BSc Economics हा कोर्स काय आहे ?
बीएससी इकॉनॉमिक्स हा सायन्स मधील पदवी चा तीन वर्षांचा पूर्ण वेळ पदवीपूर्व अभ्यासक्रम आहे. देशाची अर्थव्यवस्था कशी चालते महागाई म्हणजे काय ती कशी वाढते किंवा शेअर मार्केट म्हणजे काय शेअर मार्केटचे संपूर्ण नाव लिस्ट त्यामधील वाहणारा पैसा कुठून कुठे जातो वगैरे गोष्टी जर जाणून घेण्यात तुम्हाला रस असेल तर बीएससी इकॉनॉमिक्स हा तुमच्यासाठी उत्तम पर्याय आहे. मान्यता प्राप्त राज्य मंडळातून किंवा केंद्रीय मंडळातून संबंधित विषयांमध्ये बारावी किंवा समक्ष उत्तीर्ण झालेले विद्यार्थी आणि उमेदवारी अभ्यासक्रमासाठी अर्ज करण्यासाठी पात्र आहेत.
बीएससी इकॉनॉमिक्स हा अभ्यासक्रम विद्यार्थ्यांना आर्थिक विश्लेषण, मूलभूत तत्व आणि अर्थशास्त्राच्या प्रिन्सिपल बद्दल संबंधित ज्ञान प्रदान करतो. अभ्यासक्रम पूर्ण झाल्यावर विद्यार्थ्यांना समाजकुटुंब, सरकारी आणि खाजगी क्षेत्र, व्यवसाय आणि सायन्स मध्ये इकॉनोमिकल प्रिन्सिपल कशी लागू केली जातात याची संपूर्ण नॉलेज मिळते.
तसेच हा अभ्यासक्रम पूर्ण केल्यावर विद्यार्थ्यांना बँकिंग आणि वित्त क्षेत्रातील नोकरीच्या अनेक संधी सहज मिळू शकतात. या क्षेत्राला भरपूर मान्यता आहे. तसेच हे क्षेत्र कधीही कमी न होणारे आहे. त्यामुळे यामधील संधी वाढतच राहतील. बीएससी इकॉनॉमिक्स सुरुवातीचा सरासरी पगार पॅकेज दरवर्षी पाच लाख ते दहा लाखापर्यंत असण्याची अपेक्षा असते.
बीएससी इकॉनॉमिक्स हा एक पदवी अभ्यासक्रम आहे जो केवळ सिद्धांतांवर आधारित नसून तो अधिक व्यावहारिक आणि सांख्यिकीय आहे यामध्ये अर्थव्यवस्थेचे विश्लेषण करण्यासाठी गणितीय मॉडेल्सचा वापर कसा करायचा हे शिकवले जाते.
याचा कालावधी
या कोर्स कालावधी साधारणपणे तीन वर्षांचा असतो काही विद्यापीठांमध्ये जिथे नवीन शैक्षणिक धोरण लागू झालेले आहे तिथे चार वर्षांचा देखील असू शकतो.
याचा हेतू
या कोर्सचा मुख्य हेतू आहे तो हा विद्यार्थ्यांना जागतिक बाजारपेठ, बँकिंग आणि आर्थिक धोरणांचे सखोल ज्ञान देणे हा असतो.
याचे मुख्य विषय
या कोर्स मधील काही प्रमुख विषयांचा आपण माहिती घेऊया तर सूक्ष्म अर्थशास्त्र म्हणजेच मायक्रो इकॉनॉमिक्स त्यानंतर मॅक्रो इकॉनॉमिक्स त्यानंतर मॅट्रिक्स आणि गणित हे काही मुख्य विषय आहेत आणि त्यानुसार त्यानंतर बरेचसे सब टॉपिक्स ही पडतात.
याची अध्ययन पद्धत
प्रत्येक कोर्स कॉलेजमध्ये शिकवला जाण्याची पद्धत ही वेगवेगळी असते काही कोर्समध्ये प्रॅक्टिकल नॉलेज हे जास्त महत्त्वाचे असते तर काही कोर्समध्ये थेरॉटिकल नॉलेज हे महत्त्वाचे असते.
मित्रांनो माझ्या माहितीप्रमाणे या कोर्समध्ये लेक्चर सोबत डेटा अनालिसिस आणि केस स्टडीज वर अधिक भर दिला जातो. – केशव सूर्यवंशी
BSc Economics यासाठी शैक्षणिक पात्रता कोणती ?
आपल्याला या बीएससी इकॉनॉमिक्स या कोर्समध्ये ऍडमिशन घेण्यासाठी खालील गोष्टींची शैक्षणिक पात्रता आवश्यक आहे.
याची पात्रता
विद्यार्थी हा मान्यताप्राप्त राज्य मंडळातून अथवा केंद्रीय मंडळातून बारावी उत्तीर्ण असावा तर सायन्स किंवा कॉमर्स या प्रवाहांमधील विद्यार्थी असू शकतो.
यासाठी कमीत कमी लागणारे गुण
या कोर्स साठी लागणारे गुण हे साधारणपणे 50 ते 60 टक्के गुण आवश्यक असतात तर नामांकित कॉलेजमध्ये हे प्रमाण जास्त असू शकते.
याची वयोमर्यादा
या कोर्सला वयोमर्यादा नाही परंतु तरी 17 ते 25 वर्ष एवढी वयोमर्यादा जनरली असू शकते.
याचा प्रवाह
काही टॉप कॉलेजेस जे हा कोर्स प्रोव्हाइड करतात त्यामध्ये विद्यार्थ्यांचा बारावी मध्ये गणित हा विषय असणे आवश्यक आहे किंवा अनिवार्यही केले जाते.
BSc Economics याची ऍडमिशन प्रोसेस
बीएससी इकॉनॉमिक्स कोर्समध्ये प्रवेश हा बारावीत मिळालेल्या गुणांच्या आधारे प्रवेश अधिकाऱ्यांनी तयार केलेल्या गुणवत्ता यादीवर आधारित असतो तथापि काही महाविद्यालय बीएससी इकॉनॉमिक्स प्रोग्राम मध्ये प्रवेशासाठी प्रवेश परीक्षा देखील घेऊ शकतात.
बीएससी इकॉनॉमिक्स मध्ये थेट प्रवेश मिळवण्यासाठी उमेदवारांना बारावी मध्ये उच्च गुण मिळवणे आवश्यक आहे बारावी मध्ये मिळालेल्या गुणांचे आधारे आणि वैयक्तिक मुलाखती विद्यार्थ्यांना पुढील प्रवेश फेरीसाठी शॉर्टलिस्ट केले जाते.
याची पात्रता चेक करा
सर्वप्रथम विद्यार्थ्यांनी त्यांचे बारावीचे गुण आणि गणितातील आवड तपासणी आवश्यक आहे. गणितातील उच्च गुण हे आपल्या पसंतीचे कॉलेज मिळवण्यासाठी खूप मदत करते.
याचे कॉलेज निवडा
मुंबई पुणे नागपूर नाशिक लातूर यांसारख्या शहरांमध्ये काही टॉपचे कॉलेजेस हा कोर्स देतात तर या शहरांमधील स्वायत्त संस्थांची यादी करू शकतात तसेच गव्हर्नमेंट कॉलेजेस आहे पण आपण निवडू शकता.
यासाठी अर्ज करा
कॉलेजच्या अधिकृत वेबसाईटवर जाऊन ऑनलाईन फॉर्म भरा त्या अर्जाची सर्व प्रक्रिया पूर्ण करा काही फीस वगैरे असेल तर तेही भरून घ्या.
याची प्रवेश परीक्षा
सिंबायोसिस किंवा एन एम आय एम एस सारखी कॉलेजेस स्वतःची एंट्रन्स एक्झाम घेतात. त्या एंट्रन्स एक्झाम ची माहिती घ्या आणि त्याची तयारी पूर्णपणे चांगली करून व्यवस्थित एंट्रन्स एक्झाम द्या.
मेरिट लिस्ट
परीक्षा संपूर्ण झाल्यानंतर त्याची किंवा बारावीतील गुणांच्या आधारे मेरिट लिस्ट लावली जाते.
याचे डॉक्युमेंट वेरिफिकेशन
विद्यार्थी मेरिट लिस्ट मध्ये शॉर्टलिस्ट झाल्यानंतर किंवा त्याची निवड झाल्यानंतर दहावी बारावीचे मार्कलिस्ट, डोमिसाईल सर्टिफिकेट, एलसी आणि कास्ट सर्टिफिकेट (लागू असेल तर ) पडताळून घेतले जातात त्यासाठी आपले संपूर्ण डॉक्युमेंट्स तयार ठेवा बाकी इतरही डॉक्युमेंट्स आपल्याला पडताळणीच्या वेळेस दाखवावे लागतील.
BSc Economics याचा कालावधी
बीएससी इकॉनॉमिक्स हा कोर्स सहा सेमिस्टर मध्ये उभारलेला असतो.
याची रचना
या कोर्सची रचना मुख्यत्वे करून पहिल्या वर्षी हे मूलभूत विषय शिकवले जातात आपला पाया पक्का केला जातो आपल्याला इकॉनॉमिक क्षेत्रातील बेसिक गोष्टींची माहिती दिली जाते तर शेवटच्या वर्षी हा स्पेशलायझेशन वर भर दिला जातो.
यात तुम्ही काय शिकता
या कोर्स म्हणून तुम्ही मुख्यत्वे करून केवळ फक्त पुस्तके ज्ञानच नाही तर डेटा इंटरप्रेटेशन आणि पॉलिसी मेकिंग मधील बारकावे शिकता.
BSc Economics याचे विषय आणि अभ्यासक्रम
बीएससी इकॉनॉमिक्स अभ्यासक्रमाचा तपशीलवार अभ्यासक्रम खाली विद्यार्थ्यांमध्ये आपण पाहू शकतो.
| सेमिस्टर वन |
|
| सेमिस्टर टू |
|
| सेमिस्टर थ्री |
|
| सेमिस्टर फोर |
|
| सेमिस्टर फाईव्ह |
|
| सेमिस्टर सिक्स |
|
BSc Economics यामधील प्रॅक्टिकल्स
बीएससी इकॉनॉमिक्स या कोर्समध्ये प्रॅक्टिकल सी तितकेच महत्त्वाचे आहेत. त्यामध्ये एक्सेल किंवा आर किंवा पायथन यासारख्या सॉफ्टवेअरचा वापर करून डेटा अनालिसिस शिकवले जाते.
प्रथम वर्षात काय शिकण्यास मिळते ?
प्रथम वर्षामध्ये अर्थशास्त्राचा पाया मजबूत केला जातो.
शेवट वर्षात काय शिकण्यास मिळते ?
प्रत्यक्ष मार्केटमध्ये काम करण्याचे कौशल्य आणि व्यावहारिक ज्ञान प्राप्त होते.
BSc Economics याचे कॉलेजेस
| कॉलेजेस | फीस |
| फर्ग्युसन कॉलेज पुणे | चाळीस हजार ते पन्नास हजार |
| सेंट झेवियर्स कॉलेज मुंबई | 60 ते 80 हजार |
| सिम्बॉयसिस स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स पुणे | दोन लाख ते तीन लाख |
| गोखले इन्स्टिट्यूट पुणे | एक लाख ते दीड लाख |
सर्व कॉलेजेस चे सरासरी शुल्क
सरकारी अनुदानित कॉलेजेस मध्ये फि कमी असते तर खाजगी संस्थांमध्ये ते जास्त असू शकते.
मध्ये प्लेसमेंट साठी काय करावे ?
चांगल्या कॉलेजमध्ये शेवटच्या वर्षांमध्ये कॅम्पस प्लेसमेंटद्वारे नामांकित कंपन्यांमध्ये नोकरी मिळू शकते.
BSc Economics यामध्ये करिअर आणि संधी
बीएससी इकॉनॉमिक्स केल्यानंतर आपल्याकडे नोकरी आणि बाकी इतर संधीचे खूप मोठे क्षेत्र खुले असते. बीएससी इकॉनॉमिक्स पदवीधर व्यक्तीला बँकिंग वित्त विमा शेअर बाजार सेल्स आणि मार्केटिंग तसेच सल्लागार कंपन्या किंवा सरकारी संस्थांसारख्या कॉर्पोरेशन मध्ये अनेक प्रवेश तरी नोकरी सहज मिळून जातात.
यामधील सरकारी नोकऱ्या
तुम्ही इंडियन इकॉनॉमिक्स सर्विस आयएएस आरबीआय मध्ये ग्रेड बी ऑफिसर किंवा बँकिंग क्षेत्रामध्ये काम करू शकतात.
यामधील खाजगी नोकऱ्या
यामध्ये डेटा अनालिस्ट फायनान्शिअल कन्सल्टंट किंवा बँक बिजनेस रिपोर्टर म्हणून संधी मिळते.
यामधून पुढे उच्च शिक्षण
यानंतर तुम्ही एम एस सी इकॉनॉमिक्स एमबीए फायनान्स किंवा एम ए करू शकता.
यामधून पुढे स्वतःचा व्यवसाय
बीएससी इकॉनॉमिक्स केल्यानंतर तुम्ही फायनान्शिअल प्लॅनिंग कन्सल्टन्सी सुरू करू शकता.
BSc Economics हा कोर्स केल्यानंतर पुढील संधी
बीएससी इकॉनॉमिक्स कोर्स केल्यानंतर काही लोकप्रिय व्यावसायिक नोकऱ्यांनी त्यांच्या संबंधित पगार याची यादी दिलेली आहे.
| शिक्षक |
बीएससी अर्थशास्त्र डिग्री पूर्ण केल्यानंतर विद्यार्थी अध्यापनाचे नोकरी करू शकतात शाळा किंवा इतर शैक्षणिक संस्थांमध्ये विद्यार्थ्यांना अर्थशास्त्र शिकवू शकतात.
|
पगार पाच लाख ते दहा लाख रुपये. |
| सिनिअर टेक्निकल असिस्टंट इकॉनॉमिक्स |
कुठल्याही विभागाचे किंवा कंपनीचे कामकाज सुरळीत व्हावे यासाठी योजनांचे विश्लेषण करण्याची शिफारस करणे आणि अंमलबजावणीचे समन्वय साधने हे वरिष्ठ तांत्रिक सहाय्यकाचे काम आहे.
|
पगार सहा लाख ते आठ लाख रुपये |
| रिसर्च ऍनालिस्ट | रिसर्च ऍनालिस्ट म्हणजेच संशोधन विश्लेषक हे बाजारपेठ ऑपरेशन्स, मार्केट, वित्त किंवा लेखा अर्थशास्त्र, आणि तेजी क्षेत्रामध्ये काम करत आहे त्या क्षेत्राशी संबंधित कोणत्याही डेटाची विश्लेषण संशोधन, अर्थ लावणे, आणि सादरीकरण याची जबाबदारी घेतात. | पगार दहा लाख ते बारा लाख रुपये |
| डाटा एन्ट्री ऑपरेटर |
डेट एन्ट्री ऑपरेटर वेगवेगळे संगणक डेटाबेस मध्ये डेटा इन करणे, रेकॉर्ड व्यवस्थापित करणे आणि देखभाल करणे यासाठी जबाबदार असतात.
|
पगार पाच लाख ते सात लाख रुपये |
यामध्ये मुख्य नोकरी कंपन्या
Deloitte, केपीएमजी एचडीएफसी बँक, आयडीएफसी बँक, आणि अनेक टेक कंपन्या
यामध्ये मिळणारा सरासरी पगार
सुरुवातीचा पगार हा पाच लाख ते सात लाख रुपये असू शकतो आणि तो अनुभवानुसार वाढत जातो.
याचे विडिओ स्वरूप पहा
BSc Economics हा कोर्स का आणि कोणी निवडावा.
सर्वसामाजिक शास्त्राच्या विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध असलेला एक सामान्य पर्यायी म्हणून इकॉनॉमिक्स विद्यार्थी हे पत्रकारिता कायदा इत्यादी क्षेत्रांमध्ये ही नोकरीसाठी जाऊ शकतात.
इकॉनोमिक क्षेत्रामध्ये उच्च शिक्षण घेऊ इच्छिणारे विद्यार्थी या क्षेत्रामध्ये M.Phil. करू शकतात आणि सार्वजनिक आणि खाजगी क्षेत्रात सहजपणे उच्च पद मिळू शकतात.
याची मागणी
सध्याला आर्थिक डेटा विश्लेषण करण्याची मागणी प्रचंड वाढलेली आहे आणि डेटा इज ऑइल असे म्हटले जाते.
यामध्ये मिळणारा पगार
सुरुवातीचा पगार हा पाच लाख ते सात लाख रुपये असू शकतो आणि तो अनुभवानुसार वाढत जातो.
यामध्ये होणारे संशोधन
जर तुम्हाला पीएचडी किंवा रिसर्चमध्ये इंटरेस्ट असेल तर हा उत्तम पाया आहे ज्यावर तुम्ही पुढील गोष्टी करू शकता
हे निवडणे उत्तम कारण
जर तुम्हाला लॉजिकल थिंकिंग आवडत असेल आणि तुम्हाला केवळ न वाचता प्रॅक्टिकल प्रॉब्लेम सोडवायचे असतील तर हे क्षेत्र निवडा तसेच हे आर्थिक क्षेत्र असल्यामुळे सर्व आर्थिक गोष्टींची माहिती लवकर होते त्यामुळे बाकीच्या जगापेक्षा तुम्ही पुढे असू शकतात.
BSc Home Science कोर्सची संपूर्ण माहिती 2026 | अभ्यासक्रम, करिअर आणि संधी
BSc Economics याबद्दल विचारली गेलेली प्रश्न
हो पण तुमच्याकडे बारावी मध्ये गणित असणे अनेक कॉलेजेस मध्ये आवश्यक असते.
बीएससी मध्ये गणित आणि स्टॅटिस्टिक्स वर जास्त भर असतो तर बीए मध्ये आणि सामाजिक पैलू जास्त असतात.
जर तुमच्या घरी चांगले असेल तर हा कोर्स अतिशय रंजक आणि सोपा वाटू शकतो.
बीएससी इकॉनॉमिक्स नंतर परदेशामधील विद्यापीठांमध्ये डेटा सायन्स किंवा इकॉनॉमिक्स मध्ये मास्टर करण्यासाठी खूप जास्त मोठी संधी आहे.
बीएस्सी इकॉनॉमिक्स प्रोग्रॅम केल्यानंतर तुम्ही चार्ट अकाउंटंट, इकॉनॉमिस्ट इत्यादी नोकऱ्या निवडू शकता किंवा तुम्ही एम एस सी इकॉनॉमिक्स किंवा एम ए इकॉनॉमेट्रिक्स यासारखे पुढील शिक्षण देखील घेऊ शकता. BSc Economics आर्ट चे विद्यार्थी हा कोर्स करू शकतात का ?
बीए आणि बीएससी इकॉनॉमिक्स मध्ये काय फरक आहे ?
BSc Economics हा कोर्स अवघड आहे का ?
BSc Economics यानंतर परदेशामध्ये शिकता येते का ?
बीएससी इकॉनॉमिक्स कोर्स नंतर मी काय करू शकतो ?