BSc Data Science कोर्सची संपूर्ण माहिती 2026 | अभ्यासक्रम, करिअर आणि संधी

BSc Data Science कोर्सची संपूर्ण माहिती 2026 | अभ्यासक्रम, करिअर आणि संधी
Key Points hide

BSc Data Science हा कोर्स काय आहे ?

बीएससी डेटा सायन्स हा तीन वर्षांचा पूर्ण वेळ डिग्री अभ्यासक्रम आहे त्यामध्ये कॉम्प्युटर सायन्स, बिझनेस अनॅलिटिक्स, आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्स यांचा समावेश होतो. डेटा सायन्स हा एक इंटर डिसिप्लिनरी विषय आहे ज्यामध्ये स्टॅटिस्टिक्स, बिग डेटा अनालिसिस म्हणजेच मोठ्या प्रमाणावरील डेटा ॲनालिसिस, मशीन लर्निंग आणि त्याच्याशी संबंधित वेगवेगळे गोष्टी व पैलूंचा चा वापर समाविष्ट असतो.

आजच्या डिजिटल जगामध्ये डेटा हे एक नवीन प्रकारची करन्सी आहे. किंवा डेटा म्हणजेच नवीन इंधन मानले जाते तर तुम्हाला गणिताची आवड असेल आणि कॉम्प्युटर सोबत खेळायला आवडत असेल तर बीएससी डेटा सायन्स हा तुमच्यासाठी एक उत्तम पर्याय असू शकतो. यात मुख्यत्वे करून माहितीचे विश्लेषण म्हणजेच डेटा अनालिसिस हा महत्त्वाचा भाग आहे सोप्या भाषेत सांगायचे झाले तर वेगवेगळ्या विखुरलेल्या माहिती मधून अर्थपूर्ण निष्कर्ष काढण्याचे शास्त्र म्हणजेच डेटा सायन्स आहे.

BSc Data Science याचा कालावधी

साधारणपणे हा तीन वर्षाचा कोर्स कोर्स असतो. काही कॉलेजेस किंवा स्वायत्त संस्थांमध्ये जिथे नवीन आर्थिक धोरण लागू झालेला आहे तिथे चार वर्षाचा देखील असू शकतो.

याचा हेतू

याचा हेतू हा विद्यार्थ्यांना डेटा माइंनीग, मशीन लर्निंग आणि स्टॅटिस्टिक्स मध्ये तज्ञ बनवणे हा असतो.

याचे मुख्य विषय

प्रोग्रॅमिंग पायथॉन, आर,  लँग्वेजेस गणित आणि सांख्यिकी, मशीन लर्निंग क्लाऊड कॉम्प्युटिंग डेटा विजीओलायझेशन ऑपरेटिंग सिस्टिम्स यांचा समावेश होतो.

याची अध्ययन पद्धत

हा कोर्स केवळ  थिअरी नसून जास्तीत जास्त प्रॅक्टिकल्स आणि प्रोजेक्टवर ही भर दिला जातो.

BSc Data Science यासाठी शैक्षणिक पात्रता कोणती ?

बीएससी डेटा सायन्स या कोर्समध्ये ऍडमिशन घेण्यासाठी खालील पात्रता असणे आवश्यक आहे.

  • विद्यार्थ्यांनी मान्यता प्राप्त राज्य मंडळातून आठवा केंद्रीय मंडळातून बारावी म्हणजेच 10 + 2 ही विज्ञान शाखेतून उत्तीर्ण केलेली असावी.
  • विषय हे भौतिकशास्त्र रसायनशास्त्र आणि गणित असावेत जर एखाद्या विद्यार्थ्यांनी कॉम्प्युटर सायन्स हा अतिरिक्त विषय म्हणून अभ्यासला असेल तर तो एक फायदा मानला जातो त्यामुळे अजून आपल्याला सोपे जाते.
  • प्रवेशाच्या वेळी विद्यार्थ्यांचे वय 17 वर्षांपेक्षा जास्त असणे आवश्यक असते.
    तसेच भारतामध्ये बीएससी डेटा सायन्स करण्यासाठी तुम्हाला बारावीच्या परीक्षेत कमीत कमी 50 टक्के गुण मिळवणे अपेक्षित आहे.

याची पात्रता

विद्यार्थी बारावी सायन्स शाखेतून उत्तीर्ण असावा.

यासाठी कमीत कमी लागणारे गुण

कमीत कमी 50 ते 60 टक्के गुण आवश्यक असणे आवश्यक आहे राखीव प्रवर्गासाठी सवलग सवलत असते)

याची वयोमर्यादा

साधारणपणे 17 ते 25 वर्षे परंतु बहुतांश कॉलेजमध्ये वयाची अट कडक  नसते.

याचा प्रवाह

बारावी मध्ये गणित मॅथेमॅटिक्स हा विषय असणे अत्यंत अनिवार्य आहे.

BSc Data Science याची ऍडमिशन प्रोसेस

महाराष्ट्रात ऍडमिशन घेताना प्रामुख्याने दोन पद्धती असतात एक गुणवत्ता यादी मेरिट बेसिस वर आधारित किंवा प्रवेश परीक्षा एंट्रन्स एक्झाम वर आधारित.

याची पात्रता चेक करा

सर्वप्रथम आधी तुमचे बारावीचे मार्क्स तपासा. तसेच आपल्या आवडीच्या कॉलेजेस ची यादी तयार करून त्यांचे गेल्यावर्षीचे कट ऑफ मार्क्स चेक करा.

याचे कॉलेज निवडा

ही व इतर आणि कॉलेजेस आहेत ज्यामध्ये बीएससी डेटा सायन्स आकार दिला जातो आपण आपल्या आवडीनुसार कॉलेजेस निवडून त्यांची यादी बनवून ठेवा.

यासाठी अर्ज करा

त्यानंतर आपण कॉलेजच्या अधिकृत वेबसाईटवर जाऊन आपला फॉर्म भरू शकतो.

याची प्रवेश परीक्षा

काही टॉप युनिव्हर्सिटीज आणि काही स्वायत्त कॉलेजेस स्वतःची प्रवेश परीक्षा घेतात तर काही ठिकाणी फक्त बारावीतील सीईटीच्या गुणांचा विचार केला जातो. त्याची संपूर्ण माहिती आपण घेऊन ठेवावी.

यात गुण मिळवा

आपण यादी केलेल्या आवडत्या कॉलेजेस चे गेल्या वर्षीचे कट ऑफ गुण लक्षात घेऊन त्यानुसार बारावी मध्ये तितके गुण घेण्याचा प्रयत्न करावा अथवा जर प्रवेश परीक्षा असेल तर त्यासाठी गेल्या वर्षीचा कट ऑफ लक्षात घेऊन प्रवेश परीक्षेमध्ये तेवढ्या मार्क्स घेण्याचा प्रयत्न करावा.

याचे डॉक्युमेंट वेरिफिकेशन

दहावी बारावीचे मार्कशीट एल सी कास्ट सर्टिफिकेट जर गरज असेल तर इत्यादी कागदपत्र तयार ठेवा.

BSc Data Science याचा कालावधी

हा कोर्स तीन वर्षांचा आहे आणि तो 6 सेमिस्टर्स मध्ये विभागलेला असतो.

याची रचना

प्रत्येक वर्षामध्ये दोन सेमिस्टर असतात पहिल्या वर्षी बेसिक आणि शेवटच्या वर्षी स्पेशलिझेशन वर भर दिला जातो.

यात तुम्ही काय शिकता

तुम्ही कच्च्या डेटाचे रॉ डेटा चे रूपांतर उपयुक्त माहिती मध्ये कसे करायचे हे तुम्ही शिकता हे आत्ताच्या घडीचे सर्वात महत्त्वाचे स्किल आहे.

BSc Data Science याचे विषय आणि अभ्यासक्रम

डेटा सायन्स हे परस्पर संबंधित क्षेत्र आहे ज्यामध्ये भरपूर क्षेत्रांचे मिक्सिंग होतंय यामध्ये कॉम्प्युटर सायन्स मॅथ्स आर्टिफिशल इंटेलिजन्स आणि ॲनालिसिस या क्षेत्रातील विषयांचा समावेश असतो.

आपण प्रथम यातील कॉमन सब्जेक्ट पाहूया त्यानंतर आपण सेमिस्टर वाईस सब्जेक्ट बघूया.

BSc Data Science कॉमन सब्जेक्ट
  • अप्लाइड स्टॅटिस्टिक्स
  • डिस्क्रीट मॅथमॅटिक्स
  • डेटा स्ट्रक्चर अँड प्रोग्राम डिझाईन using C’
  • प्रोबॅबिलिटी अँड इन फरेन्शियल स्टॅटिस्टिक्स
  • डेटाबेस मॅनेजमेंट सिस्टीम
  • मशीन लर्निंग
  • आर्टिफिशियल इंटेलिजन्स
  • क्लाऊड कॉम्प्युटिंग
  • डेटा विजीवलायझेशन
  • प्रोग्रामिंग इन आर
  • डेटा वेअर हाऊसिंग अँड मल्टी डायमेन्शनल मॉडेलिंग
  • प्रोग्रामिंग इन पायथॉन

हे कॉमन सब्जेक्ट आहे जे सर्व विद्यापीठांमध्ये जवळजवळ सारखेच असतात तर आपण आता सेमिस्टर वाईज हे आपण याचे सिलॅबस पाहूया.

सेम वन सेम टू
  • लिनियर अल्जेब्रा बेसिक स्टेटस
  • प्रोग्रॅमिंग इन सी
  • कम्युनिकेशनल स्किल्स इन इंग्लिश
  • प्रोग्रामिंग इन सी लॅब
  • मायक्रोसॉफ्ट एक्सेल लॅब
  • प्रोबॅबिलिटी अँड इन्फ्रेन्शियल स्टॅटिस्टिक्स
  • डिस्क्रिप मॅथेमॅटिक्स
  • डेटा स्ट्रक्चर्स अँड प्रोग्रॅम डिझाईन इन सी
  • कॉम्प्युटर ऑर्गनायझेशन अँड आर्किटेक्चर
  • डेटा वेअर हाऊसिंग अँड मल्टी डायमेन्शनल मॉडेलिंग
  • डेटा स्ट्रक्चर लॅब
  • प्रोग्रामिंग इन आर लॅब
सेमिस्टर थ्री सेमिस्टर ४
  • ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रामिंग इन जावा
  • डेटाबेस मॅनेजमेंट सिस्टिम्स
  • ऑपरेटिंग सिस्टिम्स
  • डिझाईन अंड अनालिसिस ऑफ Algorithm’s
  • डेटाबेस मॅनेजमेंट सिस्टिम्स लॅब
  • अपसेटवर इंटर प्रोग्रामिंग इन जावा लॅब
  • मशीन लर्निंग वन
  • क्लाऊड कॉम्पिटिंग
  • डेटा वेअर हाऊसिंग अँड मल्टी डायमेन्शनल मॉडेलिंग
  • ऑपरेशन रिसर्च अँड ऑप्टिमायझेशन टेक्निक्स
  • टाईम सेरीज एनालिसिस
  • मशीन लर्निंग लॅब
  • डेटा वेअर हाऊसिंग अँड मल्टी डायमेन्शनल मॉडेलिंग  lab
सेमिस्टर फाईव्ह सेमिस्टर सिक्स
  • मशीन लर्निंग टू
  • इंट्रोडक्शन टू आर्टिफिशिअल इंटेलिजन्स
  • बिग डेटा अनालिसिस
  • डेटा विजीओलायझेशन
  • प्रोग्रामिंग इन पायथॉन लॅब
  • बिग डेटा लॅब
  • मायनर प्रोजेक्ट
  • इलेक्टिव्ह वन इलेक्टिव्ह टू
  • ग्रँड वायवा
  • मेजर प्रोजेक्ट 

 यामधील प्रॅक्टिकल्स

पायथोन आणि tableau यासारख्या सॉफ्टवेअर प्रत्यक्ष काम करणे.

प्रथम वर्षात काय शिकण्यास मिळते ?

मूलभूत गणित आणि कोडींग ची ओळख दिली जाते.

शेवट वर्षात काय शिकण्यास मिळते ?

रियल टाईम प्रोजेक्ट्स आणि इंटरनशिप

टॉप डेटा सायन्स टूल्स:

  • SAS Software
  • Apache spark
  • BigML
  • MATLAB
  • Excel
  • Tableau
  • Hadoop
  • D3js
  • Jupyter
  • Tensor Flow

BSc Data Science  याचे कॉलेजेस

आपण काही महाराष्ट्रातील टॉपचे बीएससी डेटा सायन्स चे कॉलेजेस पाहूया:

  • के सी कॉलेज मुंबई
  • मिठीभाई कॉलेज मुंबई
  • फर्ग्युसन कॉलेज पुणे
  • एमआयटी डब्ल्यू पी यु पुणे
  • एन एम आय एम एस मुंबई किंवा नवी मुंबई
  • सिंबायोसिस पुणे
  • एस आय एस नवी मुंबई
  • एमजीएमयू इन्स्टिट्यूट ऑफ बायो सायन्सेस अँड टेक्नॉलॉजी छत्रपती संभाजी नगर महाराष्ट्र
  • डॉक्टर राम मनोहर लोहिया इन्स्टिट्यूशन कॉलेज ऑफ बायो सायन्सेस छत्रपती संभाजी नगर
  • पी इ एस मॉडेल कॉलेज ऑफ आर्ट्स कॉमर्स अँड सायन्स  पुणे
  • एस आय एस कॉलेज ऑफ आर्ट सायन्स अँड कॉमर्स मुंबई
  • डॉक्टर होमी भाभा स्टेट युनिव्हर्सिटी मुंबई
  • स्कूल ऑफ डेटा सायन्स अँड बिझनेस इंटेलिजन्स मुंबई
  • विद्यालंकार स्कूल ऑफ इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी मुंबई
  • बी के बिर्ला कॉलेज ऑफ आर्ट सायन्स अँड कॉमर्स कल्याण

सर्व कॉलेजेस चे सरासरी शुल्क

सरकारी कॉलेजमध्ये फिका मी असते तर खाजगी कॉलेजेस मध्ये त्यातही झी टॉकीज कॉलेजेस आहेत त्यामध्ये दरवर्षी वार्षिक फीही दोन ते चार लाख रुपयांपर्यंत जाऊ शकते.

मध्ये प्लेसमेंट साठी काय करावे ?

शेवटच्या वर्षाला असताना आपण प्लेसमेंट सेल मध्ये नोंदणी करा तसेच कॅम्पस इंटरव्यू घेतले जातात कंपन्यांतर्फे व विद्यार्थी हा तयार केले जातात.

याचे विडिओ स्वरूप पहा 

BSc Data Science यामध्ये करिअर आणि संधी

बीएससी इंडिया सायन्स कोर्स केल्यानंतर तुमच्याकडे नोकरीच्या व विविध क्षेत्रांमध्ये जॉब करण्याच्या भरपूर मोठ्या संधी उपलब्ध आहेत.

ज्या ज्या क्षेत्रांमध्ये डेटा सायन्स चे एप्लीकेशन होते ते सर्व क्षेत्रे आपण पाहूया.:

  • बँकिंग
  • मार्केटिंग
  • ऑपरेशन्स
  • जीनोमिक्स
  • इन्शुरन्स अँड फायनान्स
  • ह्यूमन रिसोर्स
  • सप्लाय चेन
  • हेल्थकेअर

त्यामुळे जवळपास सगळीकडेच डेटा सायन्स ची गरज असते म्हणूनच या सर्व क्षेत्रांमध्ये आपल्याला नोकरी मिळण्याची संधी उपलब्ध होते म्हणूनच हे क्षेत्र खूप डायव्हर्स आहे.
डेटा सायन्स हे जगातील टॉप 50 ट्रेडिंग जॉब्स पैकी एक मानली जाते. म्हणूनच व्यवसाय, आरोग्य सेवा, लॉजिस्टिक्स, बँकिंग आणि इतर विविध क्षेत्रांमध्ये डेटा संकलन डेटा एक्सट्रॅक्शन डेटा विश्लेषण डेटा मायनिंग डेट इत्यादी विविध पैलू शिकवणारा हा विशेष अभ्यासक्रम पूर्ण करून नोकरी मिळवण्याची हीच योग्य वेळ आहे.

गुगलच्या मते डेटा सायन्स हे व्यवसाय आणि ई-कॉमर्स जगताचे भविष्य आहे.

तुम्ही फक्त केवळ जास्त पगारच मिळवत नाही तरी एक स्थिर करियर ही मिळवतात तसेच तुम्ही या प्रकारे सामील असलेली विविध तंत्रज्ञानाचा शोध घेऊन शिकू शकता व स्वतःला अजून जास्त डेव्हलप करू शकतो.

अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर तुम्हाला मिळू शकणाऱ्या काही प्रमुख नोकऱ्या आपण खालील तक्तामध्ये पाहूया.

प्रोसेस ऍनालिस्ट: प्रक्रिया विश्लेषक हा आयटीटीएम चा एक महत्त्वाचा भाग असतो यामध्ये तो व्यवसाय पद्धती समजून घेतो आणि त्या कशा स्वयंचलित करता येतील किंवा वाढवता येतील यासाठी कार्यक्रमाचे ॲनालिसीस करतो. पगार पाच ते सात लाख रुपये
डेटा सायंटिस्ट: व्यवसायात किंवा समस्या सोडवण्यात डेटा सायंटिस्ट ची मुख्य भूमिका असते डेटा सायन्सच्या प्रमुख पायऱ्या काय काळजीपूर्वक पार पाडल्यानंतर त्यातील समस्या आणि शंकांवर उपाय सुचवल्यानंतर विशिष्ट डेटा संचार मधून अर्थपूर्ण माहिती आणि मूल्य प्रदान करणे हे त्यांचे प्रमुख भूमिका असते पगार आठ ते बारा लाख रुपये प्रति वर्ष
डेटा सोल्युशन्स ॲनालिस्ट:  डेटा सोल्युशन्स ऍनालिस्ट हा सहसा क्लाइंट चा विशिष्ट डेटा आणि कंपनीची धोरणे आणि प्रक्रियाशी संबंधित उपयुक्त अहवाल बनवतात. ते क्लाइंट कडून माहिती गोळा करतात आणि डेटा वेअर हाऊस बनवतात व डेटा संकलन व संचयन करतात तसेच कुठलाही परिणाम सकारात्मक अथवा नकारात्मक असल्यास त्याबद्दल स्वतःचे इनपुट देतात. पगार 14 ते 18 लाख रुपये
बिझनेस अनॅलिस्ट: व्यवसाय विश्लेषक व्यवसायाशी संबंधित डेटाचे विश्लेषण करतो आणि टेक्निकल दृष्टिकोनातून अनेक नवीन व्यवसाय ट्रेनच्या संदर्भात निर्णय घेण्यास मदत करतो. पगार आठ ते दहा लाख रुपये
स्टॅटिस्टिकल ऍनालिस्ट: सांख्यिकी विश्लेषण डेटामधून मौल्यवान माहिती गोळा करणे पुनरावलोकन करणे आणि बाजूला काढणे यासाठी जबाबदार असतो बिझनेस किंवा डेटा सायंटिस्ट ला रियल टाईम निर्णय प्रक्रियेत मदत करतो. पगार पगार दहा ते बारा लाख रुपये
वेब अँड सोशल मीडिया ऍनालिस्ट: वेब आणि सोशल मीडिया विश्लेषण विविध सॉफ्टवेअर आणि डेटा स्ट्रक्चर टूल च्या मदतीने वापरकर्त्यांच्या सहभागाचे मूल्यांकन आणि विश्लेषण करतात. पगार पाच ते सात लाख रुपये
सीआरएम ऍनालिस्ट: क्लायंटशी संबंधित डेटाच्या अंतर्गत किंवा बाह्य मूल्यांकन करण्यासाठी ते जबाबदार आहे जेणेकरून त्यांचे वर्तन त्यांचे स्वरूप जाणून घेता येईल आणि त्यातून अर्थ आणि दृष्टी पूर्ण माहिती काढता येईल त्यामुळे क्लाइंटच्या समस्या समजून घेऊन त्याचे मोठ्या प्रमाणात निराकरण करून त्यांच्याशी संबंध टिकून ठेवण्यास मदत होते. पगार चार ते सहा लाख रुपये
बिझनेस इंटेलिजन्स अनालिस्ट: व्यवसायाचे मूल्य राखणाऱ्या मोठ्या डेटा च्या मूल्यवान माहिती मध्ये रूपांतर करण्याची जबाबदारी बिझनेस इंटेलिजन्स अँड लिस्ट मध्ये असते ते नवीनतम ट्रेनचे विश्लेषण करतात आणि व्यवसाय अधिक स्मार्ट आणि कार्यक्षमतेने वाढवण्यास मदत करतात. पगार सहा ते आठ लाख रुपये
डेटा आर्किटेक्ट: हे आर्किटेक कंपनीचे डेटा बद्दलची सर्व माहितीसाठी जबाबदार असतो. डेटाबेस मॅनेज करतात त्याची सोल्युशन तयार करतात आवश्यकता चे मूल्यांकन करता आणि अहवाल तयार करतात. पगार 20 ते 25 लाख रुपये
डाटा मायनिंग इंजिनियर: डेटा मायनिंग इंजिनियर हा मोठ्या प्रमाणात डेटा चे विश्लेषण करण्यासाठी सांख्यिकी आणि भविष्य सूचक डेटा आणि मॉडेल्स आणि अल्गोरिथम तयार करण्यासाठी आणि वाढवण्यासाठी जबाबदार असतात. पगार सहा ते दहा लाख रुपये
डेटाबेस ऍडमिनिस्ट्रेटर: डेटाबेस ऍडमिनिस्ट्रेटर वेगवेगळ्या सॉफ्टवेअर आणि साधनांचा वापर करून डेटाचे नियोजन स्थापना डिझाइन्स स्थलांतर आणि देखरेख यासाठी जबाबदार असतात. पगार सहा ते आठ लाख रुपये


यामधील सरकारी नोकऱ्या
बँकिंग क्षेत्र संरक्षण डिफेन्स आणि सरकारी संशोधन संस्थांमध्ये डेटा ऍनॅलिस्ट म्हणून काम करण्याची संधी मिळते.

यामधील खाजगी नोकऱ्या
आता आपण वर पाहिलेल्या या सर्व खाजगी नोकरी होत्या. तसेच आयटी कंपन्या टीसीएस इन्फोसिस गुगल यामध्ये मोठ्या पगारांच्या नोकऱ्या मिळू शकतात.

यामधून पुढे उच्च शिक्षण
बीएससी डेटा सायन्स पूर्ण केल्यानंतर तुम्ही पुढे उच्च शिक्षणासाठी एमएससी डेटा सायन्स किंवा एमबीए करू शकता

यामधून पुढे स्वतःचा व्यवसाय
बीएससी डेटा सायन्स पूर्ण केल्यानंतर आपण स्वतःचा व्यवसाय ही सुरू करू शकता त्यामध्ये तुम्ही डेटा नसेल तर सुरू करू शकता.

BSc Data Science हा कोर्स केल्यानंतर पुढील संधी

कॉम्प्युटर आणि इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी क्षेत्रामध्ये डेटा सायन्स एक आशाताई विषय आहे आणि परदेशी कंपन्या आणि राष्ट्रीय भारतीय कंपन्या मधील आयटी क्षेत्रामध्ये लाखोंची गुंतवणूक करत आहेत.
अमेरिकेनंतर भारत जगभरातील डेटा सायंटिस्ट साठी एक विशिष्ट खूप मोठी बाजारपेठ बनण्याची अपेक्षा आहे अभ्यासक्रम किंवा भारतातच नाही तर जगभरात मौल्यवान आहे वेगवेगळ्या कंपन्यांच्या अनुसार डेटा सायंटिस्ट चा सरासरी पगार हा सुमारे पंधरा लाख रुपये आहे आणि आंतरराष्ट्रीय पगार सरासरी सुमारे एक लाख ते दीड लाख डॉलरच्या दरम्यान आहे.
मित्रांनो हा दरवर्षीचे पॅकेज स्वरूपात आपण पाहू शकतो.

एवढ्या उच्च प्रकारची पॅकेजेस आपल्याला मिळू शकतात त्यामुळे तुम्ही करिअरच्या वाढीसाठी आणि स्थिरतेस या सर्व गरजा पूर्ण करू शकता आणि एक उत्कृष्ट करिअर म्हणून याकडे पाहू शकता.

यामध्ये मुख्य नोकरी कंपन्या
या क्षेत्रातील मुख्य कंपन्या ॲमेझॉन, मायक्रोसॉफ्ट, Deloitte, रिलायन्स जिओ यासारख्या आहेत

यामध्ये मिळणारा सरासरी पगार
बीएससी डेटा सायन्स केल्यानंतर प्रेशर म्हणून तुम्हाला वार्षिक चार ते आठ लाख रुपये पर्यंत पॅकेज मिळू शकते अनुभवानंतर हे वीस लाखाच्या पुढेही जाऊ शकते.

BSc Data Science हा कोर्स का आणि कोणी निवडावा.

आता आपण पाहूया की डेटा सायन्स कोर्स आपण का शिकायचे  तर:
कौशल्य आणि ज्ञान:
अभ्यास करून उत्पादन आरोग्य, सेवा, बँकिंग, वित्त, विपणन, व्यवसाय धोरणे इत्यादी विविध क्षेत्रांमध्ये अभ्यास करण्यासाठी विश्लेषण करण्यासाठी आणि वयांचा अंदाज लावण्यासाठी आवश्यक कौशल्य आपल्याला देतो.

हा कोर्स पूर्ण केल्यानंतर तुम्ही मोठ्या प्रमाणात डेटा हाताळण्यास सक्षम होता तसेच तुम्ही प्रोग्रामिंग, मशीन लर्निंग, डेटा रँकिंग, डेटा इंट्युशन, सॉफ्टवेअर इंजिनिअरिंग, डेटा व्हिज्युअलिजेशन इत्यादी सर्व क्षेत्रांमध्ये तज्ञ व्हाल.

प्रमुख प्रोग्रामिंग लँग्वेजेस किंवा भाषण मध्ये जावा एसक्युएल पायथॉन, आर, एसएएस काला जुलिया मेटलब तसेच टेबलावू आणि इतर साधनांचे ज्ञान समाविष्ट असते.

प्रचंड मागणी

आपण वर पाहिल्याप्रमाणे भविष्यातील व्याप्ती आणि कार्य असते त्याच्या बाबतीत डेटा सायन्स हे जगभरातील सर्वात ट्रेंडिंग नोकऱ्यांपैकी एक आहे.
सध्या या क्षेत्राशी संबंधित पाच लाखांहून अधिक नोकऱ्या उपलब्ध आहेत आणि असा अंदाज आहे की या अक्षता दरवर्षी नोकरीच्या संधीमध्ये किमान 30 ते 40% वाढ होईल.
अमेरिकन नंतर भारत जगातील अनालिसिस केंद्र बनण्याच्या दिशेने पुढे आहे.

पगार
डेटा सायंटिस्ट राष्ट्रीय सरासरी पगार सुमारे 15 लाख ते बारा लाखाच्या आसपास आहे आणि कालांतराने पुरेसा अनुभव असल्यास तो पाच ते दहा वर्षात २० ते २५ लाखांपर्यंत ही जाऊ शकतो.
डेटा सायन्स क्षेत्रातील व्यवसायिकांसाठी किमान टक्केवारी वाढ ही किमान 30 ते 40 टक्के आहे. ॲमेझॉन डीलाईट , पब्लिसियस सापिएंट, कॉग्निजंट आणि इतर सारख्या प्रतिष्ठित कंपन्यांमध्ये ती 70% पर्यंत ही जाऊ शकते.

हे निवडणे उत्तम कारण
भविष्य हे आय आणि डेटावर अवलंबून आहे त्यामुळे तुमच्या  करिअर सुरक्षित राहते.

Bsc Home Science कोर्सची संपूर्ण माहिती 2026 | अभ्यासक्रम, करिअर आणि संधी

BSc Data Science याबद्दल विचारली गेलेली प्रश्न

आर्ट्स किंवा कॉमर्सचे विद्यार्थी हा कोर्स करू शकतात का ?

बहुतांश कॉलेजेस मध्ये बारावी विज्ञान सोबत गणित असणे अनिवार्य आहे तरीही काही खाजगी संस्था कॉमर्सच्या मॅथ्स असलेल्या विद्यार्थ्यांना प्रवेश देऊ शकतात.

यासाठी कोडींग आधीपासून येणे गरजेचे असते का ?

नाही कोडींग तुम्ही कोर्समध्ये सुरुवातीपासून शिकू शकतात फक्त तुमची शिकण्याची तयारी घ्यावी असते.

या कोर्स साठी लॅपटॉप आवश्यक आहे का ?

हो प्रॅक्टिकल्स आणि कोडींग साठी एक चांगला लॅपटॉप असणे फायदेशीर ठरते.

पदवी नंतर लगेच नोकरी मिळते का ?

हो जर तुमची स्किल चांगले असतील आणि तुम्ही इंटरनेटशिप केले असेल तर लगेच नोकरी मिळू शकते.

यामधील maths कठीण असते का ?

यात स्टॅटिस्टिक्स वर जास्त भर असतो जर तुम्ही सराव केला तर ते कठीण जाणार नाही.

डेटा सायन्समध्ये बीएससी करण्यासाठी कोणते कॉलेज सर्वोत्तम आहे ?

नवोन्मेष आणि वास्तविक जगाच्या अनुप्रयोगांवर लक्ष केंद्रित करून, केएसजीआय हे बंगळुरूमधील एक उच्च दर्जाचे अभियांत्रिकी महाविद्यालय आहे जे एआय आणि डेटा सायन्स दोन्ही अभ्यासक्रम देते.

डेटा सायंटिस्ट १ कोटी कमवू शकतो का ?

हो, भारतातील डेटा सायंटिस्ट करोडो कमवू शकतात , पण तरीही ते मिळवणे खूप कठीण आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *