Bsc Home Science हा कोर्स काय आहे ?
बीएससी होम सायन्स हा तीन वर्षांचा अभ्यासक्रमा आहे. यामध्ये पोषण आहारशास्त्र मानवी विकास गृह अर्थशास्त्र वस्त्रोद्योग आणि फॅशन डिझायनिंग तसेच विस्तार शिक्षण यासारख्या विषयांच्या वैज्ञानिक शिक्षणावर भर दिला जातो जे कुटुंबाचे राहणीमान राखण्यासाठी मदत करत असतात. लोकांना असं वाटू शकतं की होम सायन्स म्हणजे फक्त स्वयंपाक किंवा घरकाम शिकवलं जातं तर हे तसं नाहीये हा गैरसमज आहे.
आजच्या काळात बीएससी होम सायन्स हे विज्ञानावर आधारित एक आधुनिक शास्त्र आहे आणि क्षेत्र आहे जे आरोग्य पोषण आणि व्यवस्थापनाचा सखोल अभ्यास करते. होम सायन्स हे विज्ञान आणि कला यांचा असा संगम आहे जो मानवी जीवन आणि पर्यावरण सुधारण्यावर भर देतो यामध्ये आहारशास्त्र बाल विकास आणि फॅशन डिझाईन यासारख्या विषयांचा समावेश होतो. तसेच वस्त्रोद्योग नीतिमत्ता विस्तार शिक्षण कुटुंब गतिमानता बालवर्तन अन्न विज्ञान अन्न आणि पोषण हेही विषय असू शकतात अभ्यासक्रम विद्यार्थ्यांना बाल संगोपन करता किंवा आरोग्य सेवा कर्मचारी बनण्यास मदत करतो.
याचा कालावधी
याचा कालावधी हा साधारणपणे तीन वर्षांचा पदवीचा कोर्स आहे.
याचा हेतू
विद्यार्थ्यांमध्ये आरोग्य, पोषण, आणि व्यवस्थापन यासारखी कौशल्य विकसित करणे हा हेतू असतो.
याचे मुख्य विषय
ह्यातील मुख्य विषय हे न्यूट्रिशन, ह्युमन डेव्हलपमेंट, फॅमिली रिसोर्स मॅनेजमेंट आणि टेक्सटाइल्स हे आहेत.
याची अध्ययन पद्धत
तर या कोर्समध्ये थेअरी सोबत भरपूर प्रॅक्टिकल आणि प्रोजेक्ट पण असतात.
माझ्या मते हा कोर्स बारावी नंतर केला जातो कारण हा डिग्री स्तरावरील कोर्स आहे. – केशव सूर्यवंशी
Bsc Home Science यासाठी शैक्षणिक पात्रता कोणती ?
बीएससी होम सायन्स या कोर्समध्ये प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांनी खालील पात्रता निकष हे पूर्ण करायला हवेत.
बारावी सायन्स मध्ये कुठल्याही प्रवाहामध्ये टेन प्लस टू परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. म्हणजेच पीसीएम किंवा पीसीबी किंवा पीसीएमबी यामधून मान्यताप्राप्त राज्य मंडळ अथवा केंद्रीय मंडळातून बारावी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
तसेच खालीलपैकी कोणत्याही दोन विषयांसह समक्ष परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक आहे –
- कृषी विज्ञान
- भौतिकशास्त्र
- नैसर्गिक विज्ञान
- जीवशास्त्र
- गृहशास्त्रातील व्यावसायिक अभ्यासक्रम
याची पात्रता
विद्यार्थी बारावी सायन्स शाखेतून उत्तीर्ण असावा काही विद्यापीठांमध्ये आर्ट्स किंवा कॉमर्स विद्यार्थी ही प्रवेश घेऊ शकता.
यासाठी कमीत कमी लागणारे गुण
किमान 45% ते 50 टक्के गुण असणे आवश्यक असते बारावी मध्ये परंतु ते प्रवर्गानुसार ही बदलू शकते.
याची वयोमर्यादा
साधारणपणे 17 ते 23 वर्ष
याचा प्रवाह
विज्ञान शाखेतील फिजिक्स केमिस्ट्री आणि बायोलॉजी असलेले विद्यार्थी याला प्राधान्य देतात.
माझ्या माहितीप्रमाणे हे सर्व माहिती तसेच काही कॉलेजेस मध्ये आणखी वेगळे निकषही असू शकतात तर आपण प्रत्येक कॉलेजानुसार त्याचे रिक्वायरमेंट्स चेक केल्या पाहिजे – केशव सूर्यवंशी
Bsc Home Science याची ऍडमिशन प्रोसेस
तर या कोर्स मध्ये ऍडमिशन घेण्यासाठी दोन प्रकार आपण पाहूया.
आपल्या पसंतीचे कॉलेज आपण आधीच शोधून ठेवले पाहिजे त्यानंतर तुम्ही तुमच्या आवडीच्या कॉलेजच्या अधिकृत वेबसाईटला भेट द्या आणि बीएससी होम सायन्स मध्ये प्रवेशासाठी दिलेल्या लिंक वर जा.
अर्ज करण्यापूर्वी तुमच्या किमान पात्रता निकषांच्या गरजा पूर्ण करणारी सर्व आवश्यक प्रमाणपत्रे जसे की गुणपत्रिका प्रमाणपत्रे फोटो ओळखपत्र पुरावा डिजिटल स्वाक्षरी यांचे स्कॅन केलेल्या प्रति गोळा करा.
त्यानंतर फॉर्म काळजीपूर्वक भरा. तो तपासा आणि अपलोड केलेल्या प्रशस्तीपत्रांसह सबमिट करा.
जर इच्छुकांना त्यांच्या पसंतीच्या संबंधित महाविद्यालयाच्या प्रवेश कार्यालयामधून फॉर्म घ्यायचा असेल तर ते फॉर्म घेऊ शकतात आणि योग्य प्रशस्तीपत्र पोस्टाने किंवा लिहून सादर करू शकतात. अर्जा जमा केल्यानंतर त्याची पावती नोंदणी मात्र घ्या आणि भविष्यातील संदर्भासाठी जपून ठेवा.
महाविद्यालय त्या त्या महाविद्यालयांच्या नियमानुसार उमेदवारांची निवड यादी प्रसिद्ध करतील त्याच गुणवत्ता यादी तयार करून प्रसिद्ध करतील त्यामध्ये सिलेक्ट झालेल्या विद्यार्थ्यांचे समुपदेशन केले जाते व डॉक्युमेंट वेरिफिकेशन करून आपण त्यामध्ये प्रवेश घेऊ शकतो.
प्रवेश परीक्षा वर आधारित प्रवेश
यामध्ये आपण संबंधित महाविद्यालयाचे किंवा युनिव्हर्सिटीची प्रवेश परीक्षा देऊन त्यामध्ये चांगले मार्क्स घेऊन आपण गुणवत्ता यादीमध्ये येऊन आपला प्रवेश निश्चित करू शकतो.
यासाठी आपण विविध महाविद्यालयांच्या एंट्रन्स एक्झाम च्या शेड्युलवर लक्ष दिले पाहिजे व त्याचे फॉर्म वेगवेगळे भरले पाहिजेत त्यानंतर त्या परीक्षेचा अभ्यास केला पाहिजे व आपला प्रवेश सोनिश्चित करण्यासाठी योग्य मार्क्स पाडले पाहिजे.
Bsc Home Science टॉपच्या कॉलेजेस मध्ये प्रवेश कसा घ्यायचा ?
महाराष्ट्रामध्ये तसेच भारतामध्ये विविध वेगवेगळ्या कॉलेजेस मध्ये बीएससी इन होम सायन्स शिकवले जाते तुम्हाला तुमच्या पसंतीच्या महाविद्यालयाची यादी काढावी लागेल तर तुम्हाला तुमच्या कॉलेजानुसार तुमचे ठिकाण बदलायचा असेल तर सर्व तारखा आणि सर्व कॉलेजच्या वेबसाईटवर लक्ष ठेवावे लागेल.
वर्षभर आधीपासूनच तयारी सुरू करावी लागेल सर्व महत्त्वाच्या तारखा आणि अंतिम मुदती लिहून ठेवा त्यानंतर प्रवेश प्रक्रियेच्या स्वरूप किंवा त्याची सिस्टीम कशी आहे हे लक्षात घ्या काही ठिकाणच्या प्रवेश परीक्षांच्या तारखा लक्षात घेऊन त्यानुसार अभ्यास सुरू करा.
प्रत्येक कॉलेज साठी चा मागील वर्षीचा कट ऑफ तपासा आणि तुम्ही कुठे आहेत हे जाणून घ्या.
आपण एकाच महाविद्यालयावर अवलंबून असू नये आपल्याकडे कमीत कमी चार ते पाच वेगवेगळे पर्याय शिल्लक असावेत
काही कॉलेजेस हे गुणवत्ता यादी प्रकाशित करण्याच्या दिवशी स्पॉट ॲडमिशन ही देऊ शकतात त्यामुळे तुम्ही अंतिम समुपदेशन डॉक्युमेंट वेरिफिकेशन आणि फी भरण्याच्या प्रक्रियेसाठी तयार असले पाहिजे.
कॉलेजला भेट देताना नक्कीच सर्व प्रशस्तीपत्र ओळखपत्र फोटो यांच्याबरोबर Xerox सोबत ठेवा.
याची पात्रता चेक करा
आधी तुमच्या बारावीच्या गुणांची पडताळणी करा किती मार्क्स आहेत कट ऑफ किती लागू शकतो गेल्यावर्षी कुठल्या कॉलेजचा कट ऑफ किती होता हे लक्षात घ्या.
याचे कॉलेज निवडा
हा तुमच्या आवडीनुसार शिक्षण देणारे कॉलेज शोधून ठेवा कॉलेजचे भरपूर उपाय तयार ठेवा.
यासाठी अर्ज करा
कॉलेजच्या अधिकृत वेबसाईटवर जाऊन फॉर्म भरा.
याची प्रवेश परीक्षा
काही नामांकित संस्था स्वतःची एंट्रन्स एक्झाम घेतात तर काही ठिकाणी बारावीच्या गुणांवर प्रवेश मिळतो ते दोन्ही गोष्टी आपण वर पाहिलेले आहेत.
याचे डॉक्युमेंट वेरिफिकेशन
दहावी बारावीचे गुणपत्रके, रहिवासी दाखला, जातीचे प्रमाणपत्र असल्यास तयार ठेवा तसेच बाकीचेही सर्व ओळखपत्र तयार ठेवा.
माझ्या माहितीप्रमाणे ऍडमिशन प्रोसेस मध्ये काही ना काही चेंजेस होत राहतात या सर्वांची अद्ययावत माहिती आपल्याकडे असणे आवश्यक असते. – केशव सूर्यवंशी
Bsc Home Science याचा कालावधी आणि रचना
हा कोर्स तीन वर्षांचा आहे ज्यामध्ये सहा सेमिस्टर मध्ये तो विभागलेला असतो प्रत्येक वर्षी दोन सेमिस्टर असतात.
काही कॉलेजेस मध्ये हा चार वर्षांचा आहे ऑनर्स कोर्स स्वरूपात उपलब्ध आहे.
याची रचना
प्रत्येक वर्षामध्ये दोन सेमिस्टर असतात सुरुवातीला मूलभूत विषय शिकवले जातात आणि शेवटच्या वर्षात स्पेशललिझेशन निवडता येते व स्पेशल लाईट विषयी शिकवले जातात.
यात तुम्ही काय शिकता
अन्नातील पोषक तत्वे कशी काम करतात मानवी मनाचा विकास कसा होतो आणि फॅब्रिकची निवड कशी करायची हे सर्व तुम्हाला इथे शिकवले जाते.
Bsc Home Science याचे विषय आणि अभ्यासक्रम
खालील टेबल मध्ये तुम्ही तीन वर्षात शिकणाऱ्या विषयांचा आढावा घेतला आहे सेमिस्टर वाईज आपण सर्व सिल्याबस पाहू शकता.
| सेमिस्टर वन | सेमिस्टर टू |
|
|
| सेमिस्टर थ्री | सेमिस्टर फोर |
|
|
| सेमिस्टर फाईव्ह | सेमिस्टर सिक्स |
|
|
यामधील प्रॅक्टिकल्स
बीएससी होम सायन्स मध्ये कुकिंग, लॅब, टेक्स्टाईल, टेस्टिंग, आणि नर्सरी स्कूल विजेट्स या प्रकारचे प्रॅक्टिकल्स असतात.
प्रथम वर्षात काय शिकण्यास मिळते ?
प्रथम वर्षामध्ये तुम्हाला विज्ञानाची मूलभूत तत्वे आणि मानवी विकासाची ओळख दिली जाते.
शेवट वर्षात काय शिकण्यास मिळते ?
शेवटच्या वर्षामध्ये तुम्ही निवडलेल्या विषयात उदाहरणार्थ डायटिक्स किंवा फॅशन या मधले सखोल ज्ञान दिले जाते.
माझ्या मते आपण शेवटच्या वर्षात आपल्या आवडीनुसार स्पेशलिजेशनच्या विषयी निवडला पाहिजे. – केशव सूर्यवंशी
Bsc Home Science याचे कॉलेजेस
महाराष्ट्रामध्ये मुंबई पुणे आणि नागपूर यासारख्या शहरांमध्ये उत्तम कॉलेजेस आहेत जे हाय कोर्स प्रोव्हाइड करतात.
आपण या कॉलेजची लिस्ट पाहूया.
|
सर्व कॉलेजेस चे सरासरी शुल्क
सरकारी कॉलेजमध्ये कमी फी असते तर खाजगी कॉलेजमध्ये ही फी एक लाख रुपयांपर्यंत असू शकते दरवर्षी.
चांगल्या कंपनी मध्ये प्लेसमेंट साठी काय करावे ?
आपण कॉलेजच्या शेवटच्या वर्षाला शिकत असताना शेवटच्या परीक्षेच्या वेळेस नामांकित कंपन्या कॉलेजमध्ये प्लेसमेंट ड्राईव्ह आणू शकतात. तसेच कॉलेजमध्ये असतानाच आपण इंटरनेटशिप करणे आवश्यक आहे त्यामुळे आपल्याकडे इंटरनॅशनल चे प्रमाणपत्र उपलब्ध राहील व त्यावर आधारित आपल्याला प्लेसमेंट लवकरात लवकर मिळू शकते.
Bsc Home Science यामध्ये करिअर आणि संधी
हा कोर्स केल्यानंतर आपल्याला खाजगी तसेच सरकारी क्षेत्रामध्येही मोठ्या प्रमाणावर संधी उपलब्ध आहे.
यामधील सरकारी नोकऱ्या
यामध्ये काही सरकारी नोकरी जसे की फुड इन्स्पेक्टर चाइल्ड डेव्हलपमेंट प्रोजेक्ट ऑफिसर सीडीपीओ किंवा सरकारी रुग्णालयांमध्ये डायटीशियन म्हणून काम करू शकतात.
यामधील खाजगी नोकऱ्या
त्यामध्ये काही खाजगी नोकऱ्या उदाहरणार्थ हॉटेल्स हेल्थ क्लब फूड इंडस्ट्री आणि एनजीओ मध्ये काम करता येते.
यामधून पुढे उच्च शिक्षण
यामधील उच्च शिक्षण तुम्ही एम एस सी होम सायन्स करून रिसर्च अथवा प्रोफेसर बनू शकतात.
यामधून पुढे स्वतःचा व्यवसाय
यामध्ये स्वतःचा व्यवसाय करण्याचे हे भरपूर सांधे उपलब्ध आहेत स्वतःचे डायट क्लिनिक बुटीक किंवा केटरिंग बिझनेस सुरू करता येतो.
आपण काही जॉब प्रोफाइल्स पाहूया.
| ट्रेनिंग फॅशन डिझायनर: प्रशिक्षणार्थी फॅशन डिझायनर म्हणून तुम्ही काम करू शकतात त्यानंतर अनुभवानंतर तुम्ही फॅशन डिझायनर म्हणून वर्क करू शकता कंपनीमध्ये लेबल्स मध्ये किंवा घरामध्ये काम करू शकता. फॅशन डिझायनिंग ला आजच्या जगात भरपूर मागणी आहे. | पगार आठ लाख ते दहा लाख रुपये |
|
न्यूट्रिशनल एक्सपर्ट:डायटेशन म्हणजेच पोषणतज्ञ हा पोषण आणि आहाराशी संबंधित समस्यांकडे लक्ष देण्यासाठी महत्त्वाची व्यक्ती म्हणून रुग्णालय जिम आरोग्य केंद्र आणि पोषण पुनर्वसन केंद्र वृद्धाश्रमांमध्ये काम करू शकतात. |
पगार चार ते सहा लाख रुपये |
| चाइल्ड केअर टेकर: टेक केअर सेंटर मध्ये लहान मुलांची काळजी घेणे त्यांच्या गरजा आणि सुरक्षितता पाहणे मुलांना खायला देणे त्यांची काळजी घेणे कपडे व डायपर घालणे, मुलांच्या गरजा पूर्ण करणे यांचा समावेश होतो तसेच वृद्धाश्रम किंवा अनाथ आश्रमामध्येही जबाबदार व्यक्ती म्हणून काम करतात मुलांना आहार देणे काळजी घेणे व वैद्यकीय गरजा आणि संवाद या यांच्या काही मुख्य जबाबदाऱ्या आहेत. | पगार तीन ते पाच लाख रुपये |
|
हेल्थकेअर वर्कर: समुदाय स्तरावरील आरोग्य कर्मचारी म्हणून काम करू शकतात. यामध्ये सरकारी नोकरी ही उपलब्ध आहे. प्रामुख्याने समुदायांमध्ये मोहिमा, चर्चासत्र, जागरूकता कार्यक्रम, लसीकरण मोहीम इत्यादी आयोजित करण्याची जबाबदारी यांच्यावर असते. |
पगार पाच लाख ते सात लाख रुपये |
| हाउसकीपिंग सुपरवायझर: हॉटेल आणि हॉस्पिटलिटी क्षेत्रामध्ये पर्यवेक्षक म्हणून काम करू शकतात आणि हाउसकीपिंग टीमचा मुख्य म्हणून ही काम करू शकता. | पगार पाच ते सात लाख रुपये. |
Bsc Home Science हा कोर्स केल्यानंतर पुढील संधी
बीएससी होम सायन्स ही सन्माननीय पदी पदवी उमेदवारांसाठी येणाऱ्या संधीसाठी एक पायरी आहे. यामधील विद्यार्थी स्पेशल डायजेशन मध्ये वेगवेगळ्या डिग्री निवडू शकतात त्यांची दोन-तीन वर्षे नोकरी सुरू ठेवू शकतात आणि नंतर पगार वाढण्यासाठी आणि कामाची व्याप्ती वाढवण्यासाठी कोणत्याही करिअर प्रोग्रेस अभ्यासक्रमाची निवड करू शकता.
तुम्हाला बीएससी होम सायन्स नंतर लगेच नोकरी करायची असेल आणि तरी पुढील शिक्षण घ्यायचे असेल तर तुम्ही किंवा यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ या कॉलेजेस द्वारे दुरुस्त शिक्षण घेऊ शकता.
उच्च शिक्षण घ्यायचे असेल तर अन्न आणि पोषण, अन्न विज्ञान, आणि पोषण विज्ञान आणि आहारशास्त्र, क्रीडा, पोषण, मानवी विकास इत्यादी विविध विषयांमध्ये गृह विज्ञानामध्ये एम ए आणि एम एस सी चा अभ्यास करता येतो.
तसेच तुम्ही फॅशन आणि कपड्यांच्या पोशाख डिझायनिंग, इंटरियर डेकोरेशन, डायटेटिक्स, उपयोजित पोषण इत्यादी विषयांमध्ये पदवी उत्तर पदविका अभ्यासक्रम देखील करू शकतात म्हणजेच मास्टर डिग्री देखील करू शकतात.
जर तुम्हाला समुदाय आणि सार्वजनिक आरोग्य क्षेत्रामध्ये तुमची कारकीर्द पुढे नेण्याची इच्छा असेल तर उच्च दर्जाच्या आणि मानवतावादी संस्थांमध्ये प्रकल्प प्रमुख राज्यप्रमुख किंवा प्रादेशिक प्रमुख यांसारख्या पदांवर सामाजिक कार्य किंवा सार्वजनिक आरोग्य या विषयातील पदवी उत्तर पदवी खूप फायदेशीर ठरते.
आपण भरपूर अनुभव घेतल्यानंतर पॉलिसी मेकिंग किंवा हॉस्पिटलिटी मॅनेजमेंट मध्ये एमबीए करणे तुमच्या कार्यासाठी अजून चांगले ठरेल.
यामध्ये मुख्य नोकरी कंपन्या
या क्षेत्रामधील काही टॉपच्या कंपन्या या नेसले ब्रिटानिया किंवा ज्या एफएमसीजी फूड अँड बेवरेज मधील कंपन्या आहेत त्या सर्व कंपन्या तसेच विविध प्रकारचे रुग्णालय व त्यांच्या चेन्स उदाहरणार्थ आपलं या सर्व कंपन्यांमध्ये आपल्याला नोकरी करण्याची संधी मिळू शकते.
यामध्ये मिळणारा सरासरी पगार
यामध्ये सुरुवातीला तुम्हाला चार ते सहा लाख रुपयांपर्यंतचे सुरुवातीचे पॅकेज मिळू शकते अनुभवांना अनुसार हे पॅकेज वाढत जाते.
Bsc Home Science हा कोर्स का आणि कोणी निवडावा.
त्या विद्यार्थ्यांना सायन्स साईडची आवड आहे परंतु ज्यांना पारंपारिक मेडिकल क्षेत्राबाहेर काहीतरी क्रिएटिव्ह आणि सोशल करायचे आहे त्यांच्यासाठी हा पर्याय उत्तम आहे.
याची मागणी
सध्या जगामध्ये फिटनेस आणि हेल्थ विषयी जागरूकता वाढल्यामुळे डायटेशनची प्रचंड मागणी आहे. तसेच फॅशन डिझाइनिंग चेही भरपूर मागणी आहे त्यामुळे या दोन्ही गोष्टी साठी हा कोर्स आपण निवडू शकतो.
हे निवडणे उत्तम कारण
अगर तुम्हाला स्वतःच्या पायावर उभे राहण्यासाठी सेल्फ एम्प्लॉयमेंट साठी सेक्शन बनवतो आणि तीन वर्षांमध्ये तुम्ही ही डिग्री लवकरात लवकर पूर्ण करून स्वतःच्या पायावर उभे राहू शकतो.
Bsc Economics बद्दल संपूर्ण माहिती 2026 । पात्रता, अभ्यासक्रम , कालावधी
Bsc Home Science याबद्दल विचारली गेलेली प्रश्न
होम सायन्स करण्यासाठी आपल्याला नीट Neet परीक्षा द्यावी लागते का ?
या कोर्स साठी सहसा नीट ची गरज नसते बारावी सायन्सच्या गुणांवर किंवा कॉलेजच्या स्वतःच्या प्रवेश परीक्षेवर प्रवेश मिळून जातो.
त्यातून पुढे एमबीए करता येते का ?
नक्कीच हॉस्पिटल मॅनेजमेंट किंवा हॉटेल मॅनेजमेंट मध्ये एमबीए करण्यासाठी हा एक उत्तम पाया आहे.
ग्रामीण भागात या कोर्सचा फायदा होतो का ?
हो नक्कीच ग्रामीण भागामध्ये एक्सटेंशन एज्युकेशन आणि अंगणवाडी पर्यवेक्षक या पदांसाठी या पदवीचा मोठा उपयोग होतो.
हा कोर्स फक्त कुकिंग बद्दल आहे का ?
या कोर्स चा कुकिंग हा फक्त एक छोटा भाग आहे यामध्ये फिजीओलॉजी मायक्रोबायोलॉजी आणि मानसशास्त्र यांसारखे कठीण विषयही असतात.