BSC Computer Science: करिअरची दिशा आणि वास्तव – एक सविस्तर मार्गदर्शक
बारावीचा निकाल लागला की, सायन्सच्या विद्यार्थ्यांमध्ये आणि पालकांमध्ये सगळ्यात जास्त चर्चा होणारा विषय म्हणजे ‘BSc Computer Science’. पण हा कोर्स म्हणजे फक्त कॉम्प्युटरसमोर बसून गेम खेळणे किंवा साधे टायपिंग करणे नाही. आजच्या धावपळीच्या युगात, जिथे सगळीकडे AI आणि सॉफ्टवेअरची चर्चा आहे, तिथे या क्षेत्राचे महत्त्व नक्कीच वाढले आहे.
पण हा कोर्स सर्वांसाठी योग्य नाही. अनेक विद्यार्थी फक्त मित्राने प्रवेश घेतला म्हणून किंवा ‘आयटीमध्ये खूप पैसा आहे’ हे ऐकून इथे येतात आणि नंतर अडकतात. आपण या लेखात या कोर्सच्या सर्व बाजू अगदी मोकळेपणाने समजून घेऊया.
१२ वी नंतर हा कोर्स करावा का? BSC Computer Science
बारावी सायन्स झाल्यानंतर इंजिनिअरिंगला (BE/BTech) पर्याय म्हणून या कोर्सकडे पाहिले जाते. जर तुम्हाला गणिताची आवड असेल आणि लॉजिकल गोष्टींमध्ये रस असेल, तर हा एक उत्तम मार्ग आहे. कमी खर्चात आणि ३ वर्षात तुम्ही आयटी इंडस्ट्रीसाठी तयार होऊ शकता.
बीएससी कॉम्प्युटर सायन्स म्हणजेच बीएससी.
हा तीन वर्षांचा पदवी पूर्व अभ्यासक्रम आहे ज्यामध्ये कॉम्प्युटर सायन्स कॉम्प्युटर टेक्निकल आणि त्याच्या सर्विसेस संबंधी विषय आणि विषयांशी संबंधित आहे.
त्या अभ्यासक्रमाचे मुख्य उद्दिष्ट म्हणजे कॉम्प्युटर सिस्टीम आणि सॉफ्टवेअरच्या टेक्नॉलॉजी ची अंमलबजावणी करून जगातील प्रत्येक क्षेत्रात काम करू शकणारे दर्जेदार व्यवसायिक बनवणे.
बीएससी कॉम्प्युटर सायन्स शुल्क हे महाविद्यालय आणि विद्यापीठांवर अवलंबून असते तरी तीन ते आठ लाखांच्या दरम्यान असू शकते.
परदेशात बीएससी कॉम्प्युटर सायन्स अभ्यास करण्यासाठी विद्यार्थ्यांना IELTS, TOEFL, PTE यासारख्या विविध इंग्रजी प्रवीणता परीक्षा उत्तीर्ण होणे आवश्यक असते.
हा अभ्यासक्रम विद्यार्थ्यांना वास्तविक जगात प्रवेश करण्यासाठी आणि त्यांचे करिअर घडवण्यासाठी खूप काही योगदान देतो यामध्ये महत्वकांशी कॉम्प्युटर सायन्स सॉफ्टवेअर डेव्हलपर सिस्टिम इंटिग्रेटर सिस्टिम ऍनालिस्ट आणि इतर जॉब प्रोफाइल म्हणून त्यांचे कशल्य प्रदर्शित करू शकतात. बीएससी कॉम्प्युटर सायन्स पदवीधर सहा ते आठ लाख रुपये पर्यंत पगार मिळू शकतो.
आजच्या युगात या कोर्सचे महत्त्व
आज भाजीवाल्यापासून ते मोठ्या बँकांपर्यंत सर्व काही ‘डिजिटल’ झाले आहे. हे डिजिटल जग चालवण्यासाठी कोडर्स आणि डेव्हलपर्सची गरज असते. त्यामुळे केवळ पदवी म्हणून नाही, तर एक ‘स्किल’ म्हणून या कोर्सचे महत्त्व अफाट आहे.
हा कोर्स कोणासाठी योग्य आहे व कोणासाठी नाही? (माझे मत)
अनेक विद्यार्थी इथे चूक करतात… त्यांना वाटते की कॉम्प्युटर सायन्स म्हणजे फक्त लॅपटॉपवर काम करणे. पण यात खूप जास्त मॅथेमॅटिक्स आणि लॉजिक असते.
-
कोणासाठी योग्य: ज्यांना कोडींगची आवड आहे, जे तासनतास एका प्रॉब्लेमवर विचार करू शकतात.
-
कोणासाठी नाही: ज्यांना गणिताचा तिरस्कार आहे किंवा ज्यांना फक्त ‘एसी’ मध्ये नोकरी हवी आहे म्हणून इथे यायचे आहे. मेहनतीशिवाय इथे टिकणे अवघड आहे.
मॉडर्न AI च्या युगात या कोर्सचे महत्त्व
Chat GPT आणि AI मुळे नोकऱ्या जातील अशी भीती घातली जातेय. पण वास्तव असे आहे की, हे AI चालवण्यासाठी देखील ‘कॉम्प्युटर सायन्स’ समजणाऱ्या लोकांचीच गरज आहे. फक्त आता तुम्हाला केवळ कोडिंग नाही, तर AI टूल्स वापरता येणेही गरजेचे झाले आहे.
आता ‘NEP’ (नवीन शैक्षणिक धोरण) मुळे या कोर्सच्या संरचनेत बदल होत आहेत. आता हा कोर्स अधिक प्रॅक्टिकल आणि इंडस्ट्रीला हवा तसा बनवला जात आहे. केवळ पुस्तकी ज्ञान आता इतिहास जमा होत आहे.
परदेशात या कोर्सबद्दल काय शिकवले जाते?
भारतात आपण अजूनही काही जुन्या सिद्धांतांवर भर देतो, पण परदेशात (उदा. अमेरिका किंवा जर्मनी) सुरुवातीपासूनच ‘प्रोजेक्ट बेस्ड लर्निंग’वर भर दिला जातो. तिथले विद्यार्थी पहिल्या वर्षापासून स्वतःचे ॲप्स बनवण्यावर काम करतात.
बारावीतील कुठले विषय महत्त्वाचे आहेत?
जर तुमचे गणित (Mathematics) पक्के असेल, तर तुम्हाला हा कोर्स सोपा जाईल. फिजिक्सचे लॉजिकही इथे कामाला येते. बायोलॉजी असलेल्या विद्यार्थ्यांना थोडी जास्त मेहनत घ्यावी लागू शकते.
विद्यार्थ्यांमधील गैरसमज
सगळ्यात मोठा गैरसमज म्हणजे: “BSc CS केले की लगेच लाखो रुपयांचे पॅकेज मिळते.” मित्रांनो, डिग्री तुम्हाला मुलाखतीपर्यंत नेईल, पण नोकरी तुमचे ‘कौशल्य’ (Skills) मिळवून देईल. पदवी म्हणजे नोकरीची गॅरंटी नाही.
Bsc In Computer Science बद्दल माहिती Youtube वर पहा ।
कोर्स निवडताना महत्त्वाचे प्रश्न
प्रवेश घेण्यापूर्वी स्वतःला विचारा:
-
मला कोडिंगमध्ये रस आहे का?
-
मी सतत नवीन गोष्टी शिकायला तयार आहे का?
-
माझ्या कॉलेजमध्ये लॅबची सोय चांगली आहे का?
शैक्षणिक पात्रता
अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेण्यासाठी शैक्षणिक पात्रतेचे खालील निकष असतात.
- विद्यार्थ्यांनी मान्यता प्राप्त मंडळातून उच्च माध्यमिक वर्ग इयत्ता बारावी मध्ये 50 ते 60 टक्के गुणांसह उतरण केलेले असावे.
- विद्यार्थी हा भौतिकशास्त्र रसायनशास्त्र आणि गणितासह सायन्स असावा त्या विद्यापीठांमध्ये कॉम्प्युटर सायन्स असणे देखील अपरिहार्य आहे.
- Middle entry साठी प्रवेशनासाठी काही विद्यापीठे किंवा महाविद्यालय थेट दुसऱ्या वर्षाला प्रवेश देतात ज्यामध्ये विद्यार्थ्याने अभ्यासक्रमाच्या मागच्या वर्षी त्याच्यात किमान 75 टक्के गुण किंवा दहावीनंतर टेक्निकल क्षेत्रामध्ये तीन वर्षांचा डिप्लोमा करणे आवश्यक असते.
- त्यानंतर ते थेट दुसऱ्या वर्षाला प्रवेश दिला जातो.
- आंतरराष्ट्रीय उमेदवारांसाठी पात्रतेचा आधार उत्तीर्ण मूल्यांकनात किमान 50 टक्के गुण असणे आवश्यक असते.
महाराष्ट्रातील प्रवेश प्रक्रिया व काही महत्त्वाची कॉलेजेस
महाराष्ट्रात प्रामुख्याने मुंबई, पुणे, नागपूर आणि कोल्हापूर ही शहरे शिक्षणाची केंद्रे आहेत. फर्ग्युसन (पुणे), रूपारेल (मुंबई), गरवारे यांसारखी कॉलेजेस यासाठी प्रसिद्ध आहेत. बहुतांश ठिकाणी मेरिट लिस्टवर प्रवेश मिळतो.
प्रवेशासाठी लागणारे मार्क्स आणि एन्ट्रन्स एक्झाम
याचे ऍडमिशन प्रोसेस मध्ये दोन प्रकार आहेत ह्यामध्ये गुणवत्तेवर आधारित प्रवेश असतो आणि प्रवेश परीक्षा वर आधारित प्रवेश असतो.
काही नामांकित कॉलेजेस स्वतःची एन्ट्रन्स घेतात, तर काही ठिकाणी १२ वीच्या मार्कांवर प्रवेश मिळतो. साधारणपणे ६०-७०% च्या वर मार्क्स असणाऱ्या विद्यार्थ्यांना चांगल्या कॉलेजमध्ये संधी मिळते. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी CET च्या अपडेट्सकडे लक्ष ठेवणे गरजेचे आहे.
गुणवत्तेवर आधारित प्रवेश:
- बहुतेक महाविद्यालयाने विद्यापीठ बीएससी कॉम्प्युटर सायन्स कार्यक्रमात गुणउत्तेवर आधारित प्रवेश घेतात.
सर्व अर्ज भरल्यानंतर महाविद्यालय कट ऑफ यादी जाहीर करतात आणि कट ऑफ पूर्ण करणार विद्यार्थी त्या विशिष्ट महाविद्यालयात किंवा विद्यापीठात प्रवेश घेण्यामध्ये पात्र असतात. - प्रवेश प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी विद्यार्थ्यांना प्रवेश शुल्क भरावे लागते.
प्रवेश परीक्षेवर आधारित प्रवेश:
- काही महाविद्यालयांमध्ये आणि विद्यापीठांमध्ये विद्यार्थ्यांची निवड करण्यासाठी प्रवेश परीक्षा घेतली जाते आणि त्याद्वारे प्रवेश निश्चित केले जातात.
- या परीक्षांच्या अभ्यासक्रमात फिजिक्स केमिस्ट्री गणित यांसारख्या विषयांचे दहावी बारावी लेवलचे कठीणता असणारे प्रश्न असतात त्यामध्ये कॉमन इंग्लिश चाही समावेश असतो.
- प्रवेश परीक्षेतील कामगिरीला किंवा मार्कांना 60% महत्व दिले जाते आणि बारावीत मिळालेल्या गुणांना 40 टक्के महत्त्व दिले जाते त्यानुसार मेरिट लिस्ट लावली जाते.
- प्रत्येक महाविद्यालयाच्या प्रवेश परीक्षेमध्ये फरक असू शकतो याची संपूर्ण माहिती अचूकपणे आपल्याला महाविद्यालयाच्या ऑफिशियल वेबसाईटला भेट देऊनच मिळवता येते ती वेबसाईट आपण सतत चेक करत राहिले पाहिजे.
- उमेदवारांनी आवश्यक तपशील बारावी आणि अर्ज शुल्क सादर करावी त्याची पावती ठेवावी.
- परीक्षेच्या दिवशी विद्यार्थ्यांनी परीक्षा चांगल्या प्रकारे देण्याचा प्रयत्न करावा.
- मार्कांच्या आधारे आपली मेरिट लिस्ट आणि कट ऑफ गुणांची यादी लावली जाईल त्यानुसार आपण कटऑफ दिनाच्या वरच्या भागात असेल तर आपले सिलेक्शन होऊ शकते निवड झाल्यानंतर उमेदवारांनी समुपदेशन प्रक्रियेला उपस्थित राहून जागा निश्चित करून ऍडमिशन घ्यावे.
BSC Information Technology IT बद्दल माहिती
कालावधी
बीएससी कॉम्प्युटर सायन्स हे तीन वर्षांच्या असते त्यामध्ये सेमिस्टर पद्धतीने असते त्यामुळे टोटल सेमिस्टर सहा होतात.
सरासरी फी 50 हजार रुपये ते दीड लाख प्रति वर्ष इतकी असू शकते.
आपल्या जाती प्रवर्गानुसार या फी मध्ये फरक पडतो.
सत्र पद्धतीचा अभ्यासक्रम (Syllabus) BSC Computer Science
हा कोर्स ६ सेमिस्टरमध्ये विभागलेला असतो. यात C, C++, Java, Python यांसारख्या लँग्वेजेस, डेटाबेस मॅनेजमेंट आणि ऑपरेटिंग सिस्टिम यांसारखे विषय असतात.
बीएससी कॉम्प्युटर सायन्स हा प्रोग्रॅम 6 सेमिस्टर मध्ये विभागलेला असतो अभ्यासक्रम अशाप्रकारे बनवण्यात आलेला असतो की त्यामध्ये विद्यार्थ्यांना कॉम्प्युटर सायन्स आणि सॉफ्टवेअर संबंधित सर्व माहिती मिळू शकते तर सेमिस्टर निहाय आपण खालील विषयांची यादी पाहूया.
| सेमिस्टर वन |
|
| सेम टू |
|
| सेम थ्री |
|
| सेमिस्टर फोर |
|
| सेमिस्टर फाईव्ह |
|
| सेमिस्टर सिक्स |
|
प्रॅक्टिकल नॉलेज आणि ऑन-साईट वर्क
कॉम्प्युटर सायन्स हे पोहायचे शिकण्यासारखे आहे; पुस्तकात वाचून पोहता येत नाही, पाण्यात उतरावे लागते. तसेच, लॅबमध्ये जाऊन स्वतः कोड रन केल्याशिवाय तुम्हाला हा विषय समजणार नाही.
काही महत्वाच्या संस्था
| गव्हर्नमेंट कॉलेज |
|
| प्रायव्हेट कॉलेज |
|
सरकारी नोकरीसाठी उपयोगी आहे का? BSC Computer Science
हो, नक्कीच! UPSC/MPSC सोबतच बँकिंग क्षेत्रात ‘IT Officer’ म्हणून अनेक जागा निघतात. तसेच रेल्वे आणि संरक्षण दलातही कॉम्प्युटर ग्रॅज्युएट्सना मागणी असते.
बीएससी कॉम्प्युटर सायन्स हे सर्वात जास्त पगार देणाऱ्या बीएससी स्पेशलिजेशन पैकी एक आहे असे आपण म्हणू शकतो कारण या कोर्समध्ये अनेक नोकऱ्या आणि करिअर संधी हे देशात आणि परदेशांमध्येही उपलब्ध आहे ज्यामध्ये तुम्हाला सरासरी वार्षिक पगार हा आठ ते दहा लाख रुपये मिळू शकतो जो की इतर सर्व बीएससी पेक्षा तुलनेने थोडा जास्त आहे.
बँक आयटी डिपार्टमेंट टेक्निकल सपोर्ट सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट रिसर्च अँड डेव्हलपमेंट टेक कन्सल्टंट सेक्युरिटी मधले आयटी चे विभाग इत्यादी सर्व क्षेत्रांमध्ये आपल्याला नोकरीच्या संधी उपलब्ध असतात.
यामध्ये काही प्रमुख जॉब प्रोफाइल्स या सिस्टीम इंजिनिअर सॉफ्टवेअर इंजिनिअर सॉफ्टवेअर डेव्हलपर कॉम्प्युटर हार्डवेअर ऑपरेटर इत्यादींचा समावेश होतो.
परदेशात नोकरीच्या संधी आणि मागणी
जर तुम्ही यानंतर MSc किंवा MCA केले, तर अमेरिका, कॅनडा आणि युरोपमध्ये सॉफ्टवेअर इंजिनिअर्सना खूप मागणी आहे. तिथे सुरुवातीचे पॅकेज भारतीय रुपयांत ४०-६० लाखांच्या घरात असू शकते.
फ्रेशर्ससाठी सुरुवातीचा पगार (Reality Check)
खरे सांगायचे तर, सुरुवातीला पगार खूप मोठा नसतो. पुण्या-मुंबईत एका फ्रेशरला महिना १५,००० ते २५,००० रुपये मिळू शकतात. पण २-३ वर्षांच्या अनुभवानंतर हा पगार झपाट्याने वाढतो.
खाली काही जॉब प्रोफाइल आणि त्यांचे कामाचे स्वरूप व पगार दिलेले आहे
| आयटी सुपरवायझर | आयटी सुपरवायझर पर्यवेक्षण करण्यासाठी आणि नवीन भरती करणाऱ्यांना प्रशिक्षण देण्यासाठी किंवा आयटी कंपनीचा विभाग कार्यक्षमतेने सुरू आहे याची खात्री करण्यासाठी जबाबदारी असतात. | पगार चार ते सहा लाख रुपये |
| नेटवर्क इंजिनिअर | नेटवर्क इंजिनियर हे टेक्निकल एक्सपर्ट असतात जे कॉम्प्युटर नेटवर्क स्थापित करण्यासाठी आणि देखभाल करण्यासाठी जबाबदार असतात | पगार चार ते पाच लाख रुपये |
| टेक्निकल रायटर | टेक्निकल रायटर टेक्निकल फिल्डमध्ये आवश्यक असणारी मॅन्युअल जर्नल आणि इत्यादी कागदपत्र तयार करतो | पगार पाच ते सात लाख रुपये |
|
सॉफ्टवेअर क्वालिटी इन्शुरन्स टेस्ट SQA |
एसक्यूए टेस्टर सहजा सॉफ्टवेअर आणि अनुप्रयोग यामध्ये त्रुटींचे मूल्यांकन करतात डीबग आणि एरर कोड काढण्यासाठी समस्या ओळखण्यासाठी त्यांची जबाबदारी असते. |
पगार |
| यु आय / यु एक्स डेव्हलपर | यु आर यु एक्स डेव्हलपर मेनू टॅब विजेट्स इत्यादी ग्राफिकल युजर इंटरफेस डिझाईन करतात. | पगार सहा ते आठ लाख रुपये |
| सॉफ्टवेअर इंजिनिअर | वेगवेगळ्या पद्धतीने साधनांच्या मदतीने सॉफ्टवेअर सोल्युशन विकसित करण्याची जबाबदारी घेतात ते प्रोग्राम येथे ठरवून डिझाईन करून सोल्युशन तयार करतात. | पगार सहा ते दहा लाख रुपये |
| वेबसाईट डेव्हलपर | वेबसाईट डेव्हलपर्स वेबसाईटच्या तांत्रिक भागासाठी जबाबदार असतात त्या प्रामुख्याने कार्यक्षम कोड लिहितात आणि कंपनीच्या अथवा ज्यांनी काम नेमून दिलेले आहे त्यांच्या गरजेनुसार विविध प्रकारच्या वेबसाईट डेव्हलप करण्यासाठी सर्वोत्तम कोडिंग बनवतात. | पगार चार ते सात लाख रुपये |
| मोबाईल ॲप डेव्हलपर | वेबसाईट डेव्हलपर्स प्रमाणेच मोबाईल ॲप डेव्हलपर वर मोबाईल साठी महत्त्वाचे आणि कार्यक्षम एप्लीकेशन डेव्हलप करण्याची जबाबदारी असते. | पगार पाच ते सहा लाख रुपये |
स्वतःचा व्यवसाय (Startup) काय करू शकता? BSC Computer Science
तुम्ही स्वतःची वेब डेव्हलपमेंट एजन्सी सुरू करू शकता, फ्रीलान्सिंग करू शकता किंवा एखादे ॲप बनवून स्टार्टअप सुरू करू शकता. आजचे अनेक करोडपती हे कॉम्प्युटर सायन्स बॅकग्राउंडचेच आहेत.
नोकरी शोधताना विद्यार्थ्यांच्या चुका
अनेक विद्यार्थी फक्त डिग्री हातात घेऊन नोकरी शोधतात. त्यांच्याकडे कोणतेही ‘लाईव्ह प्रोजेक्ट’ किंवा ‘पोर्टफोलिओ’ नसतो. नुसते पाठांतर करून इंटरव्ह्यू पास होता येत नाही, हे विद्यार्थ्यांनी समजून घेतले पाहिजे.
पगारापेक्षा कौशल्य का महत्त्वाचे आहे?
सुरुवातीला कमी पगाराची नोकरी मिळाली तरी चालेल, पण जिथे शिकायला मिळेल तिथे जा. आयटी क्षेत्रात तुमची किंमत तुमच्या पदवीवर नाही, तर तुम्ही किती कठीण प्रॉब्लेम सोडवू शकता, यावर ठरते.
पुढील २० वर्षांचा विचार आणि माझा प्रामाणिक सल्ला
पुढील दोन दशके तंत्रज्ञानाचीच असणार आहेत. पण त्यात टिकण्यासाठी तुम्हाला ‘आयुष्यभर शिकणारा विद्यार्थी’ (Lifelong Learner) बनावे लागेल. माझा सल्ला हाच आहे की, तंत्रज्ञानाची मनापासून आवड असेल तरच या क्षेत्रात या, केवळ पैशासाठी येऊ नका.
काही पुढील संधी
जसे की आपण आत्ताच पाहिल्याप्रमाणे बीएससी कॉम्प्युटर सायन्स केल्यानंतर आपण वेगवेगळ्या नोकऱ्या जॉब प्रोफाइल करू शकतो आणि चांगले पैसे कमवू शकतो.
त्यानंतर उच्च शिक्षणाच्या बाबतीत विद्यार्थी बीएससी कॉम्प्युटर सायन्स नंतर सायन्स आर्टिफिशियल इंटेलिजन्स डेटा सायन्स इत्यादी अनेक विषयांमध्ये अभ्यासक्रमांना जाऊ शकतात.
- एम एस सी कॉम्प्युटर सायन्स
- एम एस सी सॉफ्टवेअर टेक्नॉलॉजी इंजीनियरिंग
- एम एस सी डेटा सायन्स
- एम एस सी डेट ॲनालिटिक्स
- एम एस सी इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी
- एम एस सी सायबर सुरक्षा
त्यानंतर मास्टर ऑफ बिझनेस ऍडमिनिस्ट्रेशन एमबीए किंवा पीजीडीएम सारखे इतर पर्याय देखील उपलब्ध असतात जे तुम्हाला व्यवस्थापन क्षेत्रात किंवा मॅनेजमेंट क्षेत्रात तुमचे करिअर घडवण्यास मदत करतात मग ते आयटी किंवा इतर कुठल्याही क्षेत्रांमध्ये आपण करू शकतो.
हा कोर्स कोण निवडू शकतो ? BSC Computer Science
ज्या विद्यार्थ्यांना कॉम्प्युटर हार्डवेअर सॉफ्टवेअर या दोन्हींमध्ये ही इंटरेस्ट आहे त्यांनी हे क्षेत्र पूर्ण वेळ म्हणून निवडू शकता
ज्या उमेदवारांनी लोकांचे जीवन सोपे करणारे मोबाईल ॲप्लिकेशन किंवा सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट करायचे आहे त्यांनी हे क्षेत्र निवडू शकता.
परिपूर्ण केल्यानंतर उद्योजक बनवू शकता ना उमेदवारी अभ्यासक्रमाची निवड करू शकतात त्यामुळे त्यांना स्वतःची स्वतःची सल्लागार कंपनी सुरू करू शकतो तसेच या क्षेत्रामध्ये आपण खूप कमी भांडवलामध्ये स्वतःच्या सल्लागार कंपन्या बनवू शकतो.
ज्या विद्यार्थ्यांना कॉम्प्युटरचे नॉलेज वाढवून पदोन्नती मिळवायचे आहे ते दुरुस्त किंवा ऑनलाईन अभ्यासक्रमांचा पर्याय निवडून ही शिकू शकतात.
One response to “BSC Computer Science आजच्या Ai च्या जगाची ज्वलंत गरज”
[…] BSC Computer Science बद्दल माहिती […]