Warning: Constant PRODUCTION_FACTORY_BUY_BUNDLE already defined in /home2/studyflo/public_html/wp-content/themes/production-factory/get-started/notice.php on line 5
Bsc In Microbiology बद्दल माहिती । Bsc In Microbiology Information In Marathi 2026 | - Studyflowcourses

Bsc In Microbiology बद्दल माहिती । Bsc In Microbiology Information In Marathi 2026 |

Bsc In Microbiology बद्दल माहिती । Bsc In Microbiology Information In Marathi 2026 |
Key Points hide

Bsc In Microbiology Information In Marathi हा कोर्स काय आहे ?

BSc microbiology हा तीन वर्षांची  पदवी पूर्व  पदवी असते.
ज्यामध्ये सूक्ष्मजीव विषाणू प्राणी जीवन आणि बुरशी यांच्या एक कोशिकीय आणि समूहांचा अभ्यास करण्यावर लक्ष केंद्रित असते. या सूक्ष्म जीवांचे मानवी जीवनावर व पर्यावरणावर काय परिणाम होतात ते या कोर्समध्ये आपण शिकतो.
बीएससी मायक्रोबायोलॉजी अभ्यासक्रमामध्ये विविध प्रकारचे विषाणू आणि जिवाणू आणि ते मानवी पेशींमध्ये काय कार्य करतात याबद्दलची संपूर्ण माहिती मिळते.

बीएससी मायक्रोबायोलॉजी मध्ये प्रवेश घेण्यासाठी पात्र होण्यामुळे विद्यार्थ्यांना मान्यता प्राप्त मंडळातून बारावी किंवा समक्ष परीक्षेतील फिजिक्स रसायनशास्त्र आणि जीवशास्त्र म्हणजेच बायोलॉजी हे विषय अनिवार्य असतात यामधूनच त्यांनी बारावी परीक्षा पास व्हायला हवी. बीएससी मायक्रोबायोलॉजी मध्ये प्रवेश उमेदवारांच्या किंवा विद्यार्थ्यांच्या बारावीच्या परीक्षेतील गुणांच्या आधारे दिला जातो. मायक्रोबायोलॉजिस्ट म्हणून करिअर संधी सध्याच्या क्षेत्रामध्ये खूपच तेजीत आहेत आणि उच्च संधी मिळू शकतात.
बीएससी मायक्रोबायोलॉजी चे अभ्यासक्रमाचे सरासरी वार्षिक शुल्क हे 50000 ते 200,000 असते.

अलीकडच्या काळात सूक्ष्मजीवांमुळे होणारे आजारांच्या गुंतागुंतीमध्ये वाढ होत असताना जागतिक साथीच्या रोगांमध्ये वाढ होत आहे.
उदाहरणार्थ अलीकडच्या काळातील कोरोना हे एक जागतिक संकट होते.
याच कारणामुळे बीएससी मायक्रोबायोलॉजी अभ्यासक्रमांना मोठी मागणी आहे व त्यातील तज्ञांना देखील भरपूर मागणी आहे मुख्य अभ्यासक्रमांमध्ये मायकोलॉजी इंडस्ट्रियल मायक्रोबायोलॉजी बायो स्टॅटिस्टिक्स इत्यादी विषयांचा समावेश असतो जे विद्यार्थ्यांना या उद्योगांमध्ये यशस्वी होण्यासाठी आवश्यक असणाऱ्या कौशल्याने सुसज्ज करते.

Bsc In Microbiology Information In Marathi  यासाठी शैक्षणिक पात्रता कोणती ?

बीएससी मायक्रोबायोलॉजी मध्ये या अभ्यासक्रमामध्ये प्रवेश घेऊन उच्चणाऱ्या विद्यार्थ्यांनी खालील दिलेल्या किमान पात्रता निकषांचे पालन करणे आवश्यक असते.
विद्यार्थ्यांनी मान्यता प्राप्त मंडळातून जे राज्यस्तरीय महामंडळ अथवा केंद्रीय महामंडळ असेल त्यामधून किमान 60 टक्के गुणांसह बारावी किंवा त्या सहमकक्ष कोणत्याही परीक्षेत उत्तीर्ण असणे आवश्यक असते.
विद्यार्थ्यांनी बारावी मध्ये फिजिक्स केमिस्ट्री आणि बायोलॉजी अथवा झूलॉजी अथवा बॉटनी हे विषय अनिवार्य म्हणून अभ्यासलेले असावे.

Bsc In Microbiology Information In Marathi याची ऍडमिशन प्रोसेस

बीएससी मायक्रोबायोलॉजी मध्ये प्रवेश प्रक्रिया करणे साठी.:
भारतातील बहुतेक संस्था आणि विद्यापीठ आणि कॉलेजेस हे बीएससी मायक्रोबायोलॉजी प्रवेशासाठी गुणवत्तेवर आधारित प्रवेश प्रक्रिया राबवतात.
उच्च माध्यमिक वर्गात किंवा संबंधित परीक्षांमध्ये विद्यार्थ्यांनी मिळवलेले गुण विचारात घेतले जातात. त्यानुसार मेरिट लिस्ट लावली जाते व त्याच्या त्याच्यातील कट ऑफ च्या वरील विद्यार्थ्यांना प्रवेश घेण्यासाठी आमंत्रित केले जातात.
त्यानंतर पात्र उमेदवारांना जागावाट वाटप केल्या जातात. काही महाविद्यालय हे प्रवेश परीक्षेच्या आधारे प्रवेश देतात.

गुणवत्तेवर आधारित प्रवेश:

  • गुणवत्ता यादीच्या आधारे प्रवेश देणारे महाविद्यालय आणि कॉलेजेस व संस्था हे टेन प्लस टू म्हणजेच बारावीच्या मिळालेल्या गुणांचा विचार करतात.
  • यामध्ये फिजिक्स केमिस्ट्री आणि बायोलॉजी अथवा प्राणीशास्त्र अथवा जीवशास्त्र हे विषय अनिवार्य असतात म्हणजेच तुम्ही सायन्स साईडचे अथवा विज्ञान पार्श्वभूमीचे असायला हवे.
  • गुणोत्तर आधारित प्रवेश देणाऱ्या महाविद्यालयांमध्ये अर्ज करण्यासाठी तुम्हाला महाविद्यालयाच्या वेबसाईटवर अधिकृत वेबसाईटवर अर्ज भरावा लागेल.
  • आवश्यक कागदपत्रांसह अर्ज शुल्क भरावे लागेल.
  • महाविद्यालय किंवा विद्यापीठाने जाहीर केलेल्या कट ऑफ यादी वर लक्ष ठेवणे आवश्यक असते.

प्रवेश परीक्षेवर आधारित प्रवेश:

  • काही महाविद्यालय आणि कॉलेजेसही या अभ्यासक्रमात प्रवेश देण्यासाठी त्यांच्या विद्यापीठ किंवा राज्यस्तरीय प्रवेश परीक्षा घेतात.
  • काही प्रवेश परीक्षांमध्ये उदाहरणार्थ लवली प्रोफेशनल युनिव्हर्सिटी एल पी यु एन एस टी दिब्रुगड युनिव्हर्सिटी
  • अशा काही युनिव्हर्सिटी मध्ये प्रवेश परीक्षांचा समावेश असतो.
  • अशा प्रकारचे प्रवेश पद्धतीसाठी तुम्हाला कॉलेजच्या अधिकृत वेबसाईटवर अर्ज भरावा लागेल.
  • त्यामध्ये आवश्यक ते कागदपत्रे सादर करावी आणि भविष्यातील संदर्भासाठी रिसेप्ट जपून ठेवावी.
  • त्या प्रवेश परीक्षेसाठी ची आवश्यक असणारी फी भरावी.
  • तुमची प्रोफाइल क्रिएट होऊन सर्व अर्ज पूर्ण भरला जाईल याची काळजी घ्यावी नंतर काही दिवसांनी हॉल तिकीट उपलब्ध होईल त्यावेळेस परीक्षा द्यावी व चांगले गुण मिळवावे.
  • प्रवेश परीक्षा साठी पात्र असणाऱ्या विद्यार्थ्यांना समुपदेशन फेरीमध्ये उपस्थित राहावे लागेल आणि प्रवेश शुल्क भरून प्रवेश वापर करावी लागेल.
Bsc In Zoology बद्दल माहिती

Bsc In Microbiology Information In Marathi याचा कालावधी

बीएससी मायक्रोबायोलॉजी याचा कालावधी हा तीन वर्षांचा असतो.
व या कोरसीपी सर्वसाधारणपणे 50000 ते 2 लाख याच्या दरम्यान असते यामध्ये कॉलेजनुसार तसेच विद्यार्थ्यांचे प्रवर्गानुसार फ्री मध्ये बराच फरक राहू शकतो.
या कोर्स चा अभ्यासक्रम हा सेमिस्टर वाईस असतो त्यामुळे टोटल सेमिस्टर ची संख्या सहा होते.

Bsc In Microbiology Information In Marathi याचे विषय

बीएससी मायक्रोबायोलॉजी मध्ये सूक्ष्मजीव पेशी जीवशास्त्र पर्यावरण शास्त्र आणि सूक्ष्मजीवांचे संबंधित व या संज्ञांशी संबंधित विषयांचा समावेश असतो या कार्यक्रमाचा तपशील आपण खाली पाहूया.

सेमिस्टर वन
  • इंट्रोडक्शन टू मायक्रोबायोलॉजी
  • इन्फॉर्मेशन सिस्टिम्स
  • कल्चरल एज्युकेशन वन
  • मायक्रोबायोलॉजी लॅब
  • इंट्रोडक्शन टू बायोलजी
  • केमिस्ट्री
  • इंग्लिश
सेम टू
  • फिजिक्स
  • मायक्रो बियल इकॉलॉजी
  • बायो केमिस्ट्री
  • क्रिएटिव्ह रायटिंग
  • मॅथेमॅटिक्स
  • कल्चरल एज्युकेशन टू
  • फिजिकल सायन्स लॅब
  • बायो केमिस्ट्री लॅब
सेमिस्टर थ्री
  • मॉलिक्युलर बायोलॉजी
  • मायकोलॉजी
  • मायक्रोबियल फिजिओलॉजी
  • ऍनालिटिकल बायो केमिस्ट्री
  • वायरॉलॉजी
  • जनरल मायक्रोबायोलॉजी
  • मॉलिक्युलर बायोलॉजी लॅब
सेम फोर
  • सेल बायोलॉजी
  • इन्हेरीटन्स बायोलॉजी
  • इमिनोलॉजी
  • एन्झाईम टेक्नॉलॉजी
  • बायो स्टॅटिस्टिक्स
  • फूड मायक्रोबायोलॉजी
  • इम्युनोलॉजी लॅब
  • फूड microbiology lab
सेम 5
  • इंडस्ट्रियल मायक्रोबायोलॉजी
  • मेडिकल बॅक्टेरिओलॉजी
  • रिकाँबिनंट डीएनए टेक्नॉलॉजी
  • एन्व्हायरमेंटल अँड एग्रीकल्चरल मायक्रोबायोलॉजी रिसर्च मेथोडोलॉजी
  • मेडिकल बॅक्टेरिओलॉजी लॅब इंडस्ट्रियल मायक्रोबायोलॉजी लॅब
  • जेनेटिक इंजीनियरिंग लॅब
सेम सिक्स
  • फार्माकोलॉजी
  • पेरासायटोलोजी
  •   प्रोजेक्ट


बीएससी मायक्रो बायोलॉजी यामधील काही रेफरन्स बुक्स:

मायक्रोबायोलॉजी एक परिचय
जराड जे टोरटोरा भरडेल आर फंके आणि क्रिस्टिन एल केस.

ब्रॉक बायलॉजी ऑफ मायक्रो ऑरगॅनिझम
मायकल मेडिगन , जॉन एम मार्टिनको,  केली बेंडर , थॉमस ब्रॉक

क्लीनिकल मायक्रोबायोलॉजी मेड रिडिक्युलेसली सिंपल
मार्क ग्लॅडविन, बिल ट्रॅटलर, स्कॉट महान

Bsc In Microbiology Information In Marathi याचे कॉलेजेस

गव्हर्नमेंट कॉलेजेस
  • आर्मी फॉर्सेस मेडिकल कॉलेज ए एफ एम सी पुणे AFMC 
  • गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज नागपूर
  • डीजे गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज पुणे
  • सेट जीएस मेडिकल कॉलेज मुंबई
  • लोकमान्य टिळक म्युनिसिपल जनरल हॉस्पिटल अँड मेडिकल कॉलेज सायन मुंबई
  • नॉर्थ महाराष्ट्र युनिव्हर्सिटी  जळगांव
  • गोंडवाना यूनिवर्सिटी गडचिरोली
प्रायव्हेट कॉलेजेस
  • सेंट झेवियर्स कॉलेज मुंबई
  • फरगुशन कॉलेज पुणे
  • एमआयटी डब्ल्यू पी यु पुणे
  • भारती विद्यापीठ डीम्ड युनिव्हर्सिटी मेडिकल कॉलेज पुणे
  • कृष्णा इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्स कराड
  • के सी कॉलेज किशनचंद जलाराम कॉलेज मुंबई
  • एमजीएम इन्स्टिट्यूट ऑफ बायो सायन्सेस अँड टेक्नॉलॉजी छत्रपती संभाजीनगर
  • संदीप युनिव्हर्सिटी नाशिक

Bsc In Microbiology Information In Marathi यामध्ये करिअर आणि संधी

जैवतंत्रज्ञान उद्योग क्षेत्रात आज-काल सूक्ष्मजीव शास्त्रज्ञांना खूप मोठी मागणी आहे असंख्य पदवीधरांना विद्यापीठ औषध निर्माण आणि जैव विज्ञान कंपन्या आणि संस्थांमध्ये संशोधक म्हणून नोकरी मिळतात.
मायक्रोबायोलॉजिस्ट पदवीधरांना सरकारी आणि खाजगी रुग्णालय अन्न संशोधन अन्न उद्योग रासायनिक उद्योग आणि औषध उद्योगांसारख्या विविध उद्योग क्षेत्रांमध्ये नोकऱ्या मिळवू शकता.
काही लोकप्रिय व्यावसायिक नोकरांनी संबंधित पगार खालील तक्त्या मध्ये दिलेले आहे.

मायकोलॉजिस्ट मायकोलॉजिस्ट म्हणजे अशी व्यक्ती जी बुरशीचा अभ्यास करते जी प्राणी सेवा वनस्पती आणि जिवाणू सारखे स्वतंत्र जीव असते. बुरशीही उपकारक आणि उपकारक अशा दोन्ही प्रकारचे असू शकतो.
उदाहरणार्थ पेनिसिलियम notatum ही एक उपयुक्त बुरशी आहे. उद्यापासून आपल्याला पेनिसिलिन हे महत्त्वाचे अँटिबायोटिक मिळते.
मायकोलॉजिस्ट अशा जीवांचा आणि बुरशींचा अभ्यास करतात जेणेकरून औषध उद्योग आणि कृषी क्षेत्रात उपयुक्त असलेले जीव शोधता येतील.
पगार
सहा लाख ते दहा लाख रुपये
सेल बायोलॉजिस्ट सेल बायोलॉजिस्ट म्हणजेच पेशीची व शास्त्रज्ञांचा वापर पेशंटच्या रेणूचे गुणधर्म परस्पर संवाद आणि रचना यांचा अभ्यास करण्यासाठी आणि अभ्यास करण्यासाठी केला जातो.
ज्यामध्ये ते पेशीच्या वर्तनाचा विशिष्ट जीवावर होणाऱ्या परिणामाबद्दल अभ्यास करतात.
पगार
दहा लाख ते बारा लाख
बायो केमिस्ट बायो केमिस्ट हे सजीवांच्या रासायनिक रचनेवर काम करतात आणि सर्व मूलभूत जीवन कार्यांमध्ये सामील असलेल्या रासायनिक प्रक्रियांचा देखील अभ्यास करतात.

पगार
सात लाख ते दहा लाख रुपये

बॅक्टेरिओलॉजिस्ट बॅक्टेरिओलॉजिस्टचे मुख्य काम म्हणजे सतत बदलत राहणाऱ्या आणि विकसित होणाऱ्या विविध प्रकारच्या जिवाणूंचा अभ्यास करणे ते सरकारी किंवा औषध कंपन्यांसाठी प्रयोगशाळेमध्ये संशोधन करतात. पगार
चार ते पाच लाख रुपये
व्हायरलॉजिस्ट व्हायरलॉजिस्ट हा एक व्यवसायिक असतो जो वेगवेगळ्या विषाणूंची वाढ विकास रचना आणि वैशिष्ट्यांचा अभ्यास करतो.
त्यांचे मुख्य काम म्हणजे विनय विषाणूंचे पृथकरण करणे त्यांचे कल्चर तयार करणे जेणेकरून वायव्यविजन आद्रता तापमान पोषण यांसारख्या घटकांवर नियंत्रण ठेवता येईल व त्यापासून विषाणूंची वाढ रोखण्यासाठी लस निर्माण करता येईल.
पगार
दहा ते पंधरा लाख रुपये

Bsc In Microbiology Information In Marathi हा कोर्स केल्यानंतर पुढील संधी

बीएसएफ मायक्रोबायोलॉजी हा कोर्स कम्प्लीट केल्यानंतर उमेदवार विविध व्यवसायांची निवड करू शकतात बीएससी मायक्रोबायोलॉजीच्या पदवीच्या मदतीने विद्यार्थी मायक्रोबायोलॉजी क्षेत्रात मायक्रोबायोलॉजिस्ट बॅक्टेरिऑलॉजिस्ट व्हायरलॉजिस्ट इत्यादी तज्ञ म्हणून आपले करिअर घडवू शकतात.

Watch Video

इमिनोलॉजिस्ट
इम्युनॉलॉजिस्ट हे सहसा आरोग्य प्रतिकारक शक्तींशी संबंधित विविध समस्या हाताळतात नवीन औषधाच्या निर्मितीवर संशोधन करण्यासाठी देखील ते मदत करतात.
बीएससी मायक्रोबायोलॉजी कोर्स कम्प्लीट केल्यानंतर नोकरी आणि करिअरच्या अनेक संधी उपलब्ध आहेत जे की आपण आताच वर पाहिले आहे त्यानंतर पुढील शिक्षण घेण्यासाठी खालील पर्याय दिलेले आहेत

एम एस सी मायक्रोबायोलॉजी
तुम्ही तुमच्या आवडीच्या स्पेशल आइजेशन सह एम एस सी मायक्रोबायोलॉजी करू शकतात या अभ्यासक्रमानंतर पुढील अभ्यास करण्याची नेहमीची शिफारस केली जाते

अप्लाइड मायक्रोबायोलॉजी मध्ये एम एस सी
बीएससी पूर्ण केल्यानंतर विद्यार्थी हे सूक्ष्मजीव शास्त्रातील स्पेशलिझेशन असलेल्या अभ्यासक्रमाची निवड करू शकतात.
अप्लाइड मायक्रोबायोलॉजी मध्ये एमएससी अभ्यासक्रमाचा कोर्सcha खर्च ha दोन लाख ते पाच लाख रुपयांपर्यंत दरवर्षी असतो.

BSC Information Technology IT बद्दल माहिती

Bsc In Microbiology Information In Marathi हा कोर्स का आणि कोणी निवडावा.

ज्या विद्यार्थ्यांना सूक्ष्मजीव आणि त्यांच्या वर्तनांचा अभ्यास करण्यात इंटरेस्ट आहे त्यांनी सूक्ष्मजीव शास्त्राचा अभ्यास करावा.
सूक्ष्मजीव शास्त्रज्ञ म्हणून करिअर करण्यासाठी सतत संशोधन आवश्यक असते म्हणून संशोधनाची क्षमता आणि आवड असणाऱ्या विद्यार्थ्यांनी हा अभ्यासक्रम घ्यावा.
भारतामध्ये अजूनही मायक्रोबायोलॉजी अभ्यासक्रम हा एक विशिष्ट शिक्षण किंवा अजूनही जास्त सॅच्युएट न झालेला अभ्यासक्रम किंवा स्पेशल असा अभ्यासक्रम आहे त्यामुळे इच्छे का मी या संधीबद्दल लवकर फायदा घेतला पाहिजे.

चांगला पगार
भारतातील एका सूक्ष्मजीव शास्त्रज्ञाला दरवर्षी सुमारे पाच लाख रुपये पर्यंत पगार मिळतो दहा वर्षांपेक्षा जास्त अनुभवी असणाऱ्या सूक्ष्मजीव शास्त्रज्ञांना दहा लाख ते पंधरा लाख रुपयापर्यंत पॅकेज मिळू शकते म्हणूनच विद्यार्थ्यांनी या क्षेत्राचा देखील विचार करावा.
विविध संधी
मायक्रो बायलॉजी मधील पदवीधर पदवी उमेदवारांसाठी बॅक्टेरिओलॉजिस्ट व्हायरलॉजिस्ट सेल बायोलॉजिस्ट मायकॉलॉजिस्ट आणि इतर अनेक क्षेत्र नोकरीच्या संधी उघडतात.

Bsc In Microbiology Information In Marathi याबद्दल विचारली गेलेली प्रश्न

भारतामध्ये बीएससी मायक्रोबायोलॉजी चा पगार किती आहे ?

बीएस्सी बायलॉजी मध्ये बीएससी असणाऱ्या नवीन पदवीधराला भारतामध्ये अंदाजे प्रवेशस्तरीय तव्याराचे अपेक्षा असू शकते तीन ते पाच सुरुवातीचे रक्कम असू शकते. जूनियर मायक्रोबायोलॉजिस्ट तीन ते पाच एलपीजी दरम्यान कम होऊ शकतो तर रिसर्च असिस्टंट पाच ते सहा एल पी ए पासून सुरुवात करू शकतो. अनुभवांसह हे लक्षणीय रित्या वाढ होऊ शकते. अनुभवी व्यावसायिकांसाठी दहा ते पंधरा लाख रुपयांपर्यंत पोहोचण्याची शक्यता असते.

बीएससी मायक्रोबायोलॉजी ची व्याप्ती किंवा स्कोप काय आहे ?

पदवी धारकानी मायक्रोबायोलॉजी मध्ये पदवी प्राप्त केल्यानंतर ते संशोधक, अधिकारी, बायोलॉजिस्ट इत्यादी फायदेशीर करिअर पर्याय निवडू शकतात.

मायक्रोबायोलॉजी ची जागा Ai किंवा आर्टिफिशियल इंटेलिजन्स घेऊ शकते का ?

पुढील दहा वर्षात कृत्रिम बुद्धिमत्ता किंवा ए आय पारंपारिक जीव सूक्ष्मजीवशास्त्र आणि संसर्गजन्य रोग चाचणीची जागा घेऊ शकणार नाही असे मानणारे निर्देशक आहेत.

दहावी आणि डिप्लोमा च्या आधारे बीएससी मायक्रोबायोलॉजी प्रोग्राम मध्ये इच्छुकांना प्रवेश मिळू शकतो का ?

नाही. आपल्याला बीएससी मायक्रोबायोलॉजी प्रोग्रॅम मध्ये प्रवेश करण्यासाठी बारावी किंवा समक्ष परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक असते.

बीएससी मायक्रोबायोलॉजी नंतर काय करू शकतो ?

बीएससी मायक्रोबायोलॉजी प्रोग्रॅम केल्यानंतर तुम्ही मायक्रोबायोलॉजिस्ट किंवा बायोकेमिस्ट म्हणून नोकरी निवडू शकता किंवा तुम्ही msc मायक्रोबायोलॉजी सारखे पुढील शिक्षण देखील घेऊ शकता.

2 responses to “Bsc In Microbiology बद्दल माहिती । Bsc In Microbiology Information In Marathi 2026 |”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *