जाते.

बीएससी सायकॉलॉजी करून कोणीही करिअर कौन्सिलर बनू शकतो का ?

हो मानसशास्त्रामध्ये बीएससी पदवी घेतलेल्या उमेदवार करिअर कौन्सिलर बनू शकतात.

बीएससी सायकॉलॉजी पदवीधरांसाठी भरतीचे प्रमुख क्षेत्रे कोणते आहे ?

अनाशास्त्रामध्ये बीएससी पदवी असलेल्या उमेदवारांची भरती रुग्णालय शाळा महाविद्यालय दवाखाने क्रीडाक्षेत्रे व औद्योगिक कार्पोरेट क्षेत्रामध्ये कौन्सिलर म्हणूनही केली जाऊ शकते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *