BSc In Computer Applications कोर्सची संपूर्ण माहिती 2026 | अभ्यासक्रम, करिअर आणि संधी

Key Points hide

BSc In Computer Applications हा कोर्स काय आहे ?

बीएससी कॉम्प्युटर एप्लीकेशन्स हा तीन वर्षांचा पूर्णवेळ पदवी पूर्व पदवी अभ्यासक्रम आहे. यामध्ये कॉम्प्युटरच्या प्रोग्रामिंग लँग्वेजेस, विंडोज ऑपरेटिंग सिस्टिम, वेब डिझाईनिंग आणि इतर गोष्टींबद्दल सखोल ज्ञान मिळू शकते. सॉफ्टवेअर उद्योगातील कोणत्याही आयटी समस्या सोडवण्यासाठी सक्षम असलेले आयटी वेबसाईट तयार करण्यासाठी डिझाईन केलेला आहे.

जर तुम्हाला तंत्रज्ञानाची आवड असेल आणि सॉफ्टवेअर कोडींग किंवा एप्लीकेशन डेव्हलपमेंट मध्ये करिअर करायची असेल तर बीएससी कॉम्प्युटर एप्लीकेशन्स हा तुमच्यासाठी एक उत्तम पर्याय आहे.

यामध्ये प्रामुख्याने कॉम्प्युटर सॉफ्टवेअर आणि त्यांच्या प्रॅक्टिकल वापर या गोष्टींबद्दल मुख्यत्वे करून शिकवले जाते हा कोर्स केवळ थेअरी शिकवत नाही तर प्रत्यक्ष सॉफ्टवेअर कसे बनवायचे आणि कसे वापरले जाते हे शिकवतो.

याचा कालावधी

भारतामध्ये विशेषतः महाराष्ट्रामध्ये हा कोर्स साधारणपणे तीन वर्षांचा असतो जो सहा सेमिस्टर मध्ये विभागलेला असतो नवीन शैक्षणिक धोरणानुसार काही ठिकाणी हा चार वर्षांचा देखील असू शकतो.

याचा हेतू

विद्यार्थ्यांना आधुनिक प्रोग्रामिंग, लँग्वेजेस, डेटाबेस मॅनेजमेंट, आणि वेब डेव्हलपमेंट मध्ये सक्षम करणे.

याचे मुख्य विषय

या कोर्सचे मुख्य विषय हे सी ++, जावा, पायथन, एसटीएमएल डेटाबेस आणि नेटवर्किंग यासारखे विषय असतात.

याची अध्ययन पद्धत

यात वर्गातील शिक्षणासोबत लॅब प्रॅक्टिकल्स वर पण जास्त भर दिला जातो.

BSc In Computer Applications यासाठी शैक्षणिक पात्रता कोणती ?

हा कोर्स करण्यासाठी तुम्हाला काही प्राथमिक शैक्षणिक पात्रता पूर्ण कराव्या लागतात महाराष्ट्रातील बहुतांश महाविद्यापीठांमध्ये खालील निकष पाळले जातात.

याची पात्रता

विद्यार्थी हा बारावी म्हणजेच 10 + 2 उत्तीर्ण असावा काही ठिकाणी सायन्सची मानेवारी असतो तर काही ठिकाणी कॉमर्स अथवा 800 विद्यार्थी ही प्रवेश घेऊ शकतात.

यासाठी कमीत कमी लागणारे गुण

हा कोर्स करण्यासाठी किमान 45 ते 50 टक्के गुण असणे अनिवार्य आहे राखीव प्रवर्गासाठी सवलत असते.

याची वयोमर्यादा

साधारणपणे 18 ते 23 वर्ष मात्र वयाच्या अट एवढी महत्त्वाचे नसते.

याचा प्रवाह

विज्ञान सायन्स शाखेच्या विद्यार्थ्यांना प्राधान्य मिळते विशेषतः ज्यांनी गणित विषय घेतला आहे अशा विद्यार्थ्यांना.

BSc In Computer Applications याची ऍडमिशन प्रोसेस

बीएससी कॉम्प्युटर एप्लीकेशन्स अभ्यासक्रमाचे प्रवेश प्रामुख्याने उमेदवाराच्या गुणवत्तेच्या आधारावर केले जातात काही महाविद्यालय महाविद्यालय प्रवेश प्राधिकरणाद्वारे घेतले जाणाऱ्या प्रवेश परीक्षा गुणांच्या आधारावर आणि त्यानंतर वैयक्तिक मुलाखत स्वतःच्या आधारावर अभ्यासक्रमामध्ये प्रवेश देतात.

बीएससी कॉम्प्युटर एप्लिकेशन्स अर्ज फॉर्म प्रत्येक शैक्षणिक वर्षात मी आणि जून महिन्यात उपलब्ध असतात तुम्ही ऑनलाईन आणि ऑफलाइन दोन्ही पद्धतीने अर्ज करू शकता.

इच्छुक विद्यार्थी ऑनलाईन आणि ऑफलाईन दोन्ही पद्धतीने अर्ज भरू शकतात तुम्ही अर्ज थेट महाविद्यालयाचे परिसरातून मिळू शकतात सर्व वैयक्तिक तपशीलांसह अर्ज काळजीपूर्वक भरा सर्वांच्या तपासणी केल्यानंतर महाविद्यालय प्रवेश अधिकारी एक कट ऑफ यादी जाहीर करतो जर विद्यार्थ्यांनी कट ऑफ अरेंक उत्तरने केला तर तो संबंधित महाविद्यालय किंवा विद्यापीठात प्रवेशासाठी पात्र असतो. निवडलेल्या विद्यार्थ्यांना प्रवेश घेण्यासाठी आवश्यक कागदपत्रे सादर करावी लागतात आणि प्रवेश शुल्क भरावे लागते.

याची पात्रता चेक करा

तुमच्या बारावीच्या गुणांनुसार तुम्ही पात्र आहेत का ते पहा.

याचे कॉलेज निवडा

तुमच्या शहरांमध्ये किंवा पुणे मुंबई सारख्या शैक्षणिक घाब मधील उत्तम कॉलेजची यादी करा.

यासाठी अर्ज करा

कॉलेजच्या अधिकृत वेबसाईटवर जाऊन ऑनलाईन अर्ज भरा.

याची प्रवेश परीक्षा

काही नामांकित कॉलेजेस स्वतःची एंट्रन्स टेस्ट घेतात तर काही ठिकाणी बारावीच्या गुणांवर मेरिट लिस्ट वर आधारित प्रवेश मिळतो.

यात गुण मिळवा

यामध्ये कट ऑफ च्या वर जाण्यासाठी आवश्यक असणारे गुण मिळवा त्यासाठी गेल्या वर्षीच्या कट ऑफ यादीचा आधार घ्या व त्यानुसार आपला अभ्यास पूर्ण वर्षभरासाठी आधीच प्लॅन करून ठेवा व योग्य पद्धतीने परीक्षा पार पाडा आणि चांगले मार्क्स मिळवा.

याचे डॉक्युमेंट वेरिफिकेशन

दहावी बारावीचे मार्कशीट दाखला एलसी जातीचे प्रमाणपत्र डोमिसाईल सर्टिफिकेट इत्यादी कागदपत्रे पडताळून प्रवेश निश्चित होतो त्यामुळे ही सर्व कागदपत्रे तयार ठेवा.

BSc In Computer Applications याचा कालावधी

हा कोर्स तीन वर्षांचा असतो व त्यामध्ये सहा सेमिस्टर असतात.

याची रचना

हा कोर्स सेमिस्टर पॅटर्न मध्ये असतो दर सहा महिन्यांनी परीक्षा होते. सर्व सेमिस्टर चांगले मार्कांनी उत्तीर्ण होणे आवश्यक असते.

यात तुम्ही काय शिकता

पहिल्या वर्षात बेसिक कॉम्प्युटर फंडामेंटल दुसऱ्या वर्षात कोडींग आणि डेटाबेस तर तिसरे वर्षात प्रोजेक्ट वर्क आणि आधुनिक तंत्रज्ञान उदाहरणार्थ क्लाऊड कॉम्प्युटर इंटेलिजन्स या वस्तूंचा समावेश असतो.

BSc In Computer Applications याचे विषय आणि अभ्यासक्रम

सेमिस्टर वन सेम टू
  • इंट्रोडक्शन टू पर्सनल कॉम्प्युटर अँड विंडोज ऑपरेटिंग सिस्टीम
  • एप्लीकेशन सॉफ्टवेअर
  • प्रॅक्टिकल (विंडोज वर्ड एक्सेल पावर पॉइंट)
  • इंट्रोडक्शन टू इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी
  • प्रोग्रामिंग फंडामेंटल
  • प्रॅक्टीकल सी लॅंग्वेज
सेमिस्टर थ्री सेम फोर
  • इंट्रोडक्शन टू वेब डिझाईनिंग वन
  • आर डी बी एम एस युजिंग एम एस एक्सेस
  • प्रॅक्टिकल (एसटीएमएल अँड एम एस एक्स)
  • इंट्रोडक्शन टू वेब डिझाईनिंग टू
  • मॅनेजमेंट इन्फॉर्मेशन सिस्टीम
  • प्रॅक्टिकल वेब डझाईनिंग
सेम फाइव्ह  सेम सिक्स
  • मल्टीमीडिया टूल्स
  • डेस्कटॉप पब्लिकेशन
  • प्रॅक्टिकल्स
  • इंट्रोडक्शन टू लीनक्स
  • इंट्रोडक्शन टू नेट
  • प्रॅक्टिकल (लिनक्स अँड नेट)

आपण याची काही महत्वाची पुस्तके आणि त्यांचे लेखक पाहूया

  • फंडामेंटलस ऑफ कॉम्प्युटर – एस आय ए
  • बेसिक ऑफ कॉम्प्युटर अँड इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी _ डॉक्टर के वेंकटरमण प्रोफेसर प्रवीण जैन
  • इंट्रोडक्शन टू लिनक्स इन्स्टॉलेशन अँड प्रोग्रामिंग _ एन बी वेंकट स्वरालू
  • कॉम्प्युटर फंडामेंटल अँड सी प्रोग्रामिंग _ E. बालागुरुस्वामी

यामधील प्रॅक्टिकल्स

प्रत्येक विषयाला प्रॅक्टिकल लॅब सेशन असते जिथे तुम्ही प्रत्यक्ष कोड लिहायला शिकता.

याचे व्हिडिओ सुरू पहा

प्रथम वर्षात काय शिकण्यास मिळते ?

पाया मजबूत करण्यावर भर दिला जातो.

शेवट वर्षात काय शिकण्यास मिळते ?

इंडस्ट्रीमध्ये कामासाठी लागणारे स्किल्स आणि प्रोजेक्ट पूर्ण केले जातात.

BSc In Computer Applications याचे कॉलेजेस

  • बीपी सोसायटीज अहिल्यानगर कॉलेज
  • जी एस सायन्स आर्ट्स अँड कॉमर्स कॉलेज बुलढाणा
  • कस्तुरी शिक्षण संस्था कॉलेज ऑफ आर्ट्स कॉमर्स अँड सायन्स पुणे शिरूर
  • सेवादल महिला महाविद्यालय नागपूर
  • श्री शिवाजी सायन्स कॉलेज अमरावती
  • विवेकानंद आर्ट्स सरदार दलित सिंग कॉमर्स अँड सायन्स कॉलेज छत्रपती संभाजी नगर
  • यशवंतराव मोहिते कॉलेज ऑफ आर्ट सायन्स अँड कॉमर्स पुणे
  • फर्ग्युसन कॉलेज पुणे
  • एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटी डब्ल्यू पी यु पुणे
  • डी वाय पाटील विद्यापीठ पुणे
  • सर परशुराम भाऊ कॉलेज पुणे
  • सूर्यदत्त कॉलेज ऑफ मॅनेजमेंट इन्फॉर्मेशन रिसर्च अँड टेक्नॉलॉजी पुणे
  • एमसीसी मुलुंड मुंबई
  • राजर्षी शाहू महाविद्यालय लातूर

सर्व कॉलेजेस चे सरासरी शुल्क

एकूण कोर्स साठी साधारण 70 हजार ते तीन लाखांपर्यंत खर्च येऊ शकतो.

मध्ये प्लेसमेंट साठी काय करावे ?

चांगल्या कॉलेजमध्ये शेवटच्या वर्षात कॅम्पस इंटरव्ह्यू होतात जिथे कंपन्या थेट विद्यार्थ्यांना नोकरी देतात.

BSc In Computer Applications यामध्ये करिअर आणि संधी

यामधील काही नोकरी आणि त्यांचे जॉब प्रोफाइल्स पाहूया.

मोबाईल एप्लीकेशन डेव्हलपर मोबाईल ॲप्लिकेशन डेव्हलपरची मुख्य भूमिका म्हणजे जावा c++ यासारख्या भाषांचा वापर करण्यासाठी पीसी तज्ञ आणि आर्किटेक सोबत काम करणे आणि प्रोग्रामिंग साठी मूलभूत तपशील तयार करणे त्यांना ग्राहकांसाठी दोषपूर्ण ॲप्लिकेशनची चाचणी करणे समस्या निवारण करणे आवश्यक आहे. पगार दहा लाख ते वीस लाख रुपये
कॉम्प्युटर प्रोग्रामर मुख्य जबाबदारी म्हणजे प्रोग्रामिंग लिहिणे, C ++ जावा इत्यादी भाषांच्या स्क्रिप्टिंग करणे त्यांना कोड लायब्ररी वापरून विद्यमान प्रकल्पांचा विस्तार करावा लागतो जेणेकरून ते प्रोग्रामिंग रचना सहजपणे सुधारू शकतील. पगार 15 लाख ते वीस लाख रुपये.
कॉम्प्युटर ऑपरेटर संगणक ऑपरेटर हे एक प्रभारी असताचे संस्थेतील वेगवेगळ्या निरीक्षण नियंत्रण करण्यासाठी जबाबदार असतात पगार पाच लाख ते आठ लाख रुपये

यामधील सरकारी नोकऱ्या

तुम्ही एमपीएससी यूपीएससी देऊ शकता किंवा बँकिंग क्षेत्रामध्ये आयटी ऑफिसर म्हणून काम करू शकता.

यामधील खाजगी नोकऱ्या

आईटी कंपनी टीसीएस इन्फोसिस विप्रो मधे सॉफ्टवेयर डेवलपर टेस्ट तुर्की वास सपोर्ट इंजीनियर

यामधून पुढे उच्च शिक्षण

तुम्ही एमसीए, मास्टर ऑफ़ कंप्यूटर एप्लीकेशंस, एमएससी (cs) करून स्वताचे करियर खूप मोठे बनवू शकता.

यामधून पुढे स्वतःचा व्यवसाय

फ्रीलान्सिंग किंवा स्वतःची सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट फॉर्म सुरु करू शकता.

BSc In Computer Applications हा कोर्स केल्यानंतर पुढील संधी

बीएससी कॉम्प्युटर एप्लीकेशन कोर्स यशस्वीरित्या पूर्ण केल्यानंतर पदवीधरांकडे करिअरचे भरपूर पर्याय उपलब्ध असू शकतात.

विद्यार्थ्यांना उच्च शिक्षण घ्यायचे असेल तर ते कॉम्प्युटर एप्लीकेशन्स कॉम्प्युटर सायन्स माहिती तंत्रज्ञान इत्यादी कोणत्याही विषयातील संबंधित पद उत्तर पदवी अभ्यासक्रम करू शकतात ते कॉम्प्युटर प्रोग्रामिंग मध्ये पदवी उत्तर पदवी किंवा एमसी अभ्यासक्रम देखील निवडू शकतात.

यामध्ये मुख्य नोकरी कंपन्या

गुगल मायक्रोसॉफ्ट टीसीएस  cognizant टेक महिंद्रा

यामध्ये मिळणारा सरासरी पगार

आकाश केल्यानंतर सुरुवातीला वार्षिक पगार हा पाच ते सहा लाख रुपये पर्यंत मिळू शकतो अनुभवानंतर तो सहज दहा ते पंधरा लाखांच्या पुढे जातो.

BSc In Computer Applications हा कोर्स का आणि कोणी निवडावा.

जय विद्यार्थ्यांना लॉजिक वापरून समस्या सोडवण्याची आवड आहे त्यांच्यासाठी हा कोर्स सर्वोत्तम आहे.

बीएससी कॉम्प्युटर एप्लीकेशन्स पदवीधारकांना आयटी क्षेत्रामध्ये खूप मोठी मागणी आहे ते सी प्लस प्लस जावा इत्यादी विविध संगणक प्रोग्रामिंग लँग्वेजेस मध्ये प्रवीण झालेले असतात.

त्यांना त्यांचे ज्ञान प्रगत स्तरावर वाढवण्यासाठी एम एस सी कॉम्प्युटर एप्लीकेशन सीएमसीए इत्यादी उच्च शिक्षण घेण्याची संधी मिळू शकते.

अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर विद्यार्थी आयटी कंपन्या सॉफ्टवेअर कंपन्या वेबसाईट इंटरनेट मार्केटिंग कंपन्या इत्यादी प्रमुख भरती क्षेत्रामध्ये संभाव्य करियर संधीचा लाभ घेऊ शकतात.

त्यांना सहसा मोबाईल एप्लीकेशन डेव्हलपर संगणक प्रोग्राम वर संगणक ऑपरेटर सीनियर एप्लीकेशन सपोर्ट अनालिस्ट कॉम्प्युटर एप्लीकेशन म्हणून नियुक्त केले जाते.

याची मागणी

जग डिजिटल होत आहे त्यामुळे आयटी प्रोफेशनल ची मागणी कधीच कमी होणार नाही.

यामध्ये होणारे संशोधन

ए आय आणि डेटा सायन्स मध्ये संशोधनाच्या भरपूर संधी उपलब्ध आहेत.

हे निवडणे उत्तम कारण

कमी वेळेत आणि कमी खर्चामध्ये आयटी क्षेत्रामध्ये प्रवेश करण्याचा हा उत्तम मार्ग आहे.

BSc Medical कोर्सची संपूर्ण माहिती वाचा .  

BSc In Computer Applications याबद्दल विचारली गेलेली प्रश्न

मला गणित आवडत नाही तर मी हा कोर्स करू शकतो का ?

हो बेसिक गणित आवश्यक असले तरी कोडींग मध्ये लॉजिक जास्त महत्त्वाचे असते सरावाने तुम्ही हे शिकू शकता.

हा कोर्स केल्यानंतर परदेशामध्ये नोकरी मिळू शकते का ?

नक्कीच पण त्यासाठी तुम्हाला एमसीए किंवा एखादा स्पेशलिस्ट कोर्स करणे आवश्यक ठरेल.

कोडींग जमत नसेल तर इतर काही पर्याय आहेत का ?

हो तुम्ही टेस्टिंग डेट एन्ट्री ऑपरेशन्स किंवा नेटवर्क ऍडमिनिस्ट्रेशन मध्ये करिअर करू शकता.

बारावी आर्ट्स मधून झाले असेल तर प्रवेश मिळतो का ?

काही खाजगी विद्यापीठे आर्टच्या विद्यार्थ्यांना प्रवेश देतात मात्र सायन्स किंवा कॉमर्स असणे अधिक सोयीचे ठरते.

प्लेसमेंट साठी काय तयारी करावी लागते ?

तुमचे कम्युनिकेशन स्किल सुधारण्यावर आणि कोडींग प्रॅक्टिकल्स वर लक्ष केंद्रित करा व या गोष्टींमध्ये जास्तीत जास्त सुधारणा करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *