Warning: Constant PRODUCTION_FACTORY_BUY_BUNDLE already defined in /home2/studyflo/public_html/wp-content/themes/production-factory/get-started/notice.php on line 5
BSC Biochemistry Course बद्दल माहिती । BSC Biochemistry Course Information In Marathi 2026 | - Studyflowcourses

BSC Biochemistry Course बद्दल माहिती । BSC Biochemistry Course Information In Marathi 2026 |

BSC Biochemistry Course बद्दल माहिती । BSC Biochemistry Course Information In Marathi 2026 |
Key Points hide

BSC Biochemistry Course Information In Marathi हा कोर्स काय आहे ?

बीएससी बायो केमिस्ट्री अभ्यासक्रम रासायनिक आणि भौतिक रासायनिक प्रक्रियांमध्ये तीन वर्षांचा पदवी पूर्व अभ्यासक्रम आहे हे विज्ञानाची एक शाखा आहे ज्यामध्ये सजीवांच्या आणि प्राण्यांच्या च्या रासायनिक स्ट्रक्चरशी संबंधित आहे.
जय व रसायनशास्त्र म्हणजेच जैविक प्रक्रिया आणि सजीव गोष्टींचा अभ्यास करताना रासायनिक प्रक्रिया आणि तत्वांचा वापर करण्याचा अभ्यास असतो.
बायो केमिस्ट्री विज्ञानाची एक शाखा आहे ज्यामध्ये रसायनशास्त्राचा समावेश आहे आणि सजीव आणि प्राणी यांच्यातील जैविक अनुरेणूंचा व स्टेट्स आणि त्यांच्या केमिकल प्रक्रियांचा संबंध आहे.
हा अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर पदवीधर हे सरकारी क्षेत्र वैद्यकीय उद्योग संशोधन प्रयोगशाळा कृषी औषध कंपन्या ठिकाणी काम करू शकतात.

BSC Biochemistry Course Information In Marathi साठी शैक्षणिक पात्रता कोणती ?

बीएससी बायो केमिस्ट्री अभ्यासक्रमामध्ये प्रवेश मिळवण्यासाठी ची किमान पात्रता खालील प्रमाणे आहे: 

  • विद्यार्थ्यांनी मान्यता प्राप्त केंद्रीय अथवा राज्य शैक्षणिक मंडळातून किमान आवश्यक गुणांसह टेन प्लस टू म्हणजेच बारावी उत्तीर्ण केलेली असावी.
  • अभ्यासक्रमामध्ये प्रवेश घेण्यासाठी किमान गुणसंस्था अनुसार वेगवेगळ्या आहेत परंतु विद्यार्थ्यांनी फिजिक्स केमिस्ट्री बायोलॉजी अथवा फिजिक्स केमिस्ट्री मॅथ्स अथवा फिजिक्स केमिस्ट्री मॅथ्स बायोलॉजी
  • यामधून किमान 55% गुणांसह पास होणे अपेक्षिता आहे.
  • विद्यार्थ्यांना विशिष्ट महाविद्यालयांमध्ये अर्ज करताना आवश्यक असलेल्या किमान गुणांची आवश्यकता धारण करण्याचा सल्ला दिला जातो.

BSC Biochemistry Course Information In Marathi  याची ऍडमिशन प्रोसेस

याचे ऍडमिशन प्रोसेस मध्ये दोन प्रकारे ऍडमिशन घेतली जाऊ शकतो ते म्हणजे गुणवत्तेवर आधारित व प्रवेश परीक्षा वर आधारित.
प्रवेश परीक्षेतील उमेदवारांच्या कामगिरीच्या आधारे आणि बारावीच्या स्तरावर मिळालेल्या गुणांनुसार विद्यार्थ्यांना या कोर्ससाठी प्रवेश दिला जातो.
या कार्यक्रमासाठी अर्ज करण्यासाठी खालील प्रक्रिया विद्यार्थ्यांना पार पाडावे लागतात.:

  • अर्ज करणे
    जे विद्यार्थी अभ्यासक्रमासाठी विशिष्ट महाविद्यालयामध्ये अर्ज करण्याचा विचार करत आहेत त्यांनी पात्रता आणि विद्यार्थ्यांना निवडण्यासाठी कोणत्या प्रकारचे प्रवेश परीक्षा घेतली जाते ते तपासावे विद्यार्थी ऑनलाईन अर्ज करू शकतात अभ्यासक्रमासाठी अर्ज करण्यासाठी आवश्यक असलेला अर्ज भरण्यासाठी महाविद्यालयामध्ये भेट देऊ शकता
  • प्रवेश परीक्षा
  • विद्यार्थी निवड प्रक्रिया
    बीएससी बायोकेमिस्ट्री मध्ये प्रवेश गुणवत्तेच्या आधारावर दिला जातो बारावीच्या परीक्षेचे निकाल जाहीर झाल्यानंतर विद्यापीठ या कार्यक्रमांमध्ये प्रवेश प्रक्रिया सुरू करतात. मे ते जून महिन्यामध्ये अर्ज फॉर्म उपलब्ध करून दिले जातात आणि अर्ज फॉर्म भरून पूर्ण झाल्यानंतर विद्यापीठ आहे त्यांचा कट ऑफ जाहीर करण्यास सुरुवात करतात जो अभ्यासक्रमांमध्ये प्रवेश करण्यासाठी किमान आवश्यक टक्केवारी असते कॉलेज कडून कट ऑफ यादी जाहीर केली जाते आणि शॉर्टलिस्ट केलेल्या विद्यार्थ्यांना मुलाखतीच्या पुढील फेरीसाठी बोलवले जाते व कौन्सिलिंग नंतर प्रवेश होऊ शकतो.

  • अंतिम प्रवेश फेरी
    महाविद्यालय व्यक्तीची क्षमता आणि कौशल्य तपासण्यासाठी वेगवेगळ्या फेऱ्या आयोजित करतात
    वैयक्तिक मुलाखत पी आय
    समुपदेशन कौन्सलिंग

याचा सविस्तर व्हिडिओ पहा

BSC Biochemistry Course Information In Marathi याचा कालावधी

बीएससी बायो केमिस्ट्री या अभ्यासक्रमाचा कालावधी हा तीन वर्षांचा असतो याचा सत्र पद्धतीचा अभ्यासक्रम असतो. त्यामुळे टोटल सेमिस्टर हे सहा होतात.
या अभ्यासक्रमाची फीस ही 50 हजार ते दीड लाख रुपये वार्षिक इतकी असू शकते ते कॉलेज अनुसार अथवा विद्यार्थ्यांच्या प्रवर्गाअनसार बदलू शकते.

BSC Zoology Honours Course बद्दल माहिती ।

BSC Biochemistry Course Information In Marathi याचे विषय

सेमीस्टर वन
  • सेल बायोलॉजी
  • लॅब इन बायोलॉजिकल सायन्स वन
  • पब्लिक ऍडमिनिस्ट्रेशन
  • लॅब इन सेल बायोलॉजी  
  • लॅंग्वेज वन
  • बायलॉजिकल सायन्स वन
  • केमिस्ट्री वन
सेमिस्टर 2
  • केमिस्ट्री टू
  • एन्व्हायरमेंटल स्टडीज
  • लॅब इन बायोलॉजिकल सायन्स टू
  • लॅब in बायोमॉलिक्युल्स 
  • इंग्लिश टू
  • बायोलॉजिकल सायन्स टू
  • बायोमॉलिक्युल्स
सेम थ्री
  • जीओलॉजी अँड न्युट्रिशन
  • लॅब इन इंटरमिजिएटरी मेटाबोलिझम वन
  • लॅब इन ह्यूमन फिजिओलॉजी अँड न्यूट्रिशन
  • लँग्वेज थ्री
  • इंग्लिश थ्री
  • इंटरमिजिएट मेटाबोलिजम वन 
सेमिस्टर फोर
  • लँग्वेज फोर
  • इंग्लिश फॉर
  • एलिटिकल बायोकेमिस्ट्री
  • लॅब इन इंटरमिजिएट्री मेटाबोलिजम टू
  • लॅब इन अलर्टीकल बायोकेमिस्ट्री
  • कॉम्प्युटर एप्लीकेशन इन बायोलॉजी
सेम 5
  • मॉलिक्युलर बायोलॉजी
  • क्लीनिकल बायोकेमिस्ट्री
  • इंडॉक्रिनोलॉजी
  • एन्व्हायरमेंटल बायोलॉजी
  • लॅब इन क्लिनिकल बायोकेमिस्ट्री
सेंटर सिक्स
  • बेसिक इम्युनोलॉजी
  • बेसिक बायोटेक्नॉलॉजी
  • बायो स्टॅटिस्टिक्स
  • बायो इन्फॉर्मेटिक्स
  • लॅब इन बेसिक  इम्युनोलॉजी

काही पुस्तकांची नावे पहावी:

  • प्रिन्सिपल्स ऑफ बायोकेमिस्ट्री: अल्बर्ट लेनिनजर
  • हारपर्स एलुस्ट्रेटेड बायोकेमिस्ट्री: रॉबर्ट म्युरे
  • एसएन्शियल् ऑफ बायोकेमिस्ट्री: अहमद M.
  • बायो केमिस्ट्री: यु सत्यनारायण

BSC Biochemistry Course Information In Marathi  याचे कॉलेजेस

गव्हर्मट कॉलेजेस
  • बीजे गव्हर्मेंट मेडिकल कॉलेज पुणे 
  • गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज मिरज
  • इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स आयसीएम मुंबई
  • गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज अँड हॉस्पिटल नागपूर
  • स्वामी रामानंद तीर्थ रुरल गव्हर्नमेट मेडिकल कॉलेज अंबाजोगाई.
प्रायव्हेट कॉलेजेस
  • मिठी बाई कॉलेज ऑफ आर्ट्स मुंबई
  • रामनारायण रुईया ऑटोनोमस कॉलेज मुंबई
  • के जे सोमय्या कॉलेज ऑफ सायन्स अँड कॉमर्स के जे एस एस सी मुंबई
  • प्रश्न इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्स कराड
  • एन के पी साळवे इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्स नागपूर.
  • डॉक्टर डी वाय पाटील मेडिकल कॉलेज नवी मुंबई.

BSC Biochemistry Course Information In Marathi  यामध्ये करिअर आणि संधी

यामधील काही टॉपच्या कंपन्या पाहू: 

  • एपी लॅबस
  • बीएमसी टू
  • Aurobindo फार्मा
  • सेंट्रल फॉरेन्सिक Lab
  • डॉक्युमेंटेशन एक्झामिनेशन लॅबोरेटरीज ॲट सेंट्रल अँड स्टेट लेवल
  • सिपला ranbaxy
  • बायोकॉन ग्लेनमार्क फार्मासिटिकल्स
  • लुपिन
  • सिपला
  • सन फार्मा
  • Reckkit बेनकीसर
  • अपॉक्सिओ 

बीएससी बायकोनेस्ट्री पदवी पूर्ण केल्यानंतर विद्यार्थी संस्थांमध्ये सहजपणे नोकरी मिळू शकतात काही क्षेत्र उदाहरणार्थ वैद्यकीय, उद्योग, कृषी, संशोधन, प्रयोगशाळा, औषध कंपन्या, शैक्षणिक आणि शैक्षणिक संस्था इत्यादी चा समावेश आहे.
खाली काही नोकरी व त्यांचे वर्णन केलेले आहे.:

रिसर्च सायंटिस्ट जैव रसायनिक घटकांच्या संशोधनात मदत करणारे प्रयोग डिझाईन करण्यासाठी या संशोधन शास्त्रज्ञांची नियुक्ती केली जाते.

पगार पाच ते सात लाख रुपये

क्लिनिकल रिसर्च क्लीनिकल रिसर्च हे प्रयोग आणि संशोधन करतात जे व रासायनिक क्षेत्रात योगदान देण्यासाठी यांची महत्त्वाची भूमिका असते. पगार तीन ते सहा लाख रुपये
मेडिकल कोडर मेडिकल कोडर हे वैद्यकीय निदान आणि प्रक्रियांचे वर्णन हे कोडींग च्या स्वरूपात करतात ज्याला की मेडिकल कोडींग असे म्हणतात तर हे आताच भारतामध्ये नवीन उदयाला येणारे क्षेत्र आहे व यामध्ये भरपूर संधी उपलब्ध आहेत. पगार सहा ते आठ लाख रुपये
सायंटिफिक एडिटर प्रकाशनासाठी सादर केलेले आणि प्रक्रियांचे वर्णन संशोधन पत्रे संशोधन पत्रले संकलित करण्यासाठी वैज्ञानिक जर्नल्स आणि मासिकांमध्ये वैज्ञानिक संपादक नियुक्त केले जातात.

पगार पाच ते सात लाख रुपये

लॅब टेक्निशियन पॅथॉलॉजी लॅब द्वारे लॅब टेक मशीन नियुक्त केले जातात आणि ते रुग्णांसाठी चाचणी आणि निदान अहवाल तयार करतात. पगार चार ते सहा लाख रुपये

BSC Biochemistry Course Information In Marathi हा कोर्स केल्यानंतर पुढील संधी

बीएससी बायो केमिस्ट्री हा कोर्स केल्यानंतर पदवीधारकांना सेल बायोलॉजी माय इन्फॉर्मेशन डेव्हलपमेंट अँड डिसीज प्लांट बायोलॉजी मॉलिक्युलर बायोलॉजी जेनेटिक्स इत्यादी काही विशेष क्षेत्रांमध्ये करिअरच्या असंख्य संधीचा शोध घेता येईल.

काही टॉप रिक्रोटर्स हे सिपला रनबॅक्सी बायोकॉन ग्लेनमार्क फार्मा अरबिंदू फार्मा हे आहेत.
बीएससी बायोकेमिस्ट्री हा कोर्स केल्यानंतर उच्च शिक्षणाचे पर्याय देखील उपलब्ध आहेत.
यामध्ये पदवीधर उच्च शिक्षण घेऊ शकतात आणि एम एस सी बायोकेमिस्ट्री एम एस सी बायोकेमिस्ट्री इंटिग्रेटेड एम एस सी मेडिकल बायोकेमिस्ट्री पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा इन अप्लाइड बायो केमिस्ट्री आणि पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा इन बायोकेमिस्ट्री असे उच्च शिक्षणाचे अभ्यासक्रम घेऊ शकतात.

संशोधन अथवा शैक्षणिक क्षेत्रामध्ये करिअर
संशोधन उद्योगांमध्ये करिअर करायचे असल्यास मास्टर्स किंवा पीएचडी स्तरावरील पुढील अभ्यास आवश्यक असतो शैक्षणिक व्याख्याता म्हणून करिअर सुरू करण्यासाठी पीएचडी मदत करते तसेच आपण स्वतःची कोचिंग सेंटर देखील काढू शकतात.
बायो केमिस्ट्री ची पदवी मिळाल्यानंतर दंतचिकित्सा वैद्यकशास्त्र पशुवैद्यकीय विज्ञानात पदवीधर प्रवेशासाठी देखील अर्ज करू शकतात.
क्लीनिकल तसेच फॉरेन्सिक क्षेत्रात देखील बायोकेमिस्ट्री आवश्यक आहे.

BSC Biochemistry Course Information In Marathi हा कोर्स का आणि कोणी निवडावा.

बीएससी इन बायोकेमिस्ट्री म्हणजेच जैविक प्रक्रिया आणि सजीवांचा अभ्यास करताना त्यांच्यातील रासायनिक प्रक्रिया आणि त्यांचा वापर करण्याचा अभ्यास.
ज्या विद्यार्थ्यांना बायोकेमिस्ट्रीमध्ये रस आहे ते विद्यार्थी हा कोर्स करू शकतात
हा कोर्स केल्यानंतर विद्यार्थी क्लिनकल संशोधक म्हणजेच क्लीनिकल रिसर्च संशोधन शास्त्रज्ञ व्याख्याता प्राध्यापक म्हणूनही करिअर करू शकतात.

BSC Biochemistry Course Information In Marathi याबद्दल विचारली गेलेली प्रश्न

बायो केमिस्ट्री हे चांगले करिअर आहे का ?

हे नक्कीच चांगले करिअर आहे जे नोकरीच्या विस्तृत पर्यायाची ऑफर देते त्यापैकी बरेचसे उद्योगांमध्ये उदा . बायोमेडिकल सायंटिस्ट रुग्णांच्या काळजीसाठी रुग्णालय आणि प्रयोगशाळांमध्ये काम करणे आहे जिथे कुशल व्यवसायिकांची जास्त मागणी आहे .

बायो केमिस्ट्री ची बायोटेक्नॉलॉजी यामध्ये कुठले चांगले आहे ?

बायो केमिस्ट्री आणि बायोटेक्नॉलॉजी निवड तुमच्या आवडी आणि करिअरच्या ध्येयावर अवलंबून आहे. बायो केमिस्ट्री हे सजीवांमधील रासायनिक प्रक्रियांवर लक्ष केंद्रित करणारे विज्ञान आहे तर बायोटेक्नॉलॉजी हे उपयोजित विज्ञान आहे जे उत्पादने आणि प्रक्रिया विकसित करण्यासाठी जैविक प्रणालींचा वापर करते. सध्या बायोटेक्नॉलॉजी मध्ये सामान्यतः अधिक थेट उद्योग आणि प्रयोग आणि नोकरीची मागणी असते परंतु त्यासाठी मजबूत वायुकेमिस्ट्री पार्श्वभूमी असणे गरजेचे असते.

Bsc बायोकेमिस्ट्री कठीण अभ्यासक्रम आहे का ?

बायो केमिस्ट्री मध्ये बीएससी करणे एक आव्हानात्मक पण आज अविश्वासनीय फायदा देणारा अनुभव आहे पेशींच्या गुंतागुंती समजून घेण्यापासून ते जीवनाला चालना देणाऱ्या रासायनिक अभिक्रिया समजून घेण्यापर्यंत हे एक उत्तम क्षेत्र आहे.

बायो केमिस्ट्री मध्ये कोणत्या क्षेत्रात सर्वोत्तम करिअर आहे ?

बायोकमिस्ट्रीचे करिअर चांगले आहेत तुम्हाला अनेक क्षेत्रांमध्ये खूप संधी मिळतात त्यामध्ये फार्मासिटिकल इंडस्ट्री, बायोटेक्नॉलॉजी कंपन्या, क्लिनिकल बायोकेमिस्ट्री, अध्यापन व अकॅडमी इत्यादी क्षेत्रांमध्ये तुम्ही भरीव कार्य करू शकतात.

One response to “BSC Biochemistry Course बद्दल माहिती । BSC Biochemistry Course Information In Marathi 2026 |”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *