Btech Electrical And Electronics Engineering हा कोर्स काय आहे ?
- हा इंजिनिअरिंग अभ्यासक्रमांतर्गत येणारा चार वर्ष कालावधीचा डिग्रीस्तरावरील कोर्स आहे ज्याला सोप्या भाषेत EEE पण म्हणले जाते.
- यामध्ये मुख्यतः विद्युत संबंधित सर्व गोष्टींचा अभ्यास सखोल पद्धतीने शिकवला जातो ज्यामध्ये. ब्लेंडिंग इलेक्ट्रिकल पावर लार्जेस्टेंस, तसेच सिग्नल प्रोसेसिंग जे इलेक्ट्रिकल सर्किट्स असतात त्याबद्दल माहिती जे इलेक्ट्रॉनिक डिवाइस असतात जे आपण रोज वापरतो त्याबद्दलचा सखोल अभ्यास यावर केंद्रित हा अभ्यासक्रम आहे.
- यामध्ये वेगवेगळ्या नोकऱ्यांचा समावेश होतो जे आपण पुढे पाहणार आहोत ज्यामध्ये ऑटोमोटिव्ह टेलिकॉम आयटी या वेगवेगळ्या सेक्टर्समध्ये विद्यार्थ्यांना नोकरी मिळू शकते.
- हा कोर्स मुख्यतः पावर जनरेशन तसेच मोटार जे मोठे सर्किट्स असतात आणि त्यांचे ट्रान्समिशन याबाबत सखोल अभ्यासावर लक्ष केंद्रित करते तसेच हे इलेक्ट्रॉनिक्स इंजीनियरिंग मध्ये येते त्यामुळे मायक्रो इलेक्ट्रॉनिक्स तसेच त्याचे कम्युनिकेशन सिस्टीम डिजिटल लॉजिक आणि त्याचे पूर्णतः सिस्टीम कसे काम करते यांबाबत अभ्यास असतो आणि याचे काही सखोल विषय आहेत जसे कंट्रोल सिस्टीम सिग्नल त्याची प्रोसेस करणे तसेच सर्किट्स आणि त्याच्या थेरी या गोष्टींचा समावेश याच्या विषयांमध्ये होतो.
याचा कालावधी
- त्याचा कालावधी तुम्हाला चार वर्षाचा पाहायला मिळतो आणि यामध्ये तुम्हाला आठ सेमिस्टर पाहायला मिळतात आणि ही एक पूर्ण वेळ पदवी अभ्यासक्रम आहे.
याचा हेतु
- याचा हेतू आहे इलेक्ट्रिक सर्किट तसेच कंट्रोल सिस्टीम पावर इलेक्ट्रॉनिक्स आणि डिजिटल सिग्नल प्रोसेसिंग तसेच मायक्रोप्रोसेसर यांसारख्या विषयांचा समावेश यामध्ये होतो.
याचे मुख्य विषय
- इलेक्ट्रिक सर्किट्स, कंट्रोल सिस्टिम तसेच पावर इलेक्ट्रॉनिक्स डिजिटल सिग्नल प्रोसेसिंग मायक्रोप्रोसेसर अशा वेगवेगळ्या विषयांचा समावेश होतो.
याचे अध्ययन पद्धत
- यामध्ये कॉलेजमधील लेक्चर सोबत लॅबोरेटरी मध्ये प्रॅक्टिकल्स आणि इंडस्ट्रियल व्हिजिट्स तसेच प्रोजेक्ट आणि प्रॅक्टिकल्स वर विशेषतः भर दिला जातो.
Btech Electrical And Electronics Engineering यासाठी शैक्षणिक पात्रता कोणती ?
या अभ्यासक्रमाला प्रवेश मिळवण्यासाठी विद्यार्थ्यांनी बारावी पास करणे गरजेचे आहे ज्यामध्ये कंपल्सरी विषय म्हणजे फिजिक्स आणि मॅथेमॅटिक्स तसेच केमिस्ट्री किंवा कम्प्युटर सायन्स किंवा इलेक्ट्रॉनिक्स किंवा बायोलॉजी किंवा टेक्निकल चे वोकेशनल कोर्सेस जरी पूर्ण केले असतील यांपैकी एकही विषय असेल तरी विद्यार्थी यासाठी प्रवेश मिळवू शकतो.
विद्यार्थ्यांना बारावी मध्ये कमीत कमी 50 ते 60 टक्के मार्क असणे गरजेचे आहे पण जे विद्यार्थी एससी एसटी या प्रवर्गातून येतात त्या विद्यार्थ्यांना अतिरिक्त सूट दिली जाते.
याची पात्रता
- विद्यार्थी बारावी उत्तीर्ण असावा सायन्स स्ट्रीम मध्ये.
किमान गुण
- विद्यार्थ्याला किमान 50 टक्के गुण असणे आवश्यक आहे आणि प्रवर्गानुसार यामध्ये सवलत मिळू शकते तसेच विद्यार्थ्यांनी फिजिक्स केमिस्ट्री आणि मॅथेमॅटिक्स या विषयांमध्ये बारावी उत्तीर्ण केलेली असावी.
वयोमर्यादा
- या अभ्यासक्रमाला ऍडमिशन मिळवण्यासाठी किमान 16 वर्षे पूर्ण असावे.
याचा प्रवाह
- यासाठी बारावी मध्ये सायन्स ट्रीम तसेच गणित हा विषय अनिवार्य आहे.
Btech Electrical And Electronics Engineering याची ऍडमिशन प्रोसेस
याची ऍडमिशन प्रोसेस म्हणजेच प्रवेश पद्धत खूप सोपी आहे ज्यामध्ये विद्यार्थ्यांना सर्वप्रथम बारावी पास असणे गरजेचे आहे काही परीक्षा आहेत त्या देणे गरजेचे आहे जसं जेईई मेन्स जे ऍडव्हान्स कारण या परीक्षेचे जे गुण आहेत ते काही कॉलेजमध्ये त्या गुणांच्या आधारेच प्रवेश मिळतो.
पण असेही कॉलेज आहे तिथे फक्त बारावीच्या मार्कच्या आधारे तुम्हाला प्रवेश मिळतो. तसेच आपल्या महाराष्ट्रामध्ये सीईटी परीक्षा देणे पण गरजेचे आहे त्याचेही मार्क्स पाहिले जातात. आणि विद्यार्थी कोणत्याही कॉलेजमध्ये त्याच्या आवडीच्या कॉलेजेस मध्ये ऑनलाईन आणि ऑफलाइन दोन्ही पद्धतीने ऍडमिशन पूर्ण करू शकतो.
यामध्ये डॉक्युमेंट वेरिफिकेशन तसेच सीट अ लोकेशन आणि फी भरणे अशा वेगवेगळ्या पायऱ्यांचा समावेश होतो. या गोष्टी पूर्ण करून विद्यार्थी या अभ्यासक्रमासाठी प्रवेश मिळवू शकतो.
पात्रता तपासा
- तुमचे बारावीचे मार्क्स आणि पात्रता निकशात बसतात काही पहा
प्रवेश परीक्षा
- महाराष्ट्रात प्रवेशासाठी सीईटी ही मुख्य परीक्षा आहे तसेच राष्ट्रीय स्तरावर कॉलेज साठी तुम्हाला जे ई मेन परीक्षा देणे गरजेचे आहे.
कॉलेज निवडा
- तुमच्या रँकानुसार आणि सोयीनुसार कॉलेजची यादी तयार करा यासाठी हे आर्टिकल पूर्ण वाचा किंवा व्हिडिओ पण पाहू शकता.
अर्ज करा
- जेही कॉलेज हा कोर्स ऑफर करत आहेत अशा कॉलेजेसच्या वेबसाईट वरती जाऊन तुम्ही अर्ज करू शकता.
पसंती क्रम भरा
- जेही कॉलेज तुम्ही पसंत केले आहे अशा कॉलेजचा प्रेफरन्स फॉर्म भरू शकता.
डॉक्युमेंट वेरिफिकेशन
- अलॉटमेंट झाल्यानंतर कागदपत्रांची पडताळणी केली जाते आणि ते करून प्रवेश निश्चित करू शकता.
Btech Electrical And Electronics Engineering याचा कालावधी
याचा कालावधी चार वर्षाचा पहिला मिळतो या चार वर्षांमध्ये आठ सेमिस्टर चा अभ्यास विद्यार्थ्यांना करावा लागतो. म्हणजेच प्रत्येक वर्षात दोन सेमिस्टर पाहायला मिळतात वेगवेगळे जे विषय आहेत या चार वर्षांमध्ये अभ्यासायला मिळतात या चारी वर्षाचा अभ्यास पूर्ण केल्यानंतर विद्यार्थ्याला डिग्री सर्टिफिकेट मिळते जे विद्यार्थी कुठेही नोकरी मिळवण्यासाठी तसेच गव्हर्मेंट जॉबच्या तयारीसाठी सुद्धा त्याचा वापर करू शकतो.
या चार वर्षांमध्ये विद्यार्थ्यांच्या प्रोजेक्ट्स तसेच लॅब आणि फायनल इयर मध्ये म्हणजेच शेवटच्या वर्षांमध्ये हॅन्ड ऑन एक्सपिरीयन्स तसेच प्रॅक्टिकल्स वर लक्ष केंद्रित केले जाते.
याची रचना
पहिल्या वर्षात तुम्ही सर्व इंजिनिअरिंग शाखांचे मूलभूत विषय शिकता तसेच दुसऱ्या वर्षापासून खऱ्या अर्थाने इलेक्ट्रिक आणि इलेक्ट्रॉनिकचे मुख्य विषय अध्ययनाची सुरुवात होते.
यात तुम्ही काय शिकता
तुम्ही ट्रान्सफॉर्मर तसेच जनरेटर, सेमी कंडक्टर, डिव्हायसेस, आणि ऑटोमेशन सिस्टिम ची डिझाईन आणि टेस्टिंग शिकता.
Btech Electrical And Electronics Engineering याचे विषय आणि अभ्यासक्रम
| वर्ष १ (फाउंडेशन) सेमिस्टर १: | सेमिस्टर २: | वर्ष २ (कोअर ईईई) सेमिस्टर ३: | सेमिस्टर ४: |
| अभियांत्रिकी भौतिकशास्त्र/रसायनशास्त्र, गणित १, सी प्रोग्रामिंग, कम्युनिकेशन स्किल्स, बेसिक इलेक्ट्रिकल/इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंग. | गणित २, अभियांत्रिकी रेखाचित्र, कार्यशाळा सराव, मूलभूत प्रयोगशाळा. | सर्किट थिअरी/नेटवर्क विश्लेषण, डिजिटल इलेक्ट्रॉनिक्स/लॉजिक डिझाइन, | सिग्नल्स आणि सिस्टम्स, इलेक्ट्रिकल मशीन्स II, मापन आणि इन्स्ट्रुमेंटेशन, |
| वर्ष ३ | सेमिस्टर ५/६: | सेमिस्टर ७ | सेमिस्टर ८: |
| कंट्रोल सिस्टम्स, अॅनालॉग इलेक्ट्रॉनिक्स, पॉवर इलेक्ट्रॉनिक्स, कम्युनिकेशन सिस्टम्स, डिजिटल सिग्नल प्रोसेसिंग, व्हीएलएसआय डिझाइन. | अॅडव्हान्स्ड पॉवर सिस्टम्स, पॉवर सिस्टम प्रोटेक्शन, रिन्यूएबल एनर्जी, रोबोटिक्स (इलेक्ट्रॉनिक्स), प्रोजेक्ट वर्क, सेमिनार. |
(स्पेशलायझेशन स्टार्ट्स) इलेक्ट्रोमॅग्नेटिक थिअरी, इलेक्ट्रिकल मशीन्स १, ट्रान्सफॉर्म्स आणि पीडीई. |
पॉवर सिस्टम्स (ट्रान्समिशन/डिस्ट्रिब्यूशन), मायक्रोप्रोसेसर. |
प्रॅक्टिकल्स
मोटार रिवायडींग तसेच पीसीबी डिझाईनिंग, आणि सिमुलेशन, सॉफ्टवेअर, वर प्रॅक्टिकल्स होतात.
प्रथम वर्षात काय शिकता ?
विज्ञानाचे अभियांत्रिकी मधील उपायोजन आणि त्यांचे मूलभूत तांत्रिक कौशल्य तुम्ही शिकता.
शेवटच्या वर्षात काय शिकता ?
इंडस्ट्रीला लागणारे स्पेशल आइजेशन तंत्रज्ञान आणि स्वतःचा एक स्वतंत्र प्रोजेक्ट पूर्ण करणे हे तुम्ही शेवटच्या वर्षात शिकतात.
Btech Electrical And Electronics Engineering याचे कॉलेजेस
सरकारी/स्वायत्त (कमी शुल्क):
- आयआयटी मुंबई: ~₹९.१२ लाख (उच्च प्रतिष्ठित).
- व्हीजेटीआय, मुंबई: ~₹३ लाख. सीओईपी, पुणे: (सध्याच्या, सामान्यतः परवडणाऱ्या, नवीनतम शुल्कासाठी अधिकृत वेबसाइट तपासा).
- वालचंद कॉलेज, सांगली: (सरकारी, परवडणाऱ्या).
खाजगी (जास्त शुल्क):
- भारती विद्यापीठ (पुणे): ~₹३-४ लाख.
- व्हीआयआयटी, पुणे: (साइट तपासा, सामान्यतः मध्यम श्रेणी).
- एमआयटी-डब्ल्यूपीयू, पुणे: ~₹९-१३ लाख.
- एसपीआयटी, मुंबई: (साइट तपासा).
सरासरी शुल्क
सरकारी कॉलेजमध्ये फी कमी असते खाजगी कॉलेजमध्ये स्कॉलरशिप उपलब्ध असतात.
प्लेसमेंट
तुम्ही जर चांगल्या कॉलेजमधून हा अभ्यासक्रम पूर्ण केल्या तर सहाव्या सेमिस्टर पासून कंपन्यांची प्लेसमेंट येतात.
Btech Electrical And Electronics Engineering यामध्ये करिअर आणि संधी
- डिझाइन आणि विकास: इलेक्ट्रिकल डिझाइन इंजिनिअर, इलेक्ट्रॉनिक्स डिझाइन इंजिनिअर, एफपीजीए इंजिनिअर, एम्बेडेड सिस्टम्स इंजिनिअर, व्हीएलएसआय डिझाइन इंजिनिअर, अॅनालॉग/आरएफ इंजिनिअर.
- पॉवर सिस्टम्स: पॉवर इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअर, इलेक्ट्रिकल डिस्ट्रिब्यूशन इंजिनिअर, प्रोजेक्ट इंजिनिअर, फील्ड इंजिनिअर.
- कंट्रोल आणि ऑटोमेशन: कंट्रोल्स इंजिनिअर, इन्स्ट्रुमेंटेशन इंजिनिअर.
- सॉफ्टवेअर आणि हार्डवेअर: सॉफ्टवेअर इंजिनिअर, संगणक हार्डवेअर इंजिनिअर, टेस्ट इंजिनिअर.
- मॅनेजमेंट: इंजिनिअरिंग मॅनेजर (अनुभवासह).
अशा वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये जॉब मिळू शकतो तसेच विद्यार्थी सरकारी नोकरीसाठी सुद्धा प्रयत्न करू शकतात या डिग्रीच्या प्रमाणपत्राच्या आधारे विद्यार्थी वेगवेगळ्या गव्हर्मेंट जॉब साठी सुद्धा प्रयत्न करू शकतात.
विद्यार्थी उच्च शिक्षणासाठी सुद्धा याचा वापर करू शकता आणि चांगल्या स्किल्स तसेच चांगले भविष्य घडवू शकता.
सरकारी नोकऱ्या
- महावितरण तसेच रेल्वे विभाग त्यामध्ये भेल यांसारख्या मोठ्या संस्थांमध्ये सरकारी नोकऱ्या निघतात तिथे तुम्ही फॉर्म भरू शकतात.
खाजगी नोकऱ्या
- टाटा मोटर्स, सिमेंस, शेंडर इलेक्ट्रिक, सॅमसंग, इंटेल या कंपन्यांमध्ये मोठी मागणी आहे
उच्च शिक्षण
- तुम्ही उच्च शिक्षणासाठी एमटेक करू शकता किंवा परदेशातून एम एस करू शकता तसेच व्यवसायात रस असल्यास एमबीए हा पर्याय आहे तुमच्यासाठी अवेलेबल आहे.
स्वतःचा व्यवसाय
- सोलर पॅनल इन्स्टॉलेशन तसेच इलेक्ट्रिक पॅनल मॅन्युफॅक्चरिंग किंवा ईव्ही रिपेरिंग स्टार्टअप सुरू करता येते.
8. हा कोर्स केल्यानंतर पुढील संधी
- इलेक्ट्रॉनिक्स इंजिनियर – यांना प्रोजेक्ट मॅनेजमेंट तसेच इलेक्ट्रॉनिक प्रोडक्ट्स यामध्ये सखोल ज्ञान असते ज्याचा वापर करून हे वेगवेगळे प्रॉडक्ट्स बनवू शकतात सिस्टीमला मॅनेज करू शकतात. पगार चार लाख वार्षिक
- ऑपरेशन इंजिनियर – ते प्रोजेक्टचे ऑपरेशन पाहतात ज्यामध्ये काही त्रुटी असतील तर त्याला दूर करणे जे अडचणी असतील त्या दूर करणे असे काम यांचे असते. पगार साडेचार लाख वार्षिक
- सॉफ्टवेअर इंजिनियर – यांचे काम असते वेगवेगळे सॉफ्टवेअर्स बनवणे त्या सॉफ्टवेअर बरोबर काम करतात का ते पाहणे आणि हे काम ते कोणत्याही कंपनीसाठी कोणत्याही टीम साठी करू शकतात. पगार सहा लाख वार्षिक.
- प्रोजेक्ट मॅनेजर – प्रोजेक्ट मॅनेजरचे काम असते जो ही प्रकल्प म्हणजेच प्रोजेक्ट आहे तो सुरुवातीपासून अखेरपर्यंत पाहणे. जो ही प्रकल्प सुरू आहे जे ही लोक यामध्ये कार्यरत आहेत त्यांना मार्गदर्शन करणे. पगार 15 लाख वार्षिक.
मुख्य कंपन्या
हॅवेल्स तसेच फिलिप्स आणि एल अँड टी सारख्या मुख्य कंपन्यांमध्ये नोकरी मिळू शकते.
सरासरी पगार
सुरुवातीचा वार्षिक पगार हा 4 लाख ते नऊ लाख पर्यंत मिळू शकतो आणि कौशल्यानुसार हा पगार खूप वाढतो.
Btech Electrical And Electronics Engineering हा कोर्स का आणि कोणी निवडावा.
- ज्या विद्यार्थ्यांना इलेक्ट्रिकल अँड इलेक्ट्रॉनिक्स इंजीनियरिंग मधील सर्व विषय आवडतात किंवा आवड निर्माण करावयाची आहे ज्या विद्यार्थ्यांना भविष्यातील संधी जसे की हाय डिमांडिंग नोकऱ्या आर्टिफिशल इंटेलिजन्स नवीन नवीन यामध्ये कार्य करायचे आहे.
- तसेच ज्या विद्यार्थ्यांना नवनवीन टेक्नॉलॉजीला पाहणे त्यामधील त्रुटी दूर करणे किंवा त्या कशा काम करतात हे जाणून घेणे आवडत असेल तर अशा विद्यार्थ्यांनी हा कोर्स नक्की निवडावा.
- कारण याच्यामध्ये हाय डिमांड आणि जॉब सिक्युरिटी आहे आयटी सेक्टर असेल किंवा टेक इंडस्ट्री असतील तिथे विद्यार्थ्यांना जॉब मिळतो यामध्ये नोकऱ्यांचे मार्गही आहेत आणि उच्च दर्जाचे पगारही मिळतात.
तसेच जागतिक संधी पण यामध्ये पाहायला मिळतात आणि सर्व दरवाजे विद्यार्थ्यांसाठी खुले आहेत.
मागणी
सध्या इलेक्ट्रिक गाड्यांची क्रांती सुरू आहे आणि खूप ट्रेंड ही आहे त्यामुळे इंजिनिअरची मागणी प्रचंड वाढली आहे.
पगार
तांत्रिक कौशल्य आत्मसात असल्यास पगारवाढ वेगाने होतो.
संशोधन
स्मार्ट क्रीडा आणि ऑटोमेशन चे सध्या खूप ट्रेंड आहे त्यामुळे यामध्ये खूप संधी उपलब्ध आहेत.
निवडण्याचे कारण
हा कोर्स तुम्हाला भविष्यातील तंत्रज्ञानाशी जोडून ठेवण्याचे काम करतो.
मित्रांनो यामध्ये वेगवेगळे नोकऱ्या तसेच उच्चतम पगारही मिळू शकतो पण माझ्या माहितीप्रमाणे हे सर्व तुमच्या कौशल्यावर आणि तुमच्या उच्च शिक्षणावर आधारित आहे – पृथ्वीराज चंदनशिव
Btech Electrical And Electronics Engineering याबद्दल विचारली गेलेली प्रश्न
Btech Electrical And Electronics Engineering हा कोर्स केल्यानंतर पुढील संधी कशा आहेत ?
यानंतर पुढील संधी जसं की इलेक्ट्रिकल डिझायनर इंजिनियर तसेच पावर सिस्टिम इंजिनिअर असे वेगवेगळ्या नोकऱ्या विद्यार्थ्यांना मिळू शकतात.
Btech Electrical And Electronics Engineering यामध्ये उच्चतम पगार मिळतो का ?
हो यामध्ये उत्तम स्तराचा पगार मिळू शकतो पण हे सर्व विद्यार्थ्यांच्या अभ्यासक्रमावर त्यांनी तो अभ्यासक्रम कसा पूर्ण केला आहे यावर आधारित आहे.
Btech Electrical And Electronics Engineering हा कोर्स भविष्यासाठी चांगला आहे का ?
हो हा कोर्स भविष्यासाठी चांगला आहे यामध्ये आर्टिफिशल इंटेलिजन्स तसेच स्मार्ट ग्रेट चा समावेश आहे त्यामुळे यामधील नोकऱ्या ज्या आहेत त्या भविष्यामध्ये सुद्धा टिकणाऱ्या आहेत.
Btech Electrical And Electronics Engineering यातून मिळणाऱ्या नोकऱ्यांमध्ये सरासरी पगार किती राहतो ?
यामधून मिळणाऱ्या नोकऱ्यांमध्ये सरासरी पगार हा 4 लाखापासून पुढे 15 लाखापर्यंत वार्षिक असू शकतो.
Btech Electrical And Electronics Engineering या कोर्स नंतर उच्चतम शिक्षण काय करू शकतात ?
हा कोर्स पूर्ण केल्यानंतर विद्यार्थी पुढे एमटेक करू शकतो तसेच एमबीए पण करू शकतो त्यामध्ये वेगवेगळे स्पेसिलायझेशन्स आहेत जसं पावर इलेक्ट्रॉनिक्स कंट्रोल सिस्टिम्स यामध्ये विद्यार्थी हा कोर्सेस करू शकतात.